जहाज व त्यावरील मालाचा विमा | Cargo Insurance In Marathi 2022

जहाज व त्यावरील मालाचा विमा | Cargo Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण जहाज व त्यावरील मालाचा विमा ( what is cargo insurance in marathi ) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Cargo Insurance In Marathi
Cargo Insurance In Marathi

निसर्ग पर्यटन आणि विमा:

आपल्याला कामाच्या नेहमीच्या दगदगीतून काही वेळे स्वतःसाठी काढायला नक्कीच आवडते
पण तो निवांत क्षण जर निसर्गाच्या सानिध्यात घालवता आले तर ,क्या कहने ?
आणि समुद्र किनारा याशिवाय निसर्ग हा पूर्ण होऊच शकत नाही
फक्त आपण डोळ्यासमोर तो निळाशार अथांग पसरलेला समुद्र आठवला तरी मनाला खुपच उत्साह वाटतो, होना?

समुद्रकिनारा आणि असुरक्षितता:

  • बहुतांशी समुद्रावर आपण फिरायला जातो तर
  • व्यापाऱ्यांसाठी समुद्रकिनारा हा दळणवळणाचा एक मुख्य साधन असते
  • पण पर्यटक म्हणून पर्यटन करणे तसेच सुंदर व मनोहारी वाटले
  • तरी व्यावसायिक, व्यापारी , जहाज चालवणारे नाविक तसेच मालवाहू नौका व त्यातील कर्मचाऱ्यांना त्या समुद्री प्रवासातील नेमके खाचखळगे आणि धोके माहीत असतात
  • आणि त्यासाठी त्यांना शारीरिक दृष्ट्या तसेच मानसिक दृष्ट्या ही बळकट राहावे लागते
  • तरच त्यांचा तिथे निभाव लागू शकतो
  • कारण पर्यटक काही दिवसांसाठी तेथे जातात आणि नंतर आपल्या घरी परत जातात
  • पण वरील सर्व व्यापारी वगैरे मंडळी महिनोन् -महिने समुद्रात यात्रा करत असतात
  • व्यापारासाठी समुद्रा ये – जा करत असतात

असुरक्षितता कोणती?

1 नैसर्गिक वादळे
2 चक्रीवादळ
3आग लागणे
4 एका जहाजाची दुसऱ्या जहाजाला लागलेली टक्कर
5 अति वर्षा

  • यासारखे अनेक कारणं सांगता येतील ज्यामुळे समुद्री प्रवास करणाऱ्या सतत चिंतामग्न व सावध रहावे लागते
  • जगापासून कुटुंबापासून दूर राहणे ,तसेच पाण्यात राहून महिने काढणे
  • वाऱ्याचा प्रचंड झोत ,लाटांचा थरकाप भरवणारा आवाज हे सर्व दृश्य किनाऱ्यावर बसून जितका विलोभनीय वाटते
  • ते तितके समुद्री सफर करते वेळी नक्कीच वाटत नसणार नाही का ? तुम्हाला काय वाटतं?? समुद्रातील सुरक्षिततेला विम्याचा हात:
  • कितीही प्रयत्न केला तरी निसर्गाबरोबर दोन हात करणे तसेच अवघड आहे
  • तसेच  समुद्री चाचे, लुटारू तसेच अन्य समस्या पाहून नुकसान हे ठरलेलेच असते
  • मग ते छोटे असो वा मोठे मग जीवित हानी का होईना ?
  • मग करावे काय ?
  • मालाची देवाण-घेवाण करण्यासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तर देशांतर्गत व्यापार करते वेळी आंतरराष्ट्रीय व्यापार करताना एका देशातून दुसऱ्या देशात माल पोहोचवताना काळजी घेणे आवश्यक असते
  • कारण त्यामुळे पुष्कळ आर्थिक नुकसान होऊ शकते
  • याचीही काळजी असते पण त्यासाठी समुद्री विमासारखा उत्तम पर्याय नाही

अडचणी व विमा :

1 समुद्री जहाज, मालवाहू नौका
2 नौकेमधला भरलेला माल
3 जहाजावरील कर्मचारी

  • या सर्वांची जबाबदारी घ्यावी लागते आणि हा तणाव खूपच जास्त असू शकतो
  • मग आपण काय करू शकतो?
  • की आपण निर्धास्त प्रवास करू शकू ?
  • आणि जर काही कारणाने जहाज किंवा मालाचे नुकसान झाले च तरीही त्याची भरपाई दुसरा कोणी देऊ शकेल ?
  • असं नक्कीच होऊ शकत
  • समुद्री सफर करतेवेळी सागरी विमा हा आपल्या मदतीला येऊ शकतो
  • व त्याच्या सशक्त हातामुळे आपण निर्धास्त प्रवास करू शकतो किंवा व्यापार करू शकतो, नाही का??

समुद्री विम्याचे प्रकार अनेक आहेत :

  • समुद्री प्रवास करते वेळी अनेक गोष्टी लक्षात घेऊन त्यांची जोखीम उचलावे लागते
  • आणि त्यामुळे बारीक-सारीक अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत करावयाच्या असतात
  • अशावेळी प्रत्येक गोष्टींचा वेगवेगळा विमा उतरवलेला जातो
  • जेणेकरून प्रत्येक गोष्टींकडे नीट लक्ष ठेवून त्याची नुकसान भरपाई विमा कंपनीला , कंपनी च्या नियमाप्रमाणे देता येईल

समुद्री विम्याचा एक प्रकार कार्गो विमा ( what is cargo insurance in marathi ) त्याबद्दल आपण माहिती घेतली आहे

  • आता पण सागरी विमाचा दुसरा प्रकार म्हणजे हल विमा याची माहिती पाहू
  • हल विमा हा सागरी विमा चा एक विमा प्रकार आहे
  • सागरी सफर करते वेळी मालवाहू जहाज, टर्मिनल्सचे काही कारणाने नुकसान होते
  • तेव्हा या नुकसानीचा परतावा हा त्या विमाधारकाची विमा कंपनी करते
  • जेव्हाच जहाज तसेच मालवाहू नौका चे मालक किंवा मालाचे व्यापारी आपल्या जहाजाचे, जहाजावरील मालाचे असो वा कोणत्याही प्रकारच्या धोक्याची जोखीम विमा द्वारे उतरवत असतो  तेव्हा त्यात हल् विमा म्हणतात
  • हा एक प्रकारचा सागरी विमा प्रकार आहे
  • प्रवास करते वेळी जेवढा त्याला कालावधी लागतो त्या कालावधी पुरता हे उपयोगी पडणारा आहे
  • जर प्रवास किती दिवस?, किती महिने? ,किंवा वर्ष? करावयाचा आहे त्या प्रवासाचा पुरताही विमा विमाधारक काढू शकतो

समुद्री हल विम्याची सुरक्षितता:

  • विमा जहाज किंवा मालाच्या सर्व नुकसानाची भरपाई उचलते
  • जसे की जहाज तुटणे ,हरविणे ,चोरीस जाणे यासारख्या गोष्टींची
  • उदाहरण  : जर एखादे  समुद्री जहाज माल घेऊन एका देशातील गोदामापासून दुसऱ्या देशाच्या गोदामा पर्यंत प्रवास करत असेल, अन वाटेत जर काही कारणाने त्याच्या जहाजाची जोरदार टक्कर झाली तर त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई विमाधारकाने विमा काढलयास नुकसान भरपाई मिळते
  • नुकसानाचे जोखीम उचलण्याची कायदेशीर जबाबदारी

विमा कंपनीने घेतलेली असते

3 इतकेच नव्हे तर अपघात किंवा दुर्घटना दरम्यान तिसरी पार्टीच्या नुकसानीची जबाबदारी विमा द्वारे विमा कंपनी घेऊ इच्छिते

हल विमा म्हणजे नेमके काय?

” समुद्री हल हा एक विमा आहे आणि मुख्यत्वे ही योजना पाण्यातील वाहतूक करणाऱ्या साधनांसाठी बनवण्यात आलेली आहे जसे पुढीलप्रमाणे नाव ,जहाज ship , yaot, नौका, वाफेवर चालणारी आगबोट इत्यादी सर्व
या नुकसानीची जोखीम उचलते
 या योजनेअंतर्गत जहाजाच्या  पूर्ण आर्थिक संरक्षण विमा कंपनी देते
 जहाजाला कुठल्याही प्रकारची क्षती पोहचली किंवा त्यांच्या यंत्रसामग्री ला ही तरीही ,त्यांच्या नुकसानीची हमी विमा कंपनी विमाधारकाला देऊ करते”

हल विमा ( what is cargo insurance in marathi ) ची आवश्यकता कोणाला :

1 वैयक्तिक आणि व्यावसायिक जहाजाचे मालक
2 चालक  आणि त्या संबंधित व्यवसाय करणारे याशिवाय अन्य लोकांनाही हा विमा गरजेचा होतो
3  जसे की जहाजाचे मूळ मालक
4  जहाज चालवणारा चालक
5  प्रवाशांना एका जागेहून दुसर्‍या जागी पोचवणाऱ्या फेरी बोटस चे संचालक
6  पर्यटक
7 जहाजांसाठी ज्यांच्याकडून कर्ज घेतलेले असेल लोक
8 व जहाजावर काम करणारे कर्मचारी

हल विमा कोण कोणत्या गोष्टींना आपल्या योजनेत अंतर्भूत करतो?

1 या हल विमा योजनेअंतर्गत समुद्री सफर करते वेळी जर दुर्घटना झाली आणि जहाज किंवा मालाचे नुकसान झाले तर
2  दुर्घटनाग्रस्तामध्ये जहाजावर काम करणारे कर्मचारी  याचीही जबाबदारी घेतली जाते
3 मुख्य म्हणजे दोन गोष्टींचा टकरीमुळे किंवा एखाद्या घटनेत तिसऱ्या कुणा व्यक्ती किंवा जहाजाचे नुकसान झाले असेल तर त्या तिसऱ्या व्यक्ती किंवा जहाजाची नुकसान भरपाई विमा कंपनी विमाधारकाला भरून देण्यास मदत करते

हल विम्याचे प्रकार

1 जहाजाचा विमा:

  • या विमा योजनेद्वारे जर कधी जहाज दुर्घटनाग्रस्त झाले किंवा काही खराब झाले असेल तर यावेळी नुकसानभरपाई मिळू शकते
  • पण त्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी झालेल्या नुकसानाची उचित सर्वेक्षण करत असतात
  • व त्या नुकसानाचे मूल्यांकन काढून गरजांनुसार योग्य किंमत देऊन त्यांचे नुकसान भरपाई देतात

2 दायित्व विमा:

  • हा सागरी विमा चा एक प्रकार आहे
  • या दायित्व  विमा योजनेनुसार हल विम्याचा विस्तार करण्यासाठी किंवा त्याला संरक्षित करण्यासाठी हा दायित्व विमा याचा उल्लेख केला जातो
  • उत्तरदायित्वासाठी काही अटी व मर्यादा असतात
  • असे मर्यादा पात्र प्रकार ,वापर हे प्रादेशिक मर्यादेवर बदलूही शकतात

3 जहाज दुरुस्ती करणाऱ्यांचे दायित्व:

  • जहाजाची देखभाल करते वेळी किंवा दुरूस्तीच्या वेळी काही हस्तकला किंवा नाजुक कामाचे जर नुकसान झाल्यास
  • जहाज दुरुस्ती करणाऱ्या व्यक्ती नाही त्रास होऊ शकतो
  • त्यांचे ही नुकसान होऊ शकत
  • ज्या बंदराच्या सीमेमध्ये काम सुरू असेल आणि कोणी तंत्रज्ञ  ,किंवा अभियंता वा त्यांचे सहकारी यांच्या जीविताच्या नुकसानीची भरपाईकडे ही जोखीम म्हणून पाहिले जाते

4 जहाज बांधणी जोखीम:

  • या योजनेद्वारे जहाज बांधणी करते वेळी झालेल्या जहाजाच्या नुकसानाची जोखीम विमा कंपनी घेते
  • परंतु तेथे कार्यरत असलेली माणसे त्यांच्या शारीरिक नुकसानाची भरपाई ची जबाबदारी विमा कंपनी विमा योजने मार्फत घेत असते
  • आणि पैशाच्या रूपात मदत करते
  • यामध्ये प्रक्षेपण करतेवेळी किंवा
  • देशाचे सैनिक अनेक प्रकारच्या चाचण्या समुद्रात करीत असतात त्यावेळी उद्भवलेल्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवित हानी चे ही विमा कंपनी संरक्षण देऊ करते

हल विमा आणि विमाधारकाला आर्थिक संरक्षण ,कोण- कोणत्या गोष्टीमुळे मिळते??

  • समुद्री सफर किंवा व्यापार करतेवेळी जहाजाच्या एखाद्या भागाला क्षती किंवा नुकसान पोहचले तर
  • त्यामध्ये जहाजा मधील यंत्रसामग्री ही अंतर्भूत होते
  • जर समुद्री प्रवास करते वेळी हल विमा काढला जातो
  • जहाजाला आग लागली किंवा समुद्री चाचे लुटारू कडून चोरी केले गेले तर ही नुकसानभरपाई दिली जाते
  • भूकंप ,
  • वीज पडणे
  • यासारख्या आकस्मिक नैसर्गिक घटनेमुळे अपघात होऊन जहाजाचे नुकसान झाल्यास ही नुकसानभरपाई मिळू शकते
  • दोन जहाजांच्या टकरीमुळे तिचे बोट किंवा वाहतुकीच्या साधना जर क्षती पोहोचली तर
  • तिसरी व्यक्ती देयता करारानुसार त्यालाही नुकसान भरपाई दिली जाते
  • जहाजाची देखभाल करते वेळी जहाजाचे नुकसान झाले तरी नुकसान भरपाई मिळू शकते
  • जहाज बुडण्यासारख्या परिस्थितीमध्येही  विमाधारकाला विमा कंपनी मदत करते हल विमा कोण घेऊ शकतो ?

1बंदराचे अधिकारी
2 जहाज मालक
3 वैयक्तिक किंवा सार्वजनिक बंदर सांभाळणारे अधिकारी

या परिस्थितीमध्ये विमा कंपनी विमा दाव्यानंतर ही विमा संरक्षण देत नाही कारण:

 1 साधारण किंवा आंशिक जर जहाजातील यंत्रसामुग्रीत खराबी येत असेल तर
2अणू गतिविधि मुळे जर जहाज क्षतिग्रस्त झाले असेल तर
3 जहाजावरील कर्मचारी किंवा प्रवासा नि मदयपान केल्यामुळे जर नुकसानग्रस्त जहाज झाल्यास
4 जाणून-बुजून जहाजाचे नुकसान केले असेल तर
5 आतंकवादी कारवाही मुळे जहाजाचे नुकसान झालेतरीही
नुकसान भरपाई मिळते
6 घातपाती कार्यवाही मध्ये भाग घेतल्या कारणाने जर जहाजाचे नुकसान झाले हे विमा कंपनीच्या लक्षात आल्यास
7  समुद्री वादळ येणार याची कल्पना देऊन सुद्धा जर समुद्रसफर केल्यास व त्यामुळे जहाजा ला क्षती पोहोचली तर

अश्या अनेक कारणांचा विचार आपण विमा संरक्षण घेतेवेळी करावयाचा असतो

विमा प्रीमियम भरतीवेळी किंवा विमा दावा  करतेवेळी कोणत्या गोष्टीकडे बारकाईने पाहिले जाते :

1 नियमित प्रीमियम करण्याआधी जहाजाचे वय किती?
2 किती वर्षा वापरले आहे ?
3विमाचे प्रकार खूप आहेत मूळ सागरी विमा खरेदी करणे शक्य नसेल तर अनेक भाग विम्याचे केले गेले आहेत
4 त्यानुसार ही विमा पण काढला घेऊ शकतो
5आणि प्रीमियम दर कमी करायचा असेल तर तशाच विम्याची माहिती घेऊ शकता
6 नुकसान झाल्यानंतर शक्य तितक्या लवकरात लवकर नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली पाहिजे
7  तरच विमा दावा केल्याने त्यांचे अधिकारी त्या ठिकाणी येऊन सर्वेक्षण करून लगेच विमा कंपनीकडून विम्याची नुकसानभरपाई पैशाच्या रूपात तुम्हाला देऊ शकतात .

नक्की वाचा : Salon And SPA Insurance In Marathi

विमा दावा कधी व कसा करावा ?

  • जर दुर्देवाने आलेल्या आकस्मित दुर्घटनेमुळे जहाजाचे नुकसान झाले तर विमा नुकसान भरपाई मिळते
  • पण त्यासाठी विमा घेताना आपणास झालेल्या  आकस्मिक नुकसानीची लवकरात लवकर माहिती आपल्या विमा कंपनीला द्यावी लागते
  • संबंधित विमा कंपनीला तुमच्या वस्तूचे कोणते व काय काय नुकसान झालेले आहे ते कळवावे
  • विमाधारकाच्या नुकसानानंतर विमा दावा केल्यास कंपनी सर्वक्षकाला त्या घटनेतील वाहनाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करन्यास पाठवते
  • व कोणत्या परिस्थितीत नुकसान झाले असेल?
  • त्याची पडताळणी सर्वेक्षक करतो
  • सर्व विमा पत्रक  कंपनीकडे पाठवावे
  • कागदपत्रे मिळाल्यानंतर मंजूर केले गेले असेल तर त्याच्या विमा दाव्यानंतर नुकसान कंपनीला मिळू शकते

विमा दावा करायचा आहे?

  • विमा दावा फॉर्म सुरुवातील  भरावा व स्वाक्षरी करावी
  • विमा  योजना कोणती घ्यावयाची आहे ?ते पाहावे
  • व त्याची कागदपत्रे विमा कंपनीकडे जमा करून द्यावीत
  • डेक व इंजिन कक्ष लॉग बुक
  • जहाज दुरुस्ती केल्यावेलच्या पावत्या
  • विमा कंपनीच्या सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी  केलेला रिपोर्ट
  • फोटो
  • विमा कंपनीने विचारलेले कोणतेही तपशील

असे अनेक प्रकारे आपण विमा दावा  करण्याची तयारी करू शकतो

समुद्री यात्रा कीवा समुद्री व्यवसाय करणाऱ्या लोकांना वेगवेगळे सागरी विमा ( what is cargo insurance in marathi ) ची माहिती घेणे आवश्यक आहे त्यातीलच ही एक हल् विमा  योजना होती

Visit Also : Hindishaala.in

Tags : Cargo Insurance  ,जहाज व त्यावरील मालाचा विमा ,Cargo Insurance In Marathi

1 thought on “जहाज व त्यावरील मालाचा विमा | Cargo Insurance In Marathi 2022”

Leave a Comment