ज्वेलरी इन्शुरन्स | Jewellery Insurance In Marathi 2022

ज्वेलरी इन्शुरन्स | Jewellery Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण ज्वेलरी इन्शुरन्स म्हणजेच jewellery insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

jewellery insurance in marathi
Jewellery Insurance

ज्वेलरी इन्शुरन्स | what is jewellery insurance in marathi

लग्न समारंभ जवळ आले की आपली गडबड सुरू होते. नवीन कपडे, चप्पल ,मेकअप ची साधने व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोन्या- चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणे! चांगल्या घरगुती सोनाराकडे जाणे आलेच! अशा वेळी सोनाराकडे असलेली सोन्याचांदीची भांडी दागिने पाहून मन खुश तर होतेच, पण अशा या सोनारां ना धोका नसतो का? कींवा सर्वसामान्य माणसांना आपले दागिने व्यवस्थित व सुरक्षित ठेवायचे असल्यास काय करावे लागेल ?त्यांच्यावर हल्ला झाला तर चोरी, दरोडा पडला तर काय खबरदारी घ्यावी?

सोन्याच्या दागिन्या साठी विमा योजना | insurance for gold jewellery in marathi

ज्वेलर्स पॅकेज इन्शुरन्स योजनेमध्ये सोन्या-चांदीची किम्मत अशा दागिन्याचे संरक्षण कसे काय होऊ शकते विम्याचे संरक्षण मिळू शकेल का तर हो सोनारा नाही आपल्याकडे विकत असणाऱ्या महागड्या किमती अशा सोन्या-चांदीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी विम्याचे संरक्षण मिळू शकते.

विम्याचे संरक्षण

सोनाराकडे अनेक महागड्या व मौल्यवान दागिने अशा वस्तूही असतात अशावेळी त्यांना अनेक गोष्टी द्वारे धोके उद्भवू शकतात व त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्याचे काम हे विमा कंपनी आपल्या विमा योजनेद्वारा करते !ही विमा कंपनी कोण कोणत्या गोष्टीसाठी आर्थिक संरक्षण देते ?ते आता आपण पाहू

विमा कंपनी | insurance company and jewellery insurance in marathi

मौल्यवान सोने हिरे चांदीच्या दागिन्यांवर बरोबर आणखीही गोष्टींना संरक्षण देत असते .त्यात सोनारांच्या दुकानातील सामान, सजावटीचे सामान, खास कागदपत्रे, बिल्डींग, कामगार यांचाही मृत्यू झाला दुर्घटनेसाठी.तसेच कामगार अपंग झाल्यास, दुकानातील काच सारख्या वस्तु फुटणे या सर्व गोष्टींना संरक्षण मिळाले जाते.

सामान्य व कामगारांकरिता जोखीम तसेच काही साधने यांचेही नुकसान झाल्यास व्यापाराच्या गरजेनुसार संरक्षण दिले जाते.

दागिने व पुनर्विक्री

सोन्याचांदीचे दागिने म्हणजे अशी एक गुंतवणूक आहे की ,ती खरेदी केल्यावर ज्या दराने ती विकत घेतली असेल तर ती काही काळाने हीत ती विकल्यास त्याची किंमत कमी होत नाही. परंपरेने चालत आलेले दागिने असोत वा नवीन विकत घेतलेल्या सोन्या चांदीच्या किंवा हिऱ्याच्या वस्तू दागिने! पुन्हा त्याची विक्री केल्यास चांगलाच मोबदला मिळतो.

दागिने मूल्य व संरक्षण

दागिने ही अत्यंत महागडे असल्याने व्यक्ती आपापल्या परीने त्याचे संरक्षण करत असतात .कोणी घरी तिजोरीमध्ये ठेवतात ,तर कोणी बँकेत लॉकर मध्ये ठेवतात .जसे माणसाच्या राहणीमानात व विचारसरणीत काळाबरोबर बदल झाला आहे  तसेच माणसे आपल्या दागिन्यांचे संरक्षण करण्याकरिता विमा कंपनीचे संरक्षण योग्य समजतात.

विमा कंपनी ही दागिन्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रामुख्याने गृह विमा योजनेमधून मदत करते. व विमाधारकाला त्याकरिता संरक्षण मिळेल अशी घर विमा योजना विकत घ्याव-

याचे कारण नाही. विमाधारक स्वतःच्या दागिन्यांना संरक्षित करण्यासाठी योग्य अशी विमा योजना घेऊ शकतो.

होम इन्शुरन्स

घरात दागिने ठेवणे म्हणजे अत्यंत जबाबदारीचे किंवा जोखमीची परिस्थिती असते व घरी चोरी घरफोडी होऊन संपत्ती लुटली जाऊन मोठे नुकसान होऊ शकते. पण विमाधारकाने होम इन्शुरन्स घेतला असेल तर त्याला त्याच्या नुकसानाची भरपाई करून दिली जाते. या विमा कंपनीच्या विमा योजनेद्वारा अनेक योजना असतात व त्यातून अनेक प्रकारची नुकसानाची परिस्थितीही लक्षात घेतली जाते. दागिने हे फक्त सौंदर्य वाढवण्याचे साधन नाही आहे. त्या वेळी एखाद्या व्यक्तीवर आर्थिक संकट कोसळते .त्यावेळी तेच तागिने संपत्तीच्या रूपात आर्थिक नुकसान होण्यापासून व्यक्तीला वाचवते. म्हणजे इतकी मौल्यवान दागिने ना आपण विमा संरक्षण दिले पाहिजे!

बँकांमध्ये व्यक्ती अत्यंत विश्वासाने दागिने ठेवतो परंतु त्यांचे ही काही नियम असतात व त्यामुळे ते ही ठराविक मर्यादा पलीकडे व्यक्तीच्या नुकसानाची भरपाई करण्यास तयार नसतात.

विमा योजना व हप्ता

विमा कंपनी विमा खर्च वा  हप्ता ठरवते .पण त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार केला जातो.

1)दागिने

कोण कोणते ?व किती आहेत? त्यांची एक यादी बनवली जाते. व विमा कंपनीकडे ती दिली जाते.

2)बाजार भाव

त्यांच्या यादी केल्यानंतर किती वजनाचे दागिने आहेत व किती त्यांचे वर्तमान स्थिती किंमत आहे त्याचाही अंदाज घेतला जातो विमा संरक्षणाची रक्कम ही ठरवता येते व हा अंदाज एखाद्या चांगल्या प्रतिष्ठित सोनाराची विचारविनिमय करून ठरवता येतो.

3)विमा किंमत

हा जास्त प्रमाणात विमा योजनेच्या विमा किमतीवर  निर्भर असतो.

विमाधारक होम इन्शुरन्स

विमाधारक स्वतःला अनेक विमा कंपन्या विषयीचे कोट्स मिळवून तुलना करून तसेच स्वतःच्या

गरजा पाहून योग्य विमा कंपनी विमा योजनेची निवड करू शकतात .

दक्षता

ज्यावेळी विमाधारक आपल्या दागिन्या करिता विमा योजनेचा लाभ घेऊ इच्छितात. त्यावेळी निवडलेल्या विमा कंपनी व विमा योजने विषयी त्यांनी बारीकसारीक गोष्टींची माहिती घेऊन सर्व नियम ,अर्हता ज्या मोठं -मोठ्या पेपर भर लिहील्या जातात व  त्याही वाचल्या पाहिजेत. कारण विमाधारक त्यासाठी कंटाळा करतो. विमाधारकाने छोटा विमा हप्ता जास्त प्रमाणात विमा संरक्षण देणारी विमा योजना स्वीकारली पाहिजे व हा अभ्यास करतेवेळी विमा कंपनीचा विमा दावा व त्याच्या इतर विमाधारक यांनी घेतलेला फायदा या विषयी माहिती ठेवले पाहिजे. काही विमा कंपनी काही सुविधाही ठेवतात त्यांच्याकडे लक्ष ठेवून त्यांचाही फायदा घेतला पाहिजे.

संरक्षणाची मर्यादा

विमाधारकाच्या सर्व प्रकारचे पीक विमा योजनेचे संरक्षण मिळाले पाहिजे या बाबतीत निश्चिंत देईल विमा काढलेले दागिन्यांच्या नुकसानानंतर त्याची किंमत ही परत मिळू शकते.

धोके /जोखीम

चोरी

विमाधारकाने आपल्या दागिन्यांचा विमा काढला नसेल तर चोरी किंवा घरफोडी झाल्यावर त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते परंतु त्यांनी जर विमासंरक्षण मिळवले असेल चोरी होऊनही तो निश्चिंत राहू शकतो

आग

जर एखाद्याच्या घरी आग लागून नुकसान झाले तर त्याच्या नुकसानाची पूर्ण जबाबदारी विमा कंपनी घेते

आपत्ती

काही नैसर्गिक येणाऱ्या संकटामुळे ही आपले नुकसान होऊ शकते .जसे की पूर ,भूकंप, चक्रीवादळ यासारख्या धोक्यामध्ये नुकसान झाल्यास ती त्याला संरक्षण मिळू शकते.

वस्तू

घरी जर एखाद्या विमाधारकाने त्या नीट ठेवल्या असतील तरीही त्या वेळी नुकसान झाले तरी त्याची भरपाई विमाधारकाला मिळते

कोणत्या अशा गोष्टी आहेत त्यांना विम्याचे संरक्षण मिळत नाही

दुर्लक्ष

काही भीमा सारखे भीमा काढून अतिआत्मविश्वास पूर्ण वर्तन करून घरी ठेवलेल्या दागिन्यात बद्दल अगदी बेफिकीर पणाने वागतात त्यांना विमा योजनेचे आर्थिक मदत मिळेल म्हणून कसेही वागतात पण अशा वेळी त्या विमाधारकाला विमा कंपनी तर्फे मदत केली जात नाही . कारण विमाधारकाच्या बेफिकीरपणा मुळे त्याचे नुकसान झालेले असते

दागिन्यांचे मूल्य

ज्या दागिन्यांच्या विमाधारकाने विमा उतरवला आहे ,पण ते जीर्ण झाले असल्यामुळे नवीन घेण्यासाठी विमा कंपनीकडे असलेल्या यादीत फरक पडला तर मात्र विमा कंपनी ही संरक्षण देण्यास बाध्य राहत नाही.

लपविणे

काही विमाधारक आपल्या सर्व गोष्टीं स्पष्ट करतिलच असे नाही. काही गोष्टी लपवून ठेवू शकतात. विमा कंपनीकडे अगदी योग्य माहिती गेली नाही तर विमा कंपनी सुद्धा माहिती लपवलेल्या बद्दल त्याला त्याच्या नुकसानीसाठी भरपाई देत नाही.

जप्ती

काही कायदेशीर बाबी मुळे विमाधारकाला मुळे जर दागिने जप्त करण्याची परिस्थिती आली तर ही विमा कंपनी जोखीम घेत नाही.

विमा योजनेद्वारे मिळणारे फायदे | benefits of jewellery insurance in marathi

या प्रकारचा विमा हा अगदी सोपा सहज व सर्वांसाठी किमतीसाठी योग्य असा असतो. व अशा विमा योजनांवर आपण विश्वास ठेवू शकतो व जी विमा कंपनी वचन देते आश्वासन देते ती पूर्णपणे पूर्ण करण्याची निश्चितता ही असते.

विमाधारकावर आपत्ती ही कधीही कोणती वेळ येऊ शकते मग अशावेळी विमा कंपनी मर्यादित केलेली वेळ न पाहता वर्षाचे सर्व महिने दिवस व 24 तास आपले सेवा देते विमाधारकाच्या अनेक आवश्यकता यशस्वीपणे पुर्ण होतात व संरक्षणही मिळते

बँका व विमा संरक्षण

विमाधारक व्यक्ती आपला विश्वास हा पूर्णपणे बँकांवर ठेवत असतो .अशा वेळी जर त्याने विचार केला की बँकेसारखे सुरक्षित साधने असताना गृह विमा का घ्यावा? तर याचे उत्तर आहे बँका या आपत्ती दरम्यान दागिन्यांची नुकसानभरपाई घेत नाही. किंवा कोणतीही जोखीम उचलत नाहीत. त्यामुळे तो धोका टाळण्यासाठी गृह विमा अंतर्गत दागिने ही ठेवावे भलेही ते घरी न ठेवता बँकेत ठेवावेत.

नक्की वाचा : Home Bakers Insurance In Marathi

घरमालक व दागिने संरक्षण

जर एखादी व्यक्ती भाड्याने राहात असता त्याच्या गृहमालका ने जर गृह विमा काढला असेल आणि भाडोत्री म्हणून तेथे राहणाऱ्या व्यक्तीच्या घरी चोरी झाली तर गृह मालकाच्या विमा मुळे त्याला अंशतः फायदा मिळू शकतो त्यामुळे फायदाही कमी कमी मिळतो.

ब्लॅंकेट विमा योजना

विमाधारक ज्यावेळी विमा योजना खरेदी करतो त्या वेळी काही ठिकाणी सल्ले दिले जातात. की जे नियमित वापरण्याचे छोटे दागिने आहेत त्यांच्यासाठीच विमा योजना घ्यावी .कारण त्या बाबतीत जास्त धोका असतो.

ब्लॅंकेट विमा योजनेत दागिने संरक्षित केले असतील तर वेगवेगळ्या दागिन्यांचे मूल्य मोजणे गरजेचे ठरते .त्यामुळे दागिने व विमा कंपनीला विमाधारकाच्या पूर्ण दागिन्यांच्या किमतीही कळतील.

प्रवास व विमा

प्रवास करते वेळी हे दागिने गहाळ होणे चोरी होणे अशा घटना घडू शकतात अशा वेळी खास प्रवासी विमा घेण्याची आवश्यकता नाही विमाधारकाने घेतलेली विमा योजना सर्व नुकसानाचा अंतर्भाव करणारी असेल तर विमाधारक परदेशात गेला तरी ने विमायोजना आर्थिक संरक्षण प्रदान करेल

विमा दावा

विमा दावा क्रियाही वाहन विमा सारखीच असते विमा दलालाकडून मिळालेल्या विमा जावा नंबर वर विमाधारकाला त्याच्या दागिन्यांच्या चोरी संदर्भातले छायाचित्र पोलिसांचे रिपोर्ट महत्त्वाचे दस्तऐवज दिले जातात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चोरीला गेलेल्या दागिन्यांचे मूल्य व डायमंड ज्वेलरी असेल तर  (ए जी एस एल) (जी आय ए)

प्रमाणपत्र द्यावे लागते विमाधारकाने छोटासा घेणा अंगठी प्रसिद्ध सोनाराकडून विकत घेतली असेल तर मूल्य किंवा डायमंडचे प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही

विमा कंपनी व हरवलेले दागिने

काहीवेळा दागिने हरवलेल्या असतात व विमा दावा केल्यावर जर आर्थिक संरक्षण मिळाले असेल व विमा धारकाचे दागिने सापडले तर विमा कंपनीला ते कळवून एक तर मिळालेल्या आर्थिक संरक्षण म्हणजे रक्कम द्यावी लागेल किंवा त्याच्या बदल्यात घेतलेला दागिना द्यावा लागेल

दागिने व विमा फायदा

विम्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी प्रत्येक वर्षीचा दागिना व त्याचा बाजारभाव विमाधारकाने लक्षपूर्वक पाहिले पाहिजे .जेणेकरून दरवर्षीचा बाजार भाव व  त्याच्या दागिन्यांची किंमत याचे त्याला भान राहील ! कारण बाजार भावामध्ये कमी-अधिक असे प्रमाण होतच राहते व आपली विमा योजना या दरानुसार तयार करावी.

Reed Also : हास्याचे मानसशास्त्र म्हणजे काय

अशाप्रकारे सोन्यासाठी चांदीसाठी किंवा हिरे व त्यांच्या दागिन्यांसाठी अनेक प्रकारच्या विमा योजना विमा जगतात उपलब्ध आहे ज्या विमाधारकाला आपल्या भविष्यातील धोके यांसाठी आपत्तीसाठी काही आवश्यकतेनुसार विमा योजना यायचे आहेत त्यांनी विमा कंपनीचे कोट्स वाचून आपले विमा योजना निश्चित करावे जेणेकरून त्यांची मौल्यवान संपत्ती सुरक्षित राहील

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण ज्वेलरी इन्शुरन्स | Jewellery Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : ज्वेलरी इन्शुरन्स | Jewellery Insurance ,ज्वेलरी इन्शुरन्स | Jewellery Insurance In Marathi 2022

2 thoughts on “ज्वेलरी इन्शुरन्स | Jewellery Insurance In Marathi 2022”

  1. फसवणूक करून दागिने लुटले तर त्याचा विमा मिळतो का

    Reply

Leave a Comment