हवामान विमा | Weather Insurance In Marathi | use of weather insurance in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण हवामान विमा म्हणजेच weather insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

बदलते हवामान व आपण:
- ग्लोबल वॉर्मिंग मुळे आजकल भारतातच काय पण जगभरातल्या हवामानात हा बदल झालेला दिसून येतो
- इतके हवामानात परिवर्तन झालेले दिसून येते की कधीकधी हवामानाचा अंदाज बांधणारे अचंबित होऊन जातात
- आपल्या देशातील हवामानाचे आडाखे पाहून अनेक जण आपापल्या व्यवसायाची दिशा ठरवीत असतात
- त्यांचे व्यवसाय हे निसर्गावर आधारित असतात, त्यांना हवामान शास्त्रज्ञांचे मत हे बहुमूल्य वाटत असते
- पण आजच्या प्रदूषणाच्या मोठ्या समस्येमुळे अनेक बदलही संभवतात
- पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे ऋतू ठराविक महिन्यात येऊन ठराविक महिन्यात परत जातात
- ते आज कधीही उपटसुंभ सारखे उगवलेले आणि धूमकेतू सारखे गायब झालेलेही दिसतात
- थंडीतही पाऊस पडू शकतो व पावसाळ्यात ही उन्हाळा धडकू शकतो
- पण या बदलत्या ऋतू चक्रामुळे शेतकरी आपल्या व्यवसायाबद्दल चिंतीत असतात
- कारण ते लावत असलेली फुले, फळे ,शेती हे सर्व ठराविक मोसमात पिकणारे असते
- पण हवामानाच्या सततच्या लपंडावामुळे त्याची ही वेळापत्रक बदलते आणि व्यवसायाचे प्रचंड नुकसान होते
हवामान खाते व व्यवसाय:
- हवामान खात्याच्या अंदाजा मुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या उद्योगधंद्यांना चालना मिळालेली दिसते
- कारण बोटी समुद्रात नेताना खलाशांना वादळाचा अंदाज जेवढा हवामान खात्याला असतो तेवढा तो नसतो
- अनुभवावरून त्यांना ठरवता येत नाही -त्यामुळे वैमानिक, नाविक, शेतकरी ,ज्योतिषी सर्वसामान्य नोकरदार वर्ग, धंदेवाईक, पर्यटक ह्यांना होतोच
- अंदाज जर नेमक्या वेळे आधीच मिळाली नाही तर खूप लोकांचे व्यावसायिकांचे आर्थिक दृष्ट्या नुकसान होईल
- पण भौतिक मालमत्ता, जीवितहानी याचे मोजदाद करता येणार नाही
- हवामान खात्याचे अंदाज थोड्याफार प्रमाणात जरी चुकले तरी ही ते मार्गदर्शक म्हणुन नेहमीच सर्वांना दीपस्तंभासारखे वाटत असता.
हवामान विमा ( what is weather insurance in marathi ) :
हवामान विम्याद्वारे हवामानात होणाऱ्या बदलामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ही विमा कंपनी आपल्याकडे घेते
कोणकोणत्या आपत्तीत हवामान विमा योजना कामाला येते?
1) ठराविक काळासाठी व मर्यादित हंगाम किंवा ऋतू हे पूर्वापारपासून चालत आलेली ऋतुचक्र आहेत
* त्यात सहसा बदल होत नाही परंतु जर त्यामध्ये अचानक अतिशय (भयंकर )असा बदल झाला
* व त्यामुळे व्यक्ती किंवा व्यावसायिकांचे नुकसान झाले तर ते विमा कंपनी नुकसान भरपाई भरते
2) पावसाळ्यात धो -धो पावसाचे रूपांतर जेव्हा काही दिवस आतोनात मुसळधार कोसळणारा पाऊस धारांमध्ये झाले
* की शहरांचे रस्तेही तुंबतात् त्यामुळे वाहतूक नियंत्रण कोलमडते
* शेती-बागायती ,मत्स्यव्यवसाय यांच्यासारखे अनेक व्यवसाय बुडू शकतात
3) ग्लोबल वार्मिंग च्या काळात तापमानात खूप मोठे फरक होत जातात त्यामुळे ही सामाजिक जीवनावर अनिष्ट परिणाम होऊन हवामान विमा योजनेची आवश्यकता भासू शकते
4) अवर्षणाच्या काळात तर वर्षानुवर्षे पाऊस पडतच नाही
* त्यामुळे जमिनीला तडे पडतात शेती उद्योगधंदे सर्व ओस पडू लागतात
* माणसांना हवे असलेले अत्यावश्यक पाणी हे ही मिळत नाही
* यामध्येही हवामान विभाग पैशाच्या स्वरूपात विमाधारकाला मदत करू शकतो
* वादळासारखी या परिस्थितीमुळे अनेक गावाच्या गावे उद्ध्वस्त झालेली दिसून येतात अनेक जणांचे आर्थिक नुकसान होतेच पण जीवित हानी ही होतेच
हवामान विमा चा उपयोग ( use of weather insurance in marathi ) :
- खेडेगावातील जवळपास बहुतांश जणांचा शेती आणि जोडधंदा हा असतो
- आणि हे बहुतांशी उद्योग निसर्गावरच अवलंबून असतात पण निसर्गाने जर आपला तिसरा डोळा उघडला
- तर मात्र यामध्ये गावच्या -गाव नेस्तनाबूत होताना आढळतात
- अशा व्यवसायाची आर्थिक स्वरूपात नुकसानभरपाई देण्याचे काम हे हवामान विमा आपल्या हाती घेतो
- व विमाधारकांना निश्चितच ठेवतो
- वादळ, पूर ,गारा पडणे तापमानात अचानक बदलामुळे व्यापारावर अनिष्ट परिणाम होणे
- त्यामुळे त्यांना आर्थिक पाठबळ दिले जाते
- बॅंका छोट्या-मोठ्या सहकारी वित्त संस्था तसेच शेतीवर अवलंबित व्यापार या सर्वांच्या तरी हा विमा घेतो
- त्यामुळे छोट्या -छोट्या खेड्याचे अतोनात नुकसान झालेले असताना सुद्धा पुन्हा ती स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात
विम्याचे संरक्षण व शेतकरी:
- हवामान विम्याचे आर्थिक संरक्षण ही शेतकऱ्यांना मिळू शकते
- हवामानातील या बदलामुळे त्याच्या शेत पिकावर जर विपरीत परिणाम दिसून आला
- तर विमा कंपनी विमाधारकाच्या आधीच्या पीक उत्पादनावर एक नजर टाकुन परत वर्तमान स्थितीतल्या शेती काळाची तुलना करते
- या दोहोंमध्ये जर खूप तफावत आढळल्यास विमा कंपनीच्या आधीच निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंत शेतकरी विमाधारकास नुकसानभरपाई दिली जाते
- 2) पैसे फेडण्यापूर्वी सर्वेक्षण करून योजना तयार केली जाते
- व पूर्वी झालेले आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी आधीच्या नोंदीनुसार वर्तमान स्थितीची नोंद घेतली जाते
- 3) शेतकरी त्याला मिळणाऱ्या आर्थिक नुकसान भरपाई तसे त्याचे झालेले नुकसान आणि त्यांनी उत्पादन ,उत्पादनाच्या योजना ,साठी वापरलेला पैसा याचा सुयोग्य मेळ घालून ठरवता येतो
प्रीमियम
- हवामान विमा योजना जर विमाधारकाने घेतली असेल तर त्याला प्रीमियमची रक्कम ही हवामानामुळे घडू शकणाऱ्या परिस्थितीची शक्यता, अंदाज नुकसानाची आर्थिक रक्कम, यानुसार प्रीमियम ठरतो
- नैसर्गिक आपत्तीमुळे विमाधारकाला चे नुकसान झाले असेल म्हणजे भूकंप ,चक्री वादळ मात्र जन्य परिस्थिती, अति पूर यामुळे होणाऱ्या संभावित परिस्थितीपासून विमा कंपनी विमा धारकाचे संरक्षण करते
Reed Also : दायित्व विमा | Liability Insurance In Marathi
सट्टा हवामानाचा परिणाम व इतर व्यवसाय:
- 1) हवामानाचा परिणाम हा शेती व्यतिरिक्त अन्य गोष्टींवरही पडतो
- शेती व त्या व्यवसायाचे नुकसान होऊ शकते
- अशा व्यवसायासाठी हवामान विमा योजना मध्ये ते मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात
- व त्यासाठी वर्षानुवर्षे स्पर्धक खूप मेहनत घेत असतात
- पण स्पर्धेच्या दिवशी खराब हवामानामुळे जर नुकसान झाले तर त्याची भरपाई विमा धारकास मिळते
- क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी तसेच नियोजनासाठी ही पैसा खर्च केलेला असतो
- अशा वेळी झालेली नुकसान भरपाई विमा कंपनी आपल्या नियमाच्या आधारित भरून देते
- सिनेमाच्या चित्रिकरणासाठी विमाधारकाच्या पैसा हा ओतलेला असतो
- बहुतेकदा चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात किंवा थंड हवामान असलेल्या या जागेत किंवा निसर्गरम्य स्थळी जायचे ठरते
- तेथे सर्व चित्रीकरणाचा खर्च ही एका दिवसातच खूप असतो
- अशा वेळी जर त्या दिवशी हवामानातील कारणामुळे फरक पडला असेल तर दिग्दर्शकावर आर्थिक डोंगर त कोसळू शकतो
- म्हणून हे टाळण्यासाठी विमा कंपनी नुकसानाची पडताळा घेऊन भरपाई करत असते
- आजकाल मोठमोठे उद्योगपती ,चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती, किंवा राजकीय नेते स्वतःचे किंवा मुलांची लग्न, स्थळ(जागा )पाहून ठरवतात
- त्यामागे छान नियोजन करून पैशाची लयलूट केलेली असते
- अशावेळी जर संकट म्हणून हवामानातील विपरीत परिणाम समोर आला
- व लग्न थांबवावे लागले तर होणारा फार मोठा खर्च परत मिळवण्यासाठी विमा योजना खूप फायदेशीर ठरते
विमा कंपनी:
★विमा कंपनी हवामान या विमा योजनेअंतर्गत विमाधारक व्यवसायिकास खास आर्थिक संरक्षण देऊन फार मोठा दिलासा देते
★ एखाद्या व्यावसायिकाने काही कार्यक्रम आयोजित केला असेल व त्यात हवामानाच्या बिघाडामुळे त्या विमा धारकाचे आर्थिक नुकसान झाले तर विमा कंपनी त्याला आर्थिक संरक्षण देऊ करते
★ परंतु जर मुदत संपण्याआधी विमा धारकाचे व हवामानामुळे कोणतेही नुकसान झाले नाही तर विमाधारकाने भरलेल्या प्रीमियम रकमेचा लाभ विमा कंपनीला मिळतो
● हवामान विमा योजनेअंतर्गत या गोष्टींचा विचार केला जातो:
- स्टॉक इंडेक्स किंवा किती व्याज लावले आहे तो दर ,शेती उत्पादनाच्या किंमती ,यांचा विशेष विचार केला जातो
हवामान विमा योजना व वैशिष्ट्ये ( weather insurance in marathi ) :
- त्या विमा योजना अंतर्गत सर्व प्रकारचे व्यवसाय व हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई अंतर्भूत आहे
- या योजनेनुसार राष्ट्रांतर्गत तसेच परदेशात गेल्यास योजना मदतीस येते
- हवामानामुळे व्यवसायाचे नुकसानाचा लेखाजोखा देण्याची ही निकड भासत नाही कारण त्या ठिकाणची हवामानाची प्रतिकूलता पाहून विमा कंपनी स्वताहून भरपाई देऊ करते
- ज्यावेळी वेगवेगळ्या संस्था किंवा व्यवसाय समूह अनेक सामूहिक कार्यक्रम राबवतात
- यामध्ये त्या लोकांसाठी अनेक गोष्टींचे आयोजन केलेले असते डेकोरेशन वर ,खान-पान, राहण्याचे सर्व नियोजन केलेले असते
- याचा खर्चही खूप असतो व निसर्गाच्या सान्निध्यात लोकांना आनंद लुटायचा असतो
- यासाठी संस्था ही बराच पैसा घालत असते
- इतके नियोजन करून शेवटी हवामानातील अचानक झालेले बदल हे त्याच्या हाती नसतात
- पण ‘हवामान विमा ‘घेणे हे त्याच्या हाती नक्कीच असते
- अशा वेळी झालेल्या गारांचा वर्षाव, हिमवर्षाव, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक घटना संस्था थोपवू शकत नाहीत
- व झालेल्या नुकसानीची भरपाई मात्र विमा कंपनी द्वारा विमाधारक भरू शकतो
- काही अधिवेशन मध्ये हि मोठ्या व्यक्ती आलेल्या असतात त्यांच्या सुरक्षा व आयोजनाचा खर्च, संरक्षणाचा खर्चही अधिक असतो
- पण हवामान विमा योजना घेतल्यामुळे अशा नुकसानीपासून थोडा दिलासा मिळतो
Reed Also : बिझनेस सुरु करताना काय काळजी घ्यावी 2022
हवामान विमा योजना व नियोजन: ही विमा योजना निवडताना वेगवेगळ्या कंपनीच्या प्रीमियम चे दर व लाभ पण विचारात घ्यावे
- तुम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या वेळी जर एखाद्या कामकाज अडथळ्याची शक्यता असल्यास तुम्ही ही योजना निवडू शकता म्हणजे समजा पावसाच्या दिवसातल्या या कार्यक्रमासाठी तुम्ही निवडलेल्या कार्यक्रमाच्या वेळेमध्ये अतिरिक्त पाऊस पडला तर विमाधारकास संरक्षण मिळू शकते घेऊ शकतो विमाधारकाच्या या कार्यक्रमाच्या आधी काही दिवस तो हा विमा शकतो
- त्यात हवामानाचा अंदाजाचा ही त्यांनी आढावा घेऊन लगेचच योजना निवडावी त्याचाही फायदा होईल
- विमाधारकाच्या कार्यक्रमाच्या जवळपास हवामान केंद्र असेल तर आपसूकच निश्चित माहिती मिळू शकते
- परंतु जर हवामान केंद्र जवळ नसेल, लांब असेल तर एखाद्या खास ‘हवामान निरीक्षकाची’ सोय करून माहिती मिळवू शकतो
हवामान विमा व संरक्षण:
- हवामान विमा योजना नैसर्गिक कारण म्हणजे खराब हवामानामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान भरून देते
- आर्थिक नुकसानभरपाई देताना अनेक कारणाने झालेल्या नुकसानाना एकाच नियमात बसवले जाते
- तसे धुक्यामुळे ,जोरात वाहणारे वारे ,बर्फ पडणे ,वीज पडणे वेगेरे नुकसान
विमाधारक व विमा योजना:
- विमाधारकाने आयोजित केलेल्या समारंभ जर खराब हवामान परिस्थितीमुळे होऊ शकला नाही तर या सर्व आर्थिक नुकसानाची जोखीम ही विमा कंपनी उचलते जसे किती विमा कंपनी भीमा चालकाच्या कार्यक्रमाची त्यावेळी पुरती हवामानाची हमीच घेत असते पण या सर्व प्रकारात विमाधारकास असलेल्या तणावाचे रूपांतर हे निश्चितेत होते
- विमा योजना हवामानाची मदत घेऊन जाहिरात करण्यास ही मुभा देते
- एखाद्या मौसमात एखादा व्यवसायिक आपले उत्पादन विकण्यासाठी जाहीर करतो की,
- जर या विशेष तारखेला पाऊस पडला बर्फ पडला तर एका वर्षासाठी हप्ते फ्री! किंवा अशा सारख्याच योजनांची जाहिरात करू पाहतो
- व त्यासाठी नुकसान झाले तर ते भरण्याची हमी ही विमा कंपनी घेते
- ★अशाप्रकारे खराब हवामानामुळे व्यवसायिकां चे नुकसान झाले असल्यास हवामान विमा योजना जरूर घ्यावा आणि आपले नुकसान भरपाई मिळवावी
1 thought on “हवामान विमा | Weather insurance in marathi 2022”