अग्नि विमा | Fire Insurance In Marathi 2022

अग्नि विमा | what is fire insurance in marathi | fire insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण अग्नि विमा म्हणजेच what is fire insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Fire Insurance In Marathi

भारतात लोकसंख्येचा भस्मासुर वाढला आहेच आणि त्यामुळे अनेक समस्या वाढलेल्या दिसतात
जसे की,

  • वाढते औद्योगीकरण
  • लोकसंख्येचा भस्मासुर त्यामुळे वाढलेली
  • बेकारी आणि
  • अनेक प्रकारचे प्रदूषण

माणूस आपल्या अन्न, वस्त्र ,निवारा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ही संघर्ष करताना दिसतो .आणि मग या संघर्षा तून तो लढत लढत आपले नवीन अस्तित्व ,छोटे से स्वप्न आणि आपलेच एक जग तयार करतो, एक -एक वस्तू बचत करून ,कष्ट करून ती विकत घेतो किंवा निवारा नसेल तर घर विकत घेतो घर बांधतो.
              असे घर किंवा वाहन तसेच कार्यालय, दुकाने जे त्याचा भूतकाळ ,वर्तमान तसेच पूर्ण भविष्यकाळ आहे तेच जर ,अग्नीच्या म्हणजे ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, तर काय होईल ???? वाचूनच मनात चर्रर्र sssहोतं .मग असा स्वप्नाचा महल अर्थात वन रूम किचन चा असो किंवा भाड्याचा ! महाल तर महालच !आगीत बेचिराख होताना पाहिले तर माणूस जिवंतपणीच मरण यातना भोगील हो ना?

स्वप्नां ना आधार विम्याचा:

हो ,आपले कोणतेही स्वप्न असो ते मेहनतीने पूर्ण केलेले असेल ,तर त्याला आपण सांभाळून हे ठेवलंच पाहिजे. उदाहरणार्थ – जसे आपण आपले सोन्याचे दागिने किंवा चांदीची भांडी ,मौल्यवान वस्तू कडी -कुलुपात लॉकरमध्ये ठेवतो तसेच आपल्या वस्तू ना आपण विम्याचे संरक्षण देऊन सुरक्षित केल्या पाहिजेत.

 आपल्या जीवनात विम्याचे महत्त्व:

  • आपापल्या गरजेनुसार माणसे अनेक विमा योजना घेतात
  • वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपले जीवित किंवा  मालमत्ते ला क्षती पोहोचू शकते
  • आग लागणे हे ही एक नुकसानीचे कारण असते
  • आपण त्याला भविष्यकाळात होऊ पाहणारा धोका बघून आधीच अग्नि विमा काढला असेल तर आपली तसेच आपल्या कुटुंबीयां चे संरक्षण होऊ शकते
  • आपल्या बहुतेक मालमत्तेची तसेच वाहनाचे नुकसान झाले तरी सुरक्षित ठेवता येते
    *म्हणजेच आपल्या नुकसानाची भरपाई ही विमा कंपनीकडून मिळते
    *आपण भविष्यात चिंतेचे ओझे न बाळगता परत विमा कंपनीच्या केलेल्या आर्थिक मदतीने आपल्या पायावर पुनः उभे राहू शकतो

अग्नि विमा म्हणजे काय? | what is fire insurance in marathi

अग्नि विमा म्हणजे विमाधारक व विमा कंपनी यामध्ये घडलेला एक अलिखित करार असतो .त्यानुसार जर विमाधारकाच्या बहुतेक मालमत्तेचा कदाचित आग लागली व त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर नुकसान ती विमा कंपनी झेलते व विमाधारकास नुकसान भरपाई म्हणुन काही रक्कम ही मिळते

अग्नि विमा विमा धारकानी का घ्यावा?? | benefits of fire insurance in marathi

1) भविष्यकाळातील आकस्मिक दुर्घटने घडलीच तर नुकसान भरपाई मिळण्यासाठी.

2) आगीत जर त्याच्या घराचे, कार्यालयाचे नुकसान झाले तर विमा- कंपनी विमाधारकाने दावा केल्यानंतर नुकसान भरपाई देते.

3) विमा कंपनीच्या कराराच्या पत्रकात जर आगीच्या प्रकाराचे समावेश असले तर विमा धारकाचे नुकसान भरपाई केले जाते

4) आगीत जर त्याची विमा कागदपत्रे किंवा काही मालमत्ता जळून गेली असतील तरीही ठराविक विमा पॉलिसी कंपन्या पॉलिसी    नंबर दिल्याने आपल्या मालमत्तेच्या सर्वेक्षणानंतर विमा कंपनी पैशाच्या रूपात आपली मदत करते.

अग्नि विमा काढत आहात? विम्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत असतात.

जर आग लागण्याचे कारण व नुकसान विमा कंपनी चा नियमात बसत असेल तरच….. जसे की –

1) एखाद्या अपघातामुळे आग लागल्यास जसे काही वाहने, वाहन अपघातांमध्ये जोरदार आपटल्याने ही आग लागते

2) विद्युत पुरवठा मध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे आग लागू शकते

3) मानव निर्मितीतही आग लावली जाते. जाती-धर्म यामधील वितुष्ठात दंगे उधळतात व त्यांच्याद्वारे घरांना कार्यालयांना व Nगाड्यांनाही आग लावली जाते.

4) निसर्गाच्या वणव्यामुळे आग जंगलातून पसरत माणसाच्या वस्तीत येते व त्यामुळे खूप नुकसान होते

अग्नी विम्याचे किती प्रकार आहेत ते आता आपण पाहू –

1) मूल्यवान धोरण
2) विशिष्ट धोरण
3) सरासरी धोरण
4) फ्लोटिंग पोलिसी
5) जास्तीचे धोरण
6) ब्लॅकेट पोलिसी
7) व्यापक धोरण
8) संभाव्य तोटा धोरण

1 मूल्यवान धोरण :

हा एक अग्नी विम्याचा प्रकार आहे आणि त्या नुसार विमा धारकाची मालमत्ता जर आगीत भस्मसात झाली असेल तर त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी आपल्या पैशाच्या रूपात देते

2 विशिष्ट धोरण पॉलिसी :

आपण अग्नि विमा योजनेचा एक प्रकार म्हटला जातो या धोरणा नुसार विमान याद्वारे विशिष्ट रक्कमेचा जोखीम याची शाश्वती दिली जाते योजना चालू असते वेळी विमा धारका च्या मालमत्तेचे आग लागल्यामुळे जे काही नुकसान झाले असेल ते विमा कराराच्या ठरलेल्या रक्कम एवढी रक्कम मिळते

3 सरासरी धोरण : एवरेज पॉलिसी

सरासरी धोरण या अग्नी विम्याच्या योजनेनुसार विमाधारकाने ज्या आपल्या मालमत्तेचा विमा काढला असेल तर त्याच्या किमती पेक्षा कमी किमतिच्या रकमेचा दुसरा  विमा काढला जातो. ज्यावेळी विमाधारकाच्या नुकसान झाले असेल त्यावेळी विमा दावा केल्यास त्यांना जी आपल्या मालमत्तेची किंमत ठरलेली असते तेवढे नुकसान  चे प्रमाण मिळते

5 फ्लोटिंग पॉलिसी:

अग्नि विमा योजना विविध ठिकाणी एक रक्कम आणि एका प्रीमियम साठी ठेवलेल्या अनेक प्रकारच्या वस्तूंना कव्हर करत असते या योजनेअंतर्गत सामान्यपणे प्रीमियम किती असेल तर त्याच वेळी त्याची सरासरीची जी रक्कम असेल त्या रकमेसाठी विशेष पॉलिसी अंतर्गत गोष्टींच्या प्रति बॅच चा विमा घेतलेला असतो याचा अर्थ म्हणजे एका अग्नि विमा योजनेअंतर्गत अनेक वस्तूंचाही समावेश केला जातो  याचाच अर्थ म्हणजे एकाच अग्नी विमा योजनेअंतर्गत अनेक वस्तूंच्या नुकसान भरपाई चा समावेश केला

6 जास्तीचे धोरण : (एक्सेस पोलिसी)

  • काहीवेळा विमा धारकांचा चढ-उतार चालू असतो त्यामुळे त्याचा साठा कमी पडत नाही अशा कमी रकमेसाठी विमायोजना पण घेऊ शकतो
  • अशा वेळी त्याला जास्तीत जास्त साठा पोहोचण्यासाठी आणखी एखादी विमा योजना घ्यावी लागते पहिल्या योजनेला फर्स्ट लॉस पोलिसी म्हणतात आणि दुसऱ्या योजनेला एक्सट्रा पॉलिसी म्हणतात

7 ब्लॅंकेट पॉलिसी :

या ब्लॅंकेट योजनेत एकाच विमा योजने मध्ये सर्व विमा धारकाची मालमत्ता  निश्चित अंतर्गत केलेली असते

8 व्यापक धोरण :

या विमा योजनेमध्ये आग, दंगली घरफोडी इत्यादीसारख्या नुकसानाच्या जोखमी अंतर्भूत असतात यास विशिष्ट निर्देशित रकमेपर्यंत सर्वसमावेशक अशी ही विमा योजना म्हणून प्रसिद्ध आहे

9 संभाव्य तोटा धोरण:

ही विमा योजना कारखानदार किंवा छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी यांचे आगीत मालमत्ता जळाल्यामुळे जर नुकसान झाले असेल तर फायदा किंवा तोटा विरुद्ध विमा धारकाची नुकसानभरपाईही केली जाते या योजनेला नफा तोटा पॉलिसी ही म्हटले जाते

10  पुनर्स्थापना धोरण :

ही अशी योजना आहे की या धोरणांतर्गत विमाधारकाची नष्ट केलेली  संपत्ती किंवा ती पुन्हा स्थापित करण्यासाठी पुरेशी रक्कम ही विमा कंपनी भरते

अग्नि विमा योजनेत या गोष्टींचा समावेश होतो:

  • आगीच्या ज्वाला कमी करण्यासाठी अग्निशमन दलातील लोकांना निर्देश देण्याचे काम
  • आग ज्या  ठिकाणी अधिक मात्रेमध्ये लागली असेल तेथील लाकडी वस्तू ,फर्निचर किंवा ज्वलनशील गोष्टी खिडकी बाहेर काढून टाकून आग कमी करण्याचा उपाय  करणे.
  • विमाधारकाच्या आवाज किंवा मालमत्तेस आग लागल्यास ती आग विझवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या मजुरांची मजुरी देणे
  • धूर किंवा उष्णतेमुळे होणारे नुकसान त्याचीही जबाबदारी घेणे
  • आग विझविण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याने जर काही विमाधारकाच्या वस्तूही खराब झाल्या  असतील तर त्याचीही जोखीम विमा कंपनी उचलते

अग्नि विमा योजनेत या गोष्टींचा समावेश होत नाही:

  • विमाधारकाच्या निष्काळजीपणामुळे किंवा चुकीमुळे जर आग लागली असेल किंवा विस्फोट झाला असेल तर विमा कंपनी त्याची नुकसान भरपाई देत नाही
  • वीज पडली किंवा विस्फोटासारख्या परिस्थितीत ही विमा कंपनी जबाबदारी घेत नाही
  • भूकंप ,विदेशी आक्रमण ,नागरिकांमध्ये काही संघर्ष झाल्यावर लागलेल्या आगीमध्ये ही विमा कंपनी विमाधारकाला नुकसान भरपाई देत नाही

Reed Also : फुटबॉल खेळाची माहिती व नियम

या कारणामुळे अग्नि विमा कंपनी विमाधारकाला नुकसान भरपाई करण्यास नकार देऊ शकते ती खालील प्रमाणे-

1 जर आग लागून किंवा आग सदृश्य गोष्टींमध्येच अपघात घडला नसेल तर-
2 अपघात घडवून आणला आहे असे वाटत असेल तर-
3 आग लागणे किंवा ती प्रज्वलित होत असताना दिसणे अशी स्थिती नसल्यास

आग खरोखरच लागली ? आणि आकस्मिकपणे च लागली तर आणी तरच या गोष्टीचा अग्नी विमा कंपनी जोखीम उचलते-

1 वीज पडल्यामुळे आग लागणे किंवा नुकसान होणे 

2  विस्फोटा मुळे ही आग लागणे

3 विमानाचे उडडाणा अंतर्गत  स्फ़ोट होणे

4 मानवी काही तंटे यामुळे दंगे होणे ,संप यामुळे एक गट दुसऱ्या गटाचा द्वेष करून मालमत्तेचे नुकसान करतो

5 वादळ चक्रीवादळ व पूर येणे यामुळेही खूप मोठ्या प्रमाणात झालेले विमा धारकाचे नुकसान विमा कंपनी उचलते

6 दोन गटांमध्ये वाद होतात दगडफेक होते यासारखे नुकसान होते विमा कंपनी आपला भाग घेते

7 भुसखलन यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे ही विमा कंपनी सहाय्य करते

अग्नि विमा बाबत काही विशेष खालील प्रसंगातही विमा कंपनी भरपाई देते-

१ जर एखाद्या घराला आग लागली आणि ती वी जवताना त्याची भिंत व तिचा काही भाग तुटून पडला तर
२ आगीमुळे झालेल्या उष्णते मुळे घरातील किंवा घराबाहेर काढलेल्या वस्तूंना हानी पोहोचली तर

३ जळणाऱ्या घरातील सामान हटवताना जर त्या सामानाचे नुकसान झाले तरीही विमा कंपनी दुर्लक्ष न करता त्या नुकसानीची ही भरपाई विमाधारकाला त्याची नुकसान भरपाई देते
४ आगीत सापडलेल्या वास्तू मधून सामान आगीपासून वाचवण्यासाठी जर बाहेर काढले असेल आणि खराब वातावरणामुळे   त्या सामानाची नासधूस झाली किंवा ते पावसामुळे खराब झाले तर तीही जबाबदारी विमा कंपनी आपल्यावर घेते
५ आग विझवताना जर काही नुकसान झाले तरी विमा कंपनी त्या जोखमीची ही जबाबदारी घेते

अग्नि विमा घेतेवेळी विचारपूर्वक कंपनी निवडावी –

1 कंपनी प्रतिष्ठित आहे का?  ते पाहावे.
2  कंपनीच्या कामाचा अनुभव कसा आहे? आणि किती वर्षाचा आहे?
3 प्रीमियम दर किती आहे ?
4 वयाच्या कितव्या वर्षी आपण हा विमा घेऊ शकतो?
5  हा विमा किती वर्षापूरता आहे ?
6 त्या विमा योजनेत renew करता येणे शक्य आहे का ?
7 विमा कंपनी आपल्या वास्तव्याच्या क्षेत्रात आहे का?
8  ऑनलाईन सेवा उपलब्ध होईल का ?
9 आग लागण्याची कोणकोणती कारणे विमा योजनेत आहेत?
10  विमा दावा कधी व केव्हा करावा ?
11 विमा दावा करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?
12  विम्याची कागदपत्रे आगीत जळून भस्मसात झाली तरी विमा नुकसान भरपाई मिळेल का?

अग्निविमा ( fire insurance in marathi ) घेतो ,या गोष्टींची ही जबाबदारी :

 हा अग्नी विमा खरोखरच सर्वंकश विमा ठरू शकतो कारण-
1  आग लागल्यावर तो वास्तूचे नुकसान कमी होण्यासाठी प्रयत्नशील राहतोच
2 पण, घरातील सामान तसेच आग विझवताना खराब झालेल्या सामानाचा हिशोब ठेवून त्याचीही तो भरपाई देऊ करतो
3 आग विझवताना लागणारे मजूर व संसाधने यांची ही जोखीम उचलतो
4 अग्निविमा घर ,दुकान, दुकानातील सामान ,मशीन अशा प्रकारच्या चल व अचल संपत्ती साठी उपयोगा मध्ये येतो
5 इमारत जळल्यामुळे त्याचे भाडे ही घेऊ शकत नाही   पण त्याचीही आम्ही म्हणजेच नुकसानभरपाई विमा कंपनी विमाधारकाला देते आणि आश्वस्त करते.

नक्की वाचा : Agriculture Insurance In Marathi

अशाप्रकारे आपल्या वर येणाऱ्या आकस्मिक संकटाची चाहूल आपणच घेऊन जर एखादा विमा काढला तर किती मोठे संकट असेल तरीही आपल्या यावर विमा कंपनी छत्रछाया या नक्कीच असेल एका सच्च्या मित्राप्रमाणे तो आपली जबाबदारी घेईल पण एकच करा विमा निवडताना काळजीपूर्वक निवडा त्याच्या अटी विचारपूर्वक वाचून सही करा

1 thought on “अग्नि विमा | Fire Insurance In Marathi 2022”

Leave a Comment