प्रवासी यात्रा विमा | Pravasi Bharatiya Bima Yojana In Marathi 2022

प्रवासी यात्रा विमा | Pravasi Bharatiya Bima Yojana In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण प्रवासी यात्रा विमा म्हणजेच pravasi bharatiya bima yojana in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Pravasi Bharatiya Bima Yojana In Marathi
Pravasi Bharatiya Bima Yojana

यात्रा/ प्रवास आणि आपण:

आपण सर्वजण नित्यनियमाने यात्रा करत असतो.

  • वर्षभर काम करून असो वा अभ्यास करून कंटाळणारी मुले मन प्रसन्न करण्यासाठी यात्रा करतात
  • कोणी काही व्यावसायिक कामासाठी यात्रा करतात
  • धार्मिक यात्रा करणारी माणसे ही खूपच दिसून येतात मग ते कोणत्याही धर्माचे असोत वा जाती-पाती ची असोत
  • यात्रा म्हणजे आपल्या घरातील रोजचे ठिकाण सोडून आपण काही दिवस सर्व चिंता जबाबदाऱ्या सोडून रिलॅक्स व्हायला निघतो
  • यात्रा जर सुखरूपपणे पार पडली व आपल्याला त्यातून चिंता विरहित आनंद मिळू  शकला तर नक्कीच चांगलं नाही का?

यात्रा आनंददायी करायचे आहे का ? मग त्यासाठी आपण काय केले पाहिजे?

◆ सर्वात प्रथम यात्रा आनंददायी करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत त्या पुढील प्रमाणे-

1 प्रवासाचे योग्य नियोजन हे सर्वात आवश्यक असते
2 यात्रा ठिकाणाकडे जाताना ची घेतलेली खबरदारी
3  यात्रेच्या ठिकाणांमध्ये येणे जाणे ,खाणे-पिणे, याची आपण काळजी घेतली पाहिजे
4  प्रवासात जर काही अपघात झाला तर काय करावे ?याचा दूरदृष्टीने विचार करायला पहिजे
5 कारण आपल्याला मदत करणारी माणसे किंवा ते ठिकाण, हॉस्पिटल ,डॉक्टर माहीत नसतात
6 सर्वात महत्त्वाचे आर्थिक मदत करणे
7  प्रवासात आपण मोजके व ठराविक पैसे नेत असतो

या सर्व गोष्टी आपल्या या प्रवासात खूप काळजी घ्यावी लागते असे झालं तर आपला प्रवास आनंददायी निश्चितच होऊ शकतो आणि सर्वात चांगलं जर आपण यात्रा विमा काढला असेल तर??

◆ यात्रा विमा | pravasi bharatiya bima yojana in marathi

प्रवाशांना प्रवास करताना होणारा त्रास किंवा त्यामुळे होणारे नुकसान व समस्या टाळण्यासाठी यात्रा विमा योजना तयार केली आहे
    मोठ्या प्रवासासाठी खूप खात्रीशीर व असा उपाय होतो कसा ?उपयोगी पडतो कसा ? ते आपण आता समजावून घेऊया

  • जर आपल्याला लांबचा प्रवास करावयाचा असेल ,म्हणजे परदेश प्रवास तर यात्रा विमा ( pravasi bharatiya bima yojana in marathi ) महत्त्वाचा
  • भविष्यातील समस्या किंवा संकटाची दूरदर्शीपणा ने  चाहूल घेऊन सुरुवातीला  जे सावध राहतात त्यांच्या  साठी उपयोगी पडतो
  • खूप वेळा अनोळखी ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता टाळता येत नाही त्यामुळे आपल्या आर्थिक नुकसान होऊ शकते
  • प्रवासात सामानाची चोरी होणे हे खूप त्रासदायक झाले आहे अशा वेळी काय करावे? हा प्रश्नच असतो
  • कारण आपण स्वतः एका अनोळखी देश किंवा प्रदेशात असतो, तिकडची भाषा ,माणसे ,संस्कृती ही पूर्णपणे आपल्या देशापेक्षा भिन्न असते
  • दुसऱ्या ठिकाणी फिरायला गेल्यावर आपला जर अपघात झाला असेल तर त्यावेळी आपली खूपच बिकट परिस्थिती होऊ शकते
  • आपण प्रवास करण्यासाठी खूपदा  पैसे जमवून खूप आनंदाने फिरायला आलेलो असतो जर असं काही झाले तर आपले पैसे ही फुकट जातात
  • अडचणींचा सामना मात्र करावा लागतो तो वेगळाच
  • त्यातच तुम्ही एकटे असाल तर कोणी विश्वासाच, ओळखीचं नसल्याने आपण आणखीनच हवाल दिल होऊ शकतो.
  • यामुळेच जर आपण यात्रेसाठी एवढी पैशाची बचत करत असतो ,वेळ काढत असतो अशावेळी यात्रा विमा ( pravasi bharatiya bima yojana in marathi ) काढला तर अनेक प्रसंगात आपल्या पाठीशी विम्याचे सशक्त हात उभे राहतील व ना नक्की विचार करा!

यात्रा विम्यामुळे नक्की आपल्याला ( विद्यार्थ्याला) आवश्यक आहे का ते आता आपण पाहू-

1 प्रवास आपण कामातून जबाबदारीतून थोड छान वाटाव रिलॅक्सेशन व्हावं म्हणून करत असतो मग अशावेळी यात्रा विमा काढून ठेवला असेल तर नक्कीच आपण निश्चिंत होऊन प्रवास करू शकतो कारण ,तेथील तुमची काळजी घ्यायला  किंवा काही नुकसान झाले तरी मदत करायला विमा नक्की तुमच्या सोबत असू शकेल

2 आपल्यातील खूप जणांना आयुष्यात एकदा तरी विदेशात म्हणजेच परदेशात जायला खूप आवडते .जगप्रवास करायचं असे त्यांचे स्वप्नही असते पण जर त्या स्वप्नासाठी आपण दिवस-रात्र मेहनत करत असू व परदेशात गेल्यावर समजा बॅग चोरीला गेली तर आपले त्यातले डॉक्युमेंट्स हरवतात जर पासपोर्ट, क्रेडीट कार्ड, पैसे, महत्त्वाची कागदपत्रे ,ओळखपत्रे, चाव्या ,मोबाईल फोन पण आशा मौल्यवान वस्तू त्यात समाविष्ट असतात

3 कुटुंबाबरोबर प्रवास करताना खूपदा आपले वृद्ध आई-वडील किंवा लहान मुले सुद्धा सोबत असतात .अशावेळी जर अपघात झाला किंवा तुम्ही आजारी पडलात तर नवख्या ठिकाणी पैशाचे अरेंजमेंट करणे खूपच कठीण पडते पण आता काही इन्शुरन्स कंपन्या ही झाले आहेत त्यांच्या मदतीने आपण आर्थिक मदत ही मिळवू शकतो

4 परदेशात शिकायला जाणारे विद्यार्थ्यांची संख्या ही काही कमी नाही आहे आधीच वयाने लहान, अनुभवाने पण, कमी. जर त्यांना काही अडचणी, समस्या आल्या तर अशा मुलांसाठी ही यात्रा विमा सुविधा सर्वात चांगली व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेची मानली जात आहे.

Visit Also : Maymarathi.com


◆ यात्रा विमा योजना व त्याचे प्रकार –

  • वेगवेगळ्या कारणासाठी परदेशा वारी करणार्‍या लोकांसाठी विमा हा उपयोगी पडू शकतो
  • या विमा योजनेची माहिती आपण घेऊच व त्याचे प्रकार ही समजून घेऊ
  • त्याच्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार यात्रा विमा घेऊ शकतो व तणावमुक्त प्रवास करू शकतो-विम्याचे प्रमुख चार प्रकार समजले जातात-

१  विद्यार्थी प्रवास विमा
२  घरगुती प्रवास विमा
३   ज्येष्ठ नागरिक प्रवास विमा
४   आंतरराष्ट्रीय यात्रा विमा

या यात्रा विमा प्रकारातील सर्वात पहिला  ‘विद्यार्थी प्रवास’ विमा म्हणजे नेमकं काय ? व विद्यार्थ्यांना खरच आवश्यकता आहे का ? तो का व कसा घ्यावा? ते आज आपण समजून घेऊ-

1 विद्यार्थी प्रवास विमा :

 जगभर माणसे अनेक कारणासाठी प्रवास करीत असतात- ★ त्यामध्ये बहुतेक प्रवासी हे विद्यार्थी म्हणून दुसऱ्या देशात काही दिवस ,काही महिने, किंवा वर्षभरासाठी प्रवास करीत राहतात
★ पण तेथे त्यांना खूप गोष्टींशी, समस्यांशी, अडचणींशी सामना करावा लागतो
★ काही विद्यार्थी वर्षे तीन वर्षे तिथेच राहतात आपल्या व दुसऱ्या देशा चा वातावरण हे वेगळं असतं.
★ युरोपातील थंड हवामान बहुतेकांना सूट होत नाही त्यामुळे अनेक आजार येतात पण नवखा देश, माणसे व खाजगी वैद्यकीय खर्च यामुळे त्यांची तारांबळ उडते
★ पण या यात्रा विमा मध्ये यात्रा प्रवासादरम्यान आरोग्याचा ही विमा काढलेला असतो त्यामुळे ते बिनधास्तपणे शिक्षण घेऊ शकतात

◆ विद्यार्थ्यांसाठी यात्रा विमा कोण कोणत्या गोष्टी आपल्याला मदतीस येऊ शकतो?

  1. यात्रा विमा काढल्यावर विद्यार्थी ज्या देशात रहावयास आला असेल ,त्या काळात त्याचा अपघात होऊन त्याला कोणतीही शारीरिक इजा पोहोचल्यास तो विमा चा वापर करून मदत मिळवू शकतो.
  2. गरजेच्या वेळी रुग्णालये व त्यातील अद्ययावत महागडी वैद्यकीय खर्च त्याच्या खिशाला परवडेल असे नाही.
  3. पण विमा काढल्यामुळे त्याला आर्थिक संरक्षण मिळून लवकरात लवकर तो बरा होऊन आपल्या अभ्यासाला जाऊ शकतो.
  4. काहीवेळा दाताच्या समस्या ही त्याला त्रासदायक ठरू शकतात किंवा अपघातात दातांना इजा पोहोचली तर अशावेळी हे विमा आपल्या मदतीला येऊ शकतो.
  5. आकस्मिक येणार्या वैद्यकीय खर्चासाठी ही विमा फायदेशीर ठरतो.
  6. प्रवासात जर आपले सामान हरवले गेले तर त्याची ही नुकसान भरपाई विमा कंपनी द्वारा मिळते.
  7. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पासपोर्ट. पासपोर्ट शिवाय परदेश प्रवास आपण विचारच करू शकत नाही कारण परदेशात जाण्यासाठी तेथे वास्तव्यासाठी तसेच तिथून येण्यासाठी आपल्याला पासपोर्टची तर खरच खूपच लागते.
  8. अशावेळी सामाना बरोबर पासपोर्ट हरवला तर विमा कंपनी तुम्हाला डुप्लिकेट पासपोर्ट ही बनवून देते परदेशात जाणे तसे तेथे राहणे हा खर्च मध्यमवर्गीयां साठी खूपच अवाढव्य असतो.
  9. कधी कधी आपल्याकडे गुणवत्ता असते पण आर्थिक मदत नसेल तर परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा सोडावी लागते.
  10. पण काही वेळा काही स्पॉन्सर करणारे व्यक्ती असतात अशा होतकरू मुलांना शिकण्यासाठी मदत करतात पण दुर्देवाने विद्यार्थी शिकत असतानाच त्याच काळात अशा व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्यांची नेक्स्ट जनरेशन इंट्रेस घेईलच असे नाही.
  11. अशावेळी अर्धवट शिक्षण सोडून त्यांना आपल्या देशात यावे लागू शकते पण जर त्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी यात्रा विमा काढला असेल तर त्यानुसार त्याच्या उर्वरित शिक्षणाचा जिमा हा विमा कंपनी घेते
  12. कित्येक वेळा परदेशातील ऋतुबदल किंवा अतिथंड हवामान तसेच अति उष्ण हवामान विद्यार्थ्यांना सहन होत नाही अशा वेळी ते आजारी पडू शकतात.
  13. कित्तेकदा ते अपघातात जखमी होऊ शकतात त्या अपघातात मोठा जबर अपघात किंवा आजारामुळे त्यांचा मृत्यूही होऊ शकतो अशा वेळी त्यांच्या कुटुंबांना विम्याची मदत होऊ शकते या सर्वांची नुकसान भरपाईही देते.
  14. उच्च शिक्षण घेताना सेमिस्टर प्रमाणे वर्ष व कोर्स चा कालावधी गणला जातो.
  15. तर आजारामुळे किंवा वैद्यकीय काही कारणांमुळे विद्यार्थी परीक्षेत बसू शकला नाही किंवा अन्य अडचणी त्याच्यासमोर असतील तरीही सेमिस्टर ची परदेशातील फीज त्यांना भरावीच लागते.
  16. आणि हा हा जबरी खर्च खूप वाटत असल्यामुळे त्यांनी जर आपल्या विमा कंपनीकडे दावा केला तर विद्यार्थ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळते म्हणजेच त्याची परीक्षा फी विमा कंपनी भरू शकते.
  17. त्या त्या देशातील सर्वसामान्य लोकांसाठी वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करताना जर विमाधारक विद्यार्थ्यांचा अपघात झाला किंवा जबर अपघातात त्यांचा मृत्यू झाला किंवा दुर्देवाने कायमस्वरूपी अपंगत्व आले तर त्याचे नुकसान भरपाई म्हणजे आर्थिक मदत त्याला कंपनी देते.
  18. अपघातात जखमी ,अपंग झाल्यास त्याला भेट देणाऱ्या कुटुंबाच्या सदस्यांसाठी तसेच विमाधारकाच्या रिटन तिकिटाचा खर्च त्याची परतफेडही विमा धारकाची विमा कंपनीत करते.
  19. विमाधारक विद्यार्थी जर सात पेक्षा जास्त दिवस रुग्णालयात भरती असेल तर.
  20. त्याच्या रुग्णालयातील वाहतुकीसाठी लागणारा खर्च विमाधारकास विमा कंपनी देते.
  21. जर विमाधारक विद्यार्थ्याचा अपघातात किंवा आजारात मृत्यू झाल्यास त्याच्या देशातील सदस्यांचा वाहने तिकीट खर्च तसेच येण्या-जाण्याचा खर्च ही विमा कंपनी देऊ करते.
  22. विद्यार्थ्याच्या मृत्यू संदर्भात वाहतुकीसाठी जो खर्च येतो घरी परत येण्यासाठी चा खर्च तसेच जर परदेशात आपण दफन करायचे असेल तर तेथील खर्च विमा कंपनी तेथे.

त्यावेळी विमा कंपनी चा एक मोठा आधार वाटत असतो

विद्यार्थी आणि जामीन :

परदेशातल्या विद्यार्थ्यांच्या वास्तव्यात तेथील काही गोष्टी त्यांच्यासाठी नवीन असतात आपल्या स्वतःच्या देशातील आणि दुसऱ्या देशातील नियम ,कायदे असू शकतात त्यामुळे विद्यार्थ्याकडून जाणते-अजाणतेपणी चूक होऊ शकते आणि त्याच्यावर पोलिस कारवाई ही होऊ शकते अशा वेळी जामीन देताना काही रकमेची गरज असते ती विमा धारकाची विमा कंपनी ती रक्कम भरून विमाधारकाला खूप मोठी मदत करते

● विमा कंपनी कोणत्या गोष्टींना आपल्या विम्यामध्ये स्थान देत नाही-

1 विमाधारकाच्या वया ची किमान पात्रता ही ठरलेली जवळपास 16 ते 40 वयोगटातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी यात्रा विमा मिळण्याची संधी असते

2 ज्या देशात विमाधारक विद्यार्थी वास्तव्यास आहेत आणि त्या देशाचे युद्ध किंवा आण्विक धोक्यामुळे विमाधारक नुकसानीत आला तर मात्र विमा कंपनी त्याची भरपाई देण्यास नकार देते

3 जर एखादा विमाधारक विद्यार्थी यात्रा विमा करण्याआधीच कुठल्यातरी आजारांनी ग्रस्त असेल आणि ते विमा कंपनी पासून त्याने लपवून ठेवले असेल तर त्या वेळीसुद्धा विमा कंपनी विमाधारकाच्या दाव्या कडे नकारार्थी दृष्टीनेच बघते

4 जर एखाद्या विद्यार्थ्याचा आपल्या परदेशी वास्तव्यात पासपोर्ट हरवला किंवा चोरीला गेला असेल तर त्या गोष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्या कडे त्याने दुर्लक्ष केले किंवा हाय हयगय केली तरी विमा कंपनी विमाधारकाने विमा दावा केल्यानंतर त्याकडे पाठ फिरवते

5 जर एखाद्या विद्यार्थ्याने म्हणजे जो या विमाधारक आहे त्यांनी जर आत्महत्या केली असेल तरीही

6 जर तुम्ही विद्यार्थी असून यात्रा विमाधारक आहात आणि तेथे राहताना तुम्ही खेळत असताना तुमचा अपघात झाला किंवा तुम्ही सहवासामुळे स्वतःला जखमी करून घेतली असेल तर तो खर्चही विमा कंपनी विमाधारकाला नुकसान भरपाई म्हणून परत करत नाही

7 मानसिक अस्वास्थ्यामुळे विद्यार्थी आजारी असल्यास निराशेने ग्रासलेल्या विद्यार्थ्यांना चिंता तणावामुळे मानसिक त्रास असेल तरी त्याचा खर्च विमा कंपनी उचलत नाही

8 एच आय व्ही पॉझिटिव्ह विद्यार्थी नुकसान भरपाई पात्र ठरत नाही

9 दारू व्यसनाधीन विद्यार्थी यांची ही विमाधारक नुकसानभरपाई देऊ इच्छित नाही

● विद्यार्थी व यात्रा विमा

* विद्यार्थी ज्यावेळी यात्रा विमा योजनेत सहभागी होतो त्यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षापर्यंत नुकसानभरपाई लागू असते

*त्यामुळे कालावधी निश्चित असतो परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्याने आपला यात्रा विमा काढायलाच हवा कारण त्याची सुरक्षितता परदेशात विमा कंपनी द्वारे होते

* यात्रा विद्यार्थ्यांना यात्रा विमा काढायचा असेल तर विमा कंपनी सुरुवातीला कोणत्या विद्यापीठात प्रवेश घेणार? व कोणते शिक्षण घेणार ? याचाही विचार करते.

● विद्यार्थ्यांनी यात्रा विमा निवडताना कोण कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ?

  • विद्यार्थ्यांनी यात्रा विमा काढताना काळजीपूर्वक योजना व कंपनी निवडावी
  • तसेच विमा पत्रकातील अटी व नियम काय आहेत ?ते हि नीट तपासून पाहावे
  • इतर विमा कंपनीच्या तुलनेत तुम्ही सहभागी होणारी विमा योजना चांगली व तुम्हाला किती पटीने विमा नुकसान भरपाई देते आहे तेही पहावे
  • आपल्या निवडलेल्या विम्यामध्ये वैद्यकीय व अपघाती विमा संरक्षण आहे का ?ते तपासावे
  • दाता संबंधीचा खर्चही त्यात समाविष्ट आहे का? ते पाहावे
  • वैद्यकीय सुविधा या भारतापेक्षा युरोपमध्ये खूप महाग असतात
  • विदेशातील अनेक महाविद्यालय ही विद्यार्थ्यांना विमा संरक्षण घेणे आवश्यक करतात
  • सुट्टी दरम्यान जर आपल्याला आपल्या देशात परत जावयाचे असल्यास नवीन पुन्हा यात्रा विमा ( pravasi bharatiya bima yojana in marathi ) काढण्याची गरज नसते
  • त्या देशात तुम्ही शिकावयास जात आहात त्यानुसार विम्याचा हप्ता ठरविला जातो कारण युरोपातील काही देशातील वैद्यकीय खर्च सहज परवडणारा नसतो.

नक्की वाचा : Travel Insurance For Senior Citizens In Marathi

अशा अनेक प्रकारच्या या सोयी सुविधा या विमा मधून आपल्याला मिळत असतात विद्यार्थ्यांनीही त्यावेळी परदेशात उच्च शिक्षण हा साठी जायचे ठरवले असते त्यावेळी अशा विमा योजना ची माहिती घेऊन त्यांचा जरूर लाभ उठवावा

2 thoughts on “प्रवासी यात्रा विमा | Pravasi Bharatiya Bima Yojana In Marathi 2022”

Leave a Comment