ड्रोन विमा | Drone Insurance In Marathi | what is drone insurance in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण ड्रोन विमा म्हणजेच drone insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

देशाची सुरक्षा व उपकरणे
जगात देशात अनेक मार्गाने होणाऱ्या हल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते.
तसेच तेथे मनुष्य सहज आपला वावर ठेवू शकत नाही किंवा शत्रुपक्षात जाऊन बारकाईने टेहळणी करावयाची आवश्यकता भासते .अशा वेळी ड्रोन सारखी आधुनिक उपकरणे फारच महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडतात
ड्रोन म्हणजे काय ?
आता हा ड्रोन म्हणजे आहे तरी काय?
हे एक असे आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेले अद्ययावत उपकरण आहे जे छोट्याशा हेलिकॉप्टर सारखे असते त्याचे अनेक आकार असतात व त्यांच्या कंट्रोल हा एखाद्या दूरवर बसलेल्या व त्या ड्रोन मध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यामुळे जेथे ड्रोन पाठविला आहे तेथील सर्व माहिती लांब असलेल्या व्यक्तींनाही दिसू शकते सुरक्षा रक्षकानं साठी ही एक चांगली फायदेशीर अशी वस्तू आहे.
ड्रोन विमा drone insurance in marathi :
आता इतक्या बहुमूल्य छोट्या सुरक्षारक्षकांची सुरक्षा करणेही आवश्यक होते व त्यामुळे त्याचा विमा काढला जातो .त्याची किंमत ही जास्त असल्याने जर एखाद्या गोष्टीमुळे त्याचे नुकसान झाले तर त्या भागाचा खर्च विमा कंपनीच्या आर्थिक नुकसान भरपाईतुन भरुन मिळू शकतो तसेच ड्रोन हे पूर्णतः हा निर्जीव यंत्र असल्याने एखाद्या वेळेस त्यांच्या टकरीमुळे किंवा अन्य कारणामुळे तिसऱ्या व्यक्तीला शारीरिक इजा ही संभवू शकते अशा वेळी त्या व्यक्तीने खटला भरल्यास आर्थिक नुकसान भरपाई भरण्यासाठीही विमा योजना मदतीस येऊ शकेल.
ड्रोन चे संरक्षण व विमा
अनेक विम्याच्या प्रकारांमध्ये ड्रोन हा कसा संरक्षित होऊ शकतो ?
हे आता आपण पाहू-
1)घर मालकाचा विमा
जर विमाधारक एखादा भाडेकरू असेल व त्याच्या व्यवसायाचा भाग म्हणून ड्रोन जवळ बाळगत असेल आणि कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे त्याच्या घराचे नुकसान झाले आपण समजू भाडेकरू विमाधारकाच्या घराला आग लागल्यास त्यात भाडेकरूच्या घरातील सामानाबरोबर ड्रोन ला ही झळ पोहोचली तर घर मालकाचा विमा आर्थिक संरक्षण हे काही प्रमाणात देऊ शकेल कारण त्यात भाडेकरूच्या सामानाचा एक भाग हा ड्रोन आहे म्हणून ! परंतु यात घरमालकाच्या स्वतःच्या ही वस्तू किंवा मालमत्तेचे नुकसान व अधिक ड्रोनची भरपाई करताना घर मालकाला जास्त तोशिश करावी लागू शकते.
2) ड्रोन लायबिलिटी कव्हरेज
जे ड्रोन मालक आहे त्यांनी असा स्वतंत्र ड्रोन करिता फायदा करून घेतला पाहिजे कारण ड्रोन चे नुकसान होणे त्याची किंमत व त्याची कामगिरी तसे त्याच्यामुळे होऊ शकणारे दुसऱ्यांचे नुकसान यांनाही संरक्षण मिळू शकेल. ड्रोन बाबतीत ते बिघडल्यामुळे किंवा कशाला तरी आपटून तुटल्यामुळे तसेच कुणी मुद्दाम होऊन त्यांच्याशी छेडछाड करू शकतो किंवा ड्रोनच्या काही कंट्रोल करणाऱ्या मशीन खराब झाल्या किंवा त्याच्यामुळेच अन्य एखाद्या व्यक्तीच्या वस्तूचे नुकसान झाल्यास आर्थिक संरक्षण मिळू शकेल.
ड्रोनला संरक्षण | drone insurance in marathi
ड्रोनला विमा संरक्षणामुळे अनेक पद्धतीने मदत होते
1)काही विमा योजना विमाधारक वर्षानुसार घेऊ शकतो त्यामुळे वर्षभर चालू असलेल्या ड्रोनच्या कामा वेळी नुकसान झाले तर काळ मर्यादांमध्ये येणार नाही
2) विमा कंपनी ड्रोन चे लहान मोठे आकाराला येईल स्थान देते
3) विमा योजनेद्वारे एखाद्या स्थानांचे संरक्षण मिळू शकते जेणेकरून त्या ठिकाणच्या भौतिक साधने च्या नुकसानीची हमीही विमा कंपनी घेऊ शकेल
4) विमा योजना घेतल्यावर विमा खर्च ,हप्ता भरून झाल्यावर लगेचच विमाधारकाला विमा कंपनी संरक्षण देते
5)विमाधारक आपल्या गरजेनुसार ड्रोन संरक्षण घेऊ शकतो वर्षभरासाठी किंवा काही दिवस महिने तसेच तासासाठी ही विमा संरक्षण मिळू शकते
6) covid-19 च्या काळात इथे तिथे फिरणे अशक्य असल्याने आज आपल्या मोबाईल फोनची मदत ठेवूनही आपण विमा योजनेच्या संपर्कात राहू शकतो.
ड्रोन ची काही वैशिष्ट्ये व महत्त्व
1) ड्रोन हे एक असे यंत्र आहे जे फक्त मनुष्याने कंट्रोल करून हव्या त्या दिशेकडे आपले कार्य साधते
2) एखादी माहिती मिळविण्याचे, छायाचित्र मिळवण्याचे एकदम गतिमान असे आधुनिक उपकरण आहे
3) ड्रोन ची मदत सैन्यामध्ये तर होतेच पण आता छोटेमोठे व्यवसायात ही त्याचा वापर सहज करू लागले आहेत
4) अर्थात त्याच्या आकारमानात व किमती ती अधिकाधिक फरक झालेला आढळून येतो
ड्रोन व जोखीम
खरतर ड्रोन हे साधन गुप्त रित्या माहिती काढण्याकरिता केले जाते अशा वेळी त्याची जोखीम हे अधिक असते. ड्रोन हे यंत्र मानून त्याला विमा द्वारा नुकसान भरपाई किंवा संरक्षण मिळत होते परंतु आता त्याचा होणारा सर्रास व वेगवेगळ्या कारणासाठी होणारा उपयोग पाहता आता त्याला एक विमानाचा दर्जा दिलेला पाहण्यात येतो आणि त्यामुळे ड्रोन साठी विमा योजना घेताना त्याची आवश्यकता पाहता जोखीम ही वाढलेली दिसते. त्यामुळे या योजना ही स्वस्त राहिलेल्या दिसत नाही व विमा योजनेचे नियम व अटीही वाढलेल्या दिसून येतात.
ड्रोन विमा कंपनीसाठी जोखीम
ड्रोन हे जागतिक पातळीवर ही खूपच महत्वपूर्ण व अगदी कॉन्फिडेशीयल काम करत असल्यामुळे त्याचे महत्त्वही वाढलेले दिसते परंतु त्याचबरोबर विमा कंपनी वरची जोखीमही जास्त झालेली दिसते
कोणकोणत्या जोखमी त्या आपण पाहू-
1)सायबेरच अतिरिक्त प्रभाव
एक देश दुसऱ्या शत्रू देशाविषयी काही गुप्त माहिती घेण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतो
तसेच या पाठवलेल्या ड्रोन वर त्याच्या मालकीच्या माणसाने व्यतिरिक्त एखादे सायबर द्वारे ही नियंत्रण चुकीच्या कारणांसाठी घेतले जाऊ शकते तसे त्याला पोहोचवण्यात येणाऱ्या नुकसाना बरोबरच ड्रोनमुळे धक्का लागून कोणाच्या संपत्तीचे नुकसान किंवा कोणास शारीरिक इजा झाल्यास त्याचे संरक्षण प्राप्त होते
नक्की वाचा : Retirement Insurance Plan In Marathi
2) गुप्तते बाबत सांशकता
मुख्यत: देशा संदर्भात किंवा राज्या संदर्भात तसेच एखाद्या व्यवसायात संबंधित काही गुप्त माहिती त्यात असते व त्याच्यावर ज्याचे नियंत्रण असते तो त्याचा गैरवापर ही करू शकतो
ड्रोन विमा खरेदी करताना घ्यावयाची काळजी
1)विमाधारक ग्राहक म्हणून जेव्हा आपण ड्रोन करिता विमा योजना घेण्याच्या विचारात असाल तर विमा कंपनीकडून काही गोष्टीची स्पष्ट माहिती घ्यावी विमा योजना कालावधी, संरक्षणा संदर्भात नियम आणि वाढत्या ड्रोन संबंधी जागरूकतेमुळे नवनव्या सुविधा मिळतात परंतु त्यासंबंधी विमा कंपनी जोखीम येते वेळी काही गोष्टींबाबत हात आखडता ही घेऊ शकते
2)ड्रोन म्हणजे हौसेसाठी जरी घेतले असले तरी ते खेळणे नव्हे! याची प्रत्येक ड्रोनकर्त्याला जाणीव असावी. त्यामुळे ड्रोन संदर्भात एखाद्या निर्बंधावर कानाडोळा करू नये .असे केल्यास विमा कंपनी ही आपली जोखीम उचलण्यास मनाई करेल
3) ड्रोन मध्ये आधुनिक व खूपच अद्ययावत सुविधा असल्याने ज्यावेळी विमाधारक एक हौसेसाठी त्याला वापरत असल्यास त्याद्वारे छायाचित्र किंवा रेकॉर्डिंग ही केले गेल्यास त्यामुळे एखाद्या व्यक्तीने त्यावर आक्षेप घेतल्यास भरावा लागणाऱ्या आर्थिक दंडाची भरपाई विमा कंपनी घेऊ शकते.
ड्रोन बाबत हौशी लोकांकरिता असणारी बंधने
1)प्रमुख बंधन म्हणजे ते रजिस्टर केलेलं असावे
2)तसेच त्याच्या वजना संबंधात ते 60 पौंडच्या च्या खालील वजनाचे असावे
3) काही संवेदनशील क्षेत्रात ड्रोन ला बंदी असते
ड्रोन द्वारे हानी
ड्रोन हे उपकरणाचा दुरुपयोग ही करताना आढळून येऊ शकतो कारण एखाद्या एअरलाइन द्वारे काही प्लेन उड्डाण करते वेळी त्यांना अडथळा आणण्याचे काम ही हा ड्रोन करू शकतो.
Reed Also : Top 10 business ideas marathi
अखेर,
अशा प्रकारे आजच्या अद्ययावत व आधुनिक उपकरणात यांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे व सुरक्षेच्या हेतूने सैन्यदलात तसेच सार्वजनिक जीवनात ही आपल्याला त्याची फारच मदत होऊ शकते अर्थात आपण एखाद्या आपल्या सुविधेच्या वस्तूचा कसा आणि कशासाठी वापर करतो आहोत, याच्याकडे मात्र लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे एक हौस म्हणून करण्यापेक्षा त्याचा वापर योग्य तिथेच केलेला बरा! कारण त्याचा दुरुपयोग की होण्याची खूपच शक्यता असते .ड्रोनचे काही समाजात चालवतानाचे नियम व अटी असतात तसेच निर्बंधही असतात त्याचे सर्वसामान्य लोकांनी जरूर पालन करावे. त्यामुळे आपल्याला निश्चितच अशा तंत्रज्ञानाची आपल्या देशाच्या व स्वतःच्या प्रगतीसाठी निसंकोच मदत होईल,हो ना?
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण ड्रोन विमा | Drone Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.
Tags : ड्रोन विमा | Drone Insurance ,ड्रोन विमा | Drone Insurance In Marathi 2022
1 thought on “ड्रोन विमा | Drone Insurance In Marathi 2022”