लग्नासाठीचा विमा | Wedding Insurance In Marathi | what is wedding insurance in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण लग्नासाठीचा विमा म्हणजेच wedding insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

विवाह एक स्वप्न:
विवाह म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंददायी घटना असते आणि त्यासाठी एक एक पैसा जोडून त्या सुखाच्या क्षणाची साठवणूक लोक आयुष्यभरासाठी करत असतात.
विवाहाचा क्षण हे फक्त दोन वधू- वरच नाही ,तर दोन कुटुंब ही आनंदाने लुटत असतात. पण, त्यासाठी किती गोष्टी करायच्या असतात??
छोट्या-मोठ्या गोष्टी सांभाळता यायला पाहिजेत. असे हे क्षण आपल्याला आनंदी संस्मरणीय करून ठेवायचे असतील तर आपल्याला काय करायला हवे?? की कोणत्याही परिस्थितीत आपत्तींना आर्थिक ते कैद करू शकतील?
विवाह आणि विमा संरक्षण ( wedding insurance in marathi ) :
विमा हा व्यक्ती वर येणाऱ्या अनेक प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमध्ये आधार देण्याचे काम करत असतो
तसेच आर्थिक उलाढालीवर काबु करण्यासाठी विमा संरक्षण मिळत असते.
विवाहातील अडचणी :
आता आपण विचार करू की आपल्याला विवाह मध्ये प्राथमिक अशा कोण -कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? किंवा गृहीत धरा लागू शकतो??
- लग्न म्हणजे एका दिवसात ठरत नसते किंवा होत नाही. त्यासाठी अनेक दिवस महिन्याचे नियोजन करावे लागते. 2)वेगवेगळ्या व्यक्ती ,त्यांचा खर्च, कपडे ,दागिने, हॉल बुक करणे, साखरपुडा, लग्नासाठी हॉल, जेवणाची ऑर्डर, फोटोसेशन एक ना अनेक गोष्टी त्यामध्ये चा समाहित असतात.
- परंतु अचानक इतके नियोजन केल्यावर लग्नच मोडले तर?? किती गोष्टींवर प्रकाश टाकावा लागेल! कारण ,आर्थिक बाबतीत तर घराचा कणाच मोडून जाऊ शकतो .
- मुलीचे लग्न असो व मुलाचे खूप तोशिशीने सर्व उत्तमोत्तम होण्यासाठी खर्चाचे नियोजन केलेले असते
- नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे लग्नविधी च्या जागेचे नुकसान झाले किंवा केले गेले असेल,
- तर किंवा आजारपणामुळे लग्न विधी च्या दहा दिवसापूर्वी हॉस्पिटल मध्ये विमाधारकाला जावे लागले तर ,विमा त्याला संरक्षण देतो .
- एखाद्या विमाधारका ला किंवा वधूला शारीरिक दुखापत झाली तरीही विमा रुग्णालयाचा आणि औषधोपचारांचा खर्च नुकसान भरपाई म्हणून देतो.
- आग लागणे अशा घटना या लग्न घाईगडबडीत होऊ शकतात. त्यामुळे होणारे नुकसान विमा भरून काढते.
- लग्न समारंभ म्हणजे महागडे सोन्या-चांदीचे दागिने, कपडेलत्ते, गिफ्ट, आहेर यांची रेलचेल असते त्यावेळी चोरी होणे ही काही खूप मोठी गोष्ट नाही परंतु अशी घटना च्या लग्नात होते त्यांना खूप मोठा मानसिक व आर्थिक फटका बसू शकतो.
विमा चा लग्नात आर्थिक हातभार कसा व कुठे?
लग्न ठरल्यावर पत्रिका छापणे, हॉल बुक करणे सुरू होते हॉल बुक करताना अनेक विधीनुसार दिवसांची बुकिंग करणे, साखरपुडा, मेहंदी ,हळद असे सर्व कार्यक्रम असतात व ते अचानक पुढे ढकलण्याची परिस्थिती आली असेल तर खूप पैसेही अडकू शकतात. त्या वेळी विमा आर्थिक संरक्षण करू शकतो.
या गोष्टींना विम्यामध्ये संरक्षण मिळत नाही:
1)जर युद्ध किंवा आतंकवादी हल्ल्या मुळे लग्न रद्द झाले किंवा तेथील मालमत्तेचे नुकसान झाले तर त्याचा खर्च विमा कंपनी उचलत नाही.
2) कधीकधी राजकीय घटनेचे पडसाद हे समाजातही उमटलेले दिसतात
3) जसे की शिवीगाळ केल्यामुळे किंवा एखाद्या नेत्याने किंवा प्रसिद्ध व्यक्तींनी बंदचे आवाहन केले असेल तर सार्वजनिक बंद केल्यामुळे लग्न रद्द केल्यावर ही विमा काढला असतानाही विमा कंपनी ही मदत करत नाही.
4) एखाद्या वेळेस विमाधारक हरविणे किंवा तो अचानक न सापडल्यामुळे लग्नाचा कार्यक्रम रद्द केल्यास ही पैसे परत विमा द्वारा मिळत नाही.
5) विमाधारका चे काही राग, द्वेषामुळे लग्नविधी च्या ठिकाणाची नासधूस केल्यास त्या नुकसानीस विमा कंपनी बाध्य राहात नाही.
विमाधारक व नातेवाईक:
विमाधारकाने जर आपल्या किंवा कुटुंबियातील व्यक्तीच्या विवाहासाठी विमा उतरवलेला असेल, आणि विमाधारकाचे स्वतःचे किंवा अगदी रक्ताने जोडलेल्या नातेवाईकांचा अपघात झाला किंवा त्यातच ते मरण पावले अथवा अपंग झाले तर अचानक येणाऱ्या खर्चाची सोय कशी करणार?
पैसे कुणाकडे मागणार? अशावेळी विमाधारक किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या रुग्णालय किंवा औषधोपचाराच्या खर्चाची जबाबदारी विमा कंपनी घेते.
लग्नविधी चे ठिकाण व नुकसान भरपाई:
1) लग्नविधी चे ठिकाण हे युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती किंवा हवेतील किरणोत्सर्गामुळे झालेल्या तत्सम नुकसानीस विमा बाध्य राहत नाही .
2)राजकीय कोणतीही परिस्थिती असो सत्ता किंवा सरकार उखडणे, पुनर्स्थापित करणे किंवा अन्य कारण तेही विमा कंपनीकडून सहायता देण्यास पात्र ठरत नाही .
3)ज्याने लग्नासाठी विमा घेतला आहे व त्याला एखादा अचानक आजाराशी मुकाबला करावा लागला किंवा दुर्देवाने कोणत्याही एक्सीडेंट मध्ये त्याला मरण आले तर अशावेळी ही विमा ची आर्थिक साथ त्याला मिळत नाही.
विमाधारक व विमा नुकसान भरपाई ( wedding insurance in marathi ) :
1)विमाधारक अचानक पणे न सापडल्यास, विधी थांबून कार्यक्रम रद्द होऊ शकतो
2) किंवा त्यालाआजार ,शारीरिक इजेमुळे कार्यक्रम रद्द करावा लागू शकतो
3) निराशेपोटी किंवा वैयक्तिक कारणामुळे त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला किंवा जीव दिला तरीही विमा कंपनी त्याची जोखीम उचलत नाही.
4) जर विमाधारक वाईट व्यसन किंवा द्रव्याच्या आहारी गेला असेल व ड्रग किंवा तत्सम पदार्थांच्या सेवन केल्यामुळे त्याच्या लग्नाचे नुकसान झाले असेल तर विमा कंपनी मदत करण्यास सपशेल नकार देते.
नक्की वाचा : Miscellaneous Insurance In Marathi
नैसर्गिक आपत्ती व विमा कंपनीची जोखीमेस नकार:
काही अशा ही नैसर्गिक आपत्ती विमाधारका वर येऊ शकतात की त्या मुळे विमा कंपनी ही जबाबदारी घेण्यास नाकबूल होऊ शकते.
त्या कोणत्या परिस्थिती त्या आपण आता पाहू-
- एखाद्या लग्नविधी च्या हॉलच्या ठिकाणी धरणीकंप, ज्वालामुखी फुटणे, तुफान येणे यासारख्या निसर्गाने लादलेल्या आपत्तींना विमा कंपनी पाठिंबा देत नाही
- कारण या जरी अचानक येऊ शकतात याची पूर्णपणे खात्री नसते तरीही हवामान विभागाने दिलेल्या बातम्या किंवा वर्तवलेले अंदाज यामुळे आधीच आपण जागृत होत असतो तरीही व्यक्ती त्याच मुहूर्तावर लग्न करू इच्छित असल्यास त्याचे नुकसान झाल्यास विमा कंपनी ती जोखीम उचलत नाही
- काही वेळेस सरकारने समाजासाठी काही परिस्थितीत अनेक नियमांची काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलेले असते परंतु कित्येकदा लग्नासारख्या वेळी अति- उत्साहात त्या नियमांकडे कानाडोळा केला जातो
- यामुळे जर सरकारने तो कार्यक्रम रद्द करायला लावला किंवा त्यांना काही भरपाई करण्यात सांगितले किंवा त्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास सही विमा कंपनी त्या गोष्टींसाठी जबाबदार राहत नाही
- एखाद्या ज्वलनशील पदार्थांचा स्फोट झाल्यास ही नुकसान भरपाई मिळत नाही
- जर एखाद्या विमाधारकाने काही वस्तू ,गाडी ,कपडे रेंट वर घेतले असतील आणि त्याची नासधूस झाली असेल तर विमा कंपनी त्यास भरपाई देण्यास तयार नसते.
विमा आणि संरक्षण महत्त्वाचा भाग:
- खरंच आपण आपल्या मुलांच्या बालपणापासूनच त्यांच्या विवाहाची स्वप्ने पाहत असतो
- त्यासाठी पैसे साठवित असतो प्रत्येकालाच आपले लग्न धुमधडाक्यात व्हावे व त्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत असे वाटत असते.
- आनंद असला तरीही तो ही काहीवेळा पैशामुळे घडू शकतो किंवा त्या आनंदाला काही अडचणी थांबवू शकतात
- पण विमा अशा प्रसंगासाठी आपल्या आनंदाला लावलेले काजळाची तीट असे आपण म्हणू शकू .
विमा एक रक्षणकर्ता:
1) पैशामुळे होणारे विमा- धारकाची हानी ही यामुळे तो टाळू शकतो
2) विवाह म्हटला की छोट्या-मोठ्या अडचणी आल्यास त्यांना पैशाच्या स्वरूपात सुरक्षितता विमा देऊ शकतो
3) निसर्गाची किंवा मानव निर्मित कारणांमुळे उद्भवलेली लग्नातील विघातक आपत्ती थोडीफार विम्याच्या आधारे सुरक्षित राहू शकते .
विमा दावा व परिस्थिती;
1) विमा दावा करताना विमा कंपनीची अनेक नियम व अटी असतात
2) त्या नीट वाचल्या पाहिजे अंदाजे ठरवून विमा योजना स्वीकारू नये
3) कारण विमा दावा केल्यावर विमा कंपनी तुमच्या नुकसानाचे कारण विमा कंपनीच्या नियमात अंतर्भूत केले आहे का हे तपासून पाहते
4) प्रत्येक विमा कंपनीच्या संरक्षणाची कारणे किंवा नियम हे वेगवेगळे असू शकतात .
5)आपले कारण कोणत्या गोष्टीत बसेल तोही विचार करून त्या विमा कंपनीची विमा योजना घ्यावी.
6) विमा योजना जाहीर करताना मर्यादित काळापर्यंत त्याचे संरक्षण असते ,अशा वेळी लग्न रद्द झाली किंवा पुढे ढकलण्यात आला तो कालावधीही तपासावा मगच विमा दावा करावा.
Reed Also : Top 5 Small Business Ideas in Marathi 2022
कोविड व विमा नियम:
- आज तर कोविड हा जगभरात पसरलेला आहे त्यामुळे सर्व चर्चचा हा विषय व समस्या झाली आहे.
- अशावेळी सरकारचे नियम व कडक असतात.
- समाजात मास्क व सोशल डिस्टंसिंग चे नियम न पाळल्यामुळे कारवाई होऊ शकते.
- लोकांची ही संख्या खूप कमी असावी लागते.
- पण हे सर्व नियम पायदळी तुडवल्या ने पेनल्टी भरावी लागली व आर्थिक भरपाई भरावी लागली तर विमा आर्थिक संरक्षण देत नाही.
- जेव्हा सरकार द्वारा हे कडक नियम मागे घेतले तरच विमा कंपनी नवीन पाऊल उचलू शकते.
- कारण विमाधारक एकच काय प्रत्येक व्यक्तीसाठी हे नियम आजच्या अराजकतेच्या काळात आवश्यक आहेत व त्याचे आपण पालन केले तरच आपण या कोरोनो च्या वेढ्यातून लवकरात लवकर बाहेर पडू शकतो. नाही का??
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण लग्नासाठीचा विमा | Wedding insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.
Tags : लग्नासाठीचा विमा | Wedding insurance ,लग्नासाठीचा विमा | Wedding insurance in marathi 2022
1 thought on “लग्नासाठीचा विमा | Wedding insurance in marathi 202”