Third party insurance |थर्ड पार्टी इन्शुरन्स

Third party insurance याला तृतीय पक्ष विमा म्हटले जाते.
हा तिसरा पक्ष म्हणजे कोण? हे समजण्याकरिता आपल्याला प्रथम वा दुसरा पक्ष समजणे गरजेचे आहे नाही का?
तर प्रथम पक्ष म्हणजे विमा योजना घेणारा विमाधारक
व दुसरा पक्ष म्हणजे ज्याच्या कंपनीकडून तो विमा योजना घेत आहे तो !
व विमाधारक का मुळे जो इतर कोणाचे नुकसान झाले असेल व शारीरिक दुखापत झाली असेल तर त्याला त्याची भरपाई हवी असेल व त्याने विमाधारका वर खटला ही भरला असेल तर अशावेळी विमाधारक विमा कंपनीकडे याबाबत विमा दावा म्हणजेच क्लेम दाखल करते आणि त्याच्या बदल्यात विमा कंपनी ही तिसऱ्या पक्षाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करते
तिसरा पक्ष |Third party insurance
थोडक्यात तिसरा पक्ष म्हणजे असं म्हणू शकतो की विमा कंपनीने विमाधारकाला एखाद्या व्यक्तीच्या नुकसानाच्या भरपाई करीत दिलेली आर्थिक स्वरूपाची मदत म्हणजे पैशाचे संरक्षण होय
तृतीय पक्ष विम्याचे संरक्षण कशा प्रकारे असते?|How is third party insurance protected?
1) तिसर्या पक्षाचा विमा हा एखाद्या माणसाला वा कंपनीला तिसऱ्या पक्षामुळे झालेल्या तोट्या पासून आर्थिक संरक्षण देण्याचे काम करतो
2) तिसऱ्या पक्ष विम्याच्या दोन प्रकारच्या लायबिलिटी कव्हरेज आहेत व संपत्तीचे नुकसान झाल्यास त्याच्या बाबतीतले ही संरक्षण आहे
3) खरे तर ज्या व्यक्तीचे स्वतःचे घर वाहन आहे त्यांना त्या त्या प्रकारच्या विमा योजना खरेदी केल्या पाहिजेत जेणेकरून काही नुकसानाची परिस्थिती निर्माण झाली तर विमा त्यांना संरक्षण देऊ शकेल
तृतीय पक्ष विमा योजना याची खरेच गरज आहे का?|Is a third party insurance plan really needed?
हा तिसरा पक्ष विमा लायबिलिटी इन्शुरन्स म्हणजे दायित्व विमा याचाच एक प्रकार आहे एखादे नुकसान झाले मग ते मानव निर्मित कारणाने असो वा नैसर्गिक कारणाने झाले असेल तरी प्रथम पक्ष म्हणजे विमाधारकाला त्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी लागते अगदी सर्वसामान्यपणे पाहिले गेले तर तिसरा पक्ष विमा म्हणून ऑटोमोबाईल विमा ही म्हटले जाते
विमाधारक व्यक्तीची स्वतःची गाडी असेल पण तिचा चालक ड्रायव्हर असेल व जर त्या ड्रायव्हर कडून अपघात झाला तर गाडीचा विमा काढला असल्यास व विमाधारक दोन्ही नात्याने ज्या चा अपघात झाला त्या व्यक्तीच्या नुकसानीची जबाबदारी ही विमाधारका वर येते व विमा कंपनी मुळे त्याला आर्थिक संरक्षण मिळते जेतो दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला देतो नुकसानभरपाईचा खटला भरला गेल्यास संरक्षण विमा या कंपनी
द्वारे मिळते
ऑटोमोबाईल तिसरा पक्ष दायित्व संरक्षण |Automobile third party liability protection
ऑटोमोबाईल तृतीय पक्ष दायित्व चे ही प्रकार पडतात त्यातला एक म्हणजे 1 शारीरिक दुखापत दायित्व
जर विमाधारक मुळे एखाद्या व्यक्तीला अपघात झाला व इतर कारणामुळे कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा झाली तर त्याला देण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदत औषधोपचाराचा खर्च यांचे संरक्षण देते या वैद्यकीय खर्चाला मिळणाऱ्या संरक्षणामध्ये रुग्णालय खर्च हरवलेला पगार म्हणजेच कामास न गेल्यामुळे तितक्या दिवसाचे वेतन दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे होणाऱ्या वेदना व ताण यांना अंतर्भूत केले जाते
भौतिक संपत्तीचे नुकसान
विमाधारका मुळे एखाद्या व्यक्तीच्या भौतिक संपत्ती वा प्रॉपर्टी चे नुकसान झाले मोडतोड नासधूस झाली तर क्लेम केल्यावर या खर्चाची भरपाई ही विमाधारकाला विमा कंपनीकडून देण्यात येते
तिसरा पक्ष विमा व त्याची आवश्यकता |Third party insurance and its requirements
अशा प्रकारच्या विमा योजनेची सक्ती कायद्याद्वारे ही झाली पाहिजे कारण रस्त्यावर चालक ज्यावेळी रोज वाहन चालवतात अशा वेळी विम्याचे संरक्षण हे त्याने घेतले पाहिजे किमान पक्षी एक चालक म्हणून प्रॉपर्टीचे नुकसान लायबिलिटी इन्शुरन्स शारीरिक दुखापत लायबिलिटी इन्शुरन्स घेतलाच पाहिजे काही राज्यांमध्ये ही चालकांना अत्यावश्यक केले गेले आहे पण काही ठिकाणी त्याची गरज मानली जात नाही पण त्याच्या साठी काही अटी व निर्बंध या ठेवलेले आहेत
काही वेळा काही राज्यही नो फॉल्ट राज्य म्हणून ओळखले जातात व लायबिलिटी कव्हरेज हे तिथे गरजेचे ठरते हे नो फॉल्ट कायदे हे रोजचे दुर्घटनाग्रस्त व्यक्ती द्वारे आपल्या दुःख व तणावा करिता क्लेम केले जातात त्याची वाढती संख्या पाहून त्यांना थोडा मर्यादित संख्या वर आणण्याकरिता कायदा सुरू करण्यात आला आहे परंतु हा कायदा अपघाताच्या वेळी तिसऱ्या पक्षात द्वारे झालेल्या मोठ्या दुर्घटनेत जायबंदी झाला असेल तर आर्थिक मदत देण्यास नाकारते
तिसरा पक्ष विमा योजना ही गरजेचे आहे!
कारण जे गृह मालक आहेत व त्यांच्याकडे स्वतःची जास्त प्रॉपर्टी आहे अशावेळी त्यांच्या नुकसान झाल्यास अनेक प्रकारचा खर्च उद्भवू शकतो व तो खर्च गृह मालक म्हणून त्यालाच करावा लागू शकतो त्यापेक्षा प्रॉपर्टी विविध प्रकारचे असेल तर त्या प्रॉपर्टी अनुरूप लायबिलिटी इन्शुरन्स चे प्रकार त्याने घेतले पाहिजे
देश व तृतीय पक्ष विमा
प्रत्येक देशात काय प्रत्येक राज्यानुसार तिसऱ्या पक्षाच्या दायित्व विमा या बद्दल अनेक विचार नियम व कायदे असतात काही ठिकाणी तृतीय पक्ष नसला तरी चालतो पण काही निर्बंध आहे आहेतच मात्र काही देशात मात्र हा तिसरा पक्ष दायित्व विमा अत्यंत आवश्यक मानला जातो जनरल इन्शुरन्स मध्ये व्यापार व उद्योग यांना अंतर्भूत केले जाते कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्चर इंजिनिअर व या व्यवसायातील लोक तिसरा पक्षांना प्रभाव टाकू शकतात कितेकदा विविध कारखाने व कंपनी या आपल्या संपत्ती वा प्रॉपर्टीचे नुकसान यापासून संरक्षण मिळावे याकरिता चंद्र लायबिलिटी इन्शुरन्स चा वापर करताना दिसून येतात
दावे व संरक्षण
ही विमा योजना ही व्यावसायिकांसाठी अत्यावश्यक ठरते काही ठिकाणी ही विमा योजना घेणे अनिवार्य ठरते पण काही ठिकाणी व्यावसायिकांचा व्यापार कोणत्या प्रकारचा आहे?
त्यानुसार त्याने ही विमा योजना घ्यावी हे ठरते या विमा योजनेमध्ये रासायनिक पदार्थ शेतीविषयक आवश्यक गोष्टी तसेच मनोरंजनाच्या साधनांचाही अंतर्भाव केला आहे हा विमा तोटा झाल्यास वा इजा करणाऱ्या उत्पादनावर अथवा त्या गोष्टींवरील दाव्यापासून कंपनीला आर्थिक संरक्षण देण्याचे काम करते
तिसरा पक्ष विमा व स्वतःचे नुकसान
आज-काल रस्त्यावर इतकी वाहतूक वाढली आहे की त्यामुळे सहजासहजी स्वतःचे वाहन चालवणे ही जोखीम वाटते कितीही व्यवस्थित चालवले तरीही जर अपघात झालाच व तो तुमच्याकडून तुमच्या गाडीमुळे व त्यात कोणाचाही मृत्यू झाला अथवा त्याला शारीरिक इजा झाली तर विमाधारक म्हणून तुम्ही तिसरा पक्ष विमा योजना काढली असेल तर तुम्हाला तो तारणहार बनू शकेल व दाव्यामुळे येणाऱ्या खर्चाची भरपाई विमा कंपनी तुमच्या मार्फत करेल कारण जर एखादा मृत झाला तर त्याची भरपाई किती द्यावी लागेल याची कल्पना करणे ही होणार नाही याला निर्बंध ही नाही
प्रॉपर्टी नुकसान भरपाई
एखाद्या वेळी विमाधारकाच्या मोटारी मुळे व त्याच्यामुळे जर दुसऱ्या व्यक्तीच्या सामानाचे घराचे दुकानाचे वा गाडी चे अथवा त्या व्यक्तीचे शारीरिक नुकसान झाले असेल तर तो सरळ सुटू शकत नाही त्याची भरपाई करणे बंधनकारक ठरवू शकते व जर तिसरा पक्ष वाहन विमा तुम्ही काढला असेल तर जवळ जवळ सात लाखापर्यंतची रक्कम भरपाई करण्याकरिता तुम्हाला ती मिळू शकते म्हणजे अशा तणावयुक्त परिस्थितीतही तुम्ही तणावरहित राहू शकता कारण तुम्हाला पैशाचा भक्कम आधार देणारी विमा कंपनी आहे नाही का?
पर्सनल एक्सीडेंट कव्हर
विमाधारक म्हणून तिसरा पक्ष मोटार विमा वा स्टॅंडर्ड मोटार विमा विकत घेतला असाल तर विमाधारकाकडे त्याच्याबरोबर पर्सनल एक्सीडेंट कव्हर असणे ही अत्यंत गरजेचे ठरते या संरक्षणाचा उपयोग तिसरा पक्ष विमा दुर्घटनेच्या वेळी स्वतःच्या वैयक्तिक वैद्यकीय उपचारासाठी ही करून घेऊ शकतात
तिसरा पक्ष विमा कसे काम करतो?|How does third party insurance work?
कुणा व्यक्तीनेही विमा योजना खरेदी केली असेल व विमाधारक असते वेळी त्यालाच दुर्घटनाग्रस्त व्हावे लागले तर अशावेळी विमा कंपनी ही तिसरा पक्षाच्या प्रॉपर्टीचा रिपेरींग साठी पैशाची सहायता करते त्यामुळे विमा धारकाचा पैशाच्या बाबतीतला जो फार मोठा ताण असतो तो दूर होतो व दुर्घटना झाल्यास विमाधारकाने क्लेम करण्याआधी विमा कंपनी आपल्या अपघाताची माहिती आधी द्यावी लागते
विमा दावा |Third party insurance claims
विमाधारक अपघातग्रस्त झाल्यामुळे विमा कंपनीकडे तो नुकसानभरपाई करिता क्लेम करतो अशा वेळी किती व कशी नुकसानाची परिस्थिती आहे त्याची पडताळणी करण्यासाठी विमा कंपनी काही अधिकाऱ्यांना नुकसान ग्रस्त भागात पाठवते व सर्व प्रकारची तपासणी पूर्ण झाल्यावरच विमा कंपनीला नुकसानीचे कारण योग्य वाटले तर त्याच्या नियमात बसत असेल तर विमा दावा समोर विमा कंपनी आर्थिक संरक्षण देऊ करते
तिसरा पार्टी विम्याचे स्थान |Third party insurance location
तिसरा पक्ष विमा ही न्यायालयाची एक अत्यावश्यकता मानली गेली आहे यामुळे तिसरा पक्ष संरक्षित केला गेला असल्यामुळे विमाधारकाला कोणतेही न्यायालय निर्बंध अटी यांना पाळता येत हा एक चांगला संरक्षण प्रकार असला तरी विमाधारकांना आणखी एक समाधान असते ते म्हणजे स्वतः बरोबरच त्याच्यामुळे झालेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नुकसानाची भरपाई ही केली जाते
असा हा तृतीय पक्ष विमा व्यावसायिकांना वा विमाधारकांना खरंच गरजेचा असा आहे स्वतःचे रक्षण नुकसानाची भरपाई हे त्यामुळे होतेच परंतु आपल्या मुळे जर इतरांचे नुकसान झाले तर त्याचाही खर्च विमा कंपनी या विमा मार्फत देते.
आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Third party insurance |थर्ड पार्टी इन्शुरन्स बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.