एकूण नफा विमा योजना | Gross Profit Insurance In Marathi 2022

एकूण नफा विमा योजना | Gross Profit Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण एकूण नफा विमा योजना म्हणजेच Gross Profit Insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Gross Profit Insurance In Marathi
Gross Profit Insurance

विम्याची रचना:

सर्वसामान्य माणसांच्या व्यवहार करतेवेळी काही ना काही नुकसान होतेच अशा वेळी व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला त्याच्या व्यवसाय ,नोकरी अनुसार नुकसान हे स्वतः च सोसावे लागते. कधीकधी यातून बाहेर पडणे हे मुश्किल होते .त्यामुळे जर या विमा योजनेचा उदय झाला असे म्हणता येईल ! यामुळे जरी नुकसान झाले तरी त्याच्या आर्थिक गोष्टींची झळ ही त्या व्यक्तीला न लागता प्रत्यक्ष विमा कंपनी ती झेलत असते व विमाधारक निर्धास्तपणे आपला उर्वरित व्यवसाय पुन्हा सुरू करू शकतो

एकूण नफा विमा योजना ( what is Gross Profit Insurance in marathi ):

विम्याचे प्रकार तर अनेक आहेत. पण त्यापैकी एक प्रकार हा आहे, ‘एकूण नफा विमा ‘योजना हा व्यवसाय व्यत्यय विमा शी थोडा मिळताजुळता आहे. आता आपण पाहू ,हा विमा नक्की आहे तरी काय? हा एकूण नफा ज्यावेळी काही कारणाने आपल्या भौतिक संपत्तीचे (जमीन, घर, कार्यालय) यांचे नुकसान झाल्यास त्याच्या नुकसानीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पैसे देऊन आर्थिक मदत करतो

विमाधारकाला एकूण नफा व विम्याची काय ?व कशासाठी? आवश्यकता भासते?

नैसर्गिक आपत्तीमुळे वादळ ,अति वर्षा ,भूकंप ,आग लागणे विमाधारकाच्या भौतिक संपत्तीचे नुकसान होते आणि त्याचे संरक्षण करणे त्याच्या अगदीच हाताबाहेर ची होऊन बसते. कारण, त्याची तीव्रता खूप असते. अशा वेळी झालेल्या नुकसानीची जबाबदारी विमा कंपनी आपल्याकडे घेत असते. त्यामुळे ही विमा योजना खरच गरजेचे आहे ,हो ना ?
काही कृत्रिम मानवनिर्मित कारणाने मुद्दामहून विमाधारकाच्या मालमत्तेला लक्ष केले जाते व त्याचे जाणून-बुजून नुकसान केले जाते. पण, अशा वेळी विमाधारकाने आधीच विमा योजना काढली असेल तर त्याला त्याचा खूप उपयोग होऊ शकतो.

एकूण नफा विमा योजनेची काही वैशिष्ट्ये समजून घेतली पाहिजेत :

1)भौतिक संपदेच्या नुकसानाची भरपाई करणे
2) झालेले नुकसान पाहून त्यानुसार त्याची भरपाई देणे
3) बाहेरच्या देशात युनायटेड किंग्डम वगैरेमध्ये उपयोगात खूप लोक करताना दिसतात
4) या योजनेमुळे नुकसान पाहून ते किती झाले असेल ?याची चाचपणी केले जाते .
5) एखाद्या व्यावसायिकाची नैसर्गिक आपत्तीमुळे इमारत कोसळली किंवा कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असेल, तर तो जेव्हा पुन्हा त्याची डागडुजी करून त्याची उभारणी करु पहात असतो तेव्हा विमा कंपनी आर्थिक संरक्षण वाढवते
6) विमाधारकाला तीन वर्षेपर्यंत आर्थिक संरक्षण हे विमा कंपनी देऊ करते

विमा योजना आणि आर्थिक संरक्षण ( Gross Profit Insurance in marathi ) :

★व्यावसायिकाला म्हणजेच विमाधारकाला त्याच्या आपत्तीच्या काळात आर्थिक सुरक्षा देणे हे विमा कंपनी करत असते
★व्यवसायिक जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सक्षम नसतो म्हणजे तो प्रयत्नात असतो त्या वेळी आर्थिक संरक्षणाची जबाबदारी विमा कंपनी घेत असते
★सामान्यता नुकसान भरपाई चे संरक्षण फक्त तीन वर्षे पर्यंतच असते
★ही योजना सर्व नुकसानभरपाई ना सुरक्षा देत नाही
★ या योजनेमध्ये नक्की कोणते फायदे मिळतात? हे निश्चित नसते

● एकूण नफा योजना कसा कार्यान्वित होतो ?
★आता आपण पाहिलं की एकूण नफा योजना कशा स्वरूपाचा असतो ?
★एखाद्या व्यवसायिकांच्या मालमत्तेचे झालेले नुकसान भरून काढण्याची जबाबदारी ही विमा कंपनी घेत असते
★आणि जर त्याच्या व्यवसायाचे कोणत्याही कारणास्तव नुकसान झाले असेल तर जसे त्याने बनवलेली उत्पादन जर खराब परिस्थिती किंवा आपत्तीमुळे फुकट गेले असेल तर विमा कंपनी या व्यवसायिक का चा नफा हा दरवर्षी किती मिळत असतो याचा विचार करते
★ तसेच त्याच्याकडे बनवून तयार असलेला माल ,काम करणारे कर्मचारी ,कच्चामाल याचि व सर्वात नंतर त्याला आपत्ती नसती आली तर किती नफा मिळाला असता?
★ याचं गणित बसवलं जातं आणि नंतर त्यांना पैशाच्या तुलनेत विमा कंपनी नुकसान भरपाई देते

नक्की वाचा : Burial Insurance In Marathi

एकूण नफा विमा योजना (Gross Profit Insurance in marathi ) :

  1. ★व्यवसाय ,व्यक्ती आपली आर्थिक प्रगती व्हावी व भरपूर पैसा मिळावा या हेतूने म्हणजे फायद्यासाठीच करतात .
  2. ★पण, त्याची दर वर्षाला एक चाचपणी केली जाते व सरासरी वर्षाला किती आर्थिक फायदा होत असतो? याचं गणित मांडले जाते.
  3. ★ विमा कंपनी अनेक धंदेवाईक कारखान्याद्वारे येणारे उत्पन्न व झालेला खर्च याची मोजदात ठेवून झालेला खर्च बाजूला करते व मिळालेला नफा किती ? व किती वेळा मध्ये मिळाला ?
  4. याचे गणित मांडतो
  5. ★ व्यावसायिकाला आर्थिक संरक्षण देताना तो व्यवसायिक आधीच बुडलेला असतो आणि असे असते वेळी त्याला मदत करावयाची झाल्यास विमा कंपनी व्यावसायिकाचे उत्पादन खर्च किती आला? व त्यासाठी लागणारे इतर खर्च? जसे की कर्मचाऱ्यांचा पगार, कच्चामाल किंवा उत्पादन बनवताना आलेला खर्च हे सर्व त्यातून बाजूला करते
  6. ★ नंतर ते उत्पादन किती रकमेचे विक्रीस जाणार होते ?त्याचा दाम? ही त्यातून कमी केला जातो व राहिलेली रक्कम ही फक्त नफा असे ठरवले जाते

काही महत्त्वाचे:

★ विमा योजनेतील उपयोगात येणारा फायदा व उत्पादन यांचे समीकरण कोणीच उलगडून सांगत नाही
★त्यामुळे विमाधारक अंधारातच राहतो आणि बहुधा त्याचे आर्थिक नुकसान होते
★ पण जोपर्यंत एखादी आपत्ती कोसळत नाही व विमा कंपनीकडे तो आर्थिक नुकसान भरपाई मागत नाही तोपर्यंत तो अनभिज्ञच असतो

संरक्षण:

1) विमा धारकाचे जे काही आपत्तीमध्ये नुकसान झाले आहे व जो काही व्यवसायाद्वारे फायदा ठरवला असेल व व्यवसायामध्ये उत्पादनासाठी जो खर्च झाला असेल त्याला मिळवले जाते व आपत्तीत गमावलेले उत्पन्न याचाही त्यात समावेश केला जातो
2) व्यावसायिकाला विमा कंपनीकडून मिळणारी रक्कम ही आधीच्या वर्षभरात झालेला फायदा याचा अंदाज घेऊनच दिला जातो

या एकूण नफा विमा योजनेत येऊ शकणारे काही अडथळे पुढील प्रमाणे:

★ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नफा नेमके कोणाला म्हणावयाचे? हे ठरविणे .
★कारण, विमाधारक व्यवसायिक व विमा कंपनी यांच्यातील नियम हे परिवर्तित होऊ शकतात
★ यात काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की- व्यावसायिकाचा व्यवसाय आपत्तीत सुरू आहे का ?किंवा सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे का ?किंवा नुकसान यामुळे पूर्ण टाळे लागले आहे का ?

एकूण सकल नफा विमा :

  • ही विमा योजना भारतापेक्षा परदेशात जास्त उपयोगात आलेली दिसून येते
  • या विमा योजनेमध्ये व्यावसायिकाला पुर्ण फायदा किती झाला?
  • म्हणजे विकत गेलेला माल व तो किती रुपयात खरेदी केला गेला?
  • या विमा योजनेद्वारा व्यावसायिकांच्या पूर्ण नफा कमी होत जातो, कारण तो नुकसान खर्चातून काढलेला असतो.
  • यामध्ये हप्तेही अधिक असतात
  • व त्यांची किंमत ही जास्त असते
  • म्हणजे तो महाग व खर्चिक म्हणून गणला जातो

एकूण कमाई विमा योजना:

  • व्यावसायिक विमाधारकाला जास्त पैसे घालवावे लागत नाहीत
  • या विमा योजनेचे हप्ते कमी असतात व रक्कम ही कमीच असते
  • कारण नुकसान भरपाई म्हणून आर्थिक संरक्षणही विमा कंपनीद्वारा विमाधारकाला कमीच मिळते.

निष्कर्ष

★अशी ही एकूण नफा योजना आहे .ही योजना व्यावसायिकाने घेतली तर आपत्तीनंतर त्याला किती फायदा होतो? याचा नक्की विचार करावा व जास्तीत जास्त नियम व अटी पाहून व आपत्तीनंतर आपल्याला होणारे संरक्षण किती मिळेल?
याचा अंदाज घेऊनच ही विमा योजना घ्यावी.

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण एकूण नफा विमा योजना | Gross Profit Insurance  बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Reed Also : Maymarathi.com

Tags : एकूण नफा विमा योजना | Gross Profit Insurance एकूण नफा विमा योजना | Gross Profit Insurance In Marathi

1 thought on “एकूण नफा विमा योजना | Gross Profit Insurance In Marathi 2022”

Leave a Comment