मोबाईल विमा योजना | Mobile insurance in marathi 2022

मोबाईल विमा योजना | Mobile Insurance In Marathi | what is mobile insurance in marathi

Mobile Insurance : नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण मोबाईल विमा योजना म्हणजेच mobile insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Mobile insurance in marathi
Mobile Insurance

● मोबाईल फोन हा आज सर्वांचीच अत्यंत गरजेची वस्तू झाली आहे .
तो लहान-मोठा ,गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता कसाही असो, किंमत कमी असो किंवा जास्त पण सर्वजण आपल्याकडे मोबाईल फोन बाळगतातच!
पण, त्याच्या संरक्षणासाठी कोणती उपाययोजना करतात?
अनेक विमा कंपनी नी त्यांच्यासाठी काही विमा योजना सुरू केल्या आहेत .
त्या कोणत्या? व त्या कोणते संरक्षण देतात?
याची आपण माहिती वाचलीच पाहिजे-

◆ अशा मोबाइल फोनची गरज आपल्याला खरंच असते का?
◆ त्यांचे प्रकार काय?
व उपयोग किती आहेत?
याचाही आपल्याला अंदाज आहे का?

आता आपण पाहू या मोबाईल फोनची खरंच आपल्याला गरज आहे का?

तर हो खरच आज आपल्याला त्याची गरज आहे .मग ती व्यक्ती गरीब असो वा स्त्री असो वा पुरूष एखादे मूल !
सर्वांना मोबाईल फोन ची गरज ही जाणवते. कारण ,

  • एकमेकांशी वार्तालाप करणे,
  • संवाद साधणे
  • खात्रीशीर संदेश देण्याचे एक माध्यम हा फोन द्वारे आपण करू शकतो
  • जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात असलेल्या आपल्या प्रियजनांचे किंवा मित्रांशी आपण बोलू शकतो ,ख्यालीखुशाली त्यांची घेऊ शकतो .
  • व्यापार करून त्याचे फोटो पाठवून, पैसेही देणे-घेणे करू शकतो.
  • एकमेकांना बघून बोलण्याची सुविधाही फोन मध्येच आहेच!
  • जर एखादे मूल दुसऱ्या देशात किंवा राज्यात शिक्षणा साठी किंवा नोकरी दरम्यान गेले असेल, तर अशावेळी त्याच्या कुटुंबीयांना त्याच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचे मिळालेले समाधान आणखी कशात असू शकते?

मोबाईल चे प्रकार आणि उपयोग:

  • मोबाईल फोन हा तर फक्त संवाद साधण्याचे माध्यम म्हणूनच होता
  • पण आता स्क्रीन टच मोबाईल मुळे आपण एकमेकांना बघू शकतो
  • बँकिंग व्यवहार करू शकतो
  • नवनवीन बाजारपेठेत येणाऱ्या फोन मध्ये काहीतरी नवीन सुविधा ही असते
  • अगदी माफक किमतीत असलेला फोन हा फक्त बोलणे व संदेश पाठवणे इतक्या साठीच आपण उपयोगात आणू शकतो
  • पण जास्त अशा त्याच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत,
  • तशा त्यांच्या उपयुक्ततेचा ही खूप फरक आलेला दिसून येतो
  • काही फोन आपण बघू शकतो, काही टाइप स्वरूपात मोठी स्क्रिन असते
  • तर काही वही सारखे फोन आपण उघडू शकतो त्याच्या की पॅड वर लिहू शकतो
  • आयफोन ची तर किंमत लाखो मध्ये असते

● आशा या मोबाईल फोनची गरज अत्यावश्यकच झालेली दिसून येते त्यामुळे नवनवीन फोनच्या किमती किंवा त्यामध्ये असणारे वैयक्तिक माहिती फोटो यामुळे ही तो महत्वाचा बनलेला आहे
◆ अशा वेळी त्याच्या सुरक्षिततेसाठी काय बरे करता येईल?
◆ विम्याची साथ दिल्यावर निश्चित तो संरक्षित होईल नाही का?

फोन व सुरक्षितता |Mobile insurance :

  • आपण फोन मध्ये असलेल्या विविध वैयक्तिक व गोपनीय माहितीमुळे तसे त्याच्या असणाऱ्या किमतीमुळे त्याला सुरक्षित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो
  • पण तरीसुद्धा आपल्यापेक्षा तो चोरू पाहणाऱ्या व्यक्ती अधिक चाणाक्ष असतात, नाही का?
  • अशावेळी त्या फोनची सुरक्षितता किंवा संरक्षण प्राप्त करण्यासाठी खरंच कोण आपली मदत करू शकतील ?

★ विम्याची साथ व संरक्षण ( what is mobile insurance in marathi ) :

  • विमा कंपनीने मोबाइल साठी ही संरक्षण म्हणून विमा योजना सुरू केली आहे त्याच्याबद्दल ही थोडक्यात माहिती आपण घेऊ
  • मोबाईल फोनचा विमा ही काढू शकतो हे कित्येकांना अजून माहितीही नसेल
  • आपण किती स्वप्न बाळगून महागडे फोन घेत असतो आणि तेच फोन जर हरवले, चोरीस गेले तर आपले आर्थिक नुकसान तर होणारच ना?
  • पण लोकही विमायोजना घेताना तेवढे उत्सुक नसतात पण आज त्याने ही जागरूकता दाखवली पाहिजे !
  • कारण आपली बँकिंग डिटेल्स, काही फोटो, गोपनीय माहिती त्यात सेव्ह केलेली असते
  • काही वेळा आपण आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे च्या इमेजेस ही त्यात ठेवलेल्या असतात
  • भारतात तर तरुणांमध्ये एक पत तयार करण्यासाठी स्टेटस म्हणून दुसऱ्यावर इंप्रेशन मारण्यासाठी नवनवीन फोन खरेदी करण्याचा कल वाढू लागला आहे
  • पण अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यात अंतर्भूत असल्यामुळे त्याचा विमा काढणे आवश्यक ही आहे

विमा योजना म्हणजे काय?

  • एखाद्या विमा कंपनी द्वारे काढलेल्या विमा योजनेमध्ये आपल्या फोनची सर्व प्रकारची सुरक्षितता अंतर्भूत केलेली असते
  • त्या फोनचा अंतर्गत बिघाड झाला असल्यास किंवा तो चोरीस गेल्यास ही महत्त्वाची कारणे ठरतात
  • अशा धोक्यांपासून आर्थिक संरक्षण देण्याचे काम ही विमा योजना करत असते
  • कारण प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार चांगल्यात चांगला फोन घेण्याचा प्रयत्न करत असतात
  • व त्याची किंमत ही अधिक असते कित्येकदा इ .एम. आय. मुळे त्या फोनची किंमत परवडत नसतानाही व्यक्ती तो खरेदी करण्यास शक्य होते
  • पण अशा फोनचे जर नुकसान झाल्यास खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो
  • पण त्याचा विमा काढला असेल तर नक्कीच आपल्याला आज आर्थिक संरक्षण मिळेल

मोबाईल फोन ला कोणत्या गोष्टी पासून धोका असू शकतो?

◆ विमा योजना कशा प्रकारे त्याचे संरक्षण करू शकते ?याचाही आपण विचार करू-

मोबाईल फोन व धोके:

1) चोरी होणे :
फोन अत्यंत महाग असल्याने व अत्यावश्यक सुविधा असल्याने त्याची खरेदी करण्याचा कल ही खूप असतो
अशावेळी चोरी करून दुसऱ्याला किमतीपेक्षा कमी पैशात तो विकला जाऊ शकतो
2) अपघात:
आजकाल तरुण वर्गाला मोटरसायकलवरचं फिरणे सोयीस्कर वाटते .त्यामुळे फोन पडणे, तुटणे ,स्क्रीन क्रॅक होण
हे साहजिकच नुकसानिस कारणीभूत ठरते
3) पाण्यात पडणे :
खूप वेळा तरुणाई समुद्रामध्ये वर फिरायला वैगेरे गेल्यावर सेल्फी काढताना दिसतात आणि त्यावेळीही पाण्यात फोन पडू शकतो .अशा गोष्टीमुळे फोनची नुकसान होऊ शकते
अर्थात कोणत्याही फोनच्या दिवाइसेचे होणारी आतील खराबी व बाह्य धोके( पडणे, फुटणे, चोरी होणे) या सर्वांचा विचार या योजनेत केला जातो

ही विमा योजना कशा प्रकारे संरक्षण करते ? |  mobile insurance in marathi

★ जर एखादा डिवाइस हरवला किंवा चोरीला गेला तर फक्त आपण पोलिस कंप्लेंट करून तो मिळण्याबाबत साशंक राहतो व दुसऱ्या फोन साठी परत आर्थिक प्रश्न की भेडसावू शकतो
★ जर विमाधारकाने फोन साठी विमा योजना घेतली असेल तर त्याचा फोन खराब झाल्यावर विमा योजना तुम्हाला तुमच्या आधी च्या कंपनीचा च फोन नवीन घेऊन देऊ शकते
★ त्यामुळे पैशाचा ताण विमाधारकाला घ्यायची गरज नसते
★ अनेक संकट धोक्यापासून फोनचे संरक्षण देण्याचे काम हे विमा योजना करत असते
★ पावसाळ्यात काही वेळा आपल्या फोनवर पाणी पडल्यामुळे तो बिघडला तर विमा कंपनी त्याचेही नुकसान भरपाई देते
★जर तुम्ही आपल्या घर किंवा गाडीला व्यवस्थित बंद केले असेल, आणि तरीही तुमच्या घरून किंवा गाडीतून त्याची चोरी झाली असेल तर त्याचीही नुकसान भरपाई विमा कंपनी देऊ करते.

● हे आपण पाहिले की आपल्या मौल्यवान मोबाईल ला कोणत्या धोक्यापासून विमा कंपनी सुरक्षित करते .

★ पण अशाही काही गोष्टी मध्ये विमा कंपनी संरक्षण देऊ इच्छित नसते:
त्या कोणत्या ते ही आपण पाहू-

1) जर फोन कसा चोरीस गेला? ही शंका असली तर?
म्हणजे चोरीला नक्की गेला आहे ना ? याची खात्री विमा कंपनी नक्की करत असते
2) कधीकधी जुना फोन झाल्यावर विमाधारक मुद्दामच नाटक ही करून फोन चोरी झाल्या ची बतावणी करून नवीन फोनची मागणी करू शकतो
3) काही वेळा आपण रात्री बॅटरी चार्ज करण्यासाठी तसाच चार्जिंगला ठेवून झोपतो व तो ओवर चार्जिंग होऊन फुटू शकतो या कारणामुळे ही विमा कंपनी नुकसान भरून देत नाही
5)जाणून-बुजून वादावादीत किंवा मारामारी करताना जर फोन चे मुद्दामहून नुकसान केले गेले असेल तर त्याचीही भरपाई मिळत नाही

विमा योजना राबविणाऱ्या अनेक विमा कंपनी या वेगवेगळे संरक्षण देऊ करतात-

1) काही विमा कंपनी या फक्त फोनच्या अंतर्गत सुविधा मध्ये फक्त खंड पडल्यास भरपाई द्यायच्या
2)तर काही विमा कंपन्या या एखाद्या संचासाठी मिळून मदत करतात- त्यात फोन बरोबरच घरातील महत्त्वाची अन्य उपकरणे ही अंतर्भूत होत असतात
3) सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाइल कंपन्या वॉरंटी/ गॅरंटी या काही महिने किंवा वर्षासाठी मर्यादित ठेवतात
4) पण किमती फोन कंपनीच्या मर्यादेनंतर जर नुकसान झाले तर विमा योजना द्वारे विमाधारकाच्या मोबाईल फोन मधील गोपनीय माहिती किंवा फोटो संरक्षित रहावे म्हणून तर विमा कंपनी फोन ला आतून कनेक्ट करून तो बंद करणे किंवा त्याला मेसेंजर बनवून त्याला शोधून काढण्याची शक्कल लढवते

नक्की वाचा : Director And Officer Liability Insurance India In Marathi

विमा योजना एकदा स्वीकारल्यानंतर फोनची नुकसान झाल्यास आपण विमा दावा करू शकतो-

★ विमा दावा करतेवेळी-
1) एखाद्या मोबाईल फोन ला काही नुकसान झाले तर लगेचच सुरुवातीला पोलिस कंप्लेंट करायला हवी
2) नंतर त्वरित ही बाब विमा एजंट द्वारे किंवा विमा कंपनीला त्वरित कळवावी कारण विमा दावा करतेवेळी ही वेळेची मर्यादा मानली जाते
3) कोणत्या कारणामुळे नुकसान झाले ते कारण ही सविस्तर कळवावे
4) काही पुरावे असल्यास तेही व्यवस्थित सुखरूप आपल्या सोबत ठेवावे
5) कागदपत्रे ची लिस्ट किंवा खूप सारी असण्याची गरज नाही
6) परंतु काही महत्त्वाची कागदपत्रे तर जवळ असायलाच हवीत ! -जसे मोबाईलचे बिल वगैरे..
7) जर व एक वर्षापर्यंत विमा दावा करण्याची विमाधारकावर पाळी आलीच नाही
8) पण, विमाधारक नियमित हप्ते भरत असला तर त्याचा परतावा म्हणून त्याला काही अन्य आर्थिक सुविधा मिळू शकत नाही

◆ फोन घेऊन वर्ष झाली तरी त्याचे विमा कंपनी द्वारे संरक्षण होईल का?
हा अनेकांना प्रश्न भेडसावत असतो किंवा
◆काही मर्यादाही आहेत का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास आता आपण प्रयत्न करू-

★ हो आपण आधी वाचलं असालच ,की जर मोबाईल फोनची मर्यादा ही फोन कंपनी द्वारे संपली तरीही विमा कंपनी त्याला संरक्षित करू शकते
★ जर आपण मुंबईत फोन घेतला तसेच मुंबईतूनच विमा योजना घेतली पण कामानिमित्त राज्याबाहेर किंवा देशाबाहेर गेलो तर मर्यादा पडते का ?
★ म्हणजे फोन हरवला, तुटला, खराब झाला किंवा चोरीस गेला तरी विमा कंपनी संरक्षण देते का?
★ तर हो आर्थिक स्वरुपात आपल्या फोनला संरक्षण हे मिळतेच
★ अपघात झाला असल्यास ही आपल्याला दुसरा नवीन त्याच कंपनीचा डिवाइस किंवा कॅशलेस सुविधा मिळू शकते
★ जर एक/ दोन वर्षापर्यंत विमा दावा करण्याची पाळी विमाधारका वर आली नाही पण तो नियमित विमा कंपनीचे हप्ते भरत आहे तर त्याला नवीन योजनेमुळे काही हप्त्याची रक्कम मिळाली जाते

विमा योजना झाली आता सुलभ……

★ ऑनलाईन च्या मदतीने आजची covid-19 ची परिस्थिती सर्व बाजूनी धोक्यामध्ये गुरफटत चाललेली दिसून येत आहे
★जीवित हानी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न तर आहेतच!
★ पण अशावेळी आपले बहुमुल्य उपकरण ही सुरक्षित राहावेत म्हणून उपाय योजना ही करण्याकडे भर वाढलेला आहे
★ त्याच्या पुरावा म्हणजे फोनची विमा योजना होय
★पण या काळात –

  • वेगवेगळ्या विमा कंपनीत जाऊन माहिती काढणे,
  • फॉर्म भरणे ,
  • प्रवास करणे
  • बँकेत जाऊन पैशाची सोय करणे
    सहज शक्य होत नाही
    ★अशा वेळी ऑनलाइन सुविधेद्वारे आपण याचा सहज लाभ घेऊ शकता.

जर तुम्हाला वर्षभरासाठी हीच विमा योजना घ्यायची झाल्यास घर बसल्या तुम्ही हे काम करू शकता-

★ आपल्या फोन मध्ये स्क्रीन टच सारखे ॲप जोडून घ्या
★त्याद्वारे विमा कंपनी विमाधारकाच्या फोनची आतील किंवा बाहेरून झालेली हानी पाहू शकते
★ विमाधारकाकडे असलेल्या दुसऱ्या फोन नंबर वरून स्वतःचा फोन कसा आहे ?
★याचा एक व्हिडिओ पाठवा
★ त्याच्यामुळे विमा कंपनी आपल्या कार्यालयातूनच तपास करू शकते की आधीपासूनच काही बिघाड त्यात नाही ना?
★ किंवा काही नियम विमा कंपनीचेअसल्यास तेही तुमच्यापर्यंत सोयीस्करपणे पाठवू शकते
★ जर तुम्ही सर्व विमा कंपनी चे नियम व अटी पाहून ती योजना घेण्याचे निश्चित केले असेल
★ तर विमा योजना ते निश्चित झाल्यावर त्यांची ठरलेली रक्कम विमाधारकाने ऑनलाइन पाठवल्यावर विमा योजनेस विमाधारकाला विमा कंपनी सहभागी करून घेतल्याचे पत्रक तुमच्या इमेल द्वारा पाठवते
★ व जिथे आहोत तिथेच सहज योजना घेऊन आपण विमाधारक बनू शकता

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण मोबाईल विमा योजना | Mobile insurance in marathi  बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा

Visit Also : hindishaala.in

Tags : Mobile insurance ,मोबाईल विमा योजना | Mobile insurance in marathi ,mobile insurance acko ,mobile insurance information , mobile insurance company list , mobile insurance companies in india , mobile insurance india for theft, मोबाईल विमा योजना

1 thought on “मोबाईल विमा योजना | Mobile insurance in marathi 2022”

Leave a Comment