विमा कसा घ्यावा ? | How To Choose Best Term Insurance Plan In India In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण विमा कसा घ्यावा ? म्हणजेच how to choose best term insurance plan in india in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

विमा एक आवश्यकता
विमा योजना घेणे आज प्रत्येकाची आवश्यकता झाली आहे धकाधकीच्या जीवनात आज अनेक आजार ,अपघात, मृत्यू यांचे एक तांडवच चालू असलेले दिसते .अशावेळी माणसाला उद्यासाठी काळजी तर वाटणारच! बेकारी बेरोजगारी या सर्व बाबतीत उद्याच्या नोकरीची शाश्वती नसते .मोठा खर्च आला तर ?हा एक यक्षप्रश्नच वाटतो. मग अशावेळी विमा योजने शिवाय पर्याय आहे का बरं?
पण ही विमा योजना घ्यावी कशी? कोणाकडून? कोणत्या पद्धती द्वारा ?
याचा आज विचार करू-
विमा घेण्याच्या पद्धती | how to choose best term insurance plan in india in marathi
विमा योजना कोणत्याही पद्धतीच्या असोत, पण त्या दोन पद्धतीने विमाधारक ग्राहक खरेदी करू शकतो.
एक म्हणजे ऑनलाईन व दुसरी ऑफलाइन .
आता ऑनलाईन व विमा दलाल या दोन्ही मार्गाने विमा हा विमाधारकाला सहज उपलब्ध होत असतो .ऑनलाइन म्हणजे आपण इंटरनेटच्या सहाय्याने मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉप च्या मदतीने विमाधारक घरबसल्या ती विमा योजना निवडू शकतो, आणि विविध विमा योजनेची किंवा कंपनीची माहिती घेऊ शकतो. तसेच विविध विमा योजनेच्या संरक्षण ,हप्ते, खर्च, मर्यादा ,अटी यांच्याबाबतीत तुलना करून योग्य विमा निवडू शकतो .पण असा हा विमा घ्यावा तरी कसा?
विमा योजना व जागृकता
हो .विमा योजना बद्दल लोकांना तशी माहिती नसल्यामुळे विमा देण्याकडे फारसा कल नसायचा पण आता अनेक माध्यमाद्वारे माणसांना विमा उद्योगाची माहिती समजू लागली आहे व जो तो आपल्याला हवा असेल अशा विमा योजना खरेदी करतो.
ऑफलाइन व विमा योजना
विमाधारक व्यक्तीही ऑनलाईन शी नातं जोडण्याआधी ऑफलाईन विमा घेणेच पसंत करत असते व त्यासाठी विमा कंपनी व विमा धारकांच्या मध्ये दुवा बनण्याचे सर्वात महत्त्वाचे काम हे विमा एजंट करत असतात. त्या वेळी प्रत्येक विमा कंपनीकडे जाऊन त्यांची माहिती पत्रके गोळा करणे ,माहिती घेणे तसेच वेळोवेळी झालेल्या नियमातील बदलाचे अंदाज घेणे, व विमाधारकास विमा योजना त्याच्या आयुष्यात कशी योग्य आहे ?हे पटवून देणे हे समाविष्ट केले जाते .पण यासाठी वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन अनेक कागदपत्रे जमविण्यासाठी त्यांना खूप फिरावे लागते.
ऑनलाइन विमा योजना
ऑनलाइन विमा योजनेसाठी घरबसल्या स्वतः विमाधारक अनेक विमा कंपन्या व त्यांच्या योजना त्याविषयी लोकांची असलेली मते अनुभव वाचू शकतो व स्वत: साठी हवी असलेली योजना घेऊ शकतो. मुख्य म्हणजे प्रत्येक विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये खेटे न घालता घरबसल्या त्याच्याबद्दल माहिती काढून तो तुलनाही करू शकतो. हप्ते किंवा हवी असलेली कागदपत्रेही ऑनलाईन तो पाठवू शकतो. यामुळे आजच्या covid-19 च्या काळात मात्र ही प्रक्रिया अगदी लाभदायक झाली आहे!
विमाधारक ग्राहक व विमा
विमाधारक म्हणजे जी कमावती व्यक्ती आपलं आर्थिक उत्पन्न कमवू लागल्यावर त्याला बचत पण संकटकालीन बचत करावयाची गरज वाटू लागते. म्हणजेच उद्या काही मोठी -समस्या किंवा नुकसान झाले जसे- घराला आग लागणे किंवा त्या विमाधारकाच्या अपघात ,मृत्यू अशा वेळी आर्थिक मजबूत आधार मिळाल्या म्हणून विमा योजना खरेदी करण्यास तयार होतो.
विमा व रक्कम
विमा खरेदी करताना त्यांनी किती पैसे घालून घ्यायचा आहे हे आधी ठरवले पाहिजे .तसे त्याने आपल्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज घेऊन विमा योजना खरेदी करावी .तसेच त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती, तसेच त्यांची संपत्ती किंवा आर्थिक उत्पन्न या सर्व गोष्टींचा आहे त्यांनी नीट विचार करून विमा योजनेसाठी पैसे गुंतवावे.
व्यावहारिक भाषेत विमाधारकाने त्यांच्या वार्षिक उत्पन्न यापैकी दहा टक्के भाग व विमा योजनेत गुंतवावा .असा सल्ला दिला जातो कारण जर दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचे काम हे विमा योजना करू शकते.
विमा हप्ता
विमाधारक ज्यावेळी विमायोजना विकत घेत असतो ,त्यावेळी तो पूर्णपणे लक्ष हे विमा हप्त्याच्या रकमेचे कडे ठेवतो .की मला दर महिना किती हप्ता भरावा लागणार आहे? व त्यावेळी तो हा विचार करत नाही की या विमा हप्त्याच्या रकमेचे पुढे मला इतके संरक्षण मिळणार आहे ?तो हा विचार करत नाही की जर एखाद्या वेळी काही दुर्घटना किंवा आपत्ती कोसळली तर त्याला किंवा तो नसताना त्याच्या कुटुंबियांना किती रक्कम मिळू शकेल? व याचा जर त्याने विचार केला तर तो विमा हप्त्या ऐवजी आपले ध्येय म्हणजे मिळवणाऱ्या आर्थिक संरक्षणाकडे लक्ष देईल. दुर्दैवाने विमा कंपनीकडून अशा विमा योजना विकल्या जातात जेणेकरून त्या खूपच खर्चिक व सर्वसाधारण लोकांना न परवडणार्या असतात व त्या समोरचे आर्थिक संरक्षण पाहिले तर ते एकदम कमी असते.
विमा नियोजन | how to choose best term insurance plan in india in marathi
खरे तर या सर्व गोष्टींकडे विमा आयोजकांचे लक्ष हवे की विमा हप्ता किती भरला जातोय? त्याच्यापुढे किती संरक्षण मिळत आहे ?किंवा त्या आर्थिक रकमेतून विमाधारका चे व त्याच्या कुटुंबीयांचे निश्चित संरक्षण होत आहे ना ? तर असे न होता नियोजकाचे लक्ष हे बहुतांशी विमा हप्त्याचा हिशोब ठेवण्याकडेच लागलेले असते व आपले नुकसान नाही ना ?इरडाचे चे मोठे काम असते ते म्हणजे विमा धारकाची सुरक्षा! याकडे लक्ष देणे .पण इथे होते वेगळेच कंपनीकडे विमा धारकाकडून नियमितपणे विमा हप्ता जमा होत आहेत ना ?किती जमा झाले? याचा च शोध लावला जातो .खरंतर विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या
आर्थिक आधार किती?
याच्यावर लक्ष असायला हवे की ती व्यक्ती अशा गोष्टींना प्राधान्य देतात जितके पैसे हे विमाधारकाला कडून घेतले आहे. व त्यासमोर देऊ केलेले विमा संरक्षण यांचा मेळ बसतो का? याचाही सारासार विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
विमाधारक व खर्च
विमाधारकाने ही फक्त आपल्याला भरावा लागणाऱ्या विमा हप्त्या बद्दल विचार न करता त्या समोर त्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना मिळणारी आर्थिक रक्कम किती मिळेल? याचा गांभीर्याने विचार करावा. त्यावेळी तो आपल्या वार्षिक उत्पन्नाचा विचार करून दहा टक्के पर्यंत पैसे हे विमा योजनेत कोणत्या होऊ शकतो .तर विमा कंपनी द्वारा ही त्याला त्याच्या वार्षिक उत्पन्नाचा दहापट आर्थिक संरक्षण मिळाले पाहिजे तर त्याला आर्थिक संरक्षणाचा निश्चित लाभ मिळू शकतो.
विमाधारकाची सजगता
अनेक वेळा विमा दलाल हे विमाधारकांना आपल्या गोड व आश्वासक बोलण्यामध्ये गुंतवत असतात व त्याच्याकडून एखादी तरी विमा योजना खरेदी करतात. ते आपल्याकडे असणारे विमा योजना विमा धारकासाठी किती आवश्यक आहे ?त्याचा हप्ता किती कमी आहे ?कोणी व किती जणानी घेतला आहे ?याचेच पुनरावर्तन करत राहतो. व याच जाळ्यात विमाधारक फसतो. कारण विमाधारकास स्वतःच्या फायद्याचाच विचार करत असतो. व त्याला ज्या विमा योजना विकल्यावर अधिक कमिशन मिळेल अशीच योजना तो विमाधारकाच्या गळ्यात मारतो. विमाधारकाला साठी कोणती योजना योग्य आहे याचा विचार करण्याची त्याला तशी गरज वाटत नाही .अशा वेळी प्रत्येक विमाधारक व्यक्तीने स्वतःच्या सौरक्षण व
नुकसान भरपाई किती मिळेल?
याचा विचार आधी केला पाहिजे. तसेच काही मुदत विमा योजना असतात त्या मध्ये पैसे गुंतवून आल्यावर नुकसान किंवा आपत्ती आल्यास पैसे तसेच गुंतलेले राहतात .परत ते पैसे काही लाभाच्या रूपात मिळत नाही. यामुळे स्वतःचे नुकसान होण्यापूर्वी बुद्धी जागृत ठेवून विमा योजना निवडावी.
विमा खरेदी करताना
मनुष्य हा आज अनेक रोग, आजार, बेरोजगारी अशा अनेक कारणाने त्रस्त व यास्वस्थ झालेला दिसतोय. अशा वेळी त्याला सुरक्षिततेसाठी विम्याची गरज भासते व काही जीवनात धोका उत्पन्न झाल्यास त्यांच्याशी लढताना आर्थिक भक्कम आधार म्हणून विमाधारक याला विकत घेता येतो .त्यामुळे विमा योजना घेते वेळी आपल्या आपत्ती काळात संरक्षण होईल ना ?हे तर पहावे पण आपले काही पैसे परत काही काळानंतर कसे परत मिळतील ?अशा योजनाही लक्षपूर्वक पहाव्यात.
विमा व त्याचे प्रकार
विमा कंपनीकडे अनेक प्रकारच्या विमा योजना असतात .या वाढत्या औद्योगीकरण तसेच लोकसंख्येचा भस्मासुर यामध्ये मनुष्याला स्वतःच्या जीविताचा भरवसा नसतो .अशा वेळी लाइफ इन्शुरन्स अपघात विमा असतात. वेगवेगळ्या मानवनिर्मित असंतोष पसरवणाऱ्या गोष्टींचे रूपांतर घातक आजार व रोगा त्यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागले तर लाखों रुपयांचा चुराडा होतो .अशा वेळी मेडिकेअर वगैर छोटे प्रकारही ठेवून ठेवावे. निसर्गचक्राचे उलटे चक्र फिरल्यामुळे किंवा मानवनिर्मित कारणाने घर ,मालमत्ता, मोटारी यांचे संरक्षण व्हावे .म्हणून ही गृह विमा ,भाडेकरूंसाठी विमा, वाहन विमा ,पाळीव प्राण्या साठी चा विमा, शेतकऱ्यांसाठी शेती विमा काढला जातो .व्यक्तीने विमा खरेदी करतेवेळी स्वतःचे वय काय आहे ?
त्याचा व्यावसाय कोणता आहे ? त्याच्यावर कोण- कोणत्या जबाबदाऱ्या आहेत ? या सर्वांचा नीट विचार करून विमा योजना घ्याव्यात. जीवन विमा घेताना तुमच्या वार्षिक उत्पन्नावरही भर द्यावा .तसेच विमाधारक विवाहित आहे की अविवाहित? याचाही विचार करावा लागतो .त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या ही वाढणाऱ्या आहेत का? ते हेही पहावे लागते.
नक्की वाचा : List Of Car Insurance Companies In Marathi
तिसऱ्या पक्षाची भरपाई
ज्यावेळी एखादी व्यक्ती आरोग्य विमा, वाहन विमा खरेदी करत असतो अशा वेळी तिसऱ्या पक्षाची भरपाई आणि त्यातून होत आहे ना? ते ही पहावे. कारण ,जर एखाद्या विमाधारकाने वाहन विमा घेतला असेल व त्याची दुसऱ्या वाहनांची टक्कर होऊन अपघात घडला व त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यक्तीला शारीरिक दुखापत झाली किंवा त्याचे वाहन, घर, दुकान यांना काही नुकसान झाले असेल तर या विमाधारकाच्या विमा योजनेतून त्या तृतीया पक्षाची ही नुकसान भरपाई चे संरक्षण व्हायला हवे .नाही तर त्यासाठी वेगळे पैसे हे विमाधारकाला स्वतःच्या खिशातून काढावे लागतील.
विमा कोणाकडून विकत घ्यावा ? | how to choose best term insurance plan in india in marathi
विमा योजना खरेदी करत असताना विमा योजना विकणाऱ्या अनेक विमा कंपन्या या आपल्याला दिसतात. त्यातील विमा एजंट त्यासाठी मदत करू शकतात .काही विमा एजंट स्वतंत्ररित्या काम करतात. त्यामुळे विविध कंपन्यांची माहिती त्यांच्याजवळ असते व काही एजंट हे विशिष्ट कंपनीतर्फे काम करतात .त्यामुळे या कंपनीशी संबंधित विमा योजना विकली जाते.
तसेच कार्पोरेट एजंट वा ब्रोकर द्वारे ही विमा योजना खरेदी करू शकता .काही तर ऑनलाइन हे विकत घेतात. ती आजकाल सोय खूपच सहज व सुलभ झालेली दिसून येते .कोणाकडून विमा खरेदी करताना त्या एजंट जवळ (आय आर डी आय) चे लायसन्स आहे का ते पहावे .तसेच विमा दलाल असला तरी माहिती घेण्याचा तुमचाही अधिकार आहे. विमा योजने बद्दल अधिकाधिक माहिती घ्यावी ,कारण माहिती पत्रक किंवा फॉर्म वर अगदी बारीक अक्षरात लिहिलेले असतात .ते आपण वाचायचा कंटाळा करतो व ते अनेक पानाचे असल्याने आळस करतो .तसेच त्यातून मिळणारे लाभ किंवा कशामुळे विमा योजना लॅप्स होऊ शकते हे आपल्याला समजू शकते आणि आपण सावध होऊन त्या बाबतीत विचार करू शकतो
अशाप्रकारे विमाधारक हा आपल्या या विमा योजना खरेदी करताना विचार करून निवडू शकतो आणि त्या त्याने तशाच निवडायला हव्यात मग त्याची कोणतीही फसगत होणार नाही व त्याचे भविष्य तसेच त्याच्या कुटुंबाचे भविष्यही सुरक्षित राहील हे नक्की!
Reed Also :भावना व विचार या मधे अंतर काय ?
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण विमा कसा घ्यावा ? | How To Choose Best Term Insurance Plan बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.
Tags : How To Choose Best Term Insurance Plan In India विमा कसा घ्यावा ? | How To Choose Best Term Insurance Plan In India In Marathi.
1 thought on “विमा कसा घ्यावा ? | How To Choose Best Term Insurance Plan In India In Marathi 2022”