विमा दलाल व त्याची कर्तव्य | Duty Of Insurance Agent In Marathi 2022

विमा दलाल व त्याची कर्तव्य | Duty Of Insurance Agent In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण विमा दलाल व त्याची कर्तव्य म्हणजेच duty of insurance agent in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

duty of insurance agent in marathi

विमाधारक ज्यावेळी विमा कंपनीकडून विमा योजना खरेदी करत असतो, त्यावेळी त्याच्या व कंपनीतील दुव्याचे काम हा त्याचा विमा एजंट म्हणजेच विमा दलाल हा करत असतो . कारण तो कंपनीचे एक प्रकारे प्रतिनिधित्व करत असतो. विमाधारकाला वेगवेगळ्या विमा योजनांची ओळख करून देणे व त्यातील एखादी विमा योजना त्याने घ्यावी म्हणून महत्त्वही पटवणे हे त्याचे काम असते. तसेच विमाधारकाच्या वतीने कंपनीकडे विमा दावा दाखल करणे किंवा आपत्तीच्या काळात विमा कंपनीकडून नुकसान भरपाई विमाधारकाला देववणे हे होय तर असा हा विमाधारकाच्या मार्गदर्शकाबद्दल आता आपण जाणून घेऊया-

विमा दलाल | Insurance broker

विमा दलाल करतो तरी काय? त्याची कर्तव्य कोणती? | what is duty of insurance agent in marathi
तर –
1) विमा दलाल हा विमाधारक ग्राहकांना विमा योजना साधने व सेवा बद्दल माहिती देत देण्याचे काम करत असतो
2) व त्या योजना जवळजवळ खरेदी करण्याशी तो त्यांना भाग पाडतो .
3) विमाधारक ग्राहकांना चांगल्या पैशाच्या गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करतो
4) तसेच त्या व्यवसायाच्या दरम्यान विमाधारकाच्या कुटुंब व त्याच्या मित्र परिवार ,व्यापार यामध्येही तो सहभागी असतो.
5)कारण प्रत्येक गोष्टीवर व्यक्तीमार्फत अनेक विमा योजना पुरवण्याचे त्याचे कारण त्याला काम मिळू शकते.

विमा एजंटने घ्यावयाची काळजी | Care to be taken by the insurance agent

आता विमा दलाल पण वर म्हटल्याप्रमाणे विमाधारक व विमा कंपनी मधला दुवा असतो, अशा वेळी त्याने दोघां ना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे व दोघांचीही त्याचे संबंध हे दृढ व आपलेपणाने घट्ट करणे त्याला जमले पाहिजे यासाठी विमा दलालाने काय काळजी घ्यावी?

1) प्रत्येकाशी त्याने संपर्कात राहून एक चांगले नाते बनवलेत पाहिजे
2) तसेच विमाधारक ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार वर्तमान विमा व्यवसायात असलेल्या नवनवीन योजना त्याने त्याला सांगितल्या पाहिजेत
3) सध्याच्या घडामोडी व त्याचे होणारे दूरगामी परिणाम तसेच त्यादृष्टीने होणारी विमा योजनेची जडण-घडण वगैरे यावर त्याचे बारीक नजर असली पाहिजे
4) बाजारी धोरण प्रत्येक वेळी विमाधारक ग्राहकाच्या पसंतीनुसार लक्षात घेऊन पुन्हा पुन्हा बनवले पाहिजे
5) वेगवेगळ्या योजना तयार करणे गरजेचे आहे
6) मुख्य म्हणजे त्याने स्वतःला असे परिवर्तित केले पाहिजे की सामाजिक संबंध त्याने आणखी जोडले जाऊन टिकले ही पाहिजे
7) जास्तीत जास्त ग्राहक त्याचे विमाधारक Insured बनले पाहिजे.

जीवन विमा एजंट | Life insurance agent

हा विमा दलाल जीवन विमा योजना व त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जनरल विमा योजना ही विकू शकतात.
आता त्या कोणत्या विमा योजना?
1) दीर्घकालीन काळजी विमा
2) घरफोडी विमा
3)आरोग्य विमा
4) ॲक्सिडेंट इन्शुरन्स तसेच
5) लाइफ इन्शुरन्स………
अशा अनेक पैशाच्या विमा योजनेची विक्री होते.

जीवन विमा दलाल कमाई | Earnings from life insurance brokers

जीवन विमा दलालाना अनेक प्रकारे पैसे कमावण्याच्या संधी आहेत आणि त्यासाठी कोणत्याही अटी नाहीत.
विमा दलालाने जी कमावलेली आर्थिक रक्कम ही एकाकडून दुसऱ्या दलाला मध्येही परिवर्तित होऊ शकते .
विमा दलालाने प्राप्त केलेल्या विक्री व त्यांच्या परिणामांवर तो अधिक कमाई करू शकतो.
तसेच विमा दलालाच्या कमाईच्या आनंदाचा बद्दल कोणत्याही लिमिटेशन नाहीत व यासाठी विमा दलालाला आपल्या विमाधारकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आजच्या व्यापारातील तिचा योग्य व नीट माहिती पाहिजे.
त्यामुळे तो नीट समजावून देऊ शकतो.

नोकरी | Job

1)विमा दलाल म्हणून जर नोकरी करायची असेल तर त्याला आपला अनुभव व ज्ञानाच्या कक्षा हे वाढवायला हव्यात .
2) तसेच संवाद कौशल्य Communication skills ही उत्तम असायला हवे
3)कारण विमाधारकाला आपल्या उत्तम संवाद कौशल्य व आपला मुद्दा पटवून देण्याची कला अवगत हवी
4) जर नोकरीमध्ये ही आणखीन प्रगती करण्याची त्याची इच्छा असेल तर त्यातच स्पेशलायझेशन Specialization करण्याबाबत विचार करू शकतो.

विमा दलाल व त्यांच्या जबाबदाऱ्या – | duty of insurance agent in marathi

विमा जलाला च्या जबाबदाऱ्या म्हणजे

  1. विमाधारक ग्राहकांशी चांगल्या संपर्कात राहून एक आशावादी संबंध निर्माण केले पाहिजे
  2. वेळोवेळी त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा Review of the current situation घेत राहिले पाहिजे
  3. त्यांच्या गरजा यांचाही विचार केला पाहिजे
  4. काही विमा धारकांवर आपत्तीजनक परिस्थिती ओढवल्याचे हे समजलं तर त्याला धीर देऊन विमा दावा करण्याची सर्वतोपरी मदत करावी
  5. वेगवेगळ्या विमा योजना आहेत त्याची परस्पर तुलना करून त्याची माहिती त्यांना द्यावी
  6. व प्रत्येकाचे वैशिष्ट्येही Features too समजावून सांगावे
  7. ग्राहक हा तसा प्रत्यक्षपणे विमा कंपनी पेक्षा विमा दलालाच्या संपर्कात असतो व त्याच्यावर विश्वास ठेवून तो विमा योजना घेतो
  8. यामुळे त्याच्या प्रत्येक अडचणी व तक्रारी तुम्ही बांधिलकी ठेवली पाहिजे
  9. त्याच्या सर्व शंकांचे समाधान तुम्हाला करता आले पाहिजे
  10. वेळोवेळी ग्राहक विमा धारकांची मीटिंग घेत असावा
  11. व नवनवीन विमा संदर्भातील बातम्या किंवा माहिती जाणून त्यांना ते देत राहावी .
  12. तसेच नवनवीन गोष्टी त्याने शिकाव्यात.

विमा उद्योग व विमा दलाल | Insurance industry and insurance brokers

एखाद्या विमा दलाला जर या क्षेत्रात काम करावयाचे असेल तर त्याने अनेक गोष्टींचा विचार करावा.
काही गोष्टी अंगी बाणवाव्यात .

लाइफ इन्शुरन्स एजंट विमाधारकांना आकस्मिक आपत्तीत कसं विम्याचे आधारे स्थिर राहता येईल?ते तो त्यांना शिकवतो
व त्यासाठी त्याला काय कर्तव्य निभवाभावी लागतात तेही पाहूया-

1)जीवन विमा योजना विमा धारक ग्राहकांना खरेदी करण्यास भाग पाडतो
2)विमाधारकावर आपत्ती आल्यास त्याला जास्तीत जास्त गरज ही विमा दलाला चीच असते
3) त्याच्या द्वारे विमा दावा होऊन नुकसान भरपाई मिळू शकते
4) त्यामुळे त्याला त्याच्या प्रतिकूल Adverse परिस्थितीत विमा कंपनीची आर्थिक सहाय्य मिळवून द्यावी
5) जीवन विमा दलाल असल्यामुळे त्याच्या विमा योजना मध्ये पसंती व कसब असणेही गरजेचे असते

विमा दलाल व विमाधारक संवाद | Communication between insurance broker and insured

1)जीवन विमा दलाल हा सतत लोकांच्या संपर्कात असतो
त्यामुळे फोन मेल ईमेल किंवा इतर सोशल मीडियाद्वारे ही तो विमा धारकाची बोलत असतो
माहिती प्रदान करत असतो
2)विमाधारका ना नवनवीन माहिती देणे, त्यांना भेटणे
3) तसेच विमाधारक ग्राहकांना बैठकीद्वारे प्रत्यक्ष भेटून विमा योजनेची उद्दिष्टे व संरक्षण या गोष्टीवर बोलले पाहिजे
4) विमा व्यापारात अनेक दस्ताऐवज Documents गरजेचे ठरतात
5) विमा योजनेवर लोन घ्यायचे असल्यास पुन्हा कागदपत्रात अनेक परिवर्तन करणे भाग पडते
6) व सर्व जतन केलेल्या रेकॉर्ड्स मध्ये पुन्हा बदल करावा लागतो
7) विमाधारकांना त्याच्या आवश्यकतेनुसार चांगल्यात चांगली साधने देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा
8) तसेच विम्याच्या हप्त्याची रक्कम ठरवताना हि तो योग्य प्रमाणात कशी धरायची किंमत ठरवतो याकडेही त्यांनी लक्ष द्यावे.

जीवन विमा दलाल व क्षेत्र | Life insurance brokers and areas

जीवन विमा योजनेतील दलाल म्हणून पूर्णपणे स्वतंत्र हेच काम करावयाचे झाल्यास फक्त विमा लायसन साठी असलेल्या परीक्षा देऊन भागत नसते तर त्याला अनेक गोष्टीचे ज्ञान घेऊन काही गुण अंगी बनवावे लागतात नवनवीन विमा उद्योग क्षेत्रातील ज्ञान हे अपडेट ठेवावे लागते कारण समोरच्या विमाधारक ग्राहक हा तोडीस तोड असा अभ्यासही असे शकतो व कोणताही प्रश्न त्याने विचारला तर आपल्याला त्याची समाधानकारक उत्तरे देणे आवश्यक असते

आपले ज्ञान तो कसे वाढवू शकतो | How can he increase his knowledge?

या क्षेत्रातील ज्ञान वाढविण्यासाठी त्याला पुस्तके ,वर्तमानपत्रे, सोशल मीडिया अनेक विमा संदर्भातील चर्चासत्रे ,संमेलन या सर्वांमध्ये भाग घेतला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांच्या वगोतावळ्यातही त्यांनी राहिले पाहिजे, कारण समाजातील त्यांचे असणारे स्थान किंवा प्रतिष्ठा त्याचे व्यक्तिमत्व व जडण-घडण त्याला आपल्या उद्योगात यशस्वी किंवा अयशस्वी करू शकले.

नक्की वाचा : Precautions In Insurance In Marathi

रोजगार व रस्ते | Employment and roads

  • विमा दलाल म्हणून काम करते वेळी त्याला अनेक रस्ते समोर खुले होताना दिसतात.
  • एक तर स्वतंत्र जीवन विमा दलाल बनवणे व
  • दुसरा म्हणजे बंदी विमा दलाल दलाल म्हणजे एखाद्या विशिष्ट विमा कंपनी करिता काम करत असतो व फक्त त्या कंपनीची साधने व उत्पादनाची माहिती देऊन त्याचा प्रसार व प्रचार करून विमाधारकाला विमा योजना घेण्यास भाग पाडत असतो .
  • तो एका नोकरीकरिता हे काम चालू करतो व कंपनीला तो बांधील असतो. त्या कंपनीचे नियम, अटी त्याला भविष्यासाठी मान्य असतात. परंतु स्वतंत्रपणे आपला विमा दलाल म्हणून व्यवसाय पाहणारा विमा दलाल आपल्याला मिळणाऱ्या कमिशन करिता कार्य करत असतो व अनेक वेगवेगळ्या कंपनीशी त्याची बांधिलकी ठेवून ,विमा योजना तो विकत असतो मग त्याच्यावर तसे बंधन काही नसते. विमाधारक व त्याच्या परिस्थितीशी किंवा त्याच्या व्यवसायाशी आवश्यक विमा योजना शोधून तो योग्य कंपनी किंवा दोन कंपन्यांमधून योग्य दर, संरक्षण देणारी विमा योजना विमाधारकाला निवडून देऊ शकतो .
  • या दोन्ही गोष्टीत कार्य करणाऱ्या विमा दलालांना लाभ प्राप्त होतो अर्थात चॅलेंजर्स ही असतातच जो बंदी एजंट म्हणजे कंपनीतर्फे विमा दलाल बनलेला असतो त्यालाही लाभ मिळण्यात येतात जसे त्याच्या कार्यालयाचे पैसे त्यातून मिळतात व त्याला पेन्शन जीवन व आरोग्य विमा तसेच नवनवीन ट्रेनिंग New training घेतल्यामुळे क्रेडिट युनियनचे सदस्य बनण्याचे लाभही मिळत जातात. काही अशा बंदी विमा दलाला ना पगार दिला जातो व यांना काही गोष्टींमध्ये सीमारेखा निर्माण केलेल्या असतात .
  • फक्त त्यांच्या विमा कंपनीच्या त्यांना विमा योजना विकायचे असतात पण स्वतंत्र विमा दलाला जवळ अनेक कंपनीच्या अनेक ऑफर असतात.
  • त्यामुळे तो विमाधारक ग्राहकांना चांगल्यात चांगली योजना देऊन सेवा देऊ शकतो व त्यामुळे विमा धारकाची गरज व संरक्षण तसेच इतर व कंपनी सर्वांशी त्याला तुलना करून विमाधारकाला भेट देता येते व अनेक कंपन्या असल्यामुळे विमाधारकाला समजावताना जास्त पर्यायही त्याच्याजवळ उपलब्ध असतात.

विमा दलाला जवळचे कसब | The closest thing to an insurance company

आता विमा दलाल म्हणून कोणत्याही प्रकारचे दलाल बनले तरी ही ते कसे यशस्वी होऊ शकतील याकडे विमाला ने आपले पूर्ण लक्ष केंद्रित करावे व विमा दलाल म्हणून त्याच्यासाठी हवी असणारे कौशल्य कसब त्याने अंगी बाणवावी ती कोणती याबद्दल आपण पाहूयात

1)जीवन विमा दलालाचे व्यक्तिमत्व हे सोशल हवे म्हणजे अनेक लोकांशी चांगली ओळख असायला हवी
2)वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रातल्या लोकांशी त्याला सुसंवाद साधता आला पाहिजे
3) विमाधारकाच्या मरण पावल्यावर ही त्याला मिळणारा जीवन विम्याची द्वारा लाभ त्याच्या कुटुंबाकडे त्याने सुपूर्त करावा
4)त्यांना विमा दावा करण्यास मदत करावी
5)एरवीही विमाधारक ज्यावेळी अडचणीत किंवा नुकसान ग्रस्त असेल तर त्वरित नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळवून देण्याकरीता त्यांनी सक्रिय असावे
5) संवाद कौशल्य तसेच सकारात्मक विचार व प्रत्येक व्यवसायाकडे पाहून दूरदृष्टी ही असावी
6)प्रत्येक विमाधारकाला त्याच्या विमा योजनेची साध्या ,सोप्या भाषेत माहिती देणे त्याला जमले पाहिजे

तंत्रज्ञान आजचे युग | Today’s age of technology

हे संगणकीय असे युग आहे छोट्यात- छोट्या , व मोठ्यात- मोठ्या गोष्टी माहिती आपल्याला या सोशल मीडिया Social media वरून समजतात
त्यात सक्रिय राहावे लागेल.
नवनवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे लागेल. मेल ,ई मेल Email करणे ,फोन कॉल्स Phone Calls

असे हे आपल्या विमा योजनेचे विमा दलाल असतात त्यांची कर्तव्ये Duties ही खूप असतात .त्यांच्या या क्षेत्रात त्यांना नवनवीन संधी New opportunities हि मिळत असतात व पर्यायही उपलब्ध असतात नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसाय ते करू शकतात. एखाद्या कंपनीशी जोडून राहणे किंवा स्वतंत्रपणे व्यवसाय करणे हे ते ठरवून आपापल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. त्यात त्यांचे कसंब, हुशारी सामंजस्य व समाजाशी जुळवून घेणे हे आवश्यक आहे.

Visit Also : maymarathi.com

अजच्या या आर्टिकल मध्ये आपण विमा दलाल व त्याची कर्तव्य | Duty Of Insurance Agent बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा.

Tags : विमा दलाल व त्याची कर्तव्य | Duty Of Insurance Agent,विमा दलाल व त्याची कर्तव्य | Duty Of Insurance Agent In Marathi 2022 विमा दलाल व त्याची कर्तव्य | Duty Of Insurance Agent In Marathi 2022

1 thought on “विमा दलाल व त्याची कर्तव्य | Duty Of Insurance Agent In Marathi 2022”

Leave a Comment