छोटे उद्योग आणि त्यांचा विमा | Small Business Insurance In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण छोटे उद्योग आणि त्यांचा विमा म्हणजेच small business insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

उद्योगधंदे आणि उपजीविका:
- गाव असो वा शहर माणसे आपली व आपल्या कुटुंबीयांची उपजीविका चालवण्यासाठी काही ना काही काम करत असतातच
- कोणी आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवुन महिन्याच्या पगाराची निश्चिंती मिळवतात
- व एका गोल गोल फिरणाऱ्या रहाटगाड्यात स्वतःला बसवतात
- तर अनेक जण असेही असतात की नोकरी नाही काम नाही म्हणून काहीतरी धंदा व्यवसाय करावा व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करावा
- तर काही माणसे आवड म्हणून उद्योग करतात त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं
- कोणाला दुसऱ्याच्या हाताखाली न राहता स्वतंत्र काम करायचं असतं
- तर कोणी उद्योग धंदा करण्यासाठी नवनवीन गोष्टींचे शिक्षण घेतात व नंतर ते पूर्णपणे एक व्यवसाय म्हणून त्यात उडी घेतात
● उद्योगधंदे म्हणजेच जोखीम:
- हो असे म्हटले तरी अगदीच वावगं ठरू नये कारण नोकरी ही माणसे जीवनात स्थिरता निर्माण व्हावी यासाठी शोधत असतात
- पण उद्योग धंदे करणारी माणसे ही मनाने तशी चिवट व जिद्दी असावी लागतात
- कारण उद्योग म्हटले की उतार-चढाव आलेच ना ?
- मग अशावेळी कधी फायदा झाला तर प्रचंड ही होऊन आपण लक्षाधीश होऊ शकतो
- पण जर तोटा झाला तर मात्र कधीकधी होत्याचे नव्हते होऊन जाते
- क्षणात डावपेच चुकले तर रावाचे रंक होऊ शकता
- आणि नशिबाने प्रयत्ना बरोबर साथ दिली तर रंकाचे राव ही व्हाल
- पण हा एक तऱ्हे चा जुगारच
- माणसाने आपले मन व जिगर दोन्ही आपल्या बुद्धीच्या कब्जात ठेवली तरच तणावमुक्त नाही पण थोडातरी तणाव कमी होऊन जगू शकाल
मोठ्या उद्योगांची सुरुवात छोट्या धंद्यातून:
- ज्या माणसांकडे वारसाहक्काने आलेला चिक्कार पैसा आहे किंवा लक्ष्मीचा वरदहस्त आहे
- अशी माणसे बहुतांशी मोठमोठे व्यवसाय उघडण्यात रस घेतात
- किंवा उद्योगांची साखळीच उघडतात आणि मग नफा तोट्याची आंधळी कोशिंबीर खेळत राहतात
- पण जो गरजू व्यक्ती एक आवश्यकता म्हणून धंद्यात उतरतो तो काही गोष्टींचा सखोल अभ्यास करून किंवा सारासार विचार करूनच या धंद्यात उतरत असतो
- कारण एकतर त्याच्याकडे पैशाची कमतरता म्हणण्यापेक्षा चणचणच अधिक असते
- अशावेळी तो सावधपणे धंद्याची निवड करतो
- जसे की पैसा कमीत कमी वापरला जाईल
- नाशिवंत वस्तूंचा धंदा न केलेलाच बरा कारण माल विकला गेला नाही तर तो फुकट जाईल
- व त्याच्यावर नुकसान ओढवेल
- नाशिवंत मालाचे उद्योग काहीवेळा काय खूपदा चांगले चालतात
- हे तसे भाजीपाला विक्रेते, फळ विकणारे ,दूध, दही, तूप विकणारे असे अनेक आहेत
- यासाठी काही कसंबही शिकावे लागते
- तसे आपल्या समोरच्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघून त्याला ओळखण्याची कसंब
- असे अनेक प्रकारे व्यक्ती धंदा किंवा व्यवसाय करत असतो
उद्योगधंद्यातील संभाव्य धोके किंवा जोखीम:
- योग्य मुद्दल नसल्याने धंदा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू न शकलेल्याने तो धंदा बुडीत जाऊ शकतो
- नाशिवंत पदार्थांच्या उत्पादनाची जर विक्री झाली नाही तर तो माल ही खराब होण्याची शक्यता अधिक असते
- हा एक धोका असतो
- नैसर्गिक आपत्ती या प्रकारामुळे बऱ्याचदा चांगला चालत असलेला व्यवसायास रामराम ठोकावा लागू शकतो
- जसे नदीला येणारा पूर ,भूकंप, आग लागणे इत्यादी
- मानवनिर्मित ही धोके असतातच जसे की –
- धर्मा -धर्मातील असंतोष, किंवा जातिभेदांमुळे झालेल्या गैरसमजामुळे लावलेल्या आगी, जाळपोळ
- दुकाने, घर जाळणे ,अशावेळी मग धंदे, छोटे असो वा मोठे प्रत्येक व्यापारी व्यावसायिक हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यामध्ये होणाऱ्या नुकसानाची कल्पना करूनच व्यवसायाची आखणी केली पाहिजे
- व छोट्या व्यवसायात हे भांडवल ही कमीच लागते
- ते कसे वाढवता येईल याचाच विचार त्याच्या मनात खेळत राहिला पाहिजे
● व्यवसायातील जोखीमाला आता एकच उत्तर-
★ छोटे धंदे व त्यांच्यासाठी विमा योजना ( small business insurance in marathi )-
- छोट्या व्यवसायांसाठी विमा उपयुक्त कसा आहे ?आता आपण जाणून घेऊ-
- व्यवसायिकांना हा विमा एखाद्या सच्च्या मित्रासारखा पाठीशी राहत असतो
- खूप वेळा माणसाच्या स्वभावानुसार आनंदाच्या वेळी, सुखाच्या वेळी आवर्जून उपस्थित राहतात
- पण ज्यावेळी खरीच मदत हवी असते त्यावेळी सगळे सबबी सांगू लागतात
- पण जर व्यावसायिक मोठे असोत वा छोटे त्यांनी विमा योजना हे काढलीच पाहिजे
- कारण सततच्या तणावाखाली राहण्या पेक्षा आपल्या नुकसानाची भरपाई देणार्या विमाला आपला मित्र समजावा खर ना??
उद्योजकांनी विमा का घ्यावा??
- जर एखाद्या व्यावसायिकाचा छोटा-मोठा व्यवसाय असेल परंतु काही कारणाने त्याचा व्यवसाय बुडाला असेल तर –
- त्याच्या विमा कंपनीला नियमित भरल्या गेलेल्या प्रीमियम मुळे विमा कंपनी त्यांचे आर्थिक नुकसान पैशाच्या रूपाने भरत असते
- व विमाधारकाला त्याच्या कठीण प्रसंगात आश्वासक हात देऊन तणावमुक्त करत असते
छोटे व्यवसायिकांना विमा योजना मुळे होणारे लाभ किंवा संरक्षण:
- छोट्या व्यावसायिकांना आपला धंदा करते वेळी तर कधी नुकसान झाले तर विमा योजना घेतल्यामुळे त्याची जोखीमही विमा कंपनीस उचलत असते
- विमाधारक छोट्या व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान हे विमा कंपनी द्वारे भरपाई करत असतात
- त्यात महाल किंवा मालमत्ता दोन्ही गोष्टींची अंतर्भूत असते
- विमा काढता ना छोट्या व्यापाऱ्यांनी आपली तुटपुंजी किंवा थोडीशी पुंजी ही आपल्या आकस्मिक येणाऱ्या दुर्घटनेतील भरपाई करण्यासाठी घालवली तर-
- त्याचा परिणाम म्हणून तो धंद्यात खूप नुकसानीत जाईल
- किंवा पूर्णपणे त्याचा व्यापार बुडून जाईल
● व्यापार्याची विमा मधील व्यवसायिक संपत्ती अंतर्भूत होते
- तंत्रज्ञानाची साधने ,कागदपत्रे लाकडी किंवा धातूची व्यापारास उपयुक्त अशी सामग्री
- भौगोलिक स्थान म्हणजेच दुकान वगैरे जागा
- छोट्या व्यावसायिकांसाठी असलेल्या विम्याचे प्रकार:
1 सामान्य उत्तरदायित्व विमा:
- या विमा योजनेअंतर्गत तुमचा उद्योग छोटेखानी असला तरी किंवा घरगुती असला म्हणजेच घरातून तुम्ही तो व्यवसाय करत असाल
- विमाधारकाने तरीही नुकसान भरपाई मागणे आणि हे योग्यच आहे
- तरी व्यवसाय करतेवेळी काही कारणाने तिसऱ्या व्यक्तीला त्यांच्यामुळे नुकसान झाले तर;
- विमा कंपनी द्वारे त्या तिसऱ्या व्यक्तीचे ही नुकसान भरून देण्यास िमा कंपनी विमाधारक व्यापार्याला मदत करत असते
- जसे की त्या तिसर्या व्यक्तीला शारीरिक नुकसान किंवा अन्य कोणतेही नुकसान झाले तर
- त्याची जोखीम विमा धारकाची विमा कंपनी घेऊ शकते
2 व्यवसाय व्यत्यय विमा:
- या विमा योजनेद्वारे जर व्यवसाय करते वेळी खूप जास्त व्यापारात तोटा अनुभवास आला
- आज आला तर छोटे व्यापारी पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या कोलमडून पडू शकतात
- आणि असं होऊ नये म्हणून विमा योजनेद्वारे त्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते
- तिच्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्ववत चालू राहील
- व्यापारात नुकसान झाले तरी नेहमीचा काही ना काही त्यांचा खर्च करणे त्यांना गरजेचेच असते
- त्यासाठी लागणारा पैसा या विमा योजनेमध्ये सहभागी होऊन जातो
- व्यापारी विमाधारक आपला फायदा करून घेऊ शकतात
- पण त्यासाठी त्यांना आपल्या गरजा व भविष्यात येणाऱ्या काही धोक्याची पुसटशी कल्पना करून योग्य योजना निवडू शकतात
Reed Also : बिझनेस सुरु करताना काय काळजी घ्यावी 2022
कामगारांचे नुकसान व त्यांची भरपाई करणारा विमा कायदा
- या कामगार नुकसान भरपाई विमा मुळे छोट्या व्यापाऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळालेला आहे
- कारण व्यवसाय म्हटले तरी काहीना काही अपघात होतातच
- आणि काम करणारे कामगार असतील तर त्यांची नुकसान भरपाई करणे कधीकधी व्यापाऱ्यांसाठी कामगारांच्या डोईजड ही होऊ शकते
- पण या विमा योजनेमुळे एक प्रकारे व्यापाऱ्यांना आधार दिला आहे
- कामगारांना आपले काम करताना विमा कामाच्या जागी अपघात झाला तर –
- त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी उचलते
- कामगाराच्या नुकसान भरपाई काही गोष्टी समाविष्ट असतात
- अपघातस्थळी जखमी झाल्यामुळे औषध उपचार खर्च, दवाखान्याचा खर्च तसेच अपघातात तात्पुरते किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास बरे होईपर्यंत जा सर्व खर्च
- अपघात किंवा आकस्मिक अशा अपघातात मृत्यू पावला असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळते
3 व्यवसायिक मालमत्ता विमा:
- या विमा योजनेद्वारे विमाधारकाच्या व्यवसायातील काही वस्तू ,साधने, जागा ,दुकाने यांना धोका निर्माण झाल्यास
- त्या गोष्टीच्या भरपाई ची जबाबदारी विमा धारकांची विमा कंपनी घेते
- यामध्ये यंत्रे इतर साधने व सामग्री, कपाटे वगैरे इत्यादी
- याचे आग लागणे भूकंप होणे पूर येणे किंवा-
- गाड्यांना लागणे त्यामुळे झालेल्या नुकसानीची विमा * कंपनी जबाबदारी उचलत असते * व्यवसाय उत्पन्ना विमा नैसर्गिक दुर्घटनांमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले
- किंवा मानवनिर्मित कारखाने व्यापाऱ्यांच्या उत्पादनात घट झाली
- किंवा ते नष्ट झाले व वरील कारणांमुळे असे नुकसान झाले
- तर व्यक्ती कंपनी विमाधारकाला त्याच्या उत्पन्नाची घट भरून देण्यासाठी विमा रक्कम देऊन मदत करत असते ● पीओपी – (बिझनेस ओनर्स पोलिसी)
- व्यवसाय मालक धोरण ही योजना म्हणजे सर्व योजनेचे एकत्र सार आहे
- यामध्ये विमाधारक व्यापार्याची भौतिक संपत्ती आणि उत्तरदायित्व विमा नुकसानीचे संरक्षण केलेले असते
- ही विमा योजना खास अशा छोट्या-छोट्या व्यावसायिक विमा धारकांसाठी बनवलेली आहे
- यामध्ये व्यवसाय उत्पन्न विमा पण सहभाग करून घेतला जातो
- याद्वारे व्यापार करतेवेळी उत्पादनाचे नुकसान झाल्यास त्याची ही नुकसान भरपाई विमा कंपनीद्वारे भागवली जाते
- आकस्मिक दुर्घटने:
- अडकल्यामुळे जे काही नुकसान झाले त्याची जोखीम विमा कंपनी उचलत असते
या गोष्टींच्या बाबतीत विमा दावा केल्या नंतर ही विमा कंपनी संरक्षण देऊ शकत नाही :
- ज्यावेळी तुमचे नुकसान होते त्यावेळी व्यवसायिकांनी त्वरित विमा कंपनीशी संपर्क साधून परिस्थितीचे निवेदन केले पाहिजे
- वेळेचे मर्यादित तुमच्या पत्रकाद्वारे तुमच्या नुकसानाची क्रमवार नावे लिहावित
- सर्व गोष्टींच्या पावत्या वगैरे सर्व कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवलेल्या असाव्यात
- कोणत्याही स्वरूपाच्या प्रदूषणाच्या समस्येमुळे जर काही नुकसान झाले असल्यास –
- परमाणु धोका यासारखे अनेक गोष्टी मुळे विमा दावा केल्यावरसुद्धा विमाधारकाला त्याचे संरक्षण मिळत नाही
विमा दावा कसा करावा?
- सुरुवातीला विमा दावा पूर्ण फॉर्म भरावा
- विमा दावा करताना अर्ज ही एक जोडावा
- आपल्या नुकसान भरपाई चे काही फोटो ही त्यात लावून तुम्ही घेतलेल्या विमा योजनेची माहिती द्यावी
- व विमा योजना क्रमांक ही त्यात लिहावा.
नक्की वाचा : Car Insurance In Marathi
अशाप्रकारे विम्याच्या अनेक योजना आहेत की त्याची मदत घेऊन छोटे व्यापारी ( small business insurance in marathi )आपला व्यवसाय गुण्यागोविंदाने करू शकतात व काही अपघात किंवा नैसर्गिक आघात झाल्यास होणाऱ्या नुकसानीपासून विमा कंपनी अशा व्यापाऱ्यांना भरपाई देऊ पुन्हा व्यवसाय करण्यास उद्युक्त करू शकते तेव्हा ज्यांचे छोटे व्यापार आहे त्यांनी नक्कीच अशा विमा योजने कडे विचारपूर्वक पहावे व आपल्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार त्यातले विमा योजना निवडून आपले तणावमुक्त जीवन जगावे
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण small business insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा
Tags : small business insurance , Small Business Insurance In Marathi, छोटे उद्योग आणि त्यांचा विमा | Small Business Insurance In Marathi