घरमालकासाठी विमा | Home Owner Insurance In Marathi
Home Owner Insurance : नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण घरमालकासाठी विमा म्हणजेच home owner insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

घरमालकासाठी विमा | Home Owner Insurance In Marathi
घर प्रत्येकाचे स्वप्न:
- प्रत्येक माणसाच्या गरजा वेगवेगळ्या असतात
- तशाच त्या गरजा पूर्ण करण्याचे मार्गही प्रत्येकाचे वेगळे असतात
- गरजा या काही अत्यावश्यक तर काहीशा तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात
अत्यावश्यक गरजा:
- अन्न ,वस्त्र ,निवारा आणि
- आवश्यक गरजा:
वाहन ,पैसा ,नोकरी-धंदा अनेक गोष्टी आपण त्यात जोडू शकतो - कारण माणूस असा प्राणी आहे की त्याला कितीही दिलं तरीही त्याच्या गरजा काही संपत नाही
- त्या तर वाढतच राहतात आणि त्या गरजा पूर्ण करण्याच्या नादात मनुष्य स्वतःच्या आज ला म्हणजेच वर्तमानातल्या सुखाला बहुतेकदा विसरून जातो
घर एक अत्यावश्यक गरज:
- अत्यावश्यक गरजा ज्या अन्न, वस्त्र व निवारा या आहेत
- त्यातील म्हणजेच घर ,गृह होय
- गरीब माणूस असो वा श्रीमंत माणूस त्यांना स्वतःचे छोटे का होईना ? पण घर असावे असे वाटतच असते
- आणि घर घेतल्यावर ते सजवून तो जो आनंद मिळवत असतो
- तो दुसऱ्या कशातच मिळत नाही
- घर फक्त दगड-विटा-सिमेंट यानेच बांधले गेले नसते
- तर त्यात राहणाऱ्या माणसांच्या भावना त्यांची स्वप्ने व आशावाद ही सामील त्यात असतो
- त्या घरात माणसे एकमेकांना जपत असतात
- घरात त्यांना कशाचेही बंधन नसते
- घरातल्या माणसांना जसे आपण जपत असतो
- तसेच घरात एकेक करून आपण आणलेली वस्तू ही आपल्याला घरा सारखीच मौल्यवान असते
- मग त्याची किंमत कमी असली तरीही!
घरमालकाच्या समस्या:
- घर मालक जरी स्वतःच्या घरात राहताना निर्भयतेने हसत-खेळत वावरत असला
- तरीही याला कधीही कोणाची दृष्ट लागू शकते
- चांगल्या मनाने व आनंदाने सजवलेल्या घरावर कधी कोणतीही आपत्ती येऊ शकते
- मग ती नैसर्गिक असली वा मानव निर्मित आपत्ती असो त्यामुळे घराची नुकसान हे होतेच!
आपत्ती आणि घर:
- आपत्ती अनेक प्रकारच्या आहेत
- की जेणेकरून हसत्या खेळत्या घराची त्यांना होत्याचं नव्हतं करू शकतात
- आता आपण पाहू प्रमुख दोन प्रकारच्या आपत्ती:
1 नैसर्गिक आपत्ती
2 मानवनिर्मित आपत्ती
★नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय?
- पूर:
- पावसाळ्याच्या दिवसात जेथे नदी जवळ आहे अशा गावात किंवा शहरात अति पाऊस पडत असतो
- व या पावसाच्या अति माऱ्यामुळे नदी आपली मर्यादा सोडून वाहत असते
- व गाव किंवा शहरात ती शिरते
- तिच्या अचानक येण्याने घरमालकाच्या घराचे अतिशय नुकसान होऊ शकते
★नुकसान कोण -कोणते होते?
- पूर्ण घर वाहून जाऊ शकते
- घरातल्या किमती वस्तू, मौल्यवान दागिने ,महत्त्वाची कागदपत्रे वाहून जाऊ शकतात
- आर्थिक नुकसाना बरोबर घरातील व्यक्ती ,पाळीव प्राणीही वाहून जाण्याची शक्यता अधिक असते
- उदाहरणार्थ – हल्लीच झालेल्या पावसाच्या जोरदार वर्षावाने रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील लोकांचे तर तोंडचे पाणीच पळवले आहे
- यात कितीतरी जणांचे संसार धुळीला मिळाले
- दुकाने तर पार् धुऊन निघाली
- ऑफिस ,कारखाने, शाळा, हॉस्पिटल यांचे तर अतोनात नुकसान झाले
2 भूकंप:
- जमिनीला भूकंपाचे हादरे बसल्यामुळे जमिनीला मोठमोठ्या भेगा पडून गावच्या गाव बेचिराख होतात
- यामध्ये हे घराचे नुकसान हे होतेच
3 वादळ :
- वादळ ही एक नैसर्गिक अशी मोठी आपत्ती असते
- की घर ,घरातील माणसे ,प्राणी यांना तर जास्त फटका मिळू शकतो
4 आग लागणे:
- घरात काही कारणाने जर सिलेंडर स्फोट झाला किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची खूप शक्यता असते
- व पूर्ण घर व माणसे जळून खाक होऊ शकतात
● मानवनिर्मित आपत्ती:
1 आग लावणे :
- घराघरातील काही मतभेद किंवा वैमनस्यामुळे काही विकृत असलेली माणसे दुसऱ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांची अधिकाधिक नुकसानकरतात
- त्यासाठी त्यांच्या घराला आग लावतात
- जेणेकरून त्यांचा निवारा हातातून निसटून जाईल 2 संप ,मोर्चा ,आंदोलन :
- यामध्ये जी काही घरे ,माणसे येतात त्यांची मोडतोड करणे नासधूस करणे या गोष्टी केल्या जातात
4 आतंकवादी हमले :
- हे घरांना लक्ष्य ठेवूनच केले जातात
5 युद्ध :
- यासारख्या घटना यामध्ये देशादेशातील सीमेवर वसलेली गावे आणि तेथील घरांना अधिक फटका बसलेला दिसून येतो
घराच्या संरक्षणासाठी काय करता येईल?
- घर म्हणजे बहुतेक मालमत्ता न पकडता त्यातील माणसे वस्तू प्राणी या सर्वांना एकत्रित आणणारे असे घर
- तर असे हे घर उद्ध्वस्त झाले तरी त्यात राहणारी माणसे काय करू शकतील?
- त्यामुळे जर घरमालकांनी आपल्या घराचा विमा काढला असेल तर त्यांना आपल्या मालमत्तेचे भरपाई ही आर्थिक स्वरूपात मिळू शकते
घर मालकाचा विमा ( home owner insurance in marathi )
- या विमाद्वारे घरमालकाच्या घरा बरोबरच त्यांच्या घरातील सामानाची हे नुकसान झाले असल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई करत असते
- मग ती परिस्थिती कोणतीही असो
- नैसर्गिक आपत्तीमधील पूर, वादळ, असो वा मानवनिर्मित.
- चोरी होणे दंगल होणे या मुळे झालेले नुकसान असो
घर मालकाचा विमा ( home owner insurance in marathi ) काढल्यामुळे अनेक फायदे मिळतात:
- घराचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळते
- आग लागली किंवा कोणी मुद्दाम होऊन लावल्यामुळे झालेल्या नुकसानीची ही भरपाई विमा कंपनी देत असते
- घर स्वतःचे टोलेजंग बांधलेले असो वा भाड्याचे .पण कोणत्याही धोक्यापासून विमामुळे त्याची संरक्षण होते
- घरा बरोबरच घरातील किमती वस्तू च्या ही नुकसानीची भरपाई मिळते
- भारतात अनेक वेळा ऋतू बदला मुळे कधीकधी पावसाचा अधिक त्या ठिकाणच्या प्रदेशावर तडाखा बसतो
- वस्तू चे आणि घराचे नुकसान होत असते
- आर्थिक बचत केलेल्या सर्व नुकसानाची भरपाई करण्यातच संपून जाईल
- पण विमा काढल्याने घरमालक जरा निश्चिंत होऊ शकतो
- कारण त्याला घरातील वस्तू घर त्याच्यासाठी विमा कंपनी द्वारा काही रक्कम मिळू शकते
- चोरी ,घरफोडी सारख्या घटना तर शहरात रोजच्या रोज झालेल्या दिसून येतात
- त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान ही अधिक असते
- आपल्याला नोकरीधंद्याच्या कामासाठी किंवा कधी गावी तसेच फिरण्यासाठी बाहेर जावेच लागते
- अशा वेळी आपल्या घराचे रक्षण कोण करणार?
- पण या विम्यामुळे घराचे नुकसान जरी झाले तरी आपण निर्धास्त होऊ.कारण
विमा कंपनी आपल्या सोबत असेल नाही का? - हा विमा फक्त अचानक आलेल्या आपत्तीसाठी नसून-
- ज्या वेळी आपण नवीन घर घेतले असेल व तिथे जात असताना होणारा खर्च
- किंवा त्या वेळी काही दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले तर त्याचा खर्च
- घरांची पडझड झाल्याने ते राहण्यास धोकदायक होत असेल तर त्या वेळी दुसरीकडे राहण्याचा खर्च
- ही विमाधारकाची विमा कंपनी देत असते
(घरमालकासाठी विमा | Home Owner Insurance In Marathi)
घरमालकाच्या विमा योजनेमध्ये या खालील गोष्टींचा समावेश होत असतो
म्हणजे त्याला विम्याचे संरक्षण हे मिळत असते :
- या विमा योजनेमध्ये घराच्या बाहेरील गोष्टींचे व आतील बाबींचीही संरक्षण मिळत असते
- कोणत्याही आकस्मित आपत्तीमुळे झालेले नुकसान विमा कंपनी स्वतःच्या पैशांनी करून देण्याचा प्रयत्न करत असते
- कुणाच्या घराचे कोणतेही नुकसान असो वा घरातील वस्तूंचे नुकसान हे तर विमा कंपनी भरून देते
- जर घरातील कोणत्या मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्यास सोन्याचे दागिने वगैरे तर त्याची कमीत कमी भरपाई दिली जाते
- काही कलाकार व्यक्ती किंवा कलेचे आस्वाद घेणारे रसिक वेगवेगळ्या प्रसिद्ध कलाकृती ही चित्रे अगदी सांभाळून ठेवत असतात
- तो एक इतिहासाचा भाग असतो
*अशा गोष्टी आपल्या संस्कृतीचा मौल्यवान ठेवाच असतो - त्या चोरीस गेल्या तर मात्र विमा कंपनीत याकडे लक्ष पुरवीत असते
- काही वेळा घरमालकाचा फ्लॅट तरी स्वतःच्या मालकीचा असला तरी इमारत त्याच्या मालकीची नसते
- आणि अशा इमारतीला धोका उत्पन्न झाल्यास एकट्या विमाधारकांना कशा प्रकारे विमा कंपनी मदत करू शकेल ?
- विमाधारकाला विमा कंपनी नियमात निर्धारित काही रक्कम नुकसान भरपाई म्हणून देते
- एखाद्या घरात जर स्फोट झाला
- किंवा इतर कारणाने झालेल्या नुकसानीमूळे घरातील उपकरणे, कपडे, वस्तू यांनाही संरक्षण मिळत असते
- तुमच्याकडे पोर्टेबल साधने असतील तर सा-या साधनांची कुठेही नुकसान झाले तरीही विमाधारकाला विमा कंपनी आर्थिक संरक्षण देत असते
घर मालकाच्या विम्यामध्ये ( home owner insurance in marathi ) कोणत्या गोष्टींना संरक्षण मिळत नाही:
1 कोणत्याही आपत्तीमध्ये जर घर व घरामधील वस्तूंचेही नुकसान झाल्यास
- विमा कंपनी तुम्हाला मदत करते
- परंतु ती तुमच्या चुकीमुळे किंवा तुमच्या बेजबाबदार वृत्तीमुळे बिघडल्यास त्याच्या दुरुस्तीचे पैसे नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनी देत नाही
2 काहीवेळा घर मालकाची अनेक घरे असू शकतात - त्यामुळे दुसऱ्या घराकडे त्याचे दुर्लक्ष होत असते
- आणि त्या वेळी अनेक कारणाने ते दुर्लक्षित घर किडया- मुंग्यांची शिकार होऊन मोडकळीस येतात
- उदाहरणार्थ – एखाद्या घराला वाळवी लागली की घरातील सामान, भिंती, छप्पर ,लाकडी वस्तू ना पोखरून पार वाट लावून टाकते
- तसेच खिडक्या गंज लागल्यासही लोखंडी वस्तू खराब होतात
- त्यांना वेळोवेळी तेलाचा हात किंवा आपलेपणाचा स्पर्श न झाल्यास तेही आपली नाराजी घराची वास्तु करून दाखवत असतात
- आणि त्या संदर्भातील नुकसान भरपाईही विमा कंपनी देत नाही.
3 काही ठिकाणी औद्योगिक करण्याच्या वाढत्या प्रकारात कारखान्यातील दूषित धूर बाहेर सोडले जातात - त्यामुळे हवा दूषित होते त्याद्वारे ही घरावर फरक पडतो
- पण हेही नुकसान ग्राह्य धरले जात नाही
4 काही जणांच्या घराची दुरावस्था आर्थिक परिस्थिती मुळे झालेली असते - पण ती लपवून त्याला आपत्तीच्या नावाखाली विमा दावा केल्यास –
- विमा कंपनी ही सर्वेक्षण करते
- व त्यात या गोष्टी स्पष्ट झाल्या तरीही विमाधारकाला विमा कंपनी आर्थिक मदत करत नाही
5 विद्युत पुरवठा खंडित होणे किंवा भारनियमनामुळे काही छोटे-मोठे नुकसान ही विमा कंपनीच्या नुकसान भरपाईत बाध्य होत नाही
6 जर चोरीची नुकसानभरपाई करताना तो परिचित किंवा घरातलाच नातेवाईक असेल तर नुकसान भरपाई मिळत नाही
नक्की वाचा : Liability Insurance In Marathi
विमा दावा करतेवेळी-
- आपल्या घराचे नुकसान झाल्यास लगेचच त्याचे फोटो काढून ठेवावेत
- नुकसान झाल्यावर होईतोवर लवकरात लवकर विमा कंपनीला ते कळवावे
- कागदपत्रे सर्व नीट जमवून विमा कंपनीकडे जमा करावी
- व विमा दावा करावा आपल्या घराबरोबर घरातील कोण- कोणत्या गोष्टींचे नुकसान झाले आहे
- त्याची एक यादी करावी
- पुरावेही तयार ठेवावे
● विमा दावा करत आहात?
- तुमच्या घराचे बाह्य भागाचे किंवा अंतर्गत भागाचे काही नैसर्गिक कारणाने किंवा मानवनिर्मित कारणाने नुकसान झाले असल्यास-
- विमा दावा करताना घटने चे पुरावेही गोळा करा
- जेणेकरून विमा दावा केल्यावर भरपाई तुम्हाला मिळेल
- एजंट ओळखीचा आहे
- किंवा तुमच्या ओळखीच्यानी ही विमा योजना घेतलेली आहे ही सर्व कारणे लक्षात न घेता
- एजंटचे गोड बोलणे किंवा आग्रही आश्वासक बोलण्याला बळी न पडता सतर्क राहा
- कागदपत्रे सांभाळा व नीट तपासा त्यातील नियम अटी समजून घ्या
- विमा दावा करतेवेळी काही वेळा लहान-मोठ्या अडचणी येऊ शकतील
- त्रास होऊ शकेल
- म्हणून मन खंबीर ठेवा
- काही वेळा योजना आपण आपल्या घर व सुरक्षेसाठी घेतो
- पण नंतर कायदेशीर मार्गदर्शन मिळत नाही
- ते ही याच दरम्यान तणाव ही अधिक असतो
- कायदेशीर अटी वाचण्यासाठी तसेच कायदेपंडित लागतात
- त्याची निवड करा
- विमा कंपनी विमाधारकाच्या घराचे किंवा त्यातील वस्तूंचे नुकसान झाले तर –
- विमा कंपनी विमाधारकाच्या घराचे ,संपत्तीचे वर्तमान स्थिती नुसार किंमत काढते
- आणि त्यामुळे विमा दावा करतेवेळी आपणही आपल्या वस्तू घराची निश्चित किंमत काय असेल ?
- याचा विचार करून एक ढोबळ ठोकताळा तयार करावा.
अशाप्रकारे प्रत्येक माणसाने सर आपला घर मालकाचा विमा ( home owner insurance in marathi ) काढला तर त्याला अनेक नुकसान यातून वाचता येईल विमाचे आर्थिक मदत नक्की होईल
Visit Also : maymarathi.com
Tags : घरमालकासाठी विमा | Home Owner Insurance In Marathi ,Home Owner Insurance,Homeowners Insurance Definition,घरमालकासाठी विमा ,घर मालकाचा विमा
1 thought on “घरमालकासाठी विमा | Home Owner Insurance In Marathi 2022”