ट्रक विमा योजना | Truck Insurance In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण ट्रक विमा योजना म्हणजेच truck insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

वाहतुकीची साधने:
- माणसाला अनेक कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते
- कधी एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वाहतूक करावी लागते
- मग त्यासाठी तो वेगवेगळ्या वाहतूक साधनांचा म्हणजेच गाड्यांचा उपयोग करत असतो
- जसे की मालाची ने-आण करण्यासाठी ट्रक ,टेम्पो
- माणसांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा, सायकल, आगगाडी, बस मोटर्स
- अशा जमिनीवरून चालणाऱ्या साधनांची एक भलीमोठी यादी बनू शकते
वाहतुकीची साधने व उपयोग:
- लवकरात -लवकर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी
- जास्तीत -जास्त माल सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी
- कितीतरी उपयोग सांगता येतील
- एकाच -वेळी जास्तीत -जास्त लोकांना एकत्रितपणे वाहनां मुळे एकाच ध्येयाकडे वाटचाल करता येते
व्यापारी व वाहतुकीची साधने:
- व्यापारी मंडळींनी आपला माल एका शहरातून किंवा गावातून तसेच राज्यातून देशांतर्गत कुठे पाठवायचा झाल्यास
- अनेक वाहतुकीच्या साधनां पैकी एकाची मदत घ्यावी लागते
- ट्रक ,टेम्पो ,रिक्षा टेम्पो आणि तरल पदार्थांसाठी टॅंकर अशी
- पण अगदी खात्रीलायक व मजबूत साधन म्हणून आपण ट्रक कडेच पाहतो.
ट्रक आणि सुरक्षा ( what is truck insurance in marathi ) :
- ट्रक हा भलामोठा आकाराचा व मजबूत असे साधन असतो
- तो जास्तीत जास्त सामान उचलून देऊ शकतो
- आणि त्यामुळे व्यापारी मंडळींचा तो लाडकाच असतो
- अशा या ट्रक मध्ये त्यांनी टनाने माल भरलेला असतो
- व तो व्यवस्थित पॅकिंग करून पाठविला जातो
- एकदा माल भरून ट्रक निघाला की व्यापाऱ्यांना थोडी निश्चितता लाभते
- पण हायवे वरून निडरपणे, जलद गतीने धावणारे ,मोठ-मोठे अवजड सामान भरून जाणारे ट्रक पाहिले
- की रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांच्या’ जिवाचे पाणी पाणीच’ होते
- मी -मी म्हणणारी लोकही रस्ता ओलांडताना पहिल्यांदा ट्रक ने आधी जाणेच पसंद करतात
ट्रकचे संरक्षण व धोके:
ट्रक हे वाहतुकीचे साधन ज्यावेळी वापरले जाते
तेव्हा पुष्कळ लांबचा पल्ला गाठावयाचा असतो
★अशावेळी डोंगराळ भागातून वळणावळणातून मार्गक्रमण करावे लागत असते
★अशावेळी –
दरड कोसळणे,
अतिवृष्टीमुळे ट्रक दरीत पडणे, अति पूरग्रस्त परिस्थितीत सापडणे,
भूकंप झाल्यामुळे,
वीज पडल्यामुळे
अशा अनेक नैसर्गिक कारणांमुळे ट्रक ला धोके उत्पन्न होऊ शकतात
★ मानवनिर्मित धोके ही असतातच –
मत्सर किंवा
कोणी माथेफिरू तुडुंब भरलेल्या ट्रकना आग लावून देऊ शकतात
माल प्रचंड प्रमाणात भरला असल्याने ट्रक पहाडी भागातून किंवा सुनसान रस्त्यातुन रात्री-अपरात्री प्रवास करीत असतो
अशा वेळी मोठ्या प्रमाणात
- चोरी डकेती होण्याचेही प्रमाण जास्त असतेच
- कित्येक ट्रक ड्रायव्हर यांचा स्वतःचा ट्रक असतो तो चोरीत जाऊ शकतो
- किंवा सामानाची देखील चोरी होऊ शकते
- काही ट्रक ड्रायव्हर फक्त ड्रायव्हर म्हणूनच काम करत असतात त्यांचा स्वतःचा ट्रक नसतो
- अशा सर्व नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? हा एक प्रश्न असतो
विमा एक संरक्षण दाता:
- ट्रक ड्रायव्हरच्या ट्रक व मालाच्या नुकसानाची जोखीम फक्त विमा योजनेद्वारे होऊ शकते
- व त्यामुळे ट्रक मालक व सामान पाठवणाऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळत असल्याने दिलासाही मिळू शकतो
व्यवसायिक वाहन विमा योजना ( truck insurance in marathi ) :
★ ट्रक मधून सामान ,मालाची ने- आण करण्यासाठी जो विमा वापरतात तो व्यावसायिक वाहन विमा या योजनेअंतर्गत येतो
★ कारण ट्रक हे व्यापाऱ्यांच्या सामानाची ने-आण करण्याचे मुख्य वाहतुकीचे साधन मानले जाते
★ ही विमा योजना ड्रायव्हरांना अनेक प्रकारच्या आपत्तीत मदत करत असते
★आपत्ती :
1 नैसर्गिक आपत्ती :
(पूर ,भूकंप ,वीज पडणे) ★मानवनिर्मित आपत्ती:
( अपघात, चोरी,आग लावणे….. वगैरे)
ट्रक मालकांची गरज:
- ★ ट्रक मालकांना देशांतर्गत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक व्यापाऱ्यांचा माल पाठवायचा किंवा आणावयाचा असतो
- ★ ट्रक जरी तो प्रत्यक्ष त्या वेळी चालवत नसला तरीही ट्रक ड्रायव्हर ,ट्रक व क्लिनर मधील मालांची सर्व जबाबदारी ही त्याच्यावरच असते
- ★ ट्रक व्यवस्थित ठरलेल्या ठिकाणी जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्या मनाला अस्वस्थता व डोक्यावर प्रचंड ताणही असतो
- ★कारण बहुतेकांची स्वतःच्या ट्रकची संख्याही खूप अधिक असते
- ★ असे दोन-तीन ट्रक व त्यावर लादलेला माल यांची जोखीम ही तेवढीच जास्त असते
- ★परंतु ट्रक मालकांनी जर ट्रक साठी विमा योजना घेतली असेल तर मात्र त्याचा सर्व ताण हा उचलतो मनाला हि निश्चितता असते
- ★ कारण जर नुकसान झालेच तर त्याची सर्व जबाबदारी ही विमा कंपनी आपल्या वर घेते
- ★ त्यामुळे ट्रक मालक किंवा व्यापाऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागत नाही
- ★ विमा कंपनी त्याला आर्थिक मदत करते
व्यावसायिक वाहन विम्याचे ट्रक मालकांना संरक्षण:
★नैसर्गिक आपत्ती ट्रक वर उद्भवल्यास विम्याचे संरक्षण मिळते
★ म्हणजे आर्थिक नुकसान भरपाई मिळते
★झालेले नुकसान हे विमा कंपनी भरून काढते
★त्यामुळे स्वतःच्या खिशावर भार न पडता ते नुकसान भरपाई म्हणून घालावे लागणारे पैसे
★ तो पुढे भवितव्याचा लागणाऱ्या व्यापार्याच्या प्रगतीसाठी वापरू शकतो
★याचाच अर्थ आपल्या पडत्या काळात विमा आपल्याला परत स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करते
★ तृतीय पक्षाची सुरक्षा: अपघातग्रस्त ट्रक मुळे जर रस्त्या शेजारील दुकान ,व्यक्ती किंवा इतर गोष्टींचे नुकसान झाले असेल
★ तर त्या वेळी त्या तृतीय पक्षाच्या नुकसानीची जोखीम ही विमा योजना उचलते
ट्रक मध्ये ने-आण होणारे सामान :
- पशू-प्राणी यांना मोठ्या संख्येने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे किंवा आणणे
- घर बदलताना लाकडी सामान किंवा इतर वस्तूंची ने-आण करणे
- मोठ्या कारखान्यांना लागणारा कच्चामाल किंवा पूर्ण झालेला पक्का माल पोहोचवणे
- कुठे बांधकाम चालू असेल तर सिमेंट ,विटा ,लोखंडी सिमेंटचे पिलर्स ,टाइल्स अशा जड वस्तू पोहोचवण्यात मदत करणे
- नदीकिनारी पुष्कळदा रेती ,वाळू प्रचंड प्रमाणात बांधकामाच्या ठिकाणी पाठवली जाते त्याची ने-आण करणे
विमा कंपनी कडे असावी लागणारी ट्रक ची माहिती:
- राज्यातील कोणत्या गोष्टीसाठी कोणते वाहन हे वाहतुकीचे साधन हवे ते पहावे
- कोणती गाडी वापरली जाते हेही पाहिले जाते
- त्याचे मॉडेल ही पाहून
- व त्याची वयोमर्यादा याचाही विचार केला जातो
व्यवसायिक ट्रक विमाचे ( what is truck insurance in marathi ) धोरण:
1 उत्तरदायित्व धोरण:
- जर ट्रक चालवताना काही कारणाने ट्रकला अपघात झाला व त्यामुळे ट्रक ड्रायव्हर किंवा समोरच्या पक्षाचा कोणी व्यक्ती मरण पावला
- किंवा त्याला शारीरिक इजा झाली तर त्या नुकसानाची जोखीम या धोरणाद्वारे होते
- यात तृतीय पक्षाची जबाबदारी घेतली जाते
नक्की वाचा : E And O Insurance In Marathi
2 पॅकेज धोरण:
★ या विमा योजनेच्या धोरणात ट्रकचे अपघातात किंवा आपत्तीत झालेले हर प्रकारचे नुकसान अंतर्भूत होत असते
●ट्रकचे प्रकार ( types of truck in marathi ) :
1 हलक्या वजनाचा ट्रक
2 मजबूत माल नेणारा ट्रक
3 छोटा ट्रक
4 मध्यम ट्रक
1 हलक्या वजनाचा ट्रक:
हा वजनाने एकदम हलका असतो यामध्ये जवळच्या अंतरावर पोहोचवणाऱ्या माल पोहोचविला जातो
2 मजबूत माल नेणारा ट्रक:
या ट्रक च्या साह्याने बांधकाम व्यवसायासाठी लागणारे अवजड सामान वाळू वैगरे ने-आण करण्यास मदत होते
3 मध्यम आकाराचा ट्रक:
जास्त छोटा ही नसतो किंवा खूप मोठा ही नसतो
थोड्याफार वजनाचे सामान, घर बदलताना असणारे फर्निचर वैगरे उचलण्यास हा ट्रक कामी येतो
4 छोटा ट्रक :
ट्रक सर्वात छोट्या आकाराचा असतो
त्यात छोटे-मोठे सामान भरण्यास मदत होते
त्याचे भाडे ही कमी असते
● कोणत्या गोष्टींना संरक्षण मिळत नाही :
- जर ट्रक ड्रायव्हर गाडी चालवताना अपघात झाला किंवा त्याच्या ट्रकचे नुकसान झाले
- व तो विमाधारक असल्याने त्याने विमा दावा केला
- परंतु ट्रक चालवताना ड्रायव्हिंग लायसेन्स त्याच्याजवळ नसेल तर विमा कंपनी त्याला कोणतीही मदत करत नाही
- खूप वेळा दिवस-रात्र महिनोन्- महिने प्रवास चालत असतो
- काही ट्रक ड्रायव्हर हे कंटाळून ड्रग ,दारूच्या आहारी जातात
- अशा परिस्थितीत काही घटना घडली तर विमा कंपनी ही संरक्षण देत नाही
- स्वतः जर आपल्या गाडीचे मुद्दाम होऊन नुकसान केले असेल व ते विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले विमा कंपनीकडून संरक्षण मिळत नाही
- काही वेळा ट्रक मालक आपल्या ट्रक साठी ड्रायव्हर ठेवतात
- ते म्हणावे तशी ट्रक ची काळजी घेत नाही
- त्यामुळे त्यांच्या बेजबाबदारपणे गाडी चालवल्याने नुकसान झाले तरीही विमा संरक्षण मिळत नाही
- ट्रक ड्रायव्हर कडे एक ठराविक वेळी पोहोचायचे लक्ष दिलेले असते
- ट्रक मधील सामान ठराविक दिवसात पोहोचवायचा असतो
- किंवा सतत ड्रायविंग केल्यामुळे तेही कंटाळून लवकरात- लवकर घरी पोहोचण्याच्या प्रयत्नात-
- वाहतुकीचे नियम ,सूचना किंवा काही धोके समोर दिसल्यानंतर ही ट्रक चालवत असतील
- आणि अशा परिस्थितीत अपघात झाल्यास आणि ट्रकला नुकसान झाल्यास विमा कंपनीत या नुकसानाची हमी घेत नाही
- तो नुकसान खर्च हा ट्रक मालकालाच सोसावा लागतो.
विमा दावा कसा करावा?
- विमा योजना पत्रक स्वतःबरोबरच ठेवावे
- त्यातील माहिती व विमा योजना क्रमांक विमा कंपनीला अपघात झाल्यास त्वरित कळवावे
- अपघातग्रस्त ट्रक कुठे आहे ?ती जागा कुठे आहे? त्याचा पत्ता ही लगेच कळवा
- अपघात कधी ?कोणत्या तारखेला? व कोणत्या वेळी झाला ?याची ही सर्व माहिती विमा कंपनीला त्वरित द्यावी
- कारण विमा कंपनी आपल्या सुजाण व सतर्क अधिकाऱ्यांना सुरुवातीला पाठवून सर्वेक्षण करते
- की हा अपघात कोणत्या प्रकारात मोडतो ?
- व ही नुकसान भरपाई विमा कंपनीने भरावी का?
- व आपल्या योजनेच्या नियमात या प्रकारचे नुकसान बसते का?
- मगच विमाधारकाला विमा कंपनी विमा दावा केल्यानंतर योग्य आर्थिक नुकसान भरपाई देऊ करते
★ ट्रक ड्रायव्हर साठी दूरच्या प्रवासात खूप सारे सामान लादून, मोठा प्रवास करणे व जोखीम बाळगणे हे काही सोपे काम नाही
★ जर व्यवस्थित ड्रायविंग करायचे असेल किंवा व्यवसाय करायचा असेल तर आपले डोकेही विचार करण्यासाठी शांत व संयमी असायला हवे
★ आणि विमा योजना चा स्वीकार केल्यामुळे ही शांती ट्रक ड्रायव्हर किंवा ट्रक मालकांना मिळू शकते
★म्हणून योग्य विचार करून, योग्य माहिती काढून, योग्य वेळी ट्रक मालकांनी आपल्या आवश्यकतेनुसार ट्रक विमा योजना नक्की निवडावी आणि त्याचा फायदा घ्यावा.
Visit Also : MayMarathi.com
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण Assurance ट्रक विमा योजना | Truck Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा
Tags : Truck Insurance ,ट्रक विमा योजना | Truck Insurance In Marathi ,
1 thought on “ट्रक विमा योजना | Truck Insurance In Marathi 2022”