विमा हे एक सुरक्षा कवच होय | What Is Insurance In Marathi 2022

विमा हे एक सुरक्षा कवच होय | What Is Insurance In Marathi | types of insurance in marathi

what is insurance in marathi : आपल्याला भविष्यातील किचकट व कठीण प्रसंगात एक सुरक्षा कवच म्हणून कामास येऊ  शकतो जसा आपला एखादा जीवश्चकंठश्च मित्र असतो जो सुखदुःखात आपली साथ न सोडता कायम आधार बनू पाहतो तसाच हा विमा पण परंतु विम्यात आणखी गोष्ट आहे तो आपल्या बरोबरच आपण नसतानादेखील आपल्या कुटुंबाचा आधार होऊ शकतो विमा आपलं सुरक्षाकवच कसं हे समजण्यासाठी त्याची माहिती आपल्याला हवीच नाही का विमा ( what is insurance in marathi ) हा आपल्याला येणाऱ्या आकस्मित प्रसंगात मदत करतो मग नैसर्गिक परिस्थितीमुळे आलेले संकट असले तरी जर अति पावसामुळे पूर येणे तसेच शॉर्टसर्किट सारख्या घटनेमुळे घर किंवा कारखान्यात आग लागणे अपघातात गाडीचे किंवा व्यक्तीचे नुकसान होणे स्वतःचा मृत्यू होणे अशा न सांगता येणाऱ्या आपत्तीमुळे आपण कोलमडून जाऊ शकतो

मानसिकता कितीही ठेवावे म्हटली तरी एक यक्षप्रश्न उभा असतो तो म्हणजे पैसा खूप वेळा आपण पाहतो की असे दुःखद प्रसंगात भलेभले साथ सोडतात घरातला कर्ता माणूस केला तर मग विचारायलाच नको अशावेळी जर आर्थिक परिस्थिती भक्कम असेल तर घर किंवा माणसं मी मी  म्हणता स्वतःच्या पायावर स्वावलंबनाने व स्वाभिमानाने उभी राहू शकतात अशा वेळी विमा या प्रकाराचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे तऱ्हा विमा असतो किती प्रकारचा तर मुख्य दोन प्रकार ( types of insurance in marathi ) असतात एक जीवन विमा व दुसरा सामान्य विमा.

What Is Insurance In Marathi

जीवन विमा | life insurance

या विम्या मुळे विमाधारका चा मृत्यू किंवा अपघात झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास विमा कंपनी निश्चित वेळेत ठरलेल्या कालावधीपर्यंत ठरलेली रक्कम देते हा कायदेशीर करार असतो व तो विमाधारक व्यक्ती व त्याच्या कंपनी मध्ये झालेला लिखित स्वरूपाचा असतो त्यासाठी त्याला ठरलेल्या वेळी

निश्चित अशी रक्कम प्रीमियम स्वरूपात द्यावी लागते जीवन विम्याचा मुख्य विषय मनुष्याचे जीवन हेच असते आता जीवन विमा काढल्यामुळे आपण कोणत्या गोष्टीबाबत निश्चिंत होऊ शकतो ते पाहू
साधारणपणे मनुष्याचे आयुष्य 60 ते 70 वर्षा पर्यंत मानले जाते पण अचानक अपघात किंवा मोठ्या आजारपणामुळे त्याचा मृत्यू 40 ते 45 वयात म्हणजे लवकर झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षणाचं काम हा विमा देतो
   
  आज सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाले त्यामुळे खाजगी नोकरी करताना निवृत्त झाल्यावर काय हा मोठाच प्रश्न उभा राहतो कारण एकतर वृद्धावस्था त्यात कुटुंबाची वाढती जबाबदारी आणि हट्टाने येणारे काही आजार अनुषंगाने औषधाचा खर्च यामुळे मनुष्य विचार करून मेटाकुटीला येतो कारण प्रॉव्हिडंट फंड किंवा रक्कम जरी

लाखांमध्ये असली तरी ती संपायला वेळही लागत नाहीत मग अशावेळी आपण तरुणपणी केलेली बचतच आपल्याला कामास येते आपण जर ती वी मे द्वारे निवृत्तिवेतन सारखी वापरली तर आपल्या उतारवयातील क्षण आनंदाने व्यतीत करू शकतो
  जीवन विमा काढल्यामुळे आपल्याला भविष्यातील आकस्मिक खर्च किंवा प्रसंगासाठी लक्षपूर्वक निधी  जमवण्याची सवय लागते आणि मग कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत जीवन विम्याच्या मदतीमुळे आपण सुरक्षित राहतो
   
जीवन विमा सारख्या योजना राबविल्यामुळे आपल्याला बचतीचे महत्त्व कळते व रोजचे पैसे अनावश्यक खर्च टाळा आपण ते अत्यावश्यक व आवश्यक अशा ठिकाणी गुंतवायची सवय लावतो व हेच महत्त्वपूर्ण असते
  
सांग जीवन विमा पॉलिसी वर आपल्याला कर्जही मिळू शकते जशी आपण प्रॉपर्टी च्या वेळी काही गहाण ठेवतो तशीच त्यामुळे ही पॉलिसी आपली मौल्यवान  संपत्ती च म्हटले पाहिजे
   याप्रकारच्या विम्या मुळे व्यक्तीची व त्याच्या कुटुंबाची सामाजिक सुरक्षा अबाधित राहते याचे कारण हा विमा त्यांना त्यावेळी मदतीस येतो ज्यावेळी ते काम करण्यास असमर्थ असतात व जबाबदाऱ्याही मोठमोठ्या पेलाय च्या असतात अशा वेळी नियमित येणाऱ्या रकमेमुळे आपण सुरक्षित राहतो
  
   यदाकदाचित व्यक्तीच्या घरी आग लागली चोरी झाली किंवा मृत्यू सारखे प्रसंग आले तर अशावेळी त्याचे झालेले नुकसान हे विमा कंपनी भरून देते म्हणजेच त्यांची एक प्रकाराने जबाबदारीच उचलते त्यामुळे विमाधारक व्यक्ती हतबल होत नाही विमा कंपनीच्या आर्थिक मदतीच्या पाठिंब्याने तो नव्याने उभा राहू शकतो
   
   अशाप्रकारे आपण आपल्या उमेदीच्या काळात जीवन विमा सारख्या योजनेची मदत घेतली तर आपल्या पडत्या काळात आपल्याला त्याची निश्चितच मदत होईल पण या योजने ची मदत घेताना नीट वाचून समजून घ्यावी आपल्या जबाबदाऱ्या व लक्ष कोणते आहे ते जाणून त्याप्रमाणे आपले मासिक उत्पन्न पाहून भरावयाचा प्रीमियम लक्षात घेऊनच  पुढ पाऊल उचलावे
                   
आता आपण पण विम्याचा दुसरा मुख्य प्रकार तो म्हणजे सामान्य विमा पाहू

       सामान्य विमा हा आपल्या वस्तू घर गाडी शेत याबाबतीत घेतला जातो प्रत्येक व्यक्ती आपल्या वस्तू आपल्या उत्पन्नातून घेत असतो आपली स्वप्ने मेहनतीने पैसे जमा होऊन पूर्ण करीत असतो पण अशा अचानक काही परिस्थिती त आपल्या स्वप्नांचा चक्काचूर होतो आणि आपण आपले मनोधैर्य खचून बसतो पण जर त्या मौल्यवान गोष्टींचा तर नक्कीच आपल्याला विमा कंपनी आर्थिक मदत करते तर अशा कृत्रिम किंवा नैसर्गिक घटना किंवा परिस्थिती असू शकतात जसा घरात चोरी होणे आग लागणे भूकंप किंवा पूर येऊन घर किंवा शेताचे नुकसान होणे

पावसाळ्यात वीज पडणे समाजातील काही घटकांच्या मतभेदामुळे दंगे उसळतात त्याचा फटका काही जातिधर्मातील लोकांची घरे किंवा वाहने जाळण्यात होते अशावेळी आपल्याला एक एक पैसा जोडून उभारलेल्या स्वप्नांची राख पाहतांना आपण निश्चित तुटून जाऊ शकतो पण अशा वस्तूंचा विमा काढला असेल तर मिळणार या रकमेमुळे आपल्याला दिलासा व मनाला नवी उभारी ही मिळते तसेच स्वास्थ्य विमा मुळे अचानक रोग किंवा आजारामुळे न पेलवणारे खर्चही आपण विम्या मुळे पेलू शकतो       

घराचा विमा. | Home insurance

आजच्या महागाई व बेकारी च्या काळात मध्यमवर्गी आणि घर घेणे म्हणजे स्वप्नवतच झाले आहे घर घेताना खूप बचत व कर्ज घेऊन ते खरेदी केले जाते छोट्यात छोटी व मोठ्यात मोठी वस्तू देखील खूप विचारांनी अन्न अत्यंत आवडीने घेतली व सजवलेली असते पण शॉर्ट सर्किट मुळे किंवा इतर कारणाने आग लागली वीज पडली किंवा चोरी झाली पुरामुळे खर वाहून गेले किंवा भूकंपामुळे जमीनदोस्त झाले तर आपण वेळीच विमा काढल्यास विमा कंपनी नक्कीच ठरलेल्या नियमानुसार आपली  आर्थिक मदत करते

नक्की वाचा : Insurance holder and Insurance company in marathi

 वाहन विमा | Auto insurance

 घर घेतल्यानंतर वाहन मोटार आपल्या घरी असणे हे नितांत गरजेचे झाले आहे ाढत्या लोकसंख्येमुळे आपण एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रवास करतो पण त्यात बस ट्रेन यांच्या गर्दीचा विचार केल्यास स्वतःचे वाहन असल्यास आपण हवे तेव्हा कुठेही कधीही जाऊ शकतो गावात तर आता स्वतःचे वाहन असणे अत्यावश्यक असते अशावेळी अपघात चोरी आग लागणे नैसर्गिक परिस्थितीत सापडल्याने गाडीचे नुकसान झाल्यास व वाहनाचा विमा काढला असेल तर आपल्याला त्याची मदतच होते इतकेच नव्हे तर आपल्या गाडीमुळे दुसऱ्या व्यक्तीचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास भरावे लागणारे पैसे ती विमा कंपनीस पडते त्यामुळे बिकट परिस्थितीतही आपला फायदा होतो

  स्वास्थ्य विमा | Health insurance

आजच्या प्रदूषणाच्या काळात अनेक कारणामुळे आपल्याला आजाराला बळी जावे लागते पण हॉस्पिटलमध्ये गेल्यास ऑपरेशन व अनेक चाचण्या यामध्ये जमवलेली सारी निधी गुप्त होते अशावेळी आजाराशी सामना करण्यासाठी मनोधैर्य कुठून आणावे आपली संपत्ती विकावी लागण्याची वेळ येते पण जर विमा असेल तर असे मोठे खर्च ही कंपनी विमा कंपनी द्वारे उचलले जातात

  यात्रा विमा आपले कुठे देश  विदेशात फिरायला जाण्याचे स्वप्न असते त्यासाठी आपण खूप नियोजन केलेले असते बजाते ही केलेले असते पण प्रसंग सांगून येत नाही कधी परदेशात आपल्याला जखम होते किंवा आवा च्या सव्वा खर्च करण्याची पाळी येते तसेच नीट माहिती नसल्यामुळे सामान हरवते चोरी होते अशावेळी यात्रा विमा काढला असेल तर यात्रेस जाण्याच्या पूर्ण कालावधीत आपली जबाबदारी विमा कंपनी घेऊन अशा परिस्थितीत आर्थिक मदतीचा हात देते

  शेतीसाठी विमा | Insurance for agriculture

शेतीही निसर्गावर आधारित असल्यामुळे सर्वात बिकट परिस्थिती ही शेतकऱ्यांची जस्ते एक तर निसर्गाच्या रंगढंगवरून आपले कामकाज सुरु किंवा आठवावे लागते अशा जर पूर येणे किंवा पिकांवर रोगाची साथ आल्यास पूर्ण वर्षभराची मेहनत मातीत मिसळते अशावेळी त्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढलेला असेल तर त्याची नुकसानभरपाई विमान कंपनी देऊ शकते परंतु विमा कंपनीच्या अटी किचकट व नियम ही कठीण असल्याने शेतकरी या विमाकडे दुर्लक्ष करतो कारण बहुतेक वेळा शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपनीला याची जास्त मदत होते त्यामुळे सततच्या तक्रारीने सरकारनेही विचार करून या बाबतीत लक्ष घातले आहे भविष्यात त्याची चांगली फळे निश्चितच शेतकऱ्यांना चाखायला मिळतील.

Reed Also : अगरबत्ती व्यवसाय कसा करायचा

तर अशाप्रकारे आपण विम्याचे ( what is insurance in marathi )

प्रमुख दोन प्रकार व त्यांचे उपप्रकार याची माहिती पाहिली जी व्यक्ती भविष्याचा दूरदृष्टीने विचार करते व वर्तमान  काळाची भविष्य राशी उचित सांगड घालते अशा विचारी व जबाबदार व्यक्तीने विम्याचा नक्कीच विचार केला पाहिजे त्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबाचे जीवन नेहमीच सुरक्षित व आनंदित राहील

 ज्याच्या पदरी पत्रके विम्याची
भविष्य उजळतील ती त्याच्या घराची
दुःख समस्या मिटून जातील
सुयोग्य विचाराने जे विमा घेतील

1 thought on “विमा हे एक सुरक्षा कवच होय | What Is Insurance In Marathi 2022”

Leave a Comment