गुरेढोरे विमा योजना | Cattle Insurance In Marathi 2022

गुरेढोरे विमा योजना | Cattle Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण गुरेढोरे विमा योजना म्हणजेच cattle insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Cattle Insurance In Marathi
Cattle Insurance

शेती व्यवसाय आणि शेतकरी

भारत हा शेतीप्रधान देश आहे.
त्यामध्ये पूर्वांपार अधिकाधिक लोक हे शेती व्यवसाय करत असत.
आता जरी औद्योगिकीकरण झपाट्याने वाढले असले, लोकांचा ओघ शहराकडे अधिक असला तरीही आज ही बहुसंख्य लोक ही शेती हाच प्रमुख व्यवसाय म्हणून करत असतात
आणि त्यासाठी गुरे- ढोरेही मदतीस लागतातच !
शेती व्यवसाय करण्यासाठी चांगले हवामान, पर्जन्य यांची गरज असते तसे गुरे विसराची ही त्यांना गरज वाटते.आणि त्या प्राण्यांवर शेतीआधारित असू शकते त्यामुळे त्यांची देखभाल ही करावी लागते.
तसेच त्यांच्या किमतीही फार असल्याने इतर आजार व रोगांपासून ही त्यांची नीट काळजी घ्यावी लागते इतके करूनही त्यांच्या बाबतीत नुकसान होऊ नये किंवा त्यांची नुकसानाची भरपाई व्हावी म्हणून विमा काढला जातो आणि तो गरजेचा ही असतो!

(गुरेढोरे विमा योजना | Cattle Insurance )

गुरांचा विमा ( cattle insurance in marathi )

गुरांचा विमा म्हणजे गाई ,म्हशी, बैल यासारख्या प्राण्यांचा विमा काढला जातो
शेतकऱ्यांसाठी तो किमती असा विमा आहे ज्या शेतकऱ्यांची जमीन खूप कमी आहे तसेच छोटा किंवा मध्यम शेतकरी हे आपले उत्पादन अधिकाधिक या गुरा द्वारेच मिळवीत असतो पूर्णवेळ भरायचे उत्पन्न शेतीतून काढण्यासाठी या प्राण्यांचा त्यांना उपयोग होत असतो
त्यामुळे गुराढोरांचे नुकसान झाले असेल तर हा विमा योजना त्याला संरक्षण देतो

गुरे विमा व शेतकरी

बहुसंख्य शेतकऱ्यांची शेती ही त्यांच्या बैलांच्या जोडी वर तसेच व्यवसाय हा दूध -दुभत्यावर, शेणखत यावर चालू असते
परंतु बैलांच्या जोडी साठी व म्हशी साठी चा खर्च ही खूप येत असतो आणि जर गुरांचा एखादा रोग किंवा आजार आला आणि जर ते मृत्युमुखी पडल्याचे शेतकऱ्यांचा व्यवसाय ढळू शकतो आणि इतर खर्चासाठी रोख रक्कम यासाठी त्यांना कर्जाशिवाय पर्याय उरत नाही. पण गुरांसाठी घेतलेल्या विमा योजने मुळे शेतकऱ्यांचे गुरांच्याच्या बाबतीत होणारे नुकसान संरक्षित करता येते.

पशु /गुरे विमा व त्याचे प्रकार | types of cattle insurance in marathi

या विमा योजनेमध्ये काही अडचणीही आहेत .
त्याच समस्यांचा विमा उतरविला जाऊ शकतो .
गुरे व त्यांची जीवितहानी एखाद्या अपघातामुळे किंवा शारीरिक इजेमुळे त्या गुरांना काही आजार किंवा त्रास झाल्यास किंवा ते अपंग झाल्यास गुरांसाठी आर्थिक संरक्षण हे दिले जाते

गुरे विमा योजनेत अंतर्भूत गोष्टी

1) जर शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणाने गुरांच्या गोठ्याला आग लागली तर त्या गुरांचा मृत्यू झाल्यास विमा योजना त्यांना आर्थिक संरक्षण देते
2) शहरात किंवा उपनगरात गाड्यांच्या गर्दी मध्ये गुरांचे लोंढे फिरताना दिसतात काही काही तर गाई अशाच रस्त्यावर मधोमध बसलेल्या दिसतात अशा वेळी जर त्यांचा अपघात होणे नाकारता येत नाही
3) पूरग्रस्त गावात लोक पाणी भरल्यामुळे सैरावैरा पळू लागतात अशा वेळी आपले कुटुंब ,स्वतःचा जीव व मौल्यवान सामान नेताना गुरं ढोरांकडे कडे दुर्लक्ष होऊ शकते व ती पाण्यात बुडून मरू शकतात
4)पावसाळ्यात जंगलात किंवा आसपास कुरणात हिरवागार चारा आलेला असतो व शेतकरी त्यांना तसेच सोडुन चरावयास देतात आणि त्या वेळी कोणतेही सरपटणारे विषारी जीवाणूंमुळे त्या गुरांचा मृत्यू होऊ शकतो अशा वेळी विमा योजना त्यांना संरक्षण देऊ करते

नैसर्गिक आपत्ती व गुरांना विमा संरक्षण नाही

 1. नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यावेळी तुफान येते व त्यामुळे झंझावातामुळे झाडे ,घरे कोसळतात व अशा वेळी झालेल्या नुकसानीची विमा संरक्षण आर्थिक मदत देत नाही
 2. भूकंप नैसर्गिक आपत्तीला तर बहुतेक विमा योजना या संरक्षण देऊ इच्छित नसतातच जर भूकंपामुळे जमिनीत प्राणी गाडले जाणे ,जखमी किंवा मरण पावणे अशावेळी ही गुरे विमा योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत नाही
 3. गुरांचा मृत्यू हा एखाद्या अपघातात दरम्यान झाला व तो डिलेवरी दरम्यान किंवा संसर्गजन्य आजार तसेच आयुष्यभरासाठी च्या शारीरिक इजेमुळे हात ,पाय तुटणे किंवा अपंग होणे यासाठी ही गुरे विमा कोणतीही मदत करत नाही
 4. गाईंला विकत घेताना चा मुख्य उद्देश हा दुधाच्या व्यापारासाठी चा असतो पण त्या गोष्टीमध्ये समर्थ नसेल तर शेतकऱ्याला तिला विकत घेण्यासाठी आलेला खर्च हा नुकसान म्हणून गणला जातो व ती भरपाई ही गुरे विमा योजनेतर्फे मिळत नाही
 5. गाई प्रमाणे बैलांची किंमत ही अधिक असते त्यांची किंमत हजारोंच्या संख्येत असते अशा वेळी घरच्या चांगल्या बैलांच्या जाती पासून चांगले वासरू मिळेल असे वाटल्यास काही अतिशयोक्ती नाही! शेती व्यवसायासाठी पूरक हा गाई गुरांचा व्यवसायास हातभारही लागू शकतो परंतु जर तो बैल प्रजननास अक्षम असतील तर ही विमा कंपनी कोणतेही आर्थिक संरक्षण देत नाही

गुरे विमा चे महत्व | importance of cattle insurance in marathi

 1. शेतकरी आपले नुकसान रोखण्यासाठी काही गोष्टींबाबत सतर्कता दाखवू शकतो जसे की चांगली गुरे दिसली म्हणून त्यांनी खरेदी करू नये त्यांची चाचपणी, चौकशी वगैरे करूनच ती शक्यतो खरेदी करणे
 2. व आपणास त्यांच्या गुरांच्या जाती ,त्यांची क्षमता मुळे लागणारे काम याचे योग्य मुल्यांकन करूनच गुराढोरांची खरेदी करावी
 3. अर्थात मूल्यमापन करते वेळी स्वतःच्या अनुभवा बरोबरच पशुवैद्यकांचे मत ही घेतलेले बरे!
 4. विमा योजना खरेदी करताना हप्ते भरावे लागणार त्याचाही जरूर विचार करावा
 5. विमाधारक म्हणून गुरांच्या बाबतीतल्या अघटिताची बातमी त्वरीत बँकेस द्यावी.
 6. विमा कंपनी कडे जाऊन आलेली आपत्ती व त्यामुळे विमा धारकाचे झालेले नुकसान सांगावे लागते
 7. तसेच काही फोटो रूपात किंवा प्रत्यक्ष पुरावे ही दाखवले गेले तर योग्य !
 8. विमा दाव्या साठी लागणारी सर्व माहिती पत्रके जी सांभाळून ठेवलेली असावी ती बँकेकडे किंवा विमा योजने या कंपनीकडे सादर करावी

गुरे विमा घेताना अटी

1)ज्या विमाधारक शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीची गुरे असावीत (गाय ,म्हशी, बैल )वैगरे लोक हे वैयक्तिक स्वरूपाचे किंवा वेगवेगळ्या जातींची व संस्थाने घेतलेले असू शकतात त्या वेळी विमाधारक विमा योजना घेण्यास तयार होतो
2) त्यावेळी त्या गुरांची जबाबदारीही त्यांनी घेतली पाहिजे जसे ती शारीरिक दुखापतग्रस्त किंवा रोग बाधित झालेली नसावी
3) संरक्षणाच्या गुरांसाठी घेणार असतील तर त्यांची गुरांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी

नक्की वाचा : Mortgage Insurance In Marathi

विमा दावा करतेवेळी

1)विमाधारकाने च्या गुरा संदर्भात विमा योजना घेतली असेल व ते आपत्तीग्रस्त होऊन त्यांच्यासाठी जी आर्थिक नुकसान भरपाई मागण्यासाठी विमा दावा सादर करावा लागतो
2) तो दावा करते वेळी नुकसान झाल्यावर त्यांचे फोटो किंवा इतर प्रकारे पुरावे सांभाळून ठेवावे
3) नुकसानभरपाई झाल्यावर वेळ न दवडता त्वरित बँक किंवा विमा कंपनीला नुकसानीबाबत त्वरित कळवावे
4)विमा दावा करते वेळी अनेक कागदपत्रांची गरज भासू शकते-

A) विमा प्रदान केलेल्या गुरांचा फोटो लावलेला फॉर्म
B) त्या विमा घेतलेल्या गुरांची माहिती
C)गुरे खरेदी करताना ची बिले
D) व विमाधारक गुरे त्यांच्या कानावर लावलेल्या टॅग किंवा बिल्ला
यांची पूर्तता करून ठेवावी

विमाधारक व विमा कंपनी

1 ) विमा कंपनी द्वारे विमाधारकाला एक टोल फ्री कस्टमर सर्विस नंबर दिला जातो त्यावर लगेच गुरं विषयीच्या नुकसानीबाबत लवकरात लवकर कळवण्याचे सांगितले जाते
2) विमाधारक गुरांचा मृत्यू किंवा अपघात प्रकरणी झालेल्या परिस्थितीची माहिती विमा कंपनीला देतो
3) दावा योग्य असेल तर विमा कंपनीकडून विमा संरक्षण ही मिळते
4)गुरांची विमा योजना कमीत कमी एक वर्ष व अधिकाधिक तीन वर्षासाठी ची असते

विमा संरक्षण यासाठी मिळत नाही

1)जर विमा योजना घेण्याआधी किंवा संपल्यानंतर गुरांचा मृत्यू झाला किंवा त्यांना अपंगत्व आल्यास कंपनी संरक्षण देण्यास बाध्य नसते
2) एखाद्या विमाधारक गुरांची चोरी झाल्यास ही आर्थिक मदत विमा देत नाही
3) युद्धजन्य परिस्थिती किंवा एखाद्या वेळेस स्फोटामुळे झालेल्या नुकसानीसही कंपनी बाध्य राहत नाही
4) जर एखादे डॉक्टर हे योग्य पद्धतीने उपचार करीत नसल्याने गुरांना धोका पोहोचल्यास ही विमा मदतीस येत नाही

विमा व विमाधारक गुरांची घ्यावयाची निगा

1)योग्य पौष्टिक खाणं,चारा व स्वच्छ पाणी द्यावे
2)शारीरिक दुखापती च्या वेळी कोणताही बेजबाबदारपणा किंवा चालढकल करू नये
तर विमा कंपनी दावा संरक्षण देणार नाही
3)गुरांच्या बाबतीत नुकसान झालेल्या प्रकरणी त्वरित दिलेल्या कालावधीत विमा कंपनी तसेच बँकेला माहिती द्यावी
4)वेळ उलटून गेल्यास विमा दावा खारीज होऊ शकतो

गुरे विमा घेण्यामुळे मिळणारे लाभ

ग्रामीण गरीब व गरजू शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते
नैसर्गिक आपत्तीत गुरांचे नुकसान झाल्यास विमा ची मदत होते
संप,आंदोलनातील झालेल्या दंगली तही साहाय्य मिळू शकेल विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे गुरांना झालेल्या शारीरिक इजा असतील तर त्यावेळी हि मदत होते
विमा योजना चालू असते वेळी एखाद्या आजाराच्या मुळे ग्रस्त झाला असेल तर त्या गुराला विमा कंपनीचे आर्थिक संरक्षण मिळू शकते.

विमा खर्च ( cattle insurance in marathi )

विमा हप्ता हा विमा कंपनीच्या नुसार उत्पादना द्वारे परिवर्तित होतो
वर्तमान स्थितीतील गुरांचा दर पाहून विमा खर्च ठरविला जातो गुरे कोणत्या ठिकाणची आहेत? त्यांची जात कोणती?
यावरी विमा खर्च ठरू शकतो.

अशा या गुराढोरांच्या विमा योजना अनेक छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांना मदतीस येतात
परंतु त्या निवडताना आपण आपल्या ला त्या योग्य आहेत ना? याकडे लक्ष द्यावे
व ज्यांच्यासाठी आपण हा विमा घेत आहोत त्यांची डॉक्टरांकडून आधी तपासणी करून घ्यावी मग नुकसान झाले तरीसुद्धा विमा कंपनी विमा दावा केल्यानंतर त्याचे आर्थिक संरक्षण देते.

Reed Also : भावना व विचार या मधे अंतर काय ?

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण Certificate Of Insurance | सर्टिफिकेट्स ऑफ इन्शुरन्स बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा

Tags : cattle insurance ,गुरेढोरे विमा योजना | Cattle Insurance In Marathi 2022 ,गुरेढोरे विमा योजना | Cattle Insurance In Marathi 2022 ,गुरेढोरे विमा योजना | Cattle Insurance In Marathi 2022

1 thought on “गुरेढोरे विमा योजना | Cattle Insurance In Marathi 2022”

Leave a Comment