गैरप्रकार विमा योजना | miscellaneous insurance in marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण गैरप्रकार विमा योजना म्हणजेच miscellaneous insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

समाजा चे प्रतिबिंब:(Miscellaneous Insurance )
★ समाजात अनेक वेळा काही विचित्र घटना घडतात व त्याचे प्रतिबिंब आपल्याला वर्तमानपत्रात प्रतिबिंबित होताना दिसत असतात.
त्यात काही लोकांच्या बाबतीत अनेक गैरव्यवहार झालेले समोर येतात!
गैरप्रकार घडल्यामुळे सामान्य माणूस तर हवालदिल होत असतो .
आणि प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो आपले तारतम्य विसरूनच जातो !
आणि काही असामाजिक कृत्य करायला धजावतो .
त्याबाबतीतच आज आपण माहिती घेऊ-
आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा?
★ आरोग्य सेवा ईश्वर सेवा म्हटले जाते खरेच आहे. एखाद्या रुग्णावर किंवा पीडित व्यक्तीला वैद्याने औषधे देऊन वेदना कमी केल्या वर किंवा त्याला जीवनदान दिले तर त्या रुग्णा इतकेच समाधान हे त्या डॉक्टरांच्या ही चेहर्यावर पसरते !
पण, डॉक्टरांना जरी समाजात देवाचे स्थान असले तरी ते सर्वजण त्या प्रतिष्ठेला जपतात का ?
की काहीजण पैशासाठी स्वतःच्या प्रगतीसाठी काहीजणांच्या जीवाशी खेळ खेळतात?
हे खरोखरच योग्य आहे का?
नाते डॉक्टर- रुग्णांचे-
रुग्णांची मनस्थिती:
★ ही सर्व जरी कारणे झाली .
तरी जर असे रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना वाटले की आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा डॉक्टरांच्या दिरंगाईमुळे झाला आहे किंवा चुकीच्या औषधोपचाराने झाला तर त्याची प्रतिक्रिया ही तेवढेच जहाल उमटेल असे नाही का वाटत तुम्हाला??
बातम्या व हल्ले:
★ दिवसा- दिवस वर्तमानपत्र, दूरदर्शन ,मोबाईल वर अनेक बातम्या या ऐकायला मिळतात.
की ,रुग्णांच्या मृत्यूमुळे त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना चांगलाच चोप दिला.
किंवा रुग्णालयाची मोडतोड केली
डॉक्टरांवर हल्ला केला!
अशा बातम्या वाचून कोणावर विश्वास ठेवावा का?
हाच प्रश्न समोर उभा राहतो.
आरोग्य अधिकारी व सुरक्षा:
★ डॉक्टर किंवा रुग्णालयातील कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न तर खूप मोठा झालेला दिसत आहे. अत्यंत खडतर मेहनत करून, टक्केवारी आणून मुले ही डॉक्टर होण्याची स्वप्ने बघत असतात!
वैद्यकीय शिक्षणाचा खर्च हा वारेमाप असतो. आणि वेळेचे तर कुठेच नियोजन होत नसते.
ना सुट्टी ना आराम!
रुग्ण जसे दाखल होतील तसे त्यांना ही आपले कर्तव्य निभवावे लागत असते.
डॉक्टरांचा राखणदार?
★ डॉक्टरांवर जर रुग्णाने किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आरोप केला किंवा खटला भरला किंवा हल्ला केला.
तर, त्यांच्या पाठीशी कोण उभे राहतील?
विम्याचा आधार त्यांनाही मिळेल का?
आणि तो कसा?
त्याची आपण माहिती घेऊ-
आरोग्य सेवक व विमा:
★ आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांनी हा “व्यवसायिक दायित्व विमा” चेच एक अंश विकत घेतला आहे ,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .
समाजातील या सर्व अघटित घटना पाहिल्यावर डॉक्टर किंवा आरोग्य सेवकांना न्याय देण्यासाठी या विमा योजनेचा जन्म झाला आहे !
या विमा प्रकाराचे नाव आहे “गैरप्रकार विमा योजना”
आता हा विमा म्हणजे नेमके काय आहे?
तो काय करतो ?
कोणत्या गोष्टीला त्याचे आपल्याला संरक्षण मिळते?
याची आपण माहिती घेऊ-
गैरप्रकार विमा ( miscellaneous insurance in marathi ) :
★ही एक आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ची विमा योजना आहे.
यानुसार जर एखाद्या डॉक्टरांच्या चुकीमुळे किंवा मुद्दाम होऊन एखादी कृती केली गेली व त्यामुळे एखाद्या रुग्णाला त्रास झाला किंवा त्यात त्याचा मृत्यू झाला तर रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या रुग्णालयाचे नुकसान,
किंवा डॉक्टरांवर केलेले हल्ले, किंवा भरलेला खटला
या साऱ्या गोष्टींची भरपाई हा गैरप्रकार विमा योजना करून देते.
त्यामुळे विमाधारक आपले काम पुन्हा सुरक्षित रित्या व सुरळीतपणे करू शकतो.
गैरप्रकार विमा वैशिष्ट्ये:
या विमा योजने बद्दल आपण मुद्द्यानुसार काही माहिती घेत जाऊ-
1) गैरप्रकार विमा हा व्यावसायिक दायित्व विम्याचे एक अंग म्हटले जाऊ शकते
2)आरोग्य सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे काम ही योजना करते
3) रुग्णांना असलेल्या डॉक्टर वरच्या संशयामुळे ते त्याच्यावर आरोप करून खटला भरू शकतात
4)एखाद्या रुग्णाचा चुकीच्या औषधोपचार किंवा उपचार पद्धतीमुळे रुग्णाचा आजार बळावला किंवा मृत्यू झाला तर डॉक्टरचे किंवा आरोग्य सेवकांचे आर्थिक नुकसान संरक्षण व त्याची जबाबदारी ही विमा योजना घेते
5) या नुकसान भरपाई मार्फत विमाधारकाला खटल्यामध्ये झालेला खर्च किंवा त्याला न्यायालयाने काही रक्कम शिक्षा म्हणून भरायला लावले असल्यास तो खर्चही विमा कंपनी देते
वैद्यकीय क्षेत्र :
1) वैद्यकीय क्षेत्र हे अनेक गुंतागुंतीचे भरलेले असते
2) वैद्यकीय औषधोपचार याचा विपरीत परिणाम झाला त्यामागेही अनेक कारणेही असू शकतात
3)डॉक्टरांची मानसिकता.
- आणि नियोजित वेळापत्रक
- अत्याधिक तणाव
- बेजबाबदारपणा
- पैशाचा अत्यंत हव्यास
- किंवा एखाद्या औषध हि जे रुग्णाला दिलेले आहे
- ते योग्य ,सुरक्षित नसेल
- डुप्लिकेट असेल तर
- किंवा हाताखालच्या सिस्टर किंवा आरोग्य सेवकांकडून ही नजर चुकी होऊन रुग्णा बाबतीत अघटित घडू शकते
गैरप्रकार व डॉक्टर्स:
★ आज-काल आरोग्य सेवेमध्ये अशी अनेक प्रकरणे अधिक पहावयास मिळतात .
★जास्त करून युरोप खंडात अमेरिका सारख्या अति प्रगत देशात तर असे खटले अधिक भरलेले दिसतात
★जवळ -जवळ प्रत्येक डॉक्टरांच्या सरासरी पाच सहा वर्षानंतर त्यांच्यावर ही पाळी येते
★ त्यामुळे परदेशात या विमा योजना घेण्याकडे कल अधिक दिसून येतो
विमा योजना हप्ते:
★ प्रत्येक विमा योजनेचे मासिक हप्ते हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतात-
जसे-
- त्या डॉक्टरांचे क्षेत्र हे शहरी भागात आहे का?
- ग्रामीण भागात?
- तसेच त्यांचा अनुभव किती आहे ?
- तसेच त्यांच्या अजुन पर्यंतच्या कालावधीत विमा दावे केले आहेत का?व किती ?
- डॉक्टर कुठल्या स्तरातील लोकांसाठी कार्यरत आहेत?
- तसेच त्या राज्यातील किंवा भागातील नियम वगैरे काही वेगवेगळे ही असू शकतात.
- या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून हा त्यांची रक्कम ठरवली जाते.
गैरप्रकार विमा व अंतर्भूत संरक्षण खर्च:
★ या विमा प्रकारात विमाधारका वर भरलेल्या खटल्याची रक्कम तसेच न्यायालयीन खर्च याचा अंतर्भाव होऊ शकतो.
★ विमाधारकाला झाले ला खटला संदर्भातील खर्चाचा समावेश हा त्यात होतो
नक्की वाचा : Umbrella Insurance In Marathi
गैरप्रकार विमा घेण्याविषयी ( miscellaneous insurance in marathi ) :
★ गैरप्रकार विमा आपण वेगवेगळ्या मार्गाने घेऊ शकतो
- तो वैयक्तिक स्वरूपात एका विमा धारकासाठी ही घेऊ शकतो
- किंवा पूर्ण समूहासाठी ही घेऊ शकतो
- उदाहरण द्यायचे झाले तर-
- एखाद्या खास डॉक्टर विमाधारक किंवा त्याच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसाठी मिळून असा ही विमा घेतला जाऊ शकतो
- आर. आर .जी .या आरोग्यविषयक धंदेवाईकाचा एक समूह आहे आणि हा विमा देण्यासाठी त्यांचे आयोजन हे केले जाते
- आणि गैरप्रकार विमा योजनेतून हे संरक्षण मिळू शकते.
सरकार व संरक्षण:
★जे आरोग्यसेवक सरकारी रुग्णालयात कार्यरत असतील त्यांच्या साठी विमा घेण्याची चिंता नाही
★ कारण त्यांचा विमा हा सरकारद्वारे काढला जातो
★ तसेच वेगवेगळ्या प्रदेशातील नियमानुसार त्या विमा धारकांची विमा योजना देऊन त्यांना संरक्षण दिले गेलेले असते
कोणत्या कारणासाठी विम्याचे संरक्षण मिळते?
- ★ जर एखाद्या आरोग्य सेवक तथा डॉक्टरांनि रुग्णांवर चुकीच्या वैद्यकीय पद्धती वापरल्या चा
- ★व त्यामुळे त्यांचा (रुग्णाचा)आजार बळावल्या चा किंवा रुग्णाचा मृत्यू झाल्या मुळे विमाधारक डॉक्टरांवर आरोप केला जातो
- ★आणि त्यांच्यावर खटला ही भरला जातो या परिस्थितीत विमाधारक सेवकाला विमा कंपनी नुकसान भरपाई देते
- ★ वैद्यकीय क्षेत्रात काम करते वेळी अनेक क्षेत्रापेक्षा हा एक वेगळा प्रकार मानला जातो
- ★ त्यामुळे येथे छोट्या चुकी किंवा नजर चुकीला, बेजबाबदारपणा यास जागा नाही
- ★ अशी कुचराई डॉक्टरांनी केली असा विमाधारकांवर आरोप असल्यास आरोग्य सेवक या गटात अनेक व्यक्तींचा समावेश असतो
- ★ ते एकमेकांशी संबंधित असतात अशा परिस्थितीत डॉक्टर आणि उपचार केल्यानंतर किंवा ऑपरेशन केल्यावर आपल्या कनिष्ठ आरोग्य सेवक, सिस्टर्स ,वॉर्डबॉय ,सहाय्यक डॉक्टर यांना निर्देश दिल्याप्रमाणे त्यांनी जर काम केले नाही दुर्लक्ष केले तरी ही सर्व जबाबदारी ही प्रमुख डॉक्टरांवर किंवा रुग्णालयावर येते
- ★त्यावेळी जर गैरप्रकार विमा योजना त्या कालावधीत घेतला गेला असेल तर मात्र आर्थिक नुकसान भरपाई उचलण्यास त्यांना विम्याची साथ मिळू शकते
या कारणांसाठी गैरप्रकार विमा योजनेचे संरक्षण मिळत नाही:
- एखादा डॉक्टर हा आपली सेवा म्हणून न समजता जर व्यवसाय बनवून त्यापासून अधिक पैसा मिळवण्यासाठी जर अनैतिकता रुग्णा बाबत दाखवत असेल तर विमा कंपनीला याबाबतीत पुरावे मिळाल्यास त्या विमाधारकाला आर्थिक संरक्षण कंपनी देत नाही
- एडस सारख्या रोगांच्या बाबतीत ही संरक्षण विमा कंपनी द्वारा मिळत नाही
- नशिले पदार्थांच्या सेवनानंतर उपचार करताना झालेल्या नुकसानीची जोखीम ही विमा कंपनी उचलत नाही
- वेगवेगळ्या आजारात रेडिएशन सारख्या उपचार पद्धती असतात .अशावेळी किरण शरीरात जेथे आजार तेथेच टाकायचे असतात त्यावेळी झालेल्या चुकीमुळे रुग्णाला त्रास झाला तर ही विमा कंपनी त्यासाठी जबाबदारी घेत नाही
- आजकाल सुंदर दिसण्यासाठी अनेक सर्जरी शरीरा च्या अवयवा वर केल्या जातात
- त्यात काही चेहर्यासाठीही असतात त्याकरताना जर रुग्णास त्रास झाला आणि विमाधारका वर खटला भरला गेला तरही विमा कंपनी संरक्षण देण्यास सक्षम नसतात.
गैरप्रकार विम्याची गरज :
★ जे आरोग्य सेवक म्हणजेच डॉक्टर म्हणून कार्यरत आहे त्यांनी ही विमा योजना घेणे अत्यंत गरजेचे आज च्या काळात तरी झालेले आहे
★ कारण काहीही असो म्हणजे त्यांच्यावर ठेवलेले आरोप हे सत्य असू देत किंवा खोटे असतील अशा वेळी जर त्यांच्यावर खटला भरला गेला आणि गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना न्यायालयातर्फे आर्थिक दंडही भरावा लागतो
★त्यांच्या भरपाई च्या किंमती ही अधिक असू शकतात.
★ स्वतःचा व्यवसाय जर विमाधारकाचा असेल तर त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान ही होऊन शकते
★ अशा वेळी जर विमा योजनेचा मासिक हप्ता भरण्याचा खर्च जरी करावा लागला तरीही एक नुकसान भरपाईचे आर्थिक संरक्षण हे विमा कंपनी देऊ शकते
★ व त्या प्रतिकूल परिस्थितीत विमाधारकाला तो एक पुन्हा आपला व्यवसाय सुरळीत करण्यासाठी आधारही होऊ शकतो हे निश्चितच!आणि हे योग्यच नाही का?
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण गैरप्रकार विमा योजना | Miscellaneous Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.
Visit Also : Hindishaala.in
Tags : गैरप्रकार विमा योजना | Miscellaneous Insurance ,गैरप्रकार विमा योजना | Miscellaneous Insurance In Marathi 2022 ,miscellaneous insurance pdf,miscellaneous insurance ppt ,miscellaneous insurance types
1 thought on “गैरप्रकार विमा योजना | Miscellaneous Insurance In Marathi 2022”