कीमॅन विमा योजना | Key man insurance in marathi 2022

कीमॅन विमा योजना | key man insurance in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण कीमॅन विमा योजना म्हणजेच key man insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Key man insurance in marathi
key man insurance

व्यवसायाकडे कूच: (Key man insurance) 

आपल्या जीवनात आपण स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टी करतो.
नोकरी ,व्यवसाय अशा अनेक मार्गाने पैसे कमवत असतो व आपलं जीवनमान उंचावतो.
नोकरी जरी सुरक्षित क्षेत्र वाटले तरी ,ज्याला आकाशाला गवसणी घालावयाची असते ते छोट्याशा आकाशात उडायला तयार नसतात!
त्यामुळे व्यवसायाच त्यांच्या क्षितिजाला गवसणी घालू शकतो.

व्यवसाय व त्यातील धोके:

व्यवसाय करताना अनेक धोके, अडथळे हे पार करावे लागतात. व्यवसाय करताना फायदा प्रचंड होत असला, तरी नुकसानही भयंकर सोसावे लागू शकते. नुकसानाची भरपाई करण्यासाठी अनेक विमा कंपन्यांनी व्यवसायिक विमा योजना बाजारात आणल्या आहेत. व्यवसायाच्या नुकसान भरपाई शी निगडित एक विमा योजना आहे ती म्हणजे “किमॅन इन्शुरन्स” त्याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊ:

की मॅन इन्शुरन्स म्हणजे काय? ( what is key man insurance in marathi )

कि मॅन विमा योजना ही एक व्यवसाय विमा याला सलग्न अशी आहे.
ही विमा योजना व्यवसायातील नुकसानाचे संरक्षण करते व एखाद्या व्यावसायिकाच्या जिवंत नसल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे व्यवसाय चालू शकत नसेल तर या विम्याची मदत घेतल्यास व्यवसायामध्ये आर्थिक संरक्षण हे मिळते.

की मेन विमा योजना काय करते?

1)सामान्यत ही विमा योजना व्यवसायात येणाऱ्या नुकसानीची जोखीम उचलते व त्याची विमा- धारका तर्फे ही त्याच्या बदल्यात भरपाई करते
2) ही विमा योजना व्यवसायातील खूप मोठे नुकसान झाले असल्यास कार्यान्वित केली जाते
3) तसे व्यवसायाला योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती किंवा महत्वपूर्ण असा व्यावसायिक मरण पावल्यास व्यवसायाचे मोठे नुकसान होते व त्या नुकसानाला की मॅन ही योजना संरक्षित करते
4) व्यवसाय कोणत्याही कारणामुळे कोलमडू नये व तो सुरळीत व स्थिर चालत राहावा म्हणून येणारी आर्थिक जोखीम ही विमा कंपनी उचलत असते
5) अर्थात व्यवसाय लहान-मोठा किती प्रमाणात व्यापलेला असू शकतो त्याचे किती नुकसान झाले त्याप्रमाणे विमा कंपनी नुकसान सोसत नाही तर आधीच विमाधारक व विमा कंपनी दरम्यान ठरलेल्या नियमानुसार आर्थिक भरपाई दिली जाते

कि मॅन विमा कोण घेऊ शकतो? | key man insurance in marathi

व्यवसायाशी संबंधित कोणतीही व्यक्ती हा विमायोजना घेवू शकते. व्यवसाय सहकारी तत्त्वावर चालो किंवा एकट्या व्यक्ती तर्फे!
जी व्यक्ती अतिशय मुत्सद्दी व व्यवहारकुशल असून प्रचंड ताकदीने निर्णय घेत असल्यास, किंवा योग्य सल्ले देणाऱ्या व्यक्ती ही विमा योजना घेऊ शकते.
त्याच्या मुळे व्यवसायावर फरक पडू शकतो.

कर्मचारी हा विमा धारक बनू शकतो:

व्यवसाय ज्या व्यावसायिकाचा आहे, तोच फक्त विमाधारक बनू शकतो असे नाही.
काही व्यापारी किंवा व्यावसायिक आपला व्यापार खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर मेहनतीने नेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रतीही सौजन्य दाखवतात.
काही काम करणारे सदस्य यांच्या व कामाचे एक वेगळे स्थान निर्माण झालेले असते .
त्या प्रतिष्ठित काम, पद यांचाही विमा काढणे अत्यंत आवश्यक असतो.
कंपनी चे पदाधिकारी ,संचालक, अध्यक्ष अशीही मोठ्या पदाची माणसे असतात की त्यांच्यामुळे व्यवसाय हा व्यवस्थित चालत असतो.

किमॅन ओळख:

किमान विमाधारक जी व्यक्ती पूर्णपणे आपल्या कामात वाकबगार व निष्णात असल्यामुळे त्याच्यासाठी विम्याचे हप्ते भरले जातात व त्यांचे व त्यांच्या व्यवसायातील स्थानाचे नाव अबाधित ठेवले जाते.
अर्थात कारणही तसेच असते अशी निष्णात व्यक्ती च्या निर्णयक्षमतेवर अस व्यवसायात आमूलाग्र चांगला बदल हा झालेला दिसून येतो.

एखाद्या व्यवसायाच्या नुकसानाची कारणे :

ज्या विमाधारक म्हणून काम करणारा सदस्य जर मरण पावला तर कंपनीचे हि तेवढेच नुकसान होऊ शकते .
आता ते काय होऊ शकते?
ते आपण पाहू-
1) योग्य सल्लागार किंवा मार्गदर्शक नसल्यामुळे निर्णय चुकल्यामुळे आर्थिक परिस्थितीवर भार पडू शकतो
2)दर वार्षिक विशिष्ट व्यक्तीमुळे लाभणारा आर्थिक लाभ हा कमी होऊ शकतो
3) तसेच अनेक कंपन्यांशी संबंध जोडताना ही निर्णय चुकू शकतात व त्याचा अनायसे परिणाम हा कंपनीच्या भविष्यावर होऊ शकतो

नुकसानीसाठी काही उपाय योजना आहेत का ?
त्यावर आपण आता विचार करू-

1) एखाद्या व्यावसायिकाकडे हा कि मॅन विमा योजना असेल तर विमा योजनेतून मिळणारा आर्थिक लाभ हा व्यवसायात घातला जातो
2) त्याला स्थिर करण्याचे काम या विमा योजने द्वारे होऊ शकते
3) आणि विस्तारित व फायदेशीर असा व्यापार चालवण्यासाठी पैसाही प्रचंड प्रमाणात लागू शकतो
4) त्या पैशाची तरतूद हा किमान विमा योजनेद्वारे अधिक प्रमाणात दिली जाऊ शकते
5) मुख्य व्यापारात अडचणीही पैसा या एकाच गोष्टी वर येऊन अडकत असतात
6) परंतु या विमा योजनेच्या मदती दरम्यान व्यवसायातील रिक्त पदे भरण्याचे काम ही चालु राहू शकते
7)विमाधारक कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना कंपनीने घेतलेली असते
8) ही किमॅन विमा योजनेच्या कालावधीत ठीक असेल म्हणजेच जर ती व्यक्ती मरण पावली नाही तर मात्र विमा कंपनी व्यवसायासाठी कोणतीही आर्थिक लाभाची सोय करत नाही

किमान विमा योजनेचे कोणते लाभ मिळतात ( benefits of key man insurance in marathi ) :

व्यापार हा विस्तारित असो किंवा लघु व्यापार त्याला किमान विमा योजने मुळे काही लाभ ही मिळतात ते पुढील प्रमाणे:

1) सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे जर व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती अचानक मरण पावणे
2)त्या ज्या सल्ल्यामुळे किंवा निर्णय क्षमते अभावी व्यवसाय अचानक कोसळू शकतो
3) पण त्याच नाजुक परिस्थितीत व्यापाराचा डामडौल हा किं मॅन विमा योजना आर्थिक मदत करून सांभाळतो
4)त्यामुळे त्या क्षणी योग्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यास त्यांना अवधी मिळतो
5) व व्यापार ही सहज सुरळीत चालू राहतो कीमॅन विमा योजना एखाद्या व्यवसायासाठी संरक्षण दिलेले असल्यास अनेक मोठमोठी कामेही नीट होऊ शकतात

कीमॅन विमा व्यवसायासाठी अत्यंत पूरक ठरतो :

★एखाद्या कर्जाची परतफेड करणे किंवा योग्य व्यक्तीस कामाचा अनुभव मिळवून देण्यासाठी कसंब शिकवणे
★ व नवीन पदाचा भार सांभाळण्यासाठी योग्य व सक्षम पदाधिकार्‍यांची निवड करणे
★ अशी अनेक कामे ही कि में योजना करत असते
★याद्वारे फक्त एखाद्या व्यवसायाचे कार्य अबाधित राखण्यात पुरतेच ही विमा योजना काम करत नाही
★ तर एखाद्या निष्णात पदाधिकाऱ्याच्या अचानक मृत्यूमुळे त्याच्या घरावर ही अस्थिरता डोकावू शकते त्यामुळे त्याच्या पत्नीलाही एक आधार देण्याचे काम ही विमा योजना करते
★. त्यामुळे खरंच व्यवसाय व कर्मचाऱ्यांसाठी ही पूरक ठरते

नक्की वाचा : Gross Profit Insurance In Marathi

किमान विमा योजना व पारिवारिक व्यापार:

  • असे अनेक परिवार हे देश व जगतात एका ब्रँड सारखे काम करीत असतात.
  • पिढी दर पिढी ते आपल्या वारसदारा सह व्यापार वाढवत असतात
  • पूर्ण परिवार हे व्यापारामध्ये सहभागी असतात ,असे असले तरी व्यापाराचे एक सर्वेसर्वा किंवा अत्यंत कर्तबगार व्यक्तिमत्व असे एकटेच असू शकते.
  • पण त्याच्या जाण्यामुळे पारिवारिक व व्यापार या दोघांमध्ये खच्चीकरण होऊ शकते
  • अशा वेळी या कीमॅन विमा योजनेचे फायदे मिळू शकतात.
  • कारण ही विमा योजना अगदी माफक दर व सोप्या मार्गाने प्राप्त होत असते

व्यापारातील अडथळे:

व्यापारात अनेक अडचणी येत असतात.
मुख्य संचालक किंवा व्यवस्थापकांचा मृत्यू .
मार्गदर्शन किंवा सल्ले न मिळाल्याने व्यापाराचे नुकसान होऊ शकते
व्यवसायात किती वेळा पार्टनर असू शकतात त्यातील एकाचेही व्यवसाय प्रति दुर्लक्ष झाले असेल किंवा मते बदलली असतील तर त्याचाही व्यापारावर अतिशय प्रभाव पडू शकतो

अडथळे व किमॅन विमा मदत:

1)वरील अडथळे व्यापार करताना आल्यास येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी किमान विमा योजनेची मदत होते
2) आर्थिक पुरवठा केल्याने व्यापारातील अडथळे पार करताना वेळ मिळू शकतो
3) मुख्य व्यक्तीचा मृत्यू ,बदली यामुळे होणाऱ्या समस्या संदर्भात शांतपणे पदाधिकार्‍यांची नियुक्ती होण्यासाठी विमा योजना आर्थिक मदत करते.

कीमॅन विमा योजनेची विमा धारकासाठी अत्यावश्यकता:

★ की मॅन विमा योजना विमाधारकाच्या अचानक काळाच्या पडद्याआड गेल्या मुळे झालेले व्यापार व कुटुंबाच्या नुकसानीत आर्थिक आधार बनू पाहतात
★ या योजनेमुळे विमाधारक कर्मचाऱ्यांनी योजना चालू असते त्या वेळी आपल्या कामातून निवृत्त झाला असेल तरीही आर्थिक लाभ प्राप्त करून घेतात
3) टॅक्स वाचवण्यासाठी कामगारांच्या पगारात भरती केल्यास ही टॅक्स भरणे वाचू शकते
4) एखाद्या मोठ्या समस्येचे पडसाद हे विस्तारलेल्या व्यापारावर अनेक ठिकाणी झालेले दिसून येते
5) त्यामुळे या किमान विमा योजनेची साथ असल्यास आर्थिक संरक्षण ही मिळू शकते.

काही त्रुटी :

या विमा योजनेत जसे फायदे दिसून येतात तसेच काही त्रुटी ही आढळून येतात
1) या विमा योजनेद्वारा जर विमाधारकाने नुकसान भरपाई करिता विमा दावा केला असेल तर त्यावेळी टॅक्स कार्यालयाच्या नियमाशी ते तंतोतंत जुळत नाहीत
2) दुसरी त्रुटी म्हणजे विमा दाव्यानंतर संरक्षित रक्कम हवी असल्यास विमायोजना सुरुवातीला कंपनीकडे जमा करावी लागते आणि नंतर त्याच्या नियमानुसार ती नुकसान भरपाई विमाधारका कडे सुपूर्त केली जाते.

अशीही व्यावसायिकांसाठी
“किमॅन विमा योजना” आहे की त्याचा फायदा हे लहान मोठे व्यापारी आपल्याला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी घेऊ शकतात.

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण कीमॅन विमा योजना | Key man insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Visit Also : Biographystyle.com

Tags : कीमॅन विमा योजना | Key man insurance ,कीमॅन विमा योजना | Key man insurance in marathi ,कीमॅन विमा योजना | Key man insurance in marathi ,कीमॅन विमा योजना | Key man insurance in marathi ,कीमॅन विमा योजना | Key man insurance in marathi

1 thought on “कीमॅन विमा योजना | Key man insurance in marathi 2022”

Leave a Comment