विमा एजंट | Insurance Agent In Marathi 2022

विमा एजंट | Insurance Agent In Marathi | what is insurance inagent in marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण विमा एजंट म्हणजेच insurance agent in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Insurance Agent In Marathi

प्रत्येक माणूस आपल्या जीवनात हा संघर्ष करत असतो. मग, कारणे ही प्रत्येकाची अनेक असू शकतात

पण ,पोटापाण्यासाठी बहुतेकांना खूप अडचणींना पार करावे लागते. ते उदरनिर्वाह करण्याच्या या लढाईत त्यांना नोकरी व्यापार- धंदे यांची साथ घ्यावी लागते.

पण ,खूपदा काही नैसर्गिक कारणाने किंवा मानवनिर्मित कृतीमुळे त्यांचे आर्थिक, शारीरिक नुकसान होऊ शकते व त्यासाठी मनुष्य स्वतःच्या नुकसानीच्या भरपाईसाठी विमा योजनेची मदत घेत असतो.

◆ विमा म्हणजे काय ? | what is insurance in marathi

◆ तो कोणी घ्यावा व का?

◆ विमा योजना व एजंट ( insurance agent in marathi ) :

★विमा म्हणजे काय?

 हे सर्वप्रथम आपण पाहू.

 विमा म्हणजे एक संरक्षण कवच!

 अर्थात तुम्ही ते कशासाठी वापरतात ते तुमच्यावर अवलंबून आहे .

तुमच्या स्वतःच्या मृत्यूमुळे किंवा तुमच्या घर ,वस्तू ,वाहन, मालमत्तेचे एखाद्या कारणाने नुकसान झाले असेल ,तर ते परत सोसून स्वतःला पूर्वस्थितीत आणण्यासाठी विमाधारकाला एका विमा कंपनी ची आवश्यकता असते.

 ती विमा कंपनी त्या नुकसानीची आर्थिक भरपाई देते त्यामुळे तो निश्चिंतपणे स्वतःचा धंदा व्यवसाय करू शकतो व स्वतःच्या पायावर पुन्हा उभा राहू शकतो

तो कोणी घ्यावा व का ?

प्रत्येक प्रकारच्या विमा योजनेची सोय ही विमा कंपनीने केलेली आहे .

आजच्या धावपळीच्या युगात कधी अपघातात आकस्मिक मृत्यू होईल हे सांगता येत नाही!

 अशा वेळी विमाधारकाने ‘जीवन विमा ‘काढल्यास स्वतःचा अपघात झाल्यास औषधोपचार खर्च ही मिळू शकतो .

अशा अनेक विमा योजना आहेत.त्या आपण काढू शकतो वाहन विमा, गृह विमा ,जीवन विमा, व्यवसायासाठी विमा इतकेच काय ? पण मृत्यूनंतर

अंत्यविधीच्या खर्चासाठी ही ‘दफन विमा’ योजना केली गेली आहे.

 त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनी आपल्या महत्त्वाच्या किंवा त्याच्या साठी मौल्यवान गोष्टी किंवा व्यक्तींचा विमा हा काढलाच पाहिजे

विमा योजना व एजंट ( insurance agent in marathi ) :

 वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजना कोणत्या आहेत?

 त्याचा आपल्याला काय उपयोग आहे?

 आपल्याला भविष्यातील अडथळे नुकसान व त्याची विमा कंपनी कशा प्रकारे भरपाई देऊन विमाधारकाला मदत करू शकते?

 ते सर्व समजावून सांगण्याचे काम हे विमा योजना एजंट करत असतो.

आता आपण मुख्य आपल्या विषयाकडे वळू या म्हणजे-

  विमा योजना एजंट म्हणजे नेमका कोण ? | who is insurance agent in marathi

हे आपण पाहिले पण –

◆विमा एजंट ची नेमकी भूमिका काय?

◆ त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या?

 याचाही विचार आपण करू-

★ विमा एजंटची भूमिका:

 विमाधारकाला विमा योजना म्हणजे नेमके काय ?

ते समजावून सांगण्याचे काम हे एजंट करत असतो .तसेच विमा एजंट हा विमाधारकाला नेमके काय आवश्यक आहे ?

तसेच त्यांच्या गरजांची पूर्तता कोणती विमा कंपनी करेल? याची सविस्तर माहिती देत असतो.

 तसेच विमाधारकाला या योजनेतून किती संरक्षण मिळेल? किंवा त्याला नियमित किती हप्ता भरावा लागेल?

 तसेच कोणत्या गोष्टीसाठी कोणता विमा योग्य आहे ?

ते सविस्तर सांगून तो विमाधारकाला खरेदी करायला लावतो.

 विमा एजंट एखाद्या विमा कंपनीकडे विमा एजंट म्हणून कार्यरत असतो आणि तो त्या कंपनीच्या विमा योजनेची माहिती देऊन जाहिरात करत असतो.

 तसेच वेगवेगळे विमाधारक बनवणे हेही एक त्याचे काम असते .

विमा एजंटला स्वतःचा व्यापार उघडावयाचा असेल, तर तो स्वतःलाच हा धंदाही सुरू करू शकतो आणि विमाधारकाला साठी आवश्यक असलेल्या विमा योजना त्याला विकू शकतो

विमा एजंट च्या जबाबदाऱ्या:

1) विमा एजंट ने विमाधारकाला वेगवेगळ्या विमा योजनेची सविस्तर ओळख करून देणे.

2) विमाधारकास नेमका कोणता विमा आवश्यक आहे? व त्याची परिस्थिती पाहून कोणती योजना त्याला परवडेल? याचा विचारही करणे

3) वेगवेगळ्या विमा योजना ची पूर्व माहिती आधी एजंटला असायला हवी.

4) विमा कंपनी चे ग्राहक वाढण्यासाठी त्याने विशेष प्रयत्न करायला हवेत

5)त्याला नेट सर्फिंग ची माहिती हवी .कारण ,ई-मेल, सोशल मीडिया वर नेहमी अपडेट राहून त्याने ग्राहकांशी नवीन संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे

 6) नवनवीन प्रकारचे कार्यक्रम आखून लोकांना एकत्र करून त्यांना विमा योजनेची त्यांच्या जीवनातील गरज पटवून दिली पाहिजे.

7) विमा एजंट झाल्यावर ही विमाधारकाच्या वाढत्या गरजांचा किंवा जबाबदाऱ्या एजंट म्हणून पूर्ण लक्ष असायला हवे,

8) कारण विमाधारकाच्या वाढत्या जबाबदाऱ्या बरोबर अनेक नुकसानीचे प्रसंग ही वाढू शकतात व त्यासाठी त्या विम्याची गरज त्यांना लागू शकते

विमा एजंट ने समाजात सर्वत्र डोळे उघडून शांतपणे लक्षात ठेवले पाहिजे-

 की ,कोणत्या गोष्टीमुळे लोकांना अनेक संघर्ष करावे लागत आहेत?

 कोणत्या गोष्टींचा वापर दैनंदिन जीवनात करत असतात ?

तसेच आजच्या बेरोजगारीच्या काळात घेतलेल्या सर्व वस्तूंची नुकसान भरपाई जर मिळाली तर किती चांगले होईल.

◆विमा एजंट व विमा धारकाचे परस्परसंबंध :

◆विमा एजंट ची कामे कोणती?

 या गोष्टीं वर ही आपण थोडक्यात प्रकाश टाकू-

विमा एजंट व विमा धारकाचे परस्परसंबंध:

  • विमा एजंट ने समाजात एक सामाजिक प्राणी म्हणूनच खऱ्या अर्थाने आपली ओळख वाढवली पाहिजे.
  • समाजात अनेक गरजां व धोके असतात. त्यापासून व्यक्तींचे नुकसान होते, पण ती विमा कंपनी जर भरून देत असली तर, विमा धारकाचे जीवन खूपच सुकर होण्यास मदत होईल.
  • त्यामुळे या दोघांचे संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे असायला हवे.

1) विमा एजंट नि आपल्या विमाधारकाच्या जीवनातील धोके निश्चित करून त्यावर उपाययोजना म्हणून विमा योजनेचा आधार ही त्याला दिला पाहिजे .

2)तसेच विमाधारकाच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज त्याला असायला हवा

3) एजंटने विमा कंपनी बद्दल ही सर्व माहिती ही विमाधारकाला खात्रीशीर द्यायला हवी तरच विमा योजना घेण्याचा विचार करू शकेल

4) विमा योजनेची सत्य परिस्थिती, अटी, लाभ किंवा धोके ही एजंटला माहिती हवी तरच विमाधारकाला या योजनेबद्दल पटवून देऊ शकेल

5) विमाधारकाला त्या योजनेच्या मर्यादा ही माहिती हव्यात त्याला किती रक्कम योजनेसाठी द्यावी लागेल?

 6) त्या रकमेवर  हप्ते व त्यांची संख्या व त्याच्याबरोबर मिळणारे आर्थिक संरक्षण याबाबत खुलासेवार स्पष्ट रूपात सांगितले पाहिजे

विमा एजंट ची कामे:

1) विमा कंपनीच्या नवनवीन योजनेची सतत माहिती ठेवणे

2) विमाधारकाने दर  महिन्याला हप्ते भरले आहेत ना ?

याची खात्री करणे

3) नवीन बाजारात आलेल्या विमा योजने बद्दल विमाधारकाने काळाची गरज पाहून माहिती पुरवत राहणे

4)प्रत्येक वेगवेगळ्या विमाधारका ची माहिती व त्याचा नियमित सर्व अहवाल हा व्यवस्थित लिहून ठेवलेला असला पाहिजे

5) विमाधारक हा गरजवंत व पिडलेला असू शकतो अशा वेळी त्याला योग्य मार्गदर्शन त्याने करावे

6) एखाद्या विमाधारक ग्राहकांना नुकसानाची भरपाई करण्यासाठी जर विमा दावा करावा लागला तर

 त्याला सर्वतोपरी एजंट म्हणून मदत करणे आवश्यक आहे

 7)विमाधारक दुःखात किंवा तणावाखाली असल्यास विमा दावा यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ही त्याने केली पाहिजे व विमाधारकाला धीरही दिला पाहिजे

8) विमा कंपनी व विमाधारक यांच्यातला सर्वात महत्त्वाचा दुवा हा विमा एजंट असतो

9) त्यामुळे विमा कंपनी व विमाधारकाशी एकनिष्ठ राहून त्यांच्यात एक दृढ विश्वासाचे नाते तो निर्माण करू शकतो.

विमा एजंट च्या जबाबदाऱ्या कोणत्या ?

हे तर आपण पाहिले तसेच परस्पर संबंध कसे असावेत? याचा ही विचार केला

  • आता आपण विमा एजंट च्या करिअर, त्याला मिळणारे वेतन किंवा त्याला दाखवावी लागणारी तत्परता याबाबत विचार करू-

◆ विमा एजंट म्हणून क्षेत्र निवडताना-

◆ विमा एजंट व अर्थप्राप्ती:

◆ विमा एजंट कार्यप्रणाली:

विमा एजंट क्षेत्र :

1)ज्या वेळी कोणतीही व्यक्ती आपल्या समोरील विश्वाससार्थ क्षेत्र सोडून अशा नवीन क्षेत्राची निवड करते त्यावेळी खरं तर खूप धोका असतो व त्याला नवनवीन संधी ही मिळू शकते

2) प्रत्येक गोष्टीची त्यासाठी त्यांनी पूर्ण माहिती ठेवली पाहिजे

3)त्याला जर विमा एजंट व्हायचे असेल तर काही परीक्षाही द्याव्या लागतात जशी प्रिलिसेंसिंग अशा परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात

4) विमाधारक पदवीधर असला तरी त्याला विमा एजंट बनण्यासाठी परवानाही लागतो

5) विमा एजंट म्हणून क्षेत्र निवडताना त्याला एखाद्या गोष्टीमुळे स्वतःची किंवा ग्राहकांची फसवणूक होत तर नाही ना ?याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे

6)नाहीतर विमाधारकाच्या विश्वास उडाला तर त्याच्याकडे येणारे ग्राहक परत येणार नाहीत

7) त्यामुळे विमा एजंट नेहमी विमाधारक ग्राहकाला योग्य मार्गदर्शक म्हणून तसेच योग्य मदत करू पाहणाऱ्या म्हणून भूमिका निभावली पाहिजे

8) त्यांनी स्वतःला या क्षेत्रात अग्रेसर ठेवले पाहिजे नवनवीन आधुनिक यंत्रणेचा भाग झाला पाहिजे

9)कारण पूर्वी सर्व कागदपत्रे सांभाळणे ,फॉर्म भरणे, विमाधारकाच्या हप्त्यांचे आठवण करून देणे ,हप्ते भरून घेणे, दावा करण्यासाठी खेटे घालणे अशी प्रत्यक्ष कामे करताना अनेक विमा कंपनीकडे फिरावे लागत असे

10)पण आता इंटरनेटच्या सुविधेमुळे योजना समजावून सांगणे ,फॉर्म भरणे, हप्ते भरणे कागदपत्रे सेव करणे हे सर्व सहज सोपे झाले आहे ते तंत्रही त्याने शिकले पाहिजे

विमा एजंट व अर्थप्राप्ती:

1)विमा एजंट हा विमा कंपनीकडे एक एजंट म्हणून नोकरीवरून अर्थार्जन प्राप्त करू शकतो

2)तसेच एजंटला विकलेल्या योजनेवर कमिशनही मिळू शकतो

3) स्वतःच्या स्वतंत्र व्यवसाय उभारले असता ही कामे व जबाबदाऱ्या वाढल्या तरी अर्थार्जनही चांगले होऊ शकते

4) त्यासाठी व्यक्तिशः त्याला सर्वांसाठी नाते विश्वासाधं बनवायला पाहिजे

5) विमा एजंटना वेतन ,कमिशन किंवा वेतन व अतिरिक्त रक्कम बोनस स्वरूपात मिळू शकते

6) काही एजंट हे प्रत्येक विमा योजनेवर कमिशन घेतात किंवा एखाद्या योजनेची मर्यादा संपल्यावर पुन्हा ती योजना रिन्यू करताना किंवा जोड योजना घेताना प्रत्येक वेळी विमा कंपनी त्यांना त्या स्वरूपात काही रक्कम देऊ करते

विमा एजंट व त्याची कार्यप्रणाली (

  विमा योजना एजंट म्हणजे नेमका कोण ? | who is insurance agent in marathi ) :

1) विमा एजंट म्हणून त्याची ही एक कार्यप्रणाली आहे ती त्यांनी न कंटाळता केली पाहिजे .

2)म्हणजे, वेगवेगळ्या कंपनी विमा कंपनीत आपले नवनवीन विम्याची माहिती देण्यासाठी कार्यक्रम करत असतात तेथे हजेरी लावणे

3)विमा कंपनी आपल्या जुन्या-नव्या विमा योजनांवर विमा धारकांची मत मांडण्यासाठी ते जास्त आशावादी करण्याचा प्रयत्नात असते अशावेळी यांच्यामधील दुवा बनणे

4)एखाद्या विमा योजने किती महिन्याचे हप्ते होतील ?

ते विमाधारक कसे विनासायास व नियमित येऊ शकतील?

5) यासाठी नवीन कल्पना किंवा योजना शोधून काढणे .

6)त्यांचे नीट रेकॉर्ड सुरक्षित ठेवणे

7)विमाधारकाने समाधानी राहावे यासाठी असलेले विमा संरक्षण त्याला योग्य वेळेत मिळेल ,याची खात्री द्यावी

8)नवीन विमाधारक वाढवण्यासाठी नेहमी फोनद्वारे संपर्कात रहावे

9) पूर्वी घेतलेली एखादी विमा योजना असेल पण वाढत्या कुटुंबाच्या आवश्यकतेनुसार त्याला आणि त्यामध्ये जोडून नवीन विमा योजना घ्यायचे असेल तर तशीच योजना समजावून द्यावी

10)विमा योजनांचे प्रत्येक राज्यानुसार अटी ,नियम हे परिवर्तीत होत असतात त्यामुळे एक एजंट म्हणून तुम्हाला त्याची माहिती असायलाच हवी

आपण आता विमा धारकाची कार्यप्रणाली , तसेच त्याला पैसे कसे मिळतात?

 हे सर्व जाणून घेतले .

पण आपल्याला त्याबरोबर त्याच्यामध्ये विमा  एजंट व्हायला काही गुण किंवा कसंब आहे का? तेही पाहिले पाहिजे-

विमा एजंट चे कसब व गुण:

1) संवाद कौशल्य

2) प्रामाणिकपणा

3) विश्‍वासार्हता

4)नियमितता व नियोजनबद्धता

5) एक विद्यार्थी

6)नवनवीन आधुनिक यंत्रणा यांचे ज्ञान

7) विमा धारकासाठी मार्गदर्शक

8) संयमी पणा

9) आश्वासक बोलणे

असे अनेक गुण आवश्यक आहेत.

1) संवाद कौशल्य :

एजंटकडे उत्कृष्ट संवाद कौशल्य असायला हवे .कारण त्याला नवनवीन ग्राहक आपल्या विमा योजनेत जोडायचे असतात व त्यांच्या गळी नवनवीन योजना या उत्तरावयाच्या  असतात

तसेच मौखिक जाहिरात किंवा माहितीद्वारे हा व्यवसाय चालत असतो त्यामुळे मी नम्र स्वभाव व गोड बोलणे आवश्यक आहे

2) प्रामाणिकपणा:

 हे पण एक एजंटचे कौशल्य आहे खरंच हा मनुष्याच्या अंगचा एक चांगला गुण आहे .

त्यांचा प्रामाणिकपणा व सचोटी मुळे समोरच्या विमाधारकाला ही त्याच्याबद्दल खात्री वाटून तो अशा हप्ते भरावे लागनाऱ्या या योजनेत सहभाग देऊ इच्छितो

 3)विश्वासार्हता :

प्रामाणिकपणाला समानार्थी हा गुण म्हटला पाहिजे. पण, जर आपण एखाद्या ग्राहकाच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण केला तर त्यांच्या विमा योजना व विमा कंपनी कडेही ग्राहक विश्वासाने पाहिल तो सांशक राहणार नाही

4) नियोजन बद्धता:

 नियोजन माणसाला शिस्तबद्ध करत असते व या धंद्यात नियमितता ही हवीच!

 कारण ,विमाधारक नियमित हप्ते भरतो की नाही?

 सर्व कागदपत्रे वेळीच भरली आहेत का?

 नवनवीन बदल किंवा विमा योजनेतील अटी याचेही त्याला ज्ञान हवे

 तसेच विमा दावा करते वेळी वेळीच जर तो केला गेला नाही तर नुकसान भरपाई मिळत नाही. व ज्या कारणासाठी विमाधारकाने योजना घेतली आहे तो उद्देशही सफल होऊ शकत नाही

नक्की वाचा : Property And Casualty Insurance In Marathi

5) एक विद्यार्थी :

विद्यार्थी म्हणजे सतत ज्ञान मिळवणे आणि याच दशकात राहणे योग्य असते.

 कारण विमा योजना या अद्ययावत होत राहतात किंवा जोड विमा योजना ही येऊ शकतात

वेगवेगळ्या परिस्थितीनुसार नियम हे परिवर्तीत होतात तसेच ग्राहकांना योजना घेण्यासाठी पाठवायचे असल्यास त्याला त्या योजने चा संपूर्ण अभ्यास करावा लागतो

तरच ग्राहकांच्या छोट्या-मोठ्या सर्व प्रश्नांची तो खात्रीशीर उत्तरे देऊ शकतो

6) नवनवीन आधुनिक यंत्रणेची ज्ञान :

नेट सर्फिंग किंवा सोशल मीडियावर ॲक्टिव राहणे योग्य असते सुरुवातीला कागदपत्रे हाताळणे, ते सांभाळून कार्यालयात जाऊन सबमिट करणे, अशी खूप कामे करावी लागत असतात

 पण आता नेट मुळे तिथल्या -तिथे सहज सोपी कामे होऊन जातात.

 पण त्याचे ज्ञान हे विमाएजंटला हवेच !

7)एक मार्गदर्शक:

 विमा धारक हा एक सर्वसामान्य माणूस असताना त्याच्या गरजा किंवा आवश्यकता समजून घेऊन भविष्यात येणाऱ्या संभाव्य धोके व जबाबदारी साठी केलेली बचत हे सर्व समजावून सांगण्याचे काम मार्गदर्शक म्हणून विमा एजंट करत असतो

 त्यामुळे विमाधारकाच्या नुकसानीच्या काळात एक मित्र म्हणून त्याचा आधार वाटतो

8) संयमी पणा :

हो हा ही एक गुणच आहे.

 जर विमाधारकाने अनेक छोट्या- छोट्या गोष्टी विचारून विमा एजंटला भंडावून सोडले किंवा हप्ते देताना का -कू करत असला किंवा अन्य काही कारणाने विमा एजंट वर तो चिडत असेल, तर अशी शक्यता निर्माण झाल्यावर ही विमा एजंट म्हणून त्याला पूर्ण शांतच राहून, विमा धारकाचा राग शांत करून आपली योजना पटवून देता आले पाहिजे.

9) आश्वासक बोलणे:

 विमा एजंट म्हणजे आशेचा दिपक असतो.

 त्याच्यामुळे येणाऱ्या संकटातही त्या तणावातही विमाधारकाला धैर्य किंवा आशा वाटली पाहिजे की, आपले नुकसान झाले तरी विमा योजनेच्या सहाय्याने पुन्हा पण स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. ज्यावेळी विमाधाकावर आपत्ती कोसळते त्यावेळी तो खूपच निराश झालेला असतो व अशा परिस्थितीत काय करावे हे त्याला सुचत नाही पण या महत्त्वाच्या प्रसंगी जर विमा एजंट ने एक मित्रासारखे त्याला मदत करून त्याच्या मनात आशे चा किरण लावला पाहिजे त्याच्या आश्‍वासक बोलण्यामुळे पुन्हा तो ताठ उभा राहिला पाहिजे

तर आज आज आपण अशी विमा एजंट ची काय कामे आहेत त्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या हे पाहिले तसेच एखाद्या व्यक्तीला विमा एजंट म्हणून काम करावयाचे असेल तर कोणते गुण अंगी बाणवावे हेही लक्षात घेतले पाहिजे प्रत्येक  विमा एजंट ने आपले कर्तव्य हे विमाधारकाच्या प्रति प्रामाणिक पणे केले तर नक्कीच त्याच्या व्यवसायातही प्रगती होईल

Visit Also : Maymarathi.com

1 thought on “विमा एजंट | Insurance Agent In Marathi 2022”

Leave a Comment