वाहन विमा काळाची गरज | Vehicle Insurance In Marathi 2022

वाहन विमा काळाची गरज | Vehicle Insurance In Marathi | what is vehicle insurance in marathi

भरमसाठ लोकसंख्या व धावपळीने भरलेल्या आपल्या या शहरामध्ये नोकरी मिळवणे व ती टिकवणे अगदी मुश्कील झाले आहे .आगगाडीचा प्रवास असो वा बस मध्ये प्रवास करणे किंवा रिक्षाचा साधासुधा प्रवास असो ते पण सर्वच जिकरीचे झाले आहे शाळा कॉलेज ऑफिस मध्ये वेळेवर पोहोचणे आवश्यक असते जर स्वतःचे वाहन असेल तर मग आपण हवं तेव्हा गरजेनुसार जाऊ येऊ शकतो ग्रामीण भागात तर वाहन अत्यावश्यक सेवेमध्ये गणले गेले आहे पण या महागाईत वाहन घेणे व ते सांभाळणे परवडत नाही व त्याचा नीट वापर करणे मुश्कील होते.

Vehicle Insurance In Marathi
Vehicle Insurance

घाईगडबडीत गर्दीच्या ठिकाणी सर्वच एकत्र कार्यालयाच्या वेळेत निघत असतात त्यामुळे कितीही म्हटले तरीही आपली चूक असो वा नसो अपघात हा होऊ शकतोच त्यामुळे आपल्याबरोबरच इतरांच्या वाहनाचे सुद्धा नुकसान होते

आता आपण वाहन नुकसानीची कारणे तरी कोणती ती पाहूया:

  • रस्त्यावरून जाताना आपले स्वतःचे वाहन असो किंवा दुसऱ्याचे आपण गर्दीमुळे व वाढत्या औद्योगिकरणामुळे कधी अपघातात सापडून व जखमी होऊ शकतो
  • एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण सावधतेने वाहन चालवित असू तरीही समोरच्या वाहन किंवा परिस्थितीमुळे अपघात घडू शकतो
  • कारण काहीही असो पण नुकसान आपलेही होतेच शारीरिक किंवा वाहन दुरुस्ती वर चा खर्च डोईजड होऊन बसतो
  • नैसर्गिक कारणाने देखील वाहन दुर्घटनाग्रस्त होऊ शकतात
  • भूकंप असो ,पूर ,भूसखलन यामुळे सुद्धा वाहनांचे नुकसान होत होते पण करावे तरी काय ?
  • चोरीसारख्या गोष्टी आहेतच सर्व आपत्तीपासून सांभाळून लॉक करून ठेवलेली मोटार दोन चाकी किंवा तत्सम गाडी जेव्हा चोर पळून नेतात त्यावेळी गाडी मालकाच्या मनाचा विचार न केलेलाच बरा. कारण कीती स्वप्ने पाहून आवडीने बचत करून ती गाडी तो घेत असतो त्याच्यासाठी ती त्याची मौल्यवान संपत्ती असते मग त्याचे संरक्षण करावे तरी कसे??

वरील कारणांचे एकच उत्तर होऊ शकते ते म्हणजे योग्य विचार करून आपल्या गरजा पाहून काढलेला वाहन विमा होईल आणि तेच सुज्ञपणा चे ही ठरते पण हा वाहन विमा ( vehicle insurance in marathi ) आहे तरी काय??

वाहन विमा | what is vehicle insurance in marathi

वाहन विमा म्हणजे चारचाकी वाहन असो किंवा दुचाकी ट्रक रिक्षा गाड्या कार यांच्या अनेक प्रकार यांच्या दुर्घटनेत नुकसान झाले असेल तर त्यांची नुकसानभरपाईचे संरक्षण देण्याचे काम ही विमा कंपनी घेते आणि आर्थिक नुकसान भरून देते आणि त्यालाच आपण विमा म्हणू शकतो .

पण ,विमा कंपनी च्या अटी व नियम असतातच निश्चित वेळेत व निश्चित प्रीमियम भरून विमाधारक आपल्या गाडीचे नुकसान भरून काढतो व कोणत्याही दुर्घटनेत किंवा आपत्तीत आपण निर्भय होऊ शकतो

वाहन विमा का काढावा:

  • नैसर्गिक आपत्तीपासून म्हणजेच पूरग्रस्त ठिकाणी तसेच भूकंप भूसखलन अशा ठिकाणी आपल्या वाहनाचे अपघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी आर्थिक नुकसान याची भरपाई मिळण्यासाठी आपण विमा काढला पाहिजे
  • आपल्या वाहना बरोबरच दुसऱ्या वाहनाची टक्कर झाली किंवा अपघात झाला आणि त्या अपघातात आणखी कुणी तिसऱ्या वाहनांचेही नुकसान झाले तर अशा वेळी दुहेरी तिहेरी आर्थिक नुकसान वाहनचालकास होऊ शकते परंतु जर त्याने त्या प्रकारचा विमा काढला असेल तर त्याच्या गाडीच्या नुकसान भरपाई बरोबरच समोरच्या व तिसऱ्या गाडीच्या नुकसानभरपाईचे ही आर्थिक जोखीम उचलण्याचे काम विमा कंपनी घेऊ शकते
  • मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहन चालक त्याच्या मोटारीचा विमा काढणे आता आवश्यक म्हणजेच अनिवार्य झाले आहे ज्या व्यक्तीने तो काढला नसेल तर त्यांना वाहतूक पोलिसांनी पकडण्यास दंडही होऊ शकतो

कार इन्शुरन्स खेळण्याचे फायदे काय आहेत? याचा आता आपण विचार करु-

  • अपघात झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणाने दुर्घटनाग्रस्त झाल्यास गाडीची जोखीम उचलण्याचे काम ही विमा कंपनी घेते
  • आपल्या गाडीने दुसऱ्या गाडीला ठोकले आणि त्यात समोरची गाडी ला इजा पोहोचली गेली असेल तरी त्याचे नुकसान भरून देण्याचे काम सुद्धा विमा कंपनी करते
  • आपल्याच गाडीमुळे जर एखादी व्यक्ती मृत्यू पावली किंवा तिला अपंगत्व आले तरीसुद्धा तिची आर्थिक जबाबदारी उचलण्याचे काम विमा धारकाची विमा कंपनी करते
  • आपल्या वाहनाचे नुकसान झाले असेल तर आपण विमा कंपनीकडे दावा करून आपल्या गाडीचे वेळ उतरवलेली रक्कम मिळू शकतो

वाहन विमा व त्याचे प्रकार:

भारतात वाहन खरेदी केल्यानंतर त्याचा वाहन विमा घेणे आता अनिवार्य केले गेले आहे मग तुम्ही दोन चाकी चार चाकी किंवा कोणत्याही व्यावसायिक कामासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या घ्या त्यासाठी वाहन विमा घेणे आवश्यकच आहे

1 तृतीय पक्ष विमा योजना:

तृतीय पक्ष विमा योजना आपल्या वाहनाच्या मुळे जर तिसऱ्या गाडीचे नुकसान झाले असेल तर त्यासाठी विमा कंपनी त्या गाडीला नुकसान भरपाई देते उदंड रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे या व्यक्तीची मारुती गाडी आहे व त्याची व समोरच्या दुसऱ्या कारची टक्कर झाली असता मोठ्या दुर्घटनेमुळे आणखी तिथे आजूबाजूला असलेल्या तिसऱ्या
 गाडीचेही नुकसान झाले तर त्याचाही विमा काढला नुकसानभरपाई दिली जाते

  • ज्याची कार आहे अशा व्यक्तीने थर्ड पार्टी विमा काढणे अनिवार्य आहे आपल्या  वाहना मुळे जर कुणा तिसऱ्या व्यक्तीच्या भौतिक संपत्ती चे किंवा त्याच्या वाहना चे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले असेल तर त्या मुळे विमा कंपनीकडून तिसऱ्या व्यक्तीचे नुकसान भरपाई मिळते
  • स्वतःच्या वाहना मुळे कोणा तिसऱ्या व्यक्तीला शारीरिक इजा किंवा अपघातात मृत्यू झाला असेल तरीसुद्धा विमा कंपनी सर्व नुकसानीची जबाबदारी घेते व दुसऱ्या
  •  वाहकाचे चे व वाहनाचे नुकसान ही भरून देते
  • परंतु गाडी वाहकाचे सदा चे नुकसान किंवा शारीरिक जखमी झाला असेल तर मात्र या पॉलिसी द्वारे विमा कंपनी ती जबाबदारी घेत नाही आताच्या नियमानुसार कार घेतल्यास तीन वर्ष व टु विलर घेतल्यास पाच वर्ष तृतीय पक्ष  विमा योजना घेणे अनिवार्य आहे

व्यापक विमा कव्हर:

या विमा प्रकारात स्वतःच्या गाडीचे काही दुर्घटनेमुळे नुकसान झाल्यास तिसऱ्या व्यक्तीच्या गाडीची नुकसान भरपाई तर मिळतेच पण तुमच्या स्वतःच्या वाहनांचेही जे काही नुकसान झाले असेल किंवा तुम्हाला ही काही शारीरिक इजा पोहोचली असेल तर त्याची जबाबदारी त्याची जोखीम ही विमा कंपनी उचलते म्हणजेच दोन्ही गोष्टी साध्य केल्या जातात स्वतःचे नुकसान ी भरून निघते आणि आपल्यामुळे दुसर्‍या कुणाच्या वाहनाचे किंवा कुठल्या संपत्तीचे नुकसान झाले असेल तर तेसुद्धा विमा कंपनीमुळे मिळून जाते त्यामुळे हा व्यापक विमा कवर चांगला समन्वय साधणारा ठरतो

वाहन भारत थर्ड पार्टी इन्शुरन्स बरोबर एक वर्षाचे ऑन डॅमेज कवर पण घेऊ शकतात किंवा थर्ड पार्टी व त्यासाठी वेगवेगळी माहिती देऊ शकतात पण एकत्रीकरणामुळे अपघातग्रस्त वेळी स्वतःचे व दुसऱ्याचे नुकसान भरून काढणारा हा विमा कधीही चांगला नाही का?

वैयक्तिक अपघात विमा:

वैयक्तिक अपघात विमा हा विमा घेणे पण वाहन चालकाला अनिवार्य आहे यामध्ये चालक व त्याच्या गाडीत बसलेले अन्य प्रवासी यांना पण सहभागी केले आहे एखाद्या वाहनांमध्ये चालका समवेत काही माणसे बसली असता मृत यांचा मृत्यू झाला किंवा त्यांना अपंगत्व आले तर त्याची जबाबदारीही विमा कंपनी उचलते त्यांना जवळ जवळ पंधरा लाख रुपयांपर्यंत विमा घेणे आवश्यक ठरतो

प्रीमियम भरण्यासाठी कोणते निकष वापरले जातात-

वाहन विमा घेताना आपण प्रीमियम भरतो त्यावेळी काळ कोणत्या कंपनीचे आहे हे पाहिले जाते
वाहनाला विकत घेऊन किती वर्षे झाली आहेत हे पण महत्त्वाचे ठरते
गाडी साठी कोणत्या प्रकारचे इंधन वापरले जाते उजळता पेट्रोल डिझेल किंवा गॅस तेही पाहिले जाते
विमाधारक व्यक्ती कुठे राहतो
विमा धारकाचे वय त्याचे व्यवसाय त्याच्या जबाबदार्‍या यावरूनही प्रीमियम ठरविला जातो

कोणकोणत्या गोष्टींचा वाहन विमा काढताना विचार होतो

1 दुर्घटना घडल्यावर विमाधारकाच्या वाहनाचे किती आणि केवढे नुकसान झाले आहे हे पाहिले जाते
2 कोणत्या कारणाने वाहनांचे नुकसान झाले आहे तेही महत्त्वाचे ठरते उधळता आग लागणे अपघात वगैरे…..

वाहन विमा येताना त्या गोष्टी या गोष्टी चा समावेश होत नाही-

1 वाहनाचा अपघात हा जरी विमा दाव्यासाठी ग्राह्य मानला गेला असेल तरीही स्वतःहून कार दुसऱ्यावर काढणे किंवा ती  तुटेल याचा प्रयत्न करणे स्वतःहून नुकसान करणे वगैरे अपवादच मानले जाऊन अशा गोष्टींसाठी विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही
2 वाहनामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असेल वायरी मुळे गाडी बंद पडली तर हा खर्च वाहन विम्यात मिळत नाही
3 वाहन चालवताना खूपवेळा टायर फुटणे मध्ये काही बिघाड किंवा समस्या उद्भवू नये असे होऊ शकते पण तेही या विमा मध्ये समावेश होऊ शकत नाही

Reed Also : फोन पे लोन कसे घ्यावेत 

ऑनलाईन सेवा उपलब्ध कशी करता येते-

  • ऑनलाइन विमा घेताना काय करावे लागते
  • प्रत्येक गोष्ट विचार करून व निर्णय पडताळून नच घेतला पाहिजे मग तो कोणताही विमा खरेदी करायचा झाला तरी
  • ऑनलाइन योजना उपलब्ध असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यालयात खेटे मारावे लागत नाही त्यामुळे कोरोना च्या काळातील लॉक डाऊन व सोशल डिस्टन्स सारखे नियम आपण पाळू शकतो
  • तुम्ही ऑनलाईन वेगवेगळ्या विमा कंपन्या व त्यांचे नियम अटी आपल्याला हवे असलेले संरक्षण पाहून ती योजना घर बसल्या निवडू शकतो
  • निरनिराळ्या कंपन्यांच्या योजनेची एकमेकांशी तुलना करू शकतो व त्यात सर्वात चांगली ही योजना आपण आपल्या गरजेनुसार घेऊ शकतो
  • सोपी कार विमा रिनीवल योजना आपण पाहू शकतो
  • कव्हरेज किती मिळते ते पण आधी पहावे
  • प्रीमियम दर काय आहे किती आहे तो आपल्याला परवडण्यासारखा आहे का तेही पहाव
  • प्लेन रेणु करतेवेळी परत इतर विमा कंपनीच्या काही नवीन योजना किंवा त्यात नवीन फायदे दिसून येत आहेत का ते ही पडताळावे
  • आपण सहज ऑनलाइन प्रक्रिया विमा संदर्भात करू शकतो का ते ही पहावे
  • जोखीम किंवा संरक्षित करणारा विमा नीट विचारांचीच आपण निवडावा

वाहन विमा दावा कसा करावा:

वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या गाडीचे नुकसान होऊ शकते जसे की आग लागणे अपघात होणे नैसर्गिक आपत्ती चोरीहोणे अशी अनेक कारणे असू शकतात पण त्यामुळे आपल्या किमती गाडीची दुरुस्तीसाठी आपल्याला फारच मोठा पैसा मोजावा लागतो पण आपण त्या वेळी योग्य वाहन विमा काढला असेल तर नक्कीच अशा आपत्तीच्या शणी आपल्याला ने जास्त राहता येऊ शकते

होतं एकच की आपण काढलेल्या हे विमा योजनेत आपल्या आपत्ती संदर्भातील नावे जोडलेली आहेत का त्या अटी मध्ये आपण बसलो तर आणि तरच आपल्याला विमा दावा केल्यावर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते

1 आपल्या व विमा कंपनी मधील करार पत्रे कागदपत्रे विमा कंपनीला दुर्घटना झाल्यानंतर सादर करावी
कोण कोणती कागदपत्रे ती पुढील प्रमाणे
A विमा योजनेची एक प्रत
B एक एफ आय आर पोलिसांकडे पाठवावी
C पत्रक नीट भरून सही करावी
D आपले ड्रायव्हिंग लायसन ची एक प्रत द्यावी
दुरुस्ती कोणती व केवढी करावी लागेल याचे अनुमान काढावे E स्वतः किंवा दुसऱ्या झालेल्या दुखापतीची नोंदही करावी
 F  इतर सर्व लहान-मोठे खर्च यांची सविस्तर नोंद ठेवावी

विमा कंपनी देत असलेले फायदे-

  • ठराविक कंपनी च्या वाहन विमा काढला तर त्या कंपनीच्या नेटवर गॅरेजवर गाडी दुरुस्त केली तर तो खर्च डायरेक्ट विमा कंपनी त्या  गॅरेजला देतील
  • काही ठराविक शहरात जास्तीत जास्त तीन दिवसाच्या दुरुस्तीच्या कालावधीत निशुल्क ने -आण करण्याची सुविधाही ऑफर केली जाते
  • छोट्या-मोठ्या गोष्टी  म्हणजेच किरकोळ गोष्टींची दुरुस्ती करण्याची जोखीमही काहि विमा कंपनी उचलतात त्याचाही आपल्याला खूपच फायदा होतो.

नक्की वाचा : Pravasi Bharatiya Bima Yojana In Marathi

अशाप्रकारे आजच्या औद्योगिकरण व धकाधकीच्या तसेच कोरोना च्या काळात आपण आपल्या काही खास गोष्टींचा विमा काढला तर त्याचे संरक्षण होईलच आजच्या काळात वाहन ही पण आपली एक गरज व संपत्ती म्हणून गणली जाते जाते बचत करून आपण एक एक पैसा जोडून आपल्या गाडीचे स्वप्न पूर्ण केलेले असत पण आकस्मिक येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी जर आपण वाहन विमा ( vehicle insurance in marathi )काढला असेल तर पण सहर्ष निर्भयपणे आपत्ती शी दोन हात करू शकतो

2 thoughts on “वाहन विमा काळाची गरज | Vehicle Insurance In Marathi 2022”

Leave a Comment