रोख मूल्य विमा योजना | Cash Value Life Insurance In Marathi 2022

रोख मूल्य विमा योजना | Cash Value Life Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण रोख मूल्य विमा योजना म्हणजेच cash value life insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Cash Value Life Insurance In Marathi
Cash Value Life Insurance

सर्वसामान्य माणूस व पैसा:

 • माणसे आपल्या पोटापाण्यासाठी अनेक प्रकारची कामे करत असतात
 • त्यातून मिळणाऱ्या या पैशातून ते आपले व आपल्या कुटुंबियांचे उदरनिर्वाह करत असतात
 • तसेच आपली छोटी -मोठी स्वप्ने ही पूर्ण करण्याचा प्रयत्न ही त्यांचा असतो
 • सर्वच माणसे काही अधिक पैसा कमवू शकत नाही कोणी नोकरी करत असतात तर ,कोणी व्यवसाय करतात
 • आपापल्या ठिकाणी ते अनेक स्तरांवर संघर्ष करत शिकत आपल्या ध्येयाप्रत पोहोचत असतात

स्वप्ने व आशावाद:

 • माणसे मध्यम वर्ग असो किंवा श्रीमंत सर्वांना स्वप्न पाहण्याचा अधिकार तर आहेच!
 • यामुळे प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार स्वप्न पहात असतात
 • पण कधी-कधी चाळीत राहणारी किंवा वन रूम किचन मध्ये वास्तव्य करणारी माणसे ही मोठी स्वप्ने पाहतात
 • तेव्हा त्यांच्या दुर्दम्य आशावादाकडे कसे पाहावे? हेच कळत नाही
 • निराशावादा चे चित्र हे पुसले जाऊ शकते . आणि ते कसे ??★विमा च्या साह्याने ! मग आपण ओळख करून घेऊ आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागणारे पैसे आपल्याला कोण देऊ शकेल!त्याची.

रोख मूल्य विमा : स्वप्नांची चावी ( cash value life insurance in marathi )

 • हो ,आपल्या स्वप्नांची चावी! असे या विम्याला म्हटले तर अगदी खोटे होणार नाही .
 • ज्या विमाधारकाने रोख मूल्य विमा काढला असेल त्यांना याची प्रचिती असेलच
 • तर हा रोख मूल्य विमा म्हणजे आहे तरी काय ?
 • ते आपण पाहूया .

★आपल्याला काही कामासाठी लागणारी रोख रक्कम या विमा योजने द्वारा आपण घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला अचानक लागणाऱ्या रकमेसाठी कुठे जाण्याची गरज नसते आपल्याला हवी तेव्हा या विमा योजनेद्वारा नियमित प्रीमियम भरल्यामुळे रोख रक्कम मिळू शकते

रोख मूल्य विमा योजना एक ओळख:

 1. रोख मूल्य विमा योजने चे ‘कायम जीवन’ हेही नाव घेतले जाते
 2. ही विमा योजना जीवन विमा चाच एक प्रकार आहे
 3. यामध्ये आपल्या बचती द्वारे जमा केलेले पैसे हवे तेव्हा रोख स्वरूपात हातात येतात
 4. त्यामुळे आपल्याला आपल्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक भक्कम आधार मिळतो
 5. हा रोख मूल्य विमा काही काळापुरताच मर्यादित नसतो तर काही घटने पुरता ही आधार देणारा नसून तो अमर्यादित कालावधीपर्यंत आपली साथ देतो
 6. आपल्याला आर्थिक संरक्षण देण्याचे कामही या विम्या द्वारे होते
 7. ही विमा योजना विमाधारकाने स्वतःच्या हयाती पर्यंत हप्ते भरत ठेवले पाहिजे नाहीतर आपल्याला आर्थिक संरक्षण मिळू शकत नाही
 8. विमाधारक युवा अवस्थेत असल्यास त्याच्यासाठी ही योजना महाग म्हणता येणार नाही
 9. या योजनेअंतर्गत कॅश व्हॅल्यू ही नकळत ठेवलेल्या पैसे एवढीच असते यालाच कायमच जीवन विमा म्हणून ओळखतात
 10. विमा कंपनी तुमच्या अकाउंट मधील रक्कम ठेवते व विमाधारक म्हणून तुम्ही u न्यूइटी हप्त्या द्वारे पैसे गुंतवणुकीसाठी ते वापरतात काही विमाधारक संपूर्ण जीवन विमा योजना स्वीकारतात
 11. त्यात रोख मूल्याचा ही समावेश असतो विमाधारकाने भरलेल्या दर महिन्याच्या हा त्यातील काही भाग या योजनेतील रोख खात्यात ठेवला जातो
 12. व ते संचय मंजूर फंडात ठेवल्यामुळे टॅक्स मुक्त विमाधारक होऊ शकतो आणि याच्या मुळे विमाधारक या रोख विम्याचा उपयोग निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य शांततेत घालवण्यासाठी करू शकतात

रोख मूल्य विमा आवश्यकता ( requirements of cash value life insurance in marathi ) :

★ विमाधारक जर आपले नवीन घर घेण्याचा विचारात असेल किंवा त्याने ते घेतले असेल, तर त्याचे भरावे लागणारे हप्ते किंवा द्यावी लागणारी रक्कम यासाठी या विमा योजनेचा निश्चितच उपयोग होऊ शकतो
★ सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस हा आपल्या जीवनात भविष्यातील धोके ओळखून अनेक ठिकाणी पैशांची बचत करून काहीतरी जुगाड करत असतोच त्यात अनेक विमा योजना ही त्याने घेऊन आपल्या जीविता बरोबर घर ,वाहन किंवा अन्य गोष्टींची जोखीम ही विमा कंपनी द्वारा उचललेली असते
★ पण एकाच वेळी पगार झाल्यावर अनेक खर्च दिसताच तो भांबावतो व यासाठी या रोख मूल्य विमा योजनेची सहायता घेऊन आपला प्रीमियम नक्कीच भरू शकतो
★ या रोख विमा योजनेची मदत घेऊन विमाधारक कर्जही घेऊ शकतो
★परंतु, ही विमा योजना जरा महाग ही वाटू शकते
★ या विम्यामध्ये मात्र अन्य विमा योजने पेक्षा अधिक हप्ते भरावे ही लागतात त्यांची संख्याही अधिक असते

रोख मुल्य विमा व बचत:

 • रोख मूल्य विमा हा आपल्याला हवे तेव्हा रोख पैसे देतो पण आपल्या भविष्यासाठी बचतही करून ठेवतो
 • तसेच तो कायम आपल्या जीवनाचा एक भाग असतो
 • या विम्यासाठी आपण भरणारे हप्ते जरी खूप असले तरी त्याचे दोन भाग केले जातात
 • विमा कंपनीकडून विकत घेण्यात आलेल्या विमा योजनेचे मूल्य म्हणून थोडी रक्कम विमा कंपनीने आपल्याकडे ठेवलेली असते
 • व उर्वरित रक्कम ही विमाधारकाच्या रोख मूल्य खात्यात जमा केली जाते
 • यामुळे विमा धारकाची एक प्रकारे आर्थिक बचत ही होते
 • व विमाधारकाला हवी असणारी रोख रक्कम हव्या त्या वेळी त्याची त्याला वापरता येते

● रोख मूल्य विमा योजनेचे लाभ ( benefits of cash value life insurance in marathi ) :

★ सर्वात मोठा लाभ म्हणजे रोख रक्कम मिळते
★ भरणाऱ्या नियमित हप्त्यातून बचतही होते
★याच विमा योजनेच्या आधारे कर्ज मिळण्याची सोय होते
★ आपल्या बँकेतल्या बचत खात्यात सारखी आपण आवश्यक तेव्हा ती रक्कम काढून घेऊ शकतो व हवी तशी वापरू शकतो
★ विमा योजनेचा लाभ विमाधारकाच्या मृत्यूनंतर ही त्याच्या वारसदारांना मिळतो
★ रोख मूल्य विमा योजना अगदी हवी तेव्हा रोख रक्कम प्रदान करते
★निवृत्त झालेल्या कर्मचारी साठी हा बचतीचा उत्तम पर्याय मानला जातो
★जे तरुण आपल्या वाढत्या गरजांना पूर्ण करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक चांगली योजना आहे
★विमाधारकांच्या खात्यात हप्त्याची ठराविक रक्कम विमा कंपनी टाकत असतेच पण वर्षाअखेरीस त्याच्यावरचे व्याजही विमाधारकास मिळवता येते
★या योजनेच्या रोख रकमेमुळे विमाधारक आपले कर्ज फेडणे, तसेच भौतिक संपत्ती ही खरेदी करायची असल्यास त्याचा उपयोग करू शकतो

नक्की वाचा : Small Business Health Insurance In Marathi

रोख मूल्य विमा योजना चे तोटे:

 • रोख मूल्य विमा योजना अन योजनेपेक्षा जास्त महाग वाटते
 • तसेच या योजनेचे हप्ते ही अधिक प्रमाणात आहेत
 • जर विमा धारकाचा मधेच मृत्यू झाला तर मृत्यूनंतर मिळणारा वारसदाराला लाभ हा काही प्रमाणात घटवला जातो
 • जोपर्यंत विमाधारक हप्ते भरत असतो तोपर्यंतच या योजनेचा लाभ घेता येतो
 • या विमा योजनेचा अंतर्भाव हा संपूर्ण आयुष्यभरासाठी असल्याने महागडे हप्ते भरणे
 • व ते मोठ्या प्रमाणात भरत राहणे विमाधारकास अखेर डोईजड होऊ शकते
 • आणि त्याच्या बदल्यात जर विमा दावा केला नाही तर काही विशेष लाभही मिळत नाही
 • या योजनेअंतर्गत पूर्ण जीवन भर असे विमाधारकाने आश्वासन दिल्याने उगाचच जास्त किमतीचे हप्ते भरण्यातच त्याचे पैसे खर्च होत राहतात
 • कधी अडचणींच्या काळात या योजनेतून अधिक रक्कम विमाधारकाने काढली असेल तर ती योजनाही आर्थिक संरक्षण देणे विमा कंपनी बंद करू शकते

रोख मूल्य विमा प्रकार ( Types of cash value life insurance in marathi ) :

1) सार्वत्रिक जीवन विमा
2) संपूर्ण जीवन विमा

1) सार्वत्रिक जीवन विमा:

 • या विमा योजनेच्या प्रकारात विमाधारकाने घेतलेल्या विमा योजनेचे आर्थिक संरक्षण हे त्याने भरत असलेल्या या सार्वत्रिक विम्याच्या प्रीमियम मुळे होते
 • यामध्ये विमाधारक जो हप्ते भरत असतो त्यातून विमा कंपनी आपला खर्च कमी करून उरलेली रक्कम विमाधारकाच्या खात्यात जमा करत असते
 • त्याचा उपयोग गरजेच्या वेळी विमाधारकास रोख रक्कम म्हणून वापरता येऊ शकते

2) संपूर्ण जीवन विमा:

 • ही विमा ही विमा योजना पूर्ण जीवन भरासाठी असल्याने त्याचे हप्ते हि जास्तच असतात
 • तसेच तो महागही असतो या योजनेच्या नियमानुसार हप्ते व मृत्यूनंतरचे फायदे हे सारखे असतात
 • जर योजना चालू असतानाच विमाधारक मरण पावला तरीही योजना उपयोगात येते
 • या योजनेअंतर्गत विमाधारकाच्या वारसदारास मृत्यू लाभ मिळू शकतो

प्रीमियम व विमाधारक:

 • या रोख विमा योजनेच हप्ते अधिक असतात
 • तसेच या विमा योजनेचे हप्ते मुदत विमा योजने पेक्षा खूपच महाग असतात
 • विमाधारक तारुण्यावस्थेत असताना या योजनेचा लाभ जास्त घेऊ शकतो
 • प्रीमियम हा विमा धारकाचे आरोग्य व त्याच्या कुटुंबाची आरोग्य बाबत माहिती यानुसार हप्ते किती ठेवायचे हे ठरवले जाते
 • विमा पत्रकात जर विमा धारकांनी अनेक गोष्टींसाठी कर्ज काढले असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसदाराला मिळणारी मृत्यूनंतर ची ठराविक रकमेमध्ये खत होऊ शकते.

Reed Also : Top 5 Small Business Ideas in Marathi 2022|Side business ideas in marathi

विमा योजनेची निवड करताना घ्यावयाची दक्षता:

 • आता ऑनलाईन मुळे इंटरनेटच्या सहाय्याने अनेक विमा कंपनी बद्दल आपण वाचून, समजून योग्य ती विमा योजना घेऊ शकतो
 • रोजचे महिन्याचे हप्ते किती भरायचे आहेत ?आणि आपली आवक किती आहे तेही एकदा चाचपुन पाहावे
 • मुदत कधीपर्यंत आहे?
 • कोणते व काय संरक्षण मिळते? तसेच काही अटी आहेत का ?ते पण पहावे
 • आजच्या काळात महत्त्वाचे ते म्हणजे ऑनलाईन सेवा सहज सोपी आहे का?
 • रोख विमा योजना निवडल्यावर सर्व मुद्दे नीट समजून घेणे आवश्यक आहे
 • उदाहरणार्थ- फेस व्हॅल्यू, सरेंडर कॉस्ट अशा छोट्या -छोट्या गोष्टी वाचून ते सोडून देऊ नये
 • अन्य योजनेत आणि या योजनेतील सूक्ष्म फरक काय ते पहावे
 • कारण आता वाटणारे छोटे मुद्दे पुढे आपल्या डोकेदुखीचे कारण ही होऊ शकते
 • त्यामुळे नजरअंदाज न करता प्रत्येक बारीक -सारीक गोष्टीही नीट समजून घ्याव्यात
 • आणि मगच योग्य विमा योजना स्वीकारावी

★रोख विमा योजना ही काही गोष्टी सोडल्यास आजच्या काळामध्ये लाभदायक म्हणू शकतो
★कारण वेगवेगळ्या कारणांसाठी कधी आपल्याला रोख पैशांची गरज लागेल हे सांगता येत नाही
★ आणि प्रत्येक वेळी आपला प्रत्येक मित्र किंवा नातेवाईक आपल्या मदतीस येईलच असे नाही
★त्यामुळे अशा योजना चा नक्की विचार करावा
★ पण सावधतेने व समजून च!

Tags : रोख मूल्य विमा योजना | Cash Value Life Insurance In Marathi

Leave a Comment