फोटोग्राफी विमा | Insurance For Photographers In Marathi 2022

फोटोग्राफी विमा | Insurance For Photographers In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण फोटोग्राफी विमा म्हणजेच insurance for photographers in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

 Insurance For Photographers In Marathi
Insurance For Photographers

सौंदर्य आणि अभिरुची |Beauty and tastes :

  • प्रत्येक माणसाला हे सौंदर्य आकर्षून घेत असते
  • अर्थात मग ते कोणतेही सौंदर्य असो निसर्ग सौंदर्य असो किंवा माणसातील सौंदर्य असो
  • तसेच ऋतु बदलामुळे वातावरणात पसरलेले मनोहर अशा सौंदर्याचा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आस्वाद घ्यायला आवडते
  • प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे नेहमीच वाटत असते
  • व ते त्यासाठी प्रयत्न करत असतात
  • कोणी मेकअप करून, छान- छान रंगबिरंगी कपडे परिधान करून, किंवा सजून-धजून आपले व्यक्तिमत्व आणखी कसे सुंदर होईल? हे पाहत असतात
  • वयाप्रमाणे सुंदरताही कोमेजून जाते आणि वार्धक्य जवळ येऊ लागते
  • तेव्हा आधी आपण किती सुंदर दिसत होतो ते पाहण्याची इच्छा ही होते
  • निसर्गात नेहमीच ऋतू प्रमाणे बदल होत असतात
  • ऋतूप्रमाणे फुलणारी फुले, बहरणारी झाडे, वृक्ष ,वाहणारे झरे ,हिरवेगार डोंगर हे तर सुंदर वाटतातच
  • पण ज्यावेळी पानझडी चामौसम येतो आणि झाडांची पाने वाळून गळू लागतात
  • तरीही त्या झाडांचा रिकामा बुंधा ही सुंदर दिसतो
  • पण हे सर्व कायम तर राहात नाही ना ?
  • ऋतुचक्र बदलतच राहतं
  • मग आपण हे सर्व कसं बंदिस्त करून ठेवायचं ?
  • जेव्हा -केव्हा आपल्याला हि सुंदरता पहावी वाटत असेल, तर आपण ते पाहू शकतो का?
  • अगदी जादूची छडी हवी नाही का त्यासाठी??

फोटोग्राफी एक जादूची छडी:

  • फोटोग्राफीच्या शोधामुळे आपल्याला कितीतरी सुंदर आनंददायी क्षण हे कॅमेऱ्यात बंदिस्त करता येतात
  • व आपल्या प्रिय व्यक्तींना फोटोत पाहून मन काही क्षणासाठी तरी पुन्हा जुन्या आठवणी रमवू शकतो
  • फोटोच्या सहाय्याने आपण आपल्या आठवणी स्मरत असतो
  • व त्या नेहमी उजळत राहत असतो
  • त्यामुळे एखादी व्यक्ती लांब गेली तरीही आपल्या जवळच आहे असे आपल्याला भासत असते

फोटोग्राफी विमा ची आवश्यकता | requirements of insurance for photographers in marathi

  • हो खरंच फोटोग्राफी इन्शुरन्स ची आवश्यकता आहे का?
  • पण जे फोटोग्राफर असतात त्यांना याचे महत्त्व खरेच समजू शकते
  • कारण ज्या वेळी एखाद्या सामान्य दिसणार्‍या व्यक्तीचा फोटो इतका सुंदर दिसतो कि लोक तोंडात बोटे घालतात
    कारण फोटोग्राफी ! फोटोग्राफरचा हातातले कसब असते
  • आणि त्यामुळे तो दगडाला ही अतिशय सुंदर बनवू शकतो
  • आणि या साठी महत्त्वाचे काय आहे ?

1 तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोटोग्राफरला हवी असलेली सुंदर व कलात्मक दृष्टी
2 चांगला कॅमेरा
3 किंवा फोटो काढण्यासाठी वापरावी लागणारी आधुनिक साधने
अर्थात ही सर्व साधने खूप महाग असतात

फोटोग्राफी ची साधने व त्याचे महत्त्व व मूल्य:

  • फोटोग्राफी करताना फोटोग्राफर्सना चांगल्या ठिकाणी शिक्षण घ्यावे लागते
  • तसेच वेगवेगळ्या लेन्स चा कॅमेरा पण जवळ ठेवावा लागतो
  • स्वतःचा एक फोटो स्टुडिओ असला तर उत्तमच
  • त्यात मेकअपचे साधने( आरसा, विविध फॅन्सी कपडे वगैरे…) असतेच
  • तसेच वेगवेगळे भिंतीवर निसर्ग चित्र चिकटवलेले असते किंवा काढलेले असतात
  • फोटोत एक नवीन दृश्य दाखवण्यासाठी डेकोरेशन साहित्य हे हवे असते
  • कॉम्प्युटर हा तर आता गरजेचा असतो
  • वेगवेगळ्या विद्युत रोषणाई
  • व रंगीबिरंगी साजेशा फोटो फ्रेम
  • फोटो रोल्स
  • फोटो धुण्यासाठी लागणारी आधुनिक साधने व उपकरणे *अशा कितीतरी गोष्टी या फोटोग्राफी करताना फोटोग्राफर्सना महत्त्वाच्या असतात
  • आणि त्यांचे मूल्यही अधिक असते
  • कॅमेरा तर लाखाच्या घरात असतो
  • मग असा लाखोंचा व्यापार व साधने यांचे संरक्षण करण्याचा विचार तर करावा लागणारच आहे ना??

● फोटोग्राफी मधून व्यवसायाकडे:

★ फोटोग्राफी ही एक हौस:

  • म्हणून कुणी करत किंवा पुढे त्याचाच व्यवसायामध्ये रूपांतर होऊ शकतं
  • जसं जंगली प्राणी किंवा जंगलातील पक्षी यांचे चित्रीकरण करून
  • त्याची पुस्तके लिहिणे
  • डॉक्युमेंट्री बनवणे
  • किंवा त्या चित्राना स्पर्धेमध्ये पाठवणे
  • चांगली चित्रे हौशी लोक किंवा कारखानदार व्यावसायिक तसेच काही संस्थाही विकत घेत असतात

★ पोर्ट्रेट तयार करणे:

  • पोर्ट्रेट तयार करणारे ही काही फोटोग्राफर्स असतात
  • काही सुप्रसिध्द व्यक्तींचे पोर्ट्रेट काढले जाते
  • ते पूर्वी हातानेही काढायचे
  • पण आता कॅमेराने ही तंतोतंत तीच फिलिंग येते

★ लग्नाची फोटोग्राफी:

  • हा तर सरळ -सरळ भरपूर पैसा देणारा व्यवसाय आहे
  • कारण मध्यमवर्गीय लोक असो वा श्रीमंत सर्वांना फोटो काढायला आवडते
  • व सर्व आठवणी जपून ठेवायलाही सर्व जण तत्पर असतात
  • त्यामुळे साधारण मध्यमवर्गीय घर असले तरीही फोटो ग्राफी करण्याकडे त्यांची अधिक रुची असते
  • आणि त्यातून पैसाही भरपूर मिळत असतोच
  • कारण लग्नाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात
  • पण त्या सर्वांना सांभाळायला आवडतात
  • म्हणून सर्वजण मिळून नवीन विधि करत असतात
  • व साखरपुडा ,मेहंदी, हळद, लग्न सर्वांनाच फोटोग्राफी ही लागते

★ खेळासाठी फोटोग्राफी :

  • राष्ट्रीय खेळ म्हणजेच देशांतर्गत खेळ किंवा आंतरराष्ट्रीय खेळ प्रकार चालू असताना फोटोग्राफर एक योग्य भूमिका निभावतो
  • ते म्हणजे खेळाडूंचे सर्व बारीक सारीक गोष्टी फोटोग्राफर तपशील वार कॅमेराने टिपत असतो
  • त्यामुळे शून्य प्रसिद्ध असलेला खेळाडू कधी जग प्रसिद्ध होतो
    हे त्याचे त्यालाही समजत नाही
  • आणि हे सर्व त्याच्या उत्तम फोटो मुळेच होऊ शकते

★ इव्हेंट फोटोग्राफी:

  • आज-काल धावपळीच्या भाऊगर्दीत सर्वत्र ताण च ताण भरून असलेला दिसतो
  • त्यातून सुटका करण्यासाठी आजची पिढी छोट्यात-छोट्या व मोठ्यात मोठा आनंद हा आपल्या जीवनात इव्हेंट द्वारे साजरा करू इच्छितात
  • मग त्यासाठी फोटोग्राफी ही आलीच

★ सर्वात तेजीत चालणारे फोटोग्राफरचे प्रकार म्हणजे ★पासपोर्ट साईज फोटो काढणे:

  • कारण कोणीही लहान मुले असोत किंवा त्यांचे प्रत्येक महिन्याचे, वर्षातील फोटो असोत
  • तसेच विद्यालय कॉलेज मध्ये पदार्पण करणारी मुले असोत
  • पासपोर्ट साठी
  • इंटरव्यू साठी
  • बायोडाटा साठी
  • सर्वत्र बँकेमध्ये खाते ओपन करण्यासाठी सुद्धा आपल्याला पासपोर्ट साईज फोटो लागतात
  • कुठल्याही फॉर्म भरायचा झालास त्याला पासपोर्ट साईज फोटो हे लागतातच.

फोटोग्राफर साठी काही विमा योजना ( insurance for photographers in marathi )

1 व्यवसायिक विमा योजना:

  • या योजनेत स्वतःचा फोटोग्राफीचा व्यवसाय असणाऱ्या लोकांसाठी फोटोग्राफीला संरक्षण देण्याचे काम ही विमा योजना करत असते
  • तर फोटो स्टुडिओ मध्ये आग लागणे ,चोरी होणे अशा प्रकारचे नुकसान झाले असेल तर त्याच्या नुकसानीची भरपाई ही विमा कंपनी आपल्या विमा योजना द्वारे करत असते
  • त्यामुळे विमाधारक निश्चिंत असतो
  • त्यात त्याची भौतिक मालमत्ता तसेच मनुष्य हानी किंवा कामगारांचे जखमी होणे
  • या सर्व गोष्टींना गृहीत धरून विमा योजना आपले नुकसानभरपाई देत असते

2 व्यवसाय मालमत्ता विमा:

  • या विमा योजनेअंतर्गत फोटोग्राफरची सर्व उपकरणे साधने अंतर्भूत असतात
  • त्याचे काही नुकसान झाले तर विमा कंपनी त्यांच्या नुकसानीची भरपाई करण्याचे मान्य करते
  • उदाहरणार्थ : कॅमेरा लेन्स वगैरे यांची किंमत काही लाखांवर असते
  • अशा अनेक प्रकारच्या फोटोग्राफीचा व्यवसाय करणाऱ्या फोटोग्राफरसाठी विमा योजना आहेत

फोटोग्राफी व्यवसाय विमा:

★ या योजनेत विमा कंपनी कोणत्या गोष्टींना संरक्षण करते?

  1. फोटो स्टुडिओ मध्ये काही अघटित घटना घडल्यामुळे जर अपघात झाल्यास तेथील कर्मचारी वर्ग त्यात जखमी झाला असेल तर त्याचे औषध पाणी वगैरेचा खर्च विमा कंपनी देऊ करते
  2. फोटो स्टुडिओ च्या मालमत्तेची नैसर्गिक किंवा आकस्मिक दुर्घटनेत नासधुस झाल्यास विमा कंपनी त्याला मदत करते
  3. काही वेळा फोटोग्राफी जरी खूप सुंदर व मनोवेधक आठवणी साठवणूक करण्याची कला असली तरीही त्यात दोघेही खूप धोकेही असतात
  4. तसे काही कारणाने चिडून ग्राहकांनी जर स्टुडिओची तोडमोड केली
  5. किंवा कॅमेरा वर हल्ला केला
  6. तर या सर्व गोष्टींचे नुकसान भरपाई विमा कंपनी करते
  7. एखादेवेळेस मोठी कामाची ऑर्डर मिळाली असेल पण सर्व फोटोग्राफीचे किमती सामान आणून फोटो काढण्यास सज्ज असताना फोटोग्राफरच्या साधनात कॅमेरा मध्ये काही गडबड झाली किंवा खराबी आली तर सर्व मेहनत पाण्यात जाऊ शकते आणि खूप नुकसान होऊ शकते
  8. पण हे सर्व विमा कंपनीच्या मदतीने पूर्ववत होऊ शकते
  9. एखाद्या ग्राहकाचा फोटो स्टुडिओ च्या नियोजन ना मुळे जर अपघात झाला किंवा तो जखमी झाला तर त्याचा खर्चही विमा कंपनी आपल्या तर्फे होऊ शकतो

कॅमेरा चाही विमा:

  • फोटोग्राफी मध्ये सर्वात महत्त्वाचा हा फोटोग्राफरच्या कॅमेराच असतो आणि त्या बाबतीत खूप धोकाही असतो जसे की-
    1 कॅमेरा खूप किमती असतो
    2 पण फोटो काढण्यासाठी तो अतिशय आवश्यक असल्यामुळे फोटोग्राफर साठी मौल्यवान ही असतो
    3 कॅमेरा मध्ये त्याचे अनेक फोटो किंवा डॉक्युमेंटरी व्हिडिओज सेव्ह केलेले असतात ते चोरी होण्याची ही खूप शक्यता असते
    4 कॅमेरा नाजूक असल्याकारणाने तो धक्का लागून पडला तर फोटोग्राफरचे खूप मोठे व्यावसायिक व आर्थिक नुकसान होऊ शकते

कॅमेराला विम्याचे संरक्षण:

  • जर कॅमेरा चोरीस गेला किंवा अन्य कारणाने त्याचे नुकसान झाले तर विमा कंपनी त्याला काही रक्कम देऊ करते
  • एक तर दुसरा कॅमेराची किंमत मिळते
  • किंवा तो दुरुस्त करण्यासाठीचा खर्च मिळू शकतो
  • तुमच्यासमोर ऑप्शन हे ठेवलेले असतात
  • त्यानुसार रक्कम दिली जाते

विमा कंपनीकडून काही लाभ:

  1. विमा द्वारे आपण छायाचित्रणासाठी संरक्षण प्राप्त करून नुकसान झाले असले तरीही मनाला समाधान मिळवून देऊ शकतो
  2. कारण हरवलेल्या किंवा गमावलेल्या गोष्टी बद्दल आपल्याला विमा कंपनी काही ठराविक पैसे देऊ करते
  3. या विमा योजनेत महत्त्वाचे साधन हे कॅमेराच असल्यामुळे त्याचा मुख्य उपयोग हा छायाचित्रण करणे ,व्हिडिओ बनवणे हेच असते
  4. पण आग लागणे ,चोरी होणे, चुकीमुळे तो पडून फुटणे अशा गोष्टींमुळे फोटोग्राफरचे खूप मोठे नुकसान होऊ शकते
  5. पण विमा योजना त्याला कॅमेराच्या बदल्यात नवीन कॅमेरा घेण्यासाठी पैसे देऊ करते
  6. तसे नको असल्यास त्याच्या दुरुस्तीचा खर्चही देते
  7. काही योजना द्वारा आपल्याला काम जेवढ्या वेळेसाठी करावयाचे आहे ते पाहून विमा मिळवता येतो
  8. समजा दोन तासाचे जर आपले काम असेल तर त्या वेळापुरते आपण विमा संरक्षण मिळवू शकतो
  9. दूरगामी प्रीमियम भरण्याचा खर्च करत बसण्याची गरज नसते
  10. आता नवीन येणाऱ्या विमा योजनेमध्ये त्यात वेगवेगळे पॅकेजेस ठरवलेले असतात
  11. त्यात तुमच्या गरजा व आवश्यकता नुसार तुम्ही ते निवडू शकतात
  12. पॅकेज निवडून तुमच्या फोटोग्राफीसाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्यांना संरक्षित करू शकता
  13. आजकाल विमायोजना शोधण्यासाठी दारोदारी जाणेही गरजेचे नाही
  14. आपल्या फोन मधील इंटरनेटच्या साह्याने तुम्ही सहज दहा ते बारा मिनिटात विमा योजना निवडू शकता
  15. ती विमा योजना स्वतःसाठी योग्य आहे का ? ते पडताळून पाहू शकता
  16. तसेच नुकसान झाल्यास विमा दावाही मोबाईलच्या साह्याने त्वरित करू शकता
  17. त्यासाठी विमा कंपनीच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासत नाही

● विमा कंपनी अशावेळी मदत करत नाही
★ म्हणजे संरक्षण देत नाही –
★त्या कोण -कोणत्या गोष्टी आहेत ?
ते आपण पाहूयात –

★विमा योजना ही विमाधारकाने घेतली म्हणून सर्व काही नुकसानाची भरपाई कंपनी उचलेल असे नाही
★ त्या कंपनीने आपले नियम, अटी सुरुवातीलाच स्पष्ट रूपात ठरवलेले असतात
★ कधीतरी ते बारीक प्रिंट मुळेच वाचण्यासाठी विमाधारक कंटाळा करतात
★ परंतु आपण ते वाचून परखून विमा योजना स्वीकारायला हवी
★ स्वतःच्या निष्काळजीपणामुळे जर फोटोग्राफी करताना अपघात झाला असेल
★किंवा फोटोग्राफीच्या साधनांची मोडतोड झाली असेल
★आणि आपण विमा दावा करायला गेला असाल तर त्यालाही आर्थिक संरक्षण हे मिळत नाहीत
★ प्रत्येक विमा कंपनीची विमा योजना वेगळी असू शकते तिचे वेगळे नियम असू शकतात
★ त्यामुळे काही अपघात किंवा नुकसान हे प्रत्येक विमा योजनेत अंतर्भूत करता येत नाही
★अशा कारणाने विमाधारकाने काळजीपूर्वक विमा योजनेची माहिती पत्रक वाचून ती योजना घ्यावी का नोंद घ्यावी
★कोणती विमा योजना घ्यावयाची याचा विचार आधीच करावा

विमा कंपनी फोटोग्राफर्सना ( insurance for photographers in marathi ) त्यांच्या नुकसानाची भरपाई कोणत्या मापदंडाने करत असते?

1 फोटोग्राफरचे कोणते नुकसान झाले आहे?
ते विमा कंपनी पाहते
2 व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ते सत्य आहे का ?
याचा पडताळा घेत असते
3 कोणत्या साधनांचे नुकसान झाले आहे ?
4 व ते कशा प्रकारचे आहे ?
आणि कशामुळे झाले आहे? याचीही ती नोंद ठेवत असते
5 कॅमेरा ,फोटो स्टुडिओ किंवा अन्य नुकसानीची कल्पना घेऊन त्याची मूळ किंमत लक्षात घेटाळी जाते
6 त्याप्रमाणे विमाधारकाने विमा दावा केल्यास त्याची विमा कंपनी नुकसान भरपाई देते
7 तुमचे फोटोग्राफी करताना मिळणारे उत्पन्न ही विचारात घेतले जाते
8 तसेच व्यवसायाची जागा याचीही पाहणी केली जाते
9 फोटोग्राफर्स कडे किती सहकारी कामाला आहेत ?
10 किंवा त्यांचे मदतनीस किती ?
यांची विमा कंपनी नुकसान
भरपाई देण्याआधी माहिती घेत असते.

नक्की वाचा : Family Travel Insurance In Marathi

★ अशाप्रकारे विमा योजना ही प्रत्येकाला प्रत्येक व्यवसायात ही मदत करतच असते
★व फोटोग्राफी सारख्या हौशी कलाकारांना ती मदत करते
★ पण या कलेचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकानाही ती मोलाची मदत करते
★ नुकसान झाले तरीसुद्धा आर्थिक मदत देऊ करून
★ पुन्हा कोलमडलेल्या त्या व्यावसायिकाला परत स्वतःच्या पायावर उभा राहण्यास विमा कंपनी ची मदत होते
★ त्यामुळे प्रत्येक फोटोग्राफर ने आपल्याला आवश्यक अशी विमा योजना नक्की निवडावी

Tags : Insurance For Photographers फोटोग्राफी विमा , Insurance For Photographers In Marathi

1 thought on “फोटोग्राफी विमा | Insurance For Photographers In Marathi 2022”

Leave a Comment