सलून उद्योग व विमा | Salon And SPA Insurance In Marathi 2022

सलून उद्योग व विमा | Salon And SPA Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण सलून उद्योग व विमा म्हणजेच Salon and spa insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Salon And SPA Insurance In Marathi
Salon And SPA Insurance

सुंदर मी होणार:

हो बहुतेक सर्वांच्या मनात हे वाक्य नेहमीच रेंगाळत असतं
की ‘सुंदर मी होणार ‘ मग तो कोणत्याही वयोगटाचा असो त्याला किंवा तिला सुंदर दिसणं हा अधिकारच वाटतो आणि काय वाईट आहे त्यात? सुंदर दिसण्यावर सर्वांचाच अधिकार आहे काही वेळा आपले रूप, आपले व्यक्तिमत्त्व हे रंगरुपाने मोजले जाते मग कुणी काळा कुट्ट माणुस असेल तर त्याला झिरो(0) गुण मिळतात आणि ती स्त्री असली तर मग तर विचारायलाच नको!

सौंदर्याची बदलती परिभाषा:

रूपरंगाने सौंदर्य मोजणारी लोक ही समाजात पुष्कळ पाहायला मिळतात. त्यांना आपण थांबवू तर शकत नाही. पण आपण आपल्याला ईश्वराने दिलेले सौंदर्य हो ‘सौंदर्य ‘मग ते कोणत्याही रंगरूपाची असो. त्याच्यावर थोडेफार लक्ष दिले व आणखीनच काही भर टाकण्याचा प्रयत्न केला . तर ते रूपही नक्कीच ‘सौंदर्य’ म्हणून मिरवले जाऊ शकते!

सलून एक जादुई दुनिया:

सलून मध्ये जाताना चे रुप व बाहेर पडल्यानंतर चे एखाद्या व्यक्तीचे रूप यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर आढळते ज्याचे केस कुरळे आहेत ते सरळ होऊन जातात व ज्याचे केस सरळ आहेत त्यांच्या केसांचा कुरळेपणा हा सलूनचे बंदलू शकतो काळया माणसाला ही एक तकाकी ही अनेक मार्गाने मिळू शकते मग ते फेशियल असो वा ब्लिचिंग किंवा आय ब्रो असो वा चेहऱ्यावर लावलेले मेकअपचे थर या सर्वांमुळे आपला रूपाला’ चार चाँदच ‘लागतात

सलून गरज सुरक्षितेची ( Salon and spa insurance in marathi ) :

जशी कोणत्याही व्यक्तीला आपल्या नुकसानीची भीती असते व त्याचे संरक्षण व्हावे असे वाटत असते तसेच सलोन या व्यवसायामध्ये ही अनेक समस्या किंवा धोके असतात त्यामुळे त्याचे संरक्षण होऊन आपल्याला त्याची नुकसान भरपाई मिळावी असे सर्वांनाच वाटत असते

संभाव्य धोके:

नैसर्गिक आपत्ती: जशी – भूकंप ,पूर ,विज पडणे, वादळामुळे होणारे नुकसान आग लागणे ,आग लावणे ,चोरी होणे ,मानव -विघातक काही माणसे हल्ला करतात किंवा तोडफोड करतात त्यामुळे पार्लरचे नुकसान होणे

सलून मधील कारागीर:

केशभूषाकार: प्रत्येकाच्या चेहर्‍याचा आकार हा वेगळा असतो व त्याची उंची ,जाडी, व्यवसाय यावरून हे त्याचे केस कापले जातात व केसांचा एखादा कट केल्यावर सरळ -साध व्यक्तिमत्व छान उत्फुल्ल बनवू शकतो

नखांचे कारागीर : हो आज हे छोटे कुचकामी वाटू लागणारे पण नेल आर्ट हे शिक्षण हा व्यवसाय होऊ शकतो कुठल्या वर्णाच्या मुलीला कोणते नेल पॉलिश लावावे? त्यासाठी कोणता रंग वापरावा? तसेच कसा आकार द्यावा? मॅनिक्युअर ,पेडिक्युअर करताना नखांची घ्यावी लागणारी काळजी हे सर्व करताना ग्राहकाचे वय, त्याच्या स्वभाव, ती करत असणारा व्यवसाय किंवा नोकरी याकडे सुद्धा भर दिले जाते नखांवर सुंदरशी कलाकुसरही काढले जाते त्यामुळे आपले व्यक्तिमत्व आणि सुंदर दिसते

★ ब्युटिशन हि तर चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी क्रीम ,लेप, वाफ यांचा वापर करून चेहरा सतेज व चमकदार बनवता येतो * तसेच अनेक काम पार्लर मध्ये करत असते त्यामुळे आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनत असते

विमा हा संरक्षण कसे देऊ करतो? ( Salon and spa insurance in marathi ) आकस्मिक येणारे कोणतेही धोके मग ते मानवनिर्मित असोत वा निसर्गनिर्मित ते ओळखून त्या नुकसानीपासून वाचवण्याचे प्रयत्न विमा कंपनी ही करत असते पार्लरची खोली चे संरक्षण करावे लागते तसेच पार्लरमध्ये आधुनिक उपकरणे ,साधने ही असतात आणि ती खूप नाजूक तसेच महाग असु शकतात पार्लर चे काही क्रीम ,लोशन किंवा छोट्या -छोट्या वस्तू त्याच्या किमतीही खूप असतात तसेच काही वेळा स्वतः पार्लर चालवणाऱ्या ब्युटीशियन च्याही जीवाला धोका असतोच तसेच तेथे काम करणारे कर्मचारी तेथे असतात त्यांचा अपघात झाला तरी तोही त्यात अंतर्भूत असू शकतो

पार्लर आणि अनेक ट्रीटमेंट व थेरेपी:

लॅशेष एक्सटेंड:

स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या सौंदर्यात डोळे हे खूप मोठे स्थान मिळवत असतात व त्यामध्ये त्यांच्या पापण्या लांब आहे अशा मृगनयनी डोळ्यांची आकर्षकता खुपच लाजवाब दिसते अशा पापण्या सर्वांच्याच नसतात तज्ञ ब्युटीशियन हे सर्व ट्रीटमेंट देऊन त्या करू शकतात पण त्यात खूप धोकेही असतात त्यामुळे झालेल्या ग्राहकांच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी डोळ्याचा विमा ही काढला जातो कारण सुंदर लांबसडक पापण्या या सर्वांनाच हव्या असतात पण जर काही नुकसान झाले व ग्राहकाने ब्युटीशियन यांच्याविरोधात खटला दाखल केला तर त्या नुकसाना पासून संरक्षण व्हावे म्हणून ही हा विमा गरजेचा असतो

आई ब्रो ट्रिटमेंट:

आपल्या डोळ्यांत बरोबरच भुवयानाही खूप स्थान आहे त्यांना नीट आकार दिला की चेहऱ्याचे रूप खुलून येते पण कसेही जाडेभरडे व आकार विहीन पापण्या या डोळ्यांचे सौंदर्य कुरूप करून टाकतातच पण आपले व्यक्तिमत्त्व सुद्धा बिघडू शकते पण याची ट्रिटमेंट देताना ही ब्युटिशन ना विमा काढल्यास किंवा आपल्या विम्यात ब्रो ट्रीटमेंट समावेश केल्यास योग्य होईल कारण दोन भुवया या एकसारख्या होणे ,त्याचे 1/1 केस व्यवस्थित काढणे अर्थात ते तज्ञ ब्युटिशन तंत्राचा वापर करून काढतात पण त्यातही जर दोन्ही भुवयाचे नुकसान झाले तरीही त्या नुकसानी विरुद्ध सरक्षण हा विमा यांना करतो

आपला चेहरा हा व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो आणि भुवया ही सर्वात महत्त्वाचा भाग त्यासाठी निभावतात पण टीटिंग आणि लॅमिनेटिंग व मायक्रो ब्लेडिंग ,मायक्रो शेडिंग तंत्र योग्य वापरून ते करता आले पाहिजे कारण त्याच्या नुकसानभरपाईची किंमत खूप असू शकते पण त्यामध्ये विमा योजना आपली आर्थिक मदत करू शकते

इतर नुकसान-

ब्युटीशियन नी जर विमा योजना काढली असेल तर काही खबरदारी ही घ्यावी:

जसे की आपले पार्लर मध्ये कितीही ग्राहक आले तरी त्यांच्या ट्रीटमेंट व आरामात बसण्याची सोय व्यवस्थित असावी त्यामुळे अचानक पणे आपत्ती आली तर भरमसाठ सामानाच्या गोंधळात आणखी जास्त नुकसान होणे तरी थांबू शकेल काही वेळा सिझन असतो किंवा सुट्टीचे दिवस असतात सणासुदीचे दिवस असतात त्यामुळे पार्लरमध्ये खूपच जास्त गर्दी झालेली असते व जागा कमी असल्यामुळे ग्राहकांनी दिलेले पैसे सहज मिळेल तेथे ठेवले जातात आणि जर काही अडचण समस्या आली तर बाहेर पडताना आपल्याला ते एकत्रित येता ठेवलेले पैसे मिळणार नाहीत

म्हणून प्रत्येक वस्तूची जागाही निश्चित आणि सहज हाताशी मिळणारी असावि सर्वात महत्वाचे आपल्या प्रॉपर्टीची कागदपत्रे, लाईट बिल किंवा अन्य विमा ची कागदपत्रे, लायसन्स हे सर्व एकत्र फाईल मध्ये नीट जपून ठेवले पाहिजे जर अचानक अपघात -सदृश्य परिस्थिती उद्भवली तर आपणास बाहेर निघताना पटकन ती सहज मिळू शकेल व त्याच्या नंतर आपण विमा दावा करू शकतो आणि अशावेळी ते पुरावा म्हणून आपल्याला देता येतील

नक्की वाचा : Personal Trainer Insurance In Marathi

ब्युटिशन व्यवसाया अंतर्भूत असणारी विमा योजना :

यामध्ये व्यवसायासाठी लागणारी सर्व प्रकारची साधनसामग्री व दुकान हे सर्व येत असते त्याला काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोका झाला असता सर्वात मोठा फटका त्या व्यावसायिकाला पडतो कारण त्याला किंवा तिला परत स्वतःच्या पायावर उभी राहण्यास उशीर होऊ शकतो अशासाठी ‘सामान्य दायित्व विमा’, व्यवसायिक मालमत्तेचे रक्षण करणारा विमा व काही वेळा ग्राहकांचे ब्युटीशियन ट्रीटमेंट करताना कपड्याचे केवळ शरीराचे नुकसान होऊ शकते अशा वेळी त्यांनी दावा केला तर नुकसान भरपाई मिळू शकते तृतीय पक्षाला ही संरक्षण मिळेल म्हणजेच आपल्या नुकसाना बरोबर तिसऱ्या व्यक्तीचे किंवा त्याच्या सामानाचे नुकसान झाले असेल तर तेही विमा कंपनी आपल्या पैशाने भरते आणि त्यामुळेच पार्लरच्या मालकाच्या खिशावर ताण येत नाही

ग्राहकांचे संभाव्य नुकसान:

ब्युटीशियन ने केलेल्या ट्रीटमेंट चे साईड इफेक्ट त्यामुळे व्यवस्थित पणामुळे जखमी झाला असेल तर ग्राहकांच्या वस्तू कपडे ब्युटीशियन च्या कोणत्याही गोष्टीमुळे खराब झाले असेल तर ग्राहक वरील सर्व बाबतीत ब्युटीपार्लर विरुद्ध खटला भरून त्याची नुकसानभरपाई मागू शकतो पण जर आधीच ब्युटीशियन ने सुजाण बनुन विमा योजना घेतली असेल तर मग ग्राहकाच्या नुकसानाच्या भरपाईस विमा कंपनी बाध्य ठते म्हणून विमा कंपनी योजना घेतली :

पार्लर मदतनीस साठीही विमा:

1 खूपदा मोठ्या सलून मध्ये खूप गर्दी असते व ग्राहकांना खूप संयमाने हाताळावे लागते पण त्या गडबडीत कधी मदतनिस आपला पाय घसरून ही पडू शकतो किंवा त्यांना शारीरिक इजा होऊ शकते अशा वेळी पार्लर ने आपल्या सहकार्यां साठी एकत्रित पणे जर विमा काढला असेल तर त्याच्या दुखापतीचा खर्चही विमा योजना करते 2 तर काहीवेळा मोठमोठ्या सलोन मध्ये वेगवेगळी उपकरणे व साधने वापरून ट्रीटमेंट ग्राहकांना द्यावी लागते अशा वेळी त्यांचेही विपरीत परिणाम या पार्लरच्या मदतनीस किंवा कर्मचाऱ्यांवर होऊ शकतात अशा वेळी ही विमा योजना त्यांचे नुकसान भरून देऊ करते.

ब्युटी पार्लर चालवणाऱ्यानी नुकसान होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी:

1 पार्लर मध्ये गडबड न व्हावी म्हणून सुव्यवस्थित पणा असावा

2 वस्तू वेळच्या वेळी जागच्या जागी ठेवण्याची सवय असावी

3 पार्लर चालू असताना जमिनीवर काही घसरण्या जोगे नाही ना ? तेही वेळोवेळी तपासावे

4 ओले हात विद्युत उपकरणांना लावू नयेत

5 उपकरणांच्या वायरी या व्यवस्थित आहेत ना प्लग नीट लागले आहेत ना ? तेही लक्ष द्या?

6आग लागण्याची शक्यता असू शकते

7 आपल्या वस्तू ,कागदपत्रे, मोबाईल सर्व सुरक्षित कपाटात किंवा ड्रॉवर मध्ये ठेवावे

8 पार्लरचे काम करतेवेळी ग्राहकांच्या वस्तू ,पर्स ,त्यांचे कपडे खराब होणार नाही होणार ?याची दक्षता घ्यावी

पावसाने दारे, खिडक्या , सिलिंग यांची कुठे गळती होत नाही ना? याचाही विचार करावा अचानक काही आपत्ती ओढवल्यास अतिदक्ष पणे त्याची खबरदारी घ्यावी व इतरांस घेण्यासही शिकवावे

★ प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवसायासाठी विमा योजना आवश्यक असते सलून हा लहान असो का मोठा. स्त्रियांचा असो का पुरुषांचा? पण धोके ,अडचणी या जवळपास एकच असतात प्रत्येकाला आपल्या व्यवसायात सुरक्षितता हवी असते नुकसान झाले तर त्याचे संरक्षण हवे असते अशा वेळी विम्या सारखा साथीदार आणखी कोण असेल बरे?

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण सलून उद्योग व विमा | Salon And SPA Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा

Vsit Also : Hindishaala.in

Tags : सलून उद्योग व विमा | Salon And SPA Insurance , Salon And SPA Insurance In Marathi

1 thought on “सलून उद्योग व विमा | Salon And SPA Insurance In Marathi 2022”

Leave a Comment