आंतरराष्ट्रीय विमा योजना | International Travel Insurance In Marathi 2022

आंतरराष्ट्रीय विमा योजना | International Travel Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय विमा योजना म्हणजेच international travel insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

International Travel Insurance In Marathi
International Travel Insurance

● प्रवासी व प्रवास:


माणसे सततच प्रवास करीत असतात प्रवास करत राहणे त्यां च्या जिवनाचा एक भागच झालेला असतो मग कारणे काहीही असो:

 1. ते विद्यार्थी असतील तर शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी आपल्या देशातल्या दुसऱ्या देशात प्रवास करतात
 2. कोणी व्यावसायिक असतील तर, आपल्या व्यवसायांमध्ये प्रगती करण्यासाठी आणखी तो वाढवण्यासाठी प्रवास करतात
 3. काही कुटुंबे किंवा एकट्या व्यक्तीही प्रवास करत असतात रोजच्या कामाच्या, जबाबदारीच्या दगदगीतून जरा निवांतपणा अनुभवण्यासाठी ते प्रवास करतात
 4. तर काही दीर्घ आजारपणातून उठून शांती आणि आनंद मिळवण्यासाठी प्रवास करतात
 5. अशी अनेक कारणे आपल्याला प्रवासाची मिळू शकतात परंतु ,प्रवास करताना प्रवासाची सुरक्षा किंवा हमी कोण देईल ?  हा पण एक प्रश्न असतोच ना??

प्रवासाची सुरक्षा :

 • यात्री किंवा प्रवासी प्रवास करताना आपले ध्येय समोर ठेवून प्रवास करीत असतात
 • त्यांना आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करायचे असतात
 • किंवा कुणी आरामासाठी निवांतपणा साठी आलेले असतात
 • त्यावेळी त्यांना निर्भयपणे आनंद घ्यायचा असतो
 • आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्या भूत काळामध्ये नक्कीच खूप प्रयत्न व धडपड केलेली असते
 • जर एवढा विचार करून वेळ काढून नियोजन करून व मुख्य म्हणजे कष्टाचा पैसा घातला असतो
 • ते देशातल्या देशात किंवा दुसऱ्या   देशात जात असतील तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेऊ शकेल?

प्रवासातील ताण तणाव आणि त्याची कारणे :

 1. आर्थिक खर्च हा तणाव आतील एक मुख्य मुद्दा मांडला जाऊ शकतो आपले पैसे हरवले किंवा चोरी झाले तर पैशा अभावी आपण परदेशात अडचणीत येऊ शकतो
 2. आपली काही वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्रे जर गहाळ झाली
 3. परदेशात जाताना पासपोर्ट सारख्या अतिमहत्त्वाच्या वस्तू हरवणे यामुळे पण आपण तणावाखाली येऊ शकतो
 4. पैसे चोरी होणे किंवा आपल्या बॅग चोरी होणे त्याच्यात आपल्या सर्व आवश्यक आणि अत्यावश्यक असे सामान औषधे वस्तू असतात
 5. जर आपण कुठे प्रवासासाठी काही दिवसांसाठी गेलो असु आणि तिथे अनोळखी ठिकाणी जर आपला अपघात झाला आणि आपण जखमी झालो किंवा अपंगत्व आले तर अशावेळी आपल्याला तिथे रुग्णालयात भरती करण्यासाठी आर्थिक मदत लागू शकते
 6. जर परदेशात प्रवास करायला यात्री गेले असतील आणि दुर्देवाने प्रवाशाचा मृत्यू झाला तर तिथे दफनविधी करण्याचा खर्चही अधिक असतो तसेच आपल्या देशामध्ये शव घेऊन येण्यासाठी जास्त खर्च येतो

★ अशा प्रवास करताना प्रवाशांना आणि अडचणी येतात आणि या कारणाने प्रवास हा तणावपूर्ण आणि त्रासदायक ठरू शकतो परंतु असे न होण्यासाठी तणावमुक्त राहून निर्भयपणे आनंद उपभोगण्यासाठी आपण प्रवास करताना काय केले पाहिजे? आई आपण विचार करायला पाहिजे

विमा आहे चांगले उत्तर आहे :

वरील सर्व प्रवाशांच्या प्रवासातील काही समस्यांना यात्रा विमा हे चांगलंच उत्तर आहे . आपण प्रवास करताना जर त्या कालावधीसाठी यात्रा विमा काढला असेल, तर नक्कीच आपल्याला प्रवासाची काळजी करण्याची गरज उरणार नाही. काही नुकसान झाले तर मग जोखीम विमा कंपनीत घेऊन, आपल्याला आपल्या अडचणी च्या काळात आपल्याला आर्थिक आधार देऊ शकते

यात्रा विमा म्हणजे नक्की काय ? What is travel insurance?

“ज्या कालावधीसाठी तुम्ही यात्रा/प्रवास करीत असतो व ज्या ठिकाणांमध्ये आपण काही दिवस पर्यन्त राहणार असतो मग बाहेरच्या देशात असो किंवा तो आपला देश असो कोणतेही शारीरिक पैशाचे आर्थिक नुकसान झाले असेल तर त्याची जबाबदारी ही पूर्णपणे विमा कंपनी घेते व त्याचा प्रवासादरम्यान काढलेल्या आला यात्रा विमा असे म्हणतात.”

आंतरराष्ट्रीय यात्रा विमा ( international travel insurance in marathi ) बद्दल थोडक्यात :

जर काही कारणास्तव आपण आपल्या देशाच्या बाहेर म्हणजेच परदेशामध्ये काही दिवसा साठी किंवा महिन्यांसाठी प्रवास करणार असू तर आपले स्वतःचे सामान व स्वतःच्या जीवितास नुकसान होऊ नये म्हणून आपण आंतरराष्ट्रीय विमा काढू शकतो त्याद्वारे जर आपले काही नुकसान झाले तर ती जोखीम आपली विमा कंपनी उचलते आणि आपल्या या नुकसान भरपाईची पैशाचे रूपात मदत करते

आंतरराष्ट्रीय यात्रा विमा ( international travel insurance in marathi ) आणि त्याची गरज :

 • आपण जर आपल्या देशांमध्ये प्रवास करत असो तर तेवढा तणाव आपल्यावर नसतो पण जर दुसऱ्या देशांमध्ये आपण यात्रा करत असू तर मात्र अनेक कारणाने आपल्याला तणाव येऊ शकतो
 • आपल्याला आपल्या देशातील भाषा राहणीमान यांची पुरेशी माहिती असते पण दुसर्या देशातील भाषा ते तेथील संस्कृती माणसे राहणीमान याची काहीही माहिती नसते अशावेळी जर आपण अडचणीत असू तर आंतरराष्ट्रीय यात्रा विम्याची नक्कीच आपल्याला मदत होऊ शकते
 • अपघात झाल्यास किंवा चोरी झाल्यास आपल्या मौल्यवान वस्तू हरवल्यास आपल्याला काय करावे हा प्रश्नच पडतो पण त्यावेळी विमा कंपनी हर प्रकारे आपले मदत करण्यास तयार असते
 • दुसऱ्या देशात प्रवास करताना अनेक अडचणी येऊ शकतात आपल्या ओळखीचे नात्यागोत्याचे तेथे कोणीच नसते अशा वेळी आपण जर अंतराष्ट्रीय विमा काढला असेल तर विमा कंपनी आपल्याला उपयोगी येत yagshdhhd आंतरराष्ट्रीय याचा विमा योजना आपल्यासाठी:
 1. जर आपल्याला दुसऱ्या देशात अनेक वेळा प्रवास करावयाचा असेल तर तुम्ही योजनेतील वेगवेगळ्या  प्रकारचा आंतरराष्ट्रीय यात्रा विमा काढू शकता
 2. तुम्हाला एका वेळेसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल तर ही विमाधारकाला त्याचा विमा संरक्षित करता येतो
 3.   एखाद्या विमाधारक व्यक्तीचा प्रवासात दुसऱ्या देशामध्ये प्रवास करते वेळी अपघात होऊन जखमी  झाल्यास तो रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी घाबरतो कारण परदेशातील महागडी वैद्यकीय सुविधा पण आंतरराष्ट्रीय यात्रा विमा मुळे त्याला आर्थिक सहाय्य मिळू शकते
 4. अमेरिका  युरोप मध्ये दातावरचा वैद्यकीय खर्चही अधिक असतो अशा वेळी दाता साठी खास विम्यामध्ये आर्थिक नुकसान भरपाई ची सोय केली जाते
 5. काही कारणास्तव विमाधारकाच्या चा पासपोर्ट हरवला तर त्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते त्यावेळी सुद्धा विमा कंपनी त्याचा डुप्लिकेट पासपोर्ट करून देण्याची जबाबदारी घेते
 6. जर विमाधारकाच्या प्रवासादरम्यान अपघातात किंवा काही आजारांमध्ये मृत्यू झाला किंवा अपघातामध्ये तो जबर जखमी झाला तर त्या रुग्णालयातील आर्थिक नुकसान भरपाई सुद्धा विमा कंपनी देते
 7. जर विमाधारक यात्रेत असताना परदेशातच त्याला कोणता आजार किंवा अपघातामुळे सातदिवसापर्यंत रुग्णालयात भरती व्हावे लागले तर त्याच्या नातेवाईकाना भेटायला विदेशात येण्या-जाण्याचा खर्च ही विमा कंपनी आपल्या विमाधारकाला देते
 8. आकस्मिक वैद्यकीय मदतीसाठी जसे काही आजार( covid-19) किंवा अपघातात जखमी किंवा मृत्यू झाला असल्यास विमाधारकाला रुग्णालयाचा खर्च तर मिळतोच परंतु त्यांच्या नातेवाईकांचा तिकिटाचा ही खर्च मिळतो
 9. रुग्णालयात नेण्यासाठी लागणाऱ्या रुग्णवाहिकेचा खर्च
 10.   परदेशात प्रवासादरम्यान मृत्यू झाल्यास तेथे दफनविधी चा खर्च
 11.   तसेच जर त्याच्या स्वतः च्या देशांमध्ये नेण्याचा खर्च असेल तर तोही विमा कंपनी देते
 12. प्रवासाला निघताना किंवा प्रवासाहून येताना विमान बसते वेळी जर काही अत्यावश्यक कारणामुळे त्याच्या विलंबामुळे विमान पकडू शकला नाही किंवा तीन तासाच्या वर विमानात सुटण्यास उशीर झाला तरी विमा कंपनी त्याची नुकसानभरपाई करते

covid-19 व आंतरराष्ट्रीय विमा योजना:

 एखाद्या व्यक्तीने विदेशात प्रवास करताना आंतरराष्ट्रीय यात्रा विमा योजना काढला असेल व दुसऱ्या देशात गेल्यावर त्याला कोरोना झाला असेल तर तेथील रुग्णालयातील खर्च अधिक असतो  तोही खर्च या विमा योजनेत ग्राह्य धरला जातो

 • आंतरराष्ट्रीय यात्रा विमा योजना काढून झाल्यावर प्रवास करण्याआधी जर रुग्णालयात भरती झाल्यामुळे प्रवासात जाणे शक्य झाले नाही तर इतर तिकिटे व अन्य खर्चाची नुकसान भरपाई विमा कंपनीद्वारे दिली जाते.
 • आंतरराष्ट्रीय यात्रा विमा योजने कोण कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जातात:
 • प्रवासाचं नियोजन झाल्यानंतर काही कारणास्तव प्रवास पुढे ढकलावा लागला तर प्रवास करण्यापूर्वी काढलेल्या तिकिटाचा खर्च हॉटेल किंवा नुकसान भरपाई विमा धारकाला विमा कंपनी द्वारा मिळू शकते.
 • प्रवास काही कारणाने (covid-19) रद्द करावा लागला तर त्याचा खर्च ही मिळतो एखाद्या विमाधारक प्रवाशाच्या कुटुंबातील  सदस्याला covid-19 सारख्या आजारामुळे रुग्णालयात भरती करावे लागले तर त्यावेळी त्याला प्रवास रद्द करावा लागतो मग रद्द करताना येणारा सर्व  खर्च त्याची विमा कंपनी उचलते.
 • विमान उडण्यास जर काही कारणांमुळे विलंब झाला किंवा विमाधारका त्या उशिरा येण्यामुळे त्याचे विमान चुकले काही वेळेसाठी  उशिरा सोडण्यात आले तरीही त्याच्या या नुकसानीची भरपाई ही विमा कंपनी घेते.
 • आकस्मित कारणाने रूग्णालयात दाखल झाल्यास आपत्कालीन भत्ता म्हणून दररोजची रोख रक्कम ही विमा कंपनीकडून मिळू शकते.

अशा प्रकारचे अनेक फायदे व सुविधा आपल्याला विमा योजनेद्वारे मिळू शकतात

●Covid-19 आणि आंतरराष्ट्रीय विमा :

जर एखाद्या व्यक्तीने विदेशात प्रवास करताना आंतरराष्ट्रीय यात्रा विमा योजना काढली असेल व दुसऱ्या देशात गेल्यावर त्या विमाधारकाला covid-19 सारखा आजार झाला असेल तर परदेशातील रुग्णालयातील खर्च अधिक असतो तोही या विमा योजनेत ग्राह्य धरला जातो आणि त्या विमाधारकाला त्याची पैशाच्या रूपात नुकसान भरपाई मिळते

● आंतरराष्ट्रीय यात्रा विमा योजना काढून झाल्यावर प्रवास करण्याआधीच जर रुग्णालयात विमाधारकाला भरती राहावे लागले असेल तर प्रवासात जाणे शक्य झाले नाही तर तिकिटे व अन्य झालेल्या खर्चाची नुकसान भरपाई हे विमा कंपनी द्वारा मिळून जाते

नक्की वाचा : Marine Insurance In Marathi

आंतरराष्ट्रीय यात्रा विमा योजना ( international travel insurance in marathi )आणि समाविष्ट केलेल्या गोष्टी आपण पुढीलप्रमाणे पाहू:

1 प्रवास पुढे ढकलणे:

 काही कारणास्तव प्रवासाची पूर्ण तयारी केली केली असली तरी काही आकस्मिक कारणे घडतात जसे विमाधारका चा अपघात होणे किंवा covid-19 सारखा आजार होणे आणि त्यामुळे त्यांचा प्रवास पुढे ढकलला जातो जर प्रवास  करण्यापूर्वी काढलेल्या तिकिटाचा खर्च किंवा आरक्षित हॉटेल किंवा अन्य खर्च यांचा याची नुकसान भरपाई विमा धारकाला विमा कंपनीकडून मिळू शकते

2 जर यात्रा प्रवास विमा योजनेत भाग घेतलेल्या विमाधारकाने प्रवास काही कारणाने रद्द केलाच तर त्याचा खर्च विमा कंपनी उचलते

उदाहरणार्थ – प्रवाशाच्या कुटुंबातील सदस्याला आकस्मिक रितीन covid-19 असे निदान झाले तर आणि त्याला रुग्णालयात भरती करावे लागले अशा वेळी विमाधारक आपले जाणे रद्द करतो पण होणारा खर्च जो आहे तो विमाधारकाच्या ची कंपनी उचलते त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होत नाही

3 परदेश प्रवास करतेवेळी विमाधारकाच्या काही अत्यावश्यक कारणामुळे विलंब होऊन विमान जर चुकले तर त्याचाही जिम्मा ही विमा कंपनी उचलते

4 आकस्मिकपणे सर प्रवासात त्याला हॉटेलमध्ये राहावे लागले त्याचे कारण पाहता विमा कंपनी आर्थिक जोखीम तिथेही उचलते

5 अचानक अत्यावश्यक कारणामुळे विमाधारकाला जर रुग्णालयात दाखल व्हावं लागलं तर आपत्कालीन भत्ता म्हणून तर रोजची रोख रक्कम विमा कंपनीद्वारे त्याला मिळू लागते.

Reed Also : स्टार्टअप व्यवसाय यशस्वी न होण्याची 3 मोठी कारणे 

कोणत्या गोष्टींचा समावेश हा या विमा योजनेत होत नाही:

1 इतर विमा योजने प्रमाणे या विमा योजने सुद्धा काही नियम अटी आहेत ते वाचूनच विमा योजना निवडावी किंवा त्यावर स्वाक्षरी करावी आहे

2 काही ठराविक आजार विमाधारकाला असतील मग ते शारीरिक असोत वा मानसिक सर्वच योजनेत समाविष्ट होत नाहीत

3 काही आजार हे या योजनेत अंतर्भूत केले जात नाहीत व विमाधारकाने ही योजना घेताना जर अशा जुन्या आजाराची कल्पना कंपनीला दिली नसेल तर या विमा कंपनी त्याला त्याच्या आजारपणा मध्ये नुकसान भरपाई देता देतं नाही

4  जर विमाधारकाने काही कारणाने आत्महत्या केली तरीही नुकसान भरपाई त्याला मिळत नाही

5  चिंता ,तणावामुळे ,मानसिक अस्वास्थ्यामुळे जर काही आजार झाले असतील तर त्याचाही समावेश या विमा योजनेत होत नाही

6 अमली पदार्थांचे सेवन किंवा अन्य कोणतेही व्यक्तीने व्यसन केल्यावर जर त्याला अपघात झाला किंवा तो जखमी झाला तर त्या विमाधारकाला विमा कंपनी द्वारा कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही

 • अशाप्रकारे जर प्रत्येक माणसाने समजून -उमजून आपल्या आवश्यकतेनुसार एखादा विमा काढला तर त्याला त्याचा फायदाच होतो
 •  आंतरराष्ट्रीय यात्रा विमा या योजनेमुळे परदेशात जाणाऱ्या व्यक्तींचे मग ते कोणतेही कारणामुळे असो आर्थिक नुकसान भरूनच निघते
 • लांबच्या प्रवासात अनोळखी देशात अपघात, चोरी झाली तर आपल्याला कोणी वाली नसते आणि परक्या देशात पैशाची मदत कोण करणार ?
 • जर आपण आंतरराष्ट्रीय यात्रा विमा काढला असेल आपल्याला झालेल्या नुकसानाची भरपाई ही मिळते
 • आर्थिक नुकसाना ची भीतीही उरत नाही ही व आपला प्रवास आपण निश्चिंतपणे करू शकतो
 •  पण त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या अशा योजना असतात त्या तपासून आणि पडताळून नक्कीच पहावे नियम व एकदा माहिती झाल्या या की
 •  आपण ज्या कारणासाठी प्रवास करत असतो ते साध्य निर्भयपणे करू शकतो

Leave a Comment