हॉस्पिटल नुकसान भरपाई विमा | Hospital Indemnity Insurance In Marathi 2022

हॉस्पिटल नुकसान भरपाई विमा | Hospital Indemnity Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण हॉस्पिटल नुकसान भरपाई विमा म्हणजेच hospital indemnity insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Hospital Indemnity Insurance In Marathi
Hospital Indemnity Insurance

आरोग्य व चिंता:

आरोग्याच्या बाबतीत कितीही आपण ताळमेळ ठेवायचा प्रयत्न केला ,तरीही प्रत्येकाला काही ना काही कारणास्तव रुग्णालयात किंवा दवाखान्यात जावे लागते!
मग, ते आजारपणामुळे असू देत अथवा शारीरिक दुखापतीमुळे.
अथवा अपघातामुळे काही वेळा आजारपणाची जाणीव होऊन रुग्णालयात भरती होणारी माणसे किंवा अचानक पणे अपघात किंवा इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागते. पण त्यावेळी अचानक खर्चाचे आकडे ऐकून तारांबळ उडू शकते!
पण त्यावेळी आधीच ‘हॉस्पिटल नुकसान भरपाई ‘ सारखा विमा काढला असेल, तर विमाधारक खूप आश्वास्थ होऊन जाऊ शकेल!
आणि त्याचा अर्धा आजार त्यातच पळून जाईल.

हॉस्पिटल नुकसान भरपाई ( hospital indemnity insurance in marathi ):

विमा एखाद्या विमाधारकाला , जवळच्या नातेवाईक किंवा स्वतःच्या तब्येतीविषयी काही जास्त काळासाठी रुग्णालयात भरती होण्याची पाळी आली असेल व रोज चा खर्चच हजारोच्या पटीने जाऊ शकतो. अशा वेळी विमाधारकाचा हॉस्पिटलच्या खर्चाची भरपाई विमा योजना करते .
तसेच पुन्हा विमा द्वारे पैसे मिळवण्याचा साहाय्यही होऊन जाते

रुग्णालय खर्च व विमासंरक्षण:

रुग्णालयात भरती होताना विमाधारकाचा हॉस्पिटल खर्च व त्यासाठी विम्याचे संरक्षण ही वापरले जाते.
विमाधारक जितके दिवस रुग्णालयात राहील त्या दिवसापर्यंत चा लागणारा खर्च ही विमा कंपनी देऊ करते व ती सरळ ते पैसे प्रत्यक्षपणे रोख रूपाने विमाधारकाला देते आणि त्यामुळे रुग्णालयातून सोडण्याआधी विमा कंपनी त्याचा खर्च पुरवते.
मुख्यतः रुग्णालयात दाखल झालेल्या दिवसापासून विमाधारकाला रुग्णालयातून बाहेर पडेपर्यंत त्या दिवसाचा हिशोब ठेवून ती दिलेली रक्कम असते.

रुग्णालय विमा आपले काम कसे करतो?

ज्यावेळी विमाधारक विमा कंपनी व विमा योजना निवडतात व त्यासाठी ठरवलेला दर व हप्ते नियमित भरत असतो व त्या खर्चातून विमा कंपनी विमाधारकाला मदत करते.

विमा कंपनी द्वारा देण्यात येणारी रक्कम:

विमाधारकाला विमा कंपनीकडून मिळणाऱ्या पैशांमधून आरोग्य विमा कॉपीज विमा यासारख्या अनेक योजनेत ते भरले जाऊ शकतात त्यामुळे विमाधारक रुग्णालयात भरती असते वेळी त्याला तेथील निवासस्थानाचा किंवा अन्य खर्च करण्यासाठी चे पैसे उपयोगी पडू शकतात.

विमा योजनेचे संरक्षण कोण कोणत्या गोष्टीसाठी मिळते?

★जावेळी विमाधारक किंवा त्याच्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांना रुग्णालयात जावे लागते
★किंवा त्यांचे ऑपरेशन व तेथील राहण्याचा किंवा औषधोपचाराचा खर्च हा विमा योजना उचलते
★एखाद्या मोठा आजार किंवा अपघातामुळे आपल्या सर्व सोयी सुविधांनी सज्ज असे रुग्णालय लागते
★पण त्याचा सर्वसाधारण खर्च हा त्यांना परवडण्यासारखा नसतो
★ अशा वेळी या विमा योजनेमुळे ते अशा रुग्णालयात प्रवेश करून स्वतःची आरोग्य विषयक समस्या प्रथम सोडवू शकतात
★ एक्सीडेंट झाल्यावर पूर्णपणे बरे होऊन घरी जाईपर्यंत त्याचा खर्च या योजनेअंतर्गत असतो
★ विमाधारक स्वतःबरोबर आपल्या कुटुंबीयांसाठी ही निर्धास्त होऊ शकतो कारण यान योजनेअंतर्गत त्यांना देखील विम्याचे आर्थिक संरक्षण मिळते
★ पैशांचे नियोजन करणेही आवश्यक ठरत असते हप्ते भरण्यासाठी किंवा विम्याचा खर्चाची सोय विमाधारक आपल्या मासिक उत्पन्न सह जोडू शकतो
★ त्यामुळे त्यालाही ताण तणाव राहत नाही.

हा विमा का घ्यावा? | why take hospital indemnity insurance in marathi

  • हा विमा का घ्यावा? याची कारणे अनेक आहेत .
  • वाईट परिस्थिती ही तर काही सांगून येत नाही
  • बहुतेक वेळा सर्वसामान्य माणसे त्यांच्याशी लढायला तयार नसतात
  • मानसिक ,शारिरिक रित्या तयारी तर हळूहळू करावी लागत असते
  • पण आर्थिक परिस्थिती भक्कम असेल तर, निश्चिंत होता येऊन मनुष्य आपल्या आत्मबलाने बरा होऊन येईल
  • आणि त्यासाठी अशा एखाद्या विम्याची साथ असेल तर कसली काळजी ??
  • ज्यावेळी आपण रुग्णालयात जायचे म्हणत असतो ,अशावेळी आजारा बरोबरच यक्षप्रश्न असतो तो रुग्णालयाच्या खर्चाचा!!

सर्वात मोठा फायदा:

रुग्णालयीन खर्च म्हणजे शस्त्रक्रिया, औषधोपचार तेथील किती दिवस राहिलात तर तो खर्च.
हा जरी संरक्षित असला तरी अचानक अपघाता संदर्भात रुग्णालयात दाखल करावे लागल्यास हातात तशी रोख कॅश नसते व छोटे-मोठे असे इतर बरेच खर्च लागून आलेली असतात
अशा वेळी या विमा योजनेद्वारा विमाधारकाला रोख रक्कम देऊन बरेच से तणाव हे त्यांचे निघून जातात!

रुग्णालय खर्च:

विमा योजना आपण घेताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे
कारण ,आजची covid-19 ची परिस्थिती असो वा एकंदरीत एखादा आजार किंवा अपघात.
असे झाल्यास सरासरी किती खर्च येऊ शकतो हा अंदाज खर्च आपण निवडलेल्या विमा योजने द्वारे संरक्षित होऊ शकतो का?
तुमच्या विमा योजनेचे आर्थिक संरक्षण कमी तर नाही ना?
त्याच्या दृष्टीने ही ते पाहून विचार न करता भविष्यातील धोके पाहून त्यानुसार निर्णय घेऊन जास्तीत जास्त फायदेशीर अशी विमा योजना आपण घेतली पाहिजे!

वाढते वय व वाढती जबाबदारी :

वाढत्या वया चे ही विमा योजने बाबतीत कानाडोळा केला नाही पाहिजे .
कारण जसे विमा धारकाचे वय वाढते तसतशी कौटुंबिक जबाबदाऱ्या ही त्याच्यावर स्वार होत असतात.
आधी एका साठी घेतलेली योजना मग अगदी कमी संरक्षित होईल असे वाटत राहते.
कारण, पत्नी, मुलेबाळे यांचेही संरक्षण त्यातून व्हायला हवेत!
शहराच्या ठिकाणी डिलेवरी चा खर्च खूपच असतो व सिजरीन असेल तर विचारूच नका!
अशा वेळी पत्नी, लहान मुले ,वृद्ध आई-वडील यांच्या आरोग्याची जबाबदारी घेताना विमा धारकाची अगदी त्रेधा ग शकते!

आरोग्य विमा व रुग्णालय विमा:

रुग्णालय विमा हा आरोग्य विमा शी संलग्न असाच आहे.
कारण, ‘हेल्थ इन्शुरन्स ‘ला पैशाची मदत करून संरक्षित करण्याचे कामही योजना करत असते !
तर कोणते मोठे आजार किंवा दुखापत झाल्यास आपल्या परिवाराचे व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या योजना अत्यंत आवश्यक आहेत.

विम्याचे रोख संरक्षण:

  • हा सर्वात मोठा नफा पाच विमाधारकांना मिळत असतो.
  • कारण रोख रक्कम हाती येणे आणि ती अत्यंत नाजूक क्षणी, तर ‘सोने पे सुहागा’!
  • कारण आपली सुरक्षित बँकेतली ठेव वैगरे मोडेपर्यंत आपल्याला अवधी जातोच.
  • आजाराच्या तीव्रतेमध्ये रुग्णालयीन खर्च संरक्षित करतोच
  • पण एक्सीडेंट च्या परिस्थितीत डॉक्टरचा खर्च, औषधांचा खर्च, चाचण्यांचा खर्च हा सर्व त्यात समाविष्ट असतो व जर कोणी विमाधारक कुटुंबाचा कमविता व्यक्ती असेल आणि त्यालाच दुखापत झाली असल्यास घरातील अनेक खर्च पेलणे हे इतरांना सहज सोपे नसते!
  • पण ही विमा योजना त्यांना हातात रोख पैसे देते त्यामुळे निर्धास्तपणे हॉस्पिटल व घर दोहोंच्या खर्चाचे नियोजन होऊन जाते
  • कॅन्सर किंवा इतर आजार यामध्ये अनेक खर्च असतात अशा वेळी त्यांची ही देयके भरणे व आपल्याला त्या आजारातून ठीक करून घरी निट आणण्याची जोखीमही ही विमा योजना घेत असते.

नक्की वाचा : American National Insurance In Marathi

विमा धारकाची चिंता व विमा योजना ( hospital indemnity insurance in marathi ) :

विमाधारक कुटुंबाचा कमावता पुरुष किंवा स्त्री असेल तर त्याचे एक्सीडेंट किंवा आजारात रुग्णालयात जावे लागले तर याचा खर्च कसा पेलवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर येत राहील .
पण त्याने विमा योजनेचा खर्च व रुग्णालयाच्या खर्चाचे गणित जमत नसेल म्हणजे विम्याच्या संरक्षण अपेक्षा रुग्णालयीन खर्च अधिक असेल तर चिंता करण्याची काहीही गरज नाही.
कारण ,विमाधारकाने एखाद्या आरोग्य संबंधीत गोष्टींसाठी संरक्षण तयार ठेवले असेल तर रुग्णालयीन खर्च म्हणजे विमा कंपनीकडून होणारी भरपाई रक्कम व विमाधारकाच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये अंतर्भूत नाही .
असा रुग्णालय च्या पैशांची तरतुदीची सहायता मिळू शकते.

विमाधारकाची मनस्थिती:

अचानक हॉस्पिटल मध्ये कोणत्याही तब्येतीच्या कारणाने विमाधारकाला किंवा त्याच्या कुटुंबियांना जावे लागले असता आपल्या तब्येती बरोबरच असलेल्या इतर खर्च यांची चिंता या योजनेमुळे सोडून तुम्ही निर्धास्तपणे फक्त तब्येतीची साठी योग्य उपाय योजना कराव्यात व त्यातून लवकर बरे व्हावे हेच योग्य नाही का?

इतर लाभ:

जसे रुग्णालयीन खर्च व अपघात या संदर्भातील खर्च रोख रक्कम हा लाभ आहेच!
पण सुदैवाने हा त्रास न झाल्यास विमाधारक स्वतःची काळजी घेऊन स्वतःला चांगले आरोग्यवान जीवन जगण्यास घालवू शकतो.
त्यासाठी वयोमानानुसार कराव्या लागणाऱ्या चाचण्या किंवा औषधे नियमित घेऊन स्वतःची जीवन- मान आयुष्यमान वाढवण्यास मदत करू शकतो.

आकस्मिक गरज:

आजार किंवा रोगाची प्राथमिक चीन्हेने आपल्याला आढळून येऊ शकतात .
पण ऑफिसमध्ये जाणारा माणूस व त्याचा अचानक अपघात झाला तर??
अशावेळी त्वरित वैद्यकीय सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे ठरते.
पण ,खर्च अधिक असेल किंवा शस्त्रक्रिया ताबडतोब करावी लागत असेल, तर रुग्णालयातील डॉक्टर ही पैसे जमा केल्या शिवाय रुग्णाला हात लावत नाहीत !
अशा वेळी अशा विमा योजना म्हणजे संजीवनी चे काम करेल नाही का?

Reed Also : Emphasis meaning in marathi?

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण हॉस्पिटल नुकसान भरपाई विमा | Hospital Indemnity Insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : हॉस्पिटल नुकसान भरपाई विमा | Hospital Indemnity Insurance,हॉस्पिटल नुकसान भरपाई विमा | Hospital Indemnity Insurance In Marathi 2022

2 thoughts on “हॉस्पिटल नुकसान भरपाई विमा | Hospital Indemnity Insurance In Marathi 2022”

Leave a Comment