कार्यक्रम विमा( इव्हेंट इन्शुरन्स) | Event Insurance India In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण कार्यक्रम विमा ( इव्हेंट इन्शुरन्स) म्हणजेच event insurance india in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

◆ आपण शाळेत शिकत असू किंवा नोकरी करत असू अथवा घरातील सण-समारंभ असू दे.
आपण पहिली त्याची एक रूपरेखा तयार करत असतो.
आणि नंतरच कार्यक्रम करण्याचे ठरविले असतो.
अर्थात कार्यक्रम छोटा असो वा मोठा आपण त्याचे भविष्यातील धोके ,अडचणी आणि समस्यांकडे ही दूरदृष्टीने पाहिले पाहिजे !
नाहीतर आपण आनंदच कसा आणखी साजरा करता येईल?
याकडे लक्ष देत राहिलो तर आणि अचानक काही आपत्ती येऊन कोसळली मग मात्र हक्का- बक्का मनुष्य होऊ.
व सर्व कार्यक्रमाचा आनंदच निघून जाईल!
म्हणूनच आपण त्यातील धोके ओळखून आधीच त्यादृष्टीने ही पावले उचलली पाहिजेत,
हो ना ??
आणि महत्त्वाचा व मोठा कार्यक्रम असेल, तर त्या कार्यक्रमाचा विमा काढला तर उत्तमच! नाही का??
कार्यक्रम विमा ( event insurance india in marathi ) :
आपल्या सर्वांच्या आयुष्यात छोटे-मोठे कार्यक्रम येतच असतात .
आनंदही आपण साजरा करतो व दुःखात ही सर्वजण सहभागी होतात .
अशा वेळी ऑफिसमधील मीटिंगचं शाळा-महाविद्यालयातील छोटे समारंभ, मेळावे, विवाह, विविध खेळांचे कार्यक्रम अशा कार्यक्रमात खूप जण एकत्र येतात व विचारांची देवाणघेवाण तर होतेच.
पण ,अशा या कार्यक्रमाला समस्या पासून किंवा तोट्या पासून वेगळे करायचे असल्यास आपण कार्यक्रम विमा काढावा.
कार्यक्रम विमा कोणासाठी काढू शकतो:
आपला कार्यक्रम ज्याठिकाणी चालला आहे त्या जागेसाठी आपण विमा काढू शकतो.
किंवा लग्नविधी तसेच इतर स्नेहसंमेलन ,नैसर्गिक किंवा अन्य कारणामुळे, अचानक व्यत्यय आणावा लागला तर ??
ही विमा योजना आर्थिक खर्चाच्या नुकसानीसाठी मदत करू शकते .
ज्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे त्या विमाधारकाला शारीरिक दुखापत झाली असेल किंवा कार्यक्रमातील काही गोष्टींची काही कारणाने नासाधुस झाली किंवा मोडतोड झाली अशा अनेक गोष्टींकरिता आपण कार्यक्रम विमा काढू शकतो.
व त्याची खूपच आपल्याला मदत होऊ शकते .
आता त्या मुद्द्यांना आपण स्पष्ट करू:
★ एखादा कार्यक्रम आपण खूप विचार करून ठरविला असतो, अनेकांची वेळ, मुहूर्त सर्व पाहून तो दिवस ठरवून स्थळ आपण ठरवून टाकतो .
★एखादा हॉल किंवा शाळा जरी असली तरी त्याचे काही रक्कम आधीच आपल्याला भरावी लागते व ती जागा बुक करावी लागते.
★ अचानक काही स्वतःच्या शारीरिक इजेमुळे किंवा काही कारणास्तव काही काळासाठी किंवा पूर्णपणे तो कार्यक्रमच रद्द केला गेला तर त्याचा आर्थिक दंडही भरावा लागू शकतो
★ पण अशावेळी ही कार्यक्रम विमा आपल्या नक्कीच मदतीस येऊ शकतो.
संभाव्य नैसर्गिक धोके:
★ नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंपामुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे कार्यक्रमाच्या जागेची पडझड झाली किंवा आग लागून ती जागा भस्मसात झाली अथवा वस्तूंचे नुकसान झाले तर ही विमा योजना त्याला मदत करते.
या नैसर्गिक गोष्टींना संरक्षण नाही:
ज्वालामुखी फुटणे, चक्रीवादळ किंवा यासारख्या घटना आणि मानवी जीवन अस्ताव्यस्त होते.
अशा वेळी विमा आधार देत नाही.
विमा या गोष्टींसाठी मदत करतो:
★ कार्यक्रम रद्द झाला किंवा पुढे ढकलला गेल्यास काही हॉलचे व्यवस्थापन किंवा इतर आयोजक आधी घेतलेली रक्कम परत देण्यास का -कू करतात व त्याची भरपाई ही विमा कंपनी आपल्या अंगावर घेते .
★कार्यक्रमासाठी मौल्यवान किमती गोष्टींचा संचय केलेला असतो अशा वेळी तेथील गोष्टींची चोरी झाली तर आर्थिक सहकार्य विमा कंपनी देऊ करते.
★ अपघात झाला व त्यात विमाधारक किंवा त्याच्या जवळच्या सख्या नातेवाईक काचा मृत्यू झाला किंवा तो जखमी झाला ,तसेच काही काळापुरते किंवा कायमचे त्याला अधुत्व आल्यास त्याची भरपाई हे विमा कंपनी पैशान मार्फत करते.
या गोष्टीला विमा संरक्षण मिळत नाही:
- विमा रक्कम मिळवण्यासाठी काही वेळा विमाधारक हा स्वतःच नुकसान घडवून आणू शकतो व ते सिद्ध झाल्यास मात्र विमा कंपनी त्याला कोणतेही संरक्षण देण्यास तयार नसते.
- कार्यक्रमाचा मुख्य यजमान असते वेळी तो जर हरवला किंवा विवादास्पद स्थितीत सापडत नसेल तर ही त्यासाठी विमा कंपनीकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही.
- कार्यक्रम स्थळी एखादे मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक संसाधन खराब झाले असल्यास त्याचीही जबाबदारी विमा कंपनी आपल्यावर घेत नाही.
- कधी-कधी कार्यक्रमासाठी आणलेल्या वस्तू आधीच संग्रही ठेवून दिल्या जातात व त्यामुळे घरी ठेवून शकल्याने त्या घराबाहेर अशाच काळजी न घेता ठेवलेल्या असतात
- खराब हवामानाचा ही त्याच्यावर परिणाम होतो पण त्याची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास तयार नसते
- विमाधारकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई ही विमा कंपनीकडून मिळत नाही.
शारीरिक दुखापत व विमा नुकसान भरपाई :
★एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यापूर्वी किंवा कार्यक्रमात एखाद्या आजार किंवा रोगामुळे विमाधारक ग्रस्त झाला तर ही विमा कंपनी आर्थिक मदत करण्यास उत्सुक नसते.
★ कार्यक्रमाच्या ठिकाणी अणू- रचनात्मक कार्या मुळे उध्वस्त झाले असेल किंवा त्यातून निघणाऱ्या किरणा मुळे काही क्षती झाल्यास विमा कंपनी त्याची नुकसानभरपाई देऊ शकत नाही.
★ आज कालची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहिली तर युद्धाच्या काळात एकाच वेळी पूर्ण काजळी आलेली दिसते अशावेळी कार्यक्रमात युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यत्यय आला असेल, तर ही विमा कंपनी नकार देऊ शकते.
मानवनिर्मित धोके व कंपनीचे सहकार्य नाही:
★ युद्ध ,हल्ले या कारण असतील तर विमा कंपनी मदत करण्यास नकार देते.
★ पण आक्रमक व्यक्ती/ समाजविघातक माणसे एकत्रित होऊन मोर्चा, आंदोलन किंवा व त्यावरून कार्यक्रम उधळण्याचे काम करत असतात. अशा मुळे झालेल्या नुकसानाचा विमा कंपनी बाध्य नसते.
★ विमाधारकाच्या वैयक्तिक काही कारणामुळे त्याला पोलिस कस्टडीत रहावे लागते किंवा बँके संबंधी कर्जाच्या संबंधित त्या ठिकाणच्या संस्थेने कार्यक्रम स्थळ किंवा मालमत्ता व आपले वर्चस्व दाखवले तर विमा कंपनी त्यात पडत नाही.
★ विमाधारक स्वतः विमा धारकाची मानसिक आर्थिक किंवा शारीरिक परिस्थिती नीट नसेल त्यामुळे स्वतःचा जीव गमवायचा त्याने प्रयत्न केल्यास विमा कंपनी अशा गोष्टीत आर्थिक मदत करत नाही
★ विमाधारकाला वाईट व्यसन किंवा ड्रग्स सारख्या अंमली पदार्थांच्या सेवनामुळे झालेल्या नुकसानी सही विमा कंपनी बाध्य ठरत नाही
कार्यक्रम स्थळ व अडचणी:
★ कार्यक्रम स्थळ म्हटले की अनेक जण शेकडो ते हजारोच्या संख्येने उपस्थित असतात अशावेळी नियोजन किती व कस करणार?
काहीतरी गालबोट लागणारच ना?
★ कार्यक्रम म्हटले तर वाहतूक व्यवस्थाही आली त्याच वाहनांची पार्किंग बाबत समस्या निर्माण होऊन काही सरकार द्वारे दंड आकारला जाऊ शकतात किंवा कारवाई केली गेल्यास आर्थिक नुकसान भरावी लागते विमा कंपनी या गोष्टी ना मदत करत नाही.
तृतीय पक्ष व विमाभरपाई:
विमा हा नुकसानीत संरक्षण देण्याचे काम करत असतो
विमाधारक स्वतः नुकसान ग्रस्त असेल तर त्याची भरपाई होते. परंतु विमाधारका मुळे इतर कोणाचे (तृतीय पक्ष ) नुकसान झाले व त्याची भरपाई करण्याची पाळी विमाधारकावर आली तर विमा कंपनी विमाधारकाच्या वतीने भरपाई देण्यासाठी काही रक्कम देऊन मदत करते.
विमाधारकाच्या एखाद्या कृतीमुळे तृतीय पक्षास शारीरिक दुखापत झाली तसेच त्याच्या स्थावर संपत्तीला हानी पोहोचली किंवा काही खटले व रुग्णालयाचा खर्चही उचलावा लागल्यास विमाधारका द्वारे विमा कंपनी तो खर्च उचलते.
इव्हेंट व्यवस्थापक म्हणून विम्याची मदत:
★ कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणून जर कार्यक्रम विमा काढला गेला असेल तर ही विमा कंपनी कार्यक्रमाच्या ठिकाण व तेथील भौतिक संपत्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेत असते
★ व्यवस्थापक म्हणून खूप गोष्टींची धोके समोर असतात
★ नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित आपत्ती व त्याचे अनेक पडसाद या व्यवस्थापकाला भोगावे लागतात
★त्याचे त्यात आर्थिक नुकसानही झाल्यास ते भरून काढले जाते
नक्की वाचा : Hull Insurance In Marathi
व्यवस्थापकांना संरक्षण:
कार्यक्रम जर वर्षभरासाठी चा असल्यास त्या कालावधीसाठी काही आपत्ती किंवा अडथळा साठी कंपनी कार्यक्रम व्यवस्थापकाला आर्थिक मदत करू इच्छिते
इतर दायित्व संरक्षण :
जे कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासंदर्भात कार्य करत असतात त्याने अनेक प्रकारच्या धोक्यासाठी सार्वजनिक दायित्व विमा व इतर प्रकारच्या लायबिलिटी कव्हर घेणे आवश्यक ठरते
सार्वजनिक दायित्व विमा व संरक्षण :
- एखादे प्रशिक्षणाचे वर्ग व त्याच्या व्यवस्थापकास मदत होऊ शकते
- चित्रपट किंवा कार्यक्रमाच्या संगीताचे व्यवस्थापन कक्ष
- काही शिकवण्या वर्ग
- स्पर्धेसाठी तयार करण्याचे प्रशिक्षण संस्था
- इत्यादी कार्यक्रम
विमा ची गरज ( event insurance india in marathi ) :
1) कार्यक्रमाचे व्यवस्थापन म्हणजे जे काम पाहत असतात त्यांच्यासमोर अनेक छोट्या-मोठ्या अडचणी उभ्या असतात त्यातून काही नुकसान झाल्यास विमा आर्थिक बाबतीत संरक्षण देतो
2) व्यवस्थापक मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांसाठी कार्यक्रम आयोजित करत असतो त्यात घाईगडबडीत त्यांच्या मालकीची भौतिक संपत्ती किंवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कामगारांना द्वारे कुणासही त्रास झाला त्याच्यासाठी ही त्याला पैसे भरावे लागू शकते ती जोखीम विमा कंपनी उचलते
इव्हेंट किंवा कार्यक्रम :
काही औपचारिक कार्यालयीन असतात अशा वेळी देण्यात येणार्या पार्ट्या ड्रिंक सर्व करणं सामान्य झाले आहे
एखाद्या व्यक्तीकडून जाणून-बुजून वयाने लहान असलेल्या ना जर मदय दिले गेले तर तो एक गैर प्रकार मानला जाऊ शकतो अशा वेळी हे काही मदत विमा योजना करू शकते .
कार्यक्रमातील बदल:
कार्यक्रमाच्या एन वेळी वातावरणात होणाऱ्या बदलामुळे कार्यक्रम अचानक बंद किंवा रद्द केला जाऊ शकतो
त्यासाठी आयोजित केलेल्या गोष्टींचा खर्च ही व्यवस्थापकाच्या माथी पडू शकतो
जसे मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांसाठी नाश्ता, जेवण याची तयारी वर केलेला खर्च
त्यांना नेण्या- आणण्यासाठी भाडेतत्त्वावर आणलेल्या गाड्या या सर्व खर्चाचा बोजा कोण उचलेल??
हा मोठा प्रश्न विमा योजना स्वतःचीच जोखीम उचलून सोडवते.
वाद-विवाद व भांडणे:
बहुतेक वेळा खूप प्रमाणात माणसे आलेली असल्यास वादविवाद, भांडणे, मारामारी ही होऊ शकते व त्यानंतर विमाधारकाच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वतः व्यवस्थापक किंवा त्याच्या मदतनिसांना जर प्रत्यक्षपणे शारीरिक आघात सहन करावा लागू शकतो
त्या वेळी सुद्धा ती जोखीम ही विमा कंपनी आपल्या खांद्यावर घेते व विमाधारक व्यवस्थापक वर असलेले मोठे आर्थिक दडपण आपल्या मदतीने ती हलके करू शकते.
◆ अशा प्रकारे जर लहान किंवा मोठे कार्यक्रम आयोजित करत असाल किंवा कार्यक्रम व्यवस्थापक म्हणून तुम्ही भूमिका निभावत असाल तर नक्की कार्यक्रम विमा काढा.
पण …… ….त्याआधी काळजीपूर्वक त्याच्या अटी, नियम वाचा !
उत्साहाच्या भरात विमा योजना घेऊन हप्ते भराल व नंतर आपत्ती आल्यावर तुमच्या विमा योजनेत त्या आपत्तीचे कुठेही नामोनिशान नसेल तर नुकसान भरपाई तुम्हाला कशी मिळेल??
Visit Also : Hindishaala.in
Tags : कार्यक्रम विमा( इव्हेंट इन्शुरन्स) | Event Insurance India In Marathi
1 thought on “कार्यक्रम विमा( इव्हेंट इन्शुरन्स) | Event Insurance India In Marathi 2022”