व्यवसाय व्यत्यय विमा | Business Interruption Insurance In Marathi 2022

व्यवसाय व्यत्यय विमा | Business Interruption Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण व्यवसाय व्यत्यय विमा म्हणजेच business interruption insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Business Interruption Insurance In Marathi
business interruption insurance

व्यवसाय एक आव्हान:

  • बर्‍याच माणसांना नोकरी शिवाय स्वतःचा एखादा व्यवसाय हवा असतो
  • व ते त्यासाठी सर्वस्व पणाला लावतात ,स्वतःला व्यवसायात अगदी झोकून घेतात
  • अपार कष्ट व एकाग्रचित्त करून अशा व्यावसायिकांना शिखरावर पोहोचवण्याचा पासून कोणीच मग रोखू शकत नाही
  • गाळलेल्या घामाचे चीज तर व्हायलाच हवे ना ?
  • ते होते ही !
  • पण कधीकधी काही घटना अशा अचानक घडतात की, आपण त्यासाठी मनाने तयार नसतोच
  • त्याचा विचारही कधी केलेला नसतो पण ,आकस्मिक घडलेल्या अशा आपत्ती मुळे काही व्यवसायिकांचा व्यवसाय क्षणात मातीमोल होऊन जाऊ शकतो
  • नोकरी करणारे आपल्या नोकरीशी बांधिलकी ठेवून असतात
  • त्यामुळे ,महिन्याच्या अखेरीस त्यांना ठरलेले वेतन व ठराविक काळ काम करून आपली जबाबदारी आटोपती घेता येते
  • पण व्यावसायिकाचे तसे नसते त्याच्यावर खूप जणांचे भविष्य व वर्तमान अवलंबून असतो
  • आपल्या व्यवसायात त्याला रोज नवे आव्हान झेलावे लागते!

व्यवसायात येणारे व्यत्यय:

व्यवसायात अनेक व्यत्यय किंवा अडथळे हे येऊ शकतात
जसे की –
1) पावसाच्या दिवसांमध्ये वादळ येणे आणि त्यामुळे दुकानातील उत्पन्नाचे काही काळासाठी नुकसान होणे
2) आग लागल्यामुळे सामान जळून त्याचे नुकसान होणे
3) भरलेल्या उत्पादनाची चोरी झाल्याने व्यवसायात काही काळासाठी व्यत्यय येतो
4) अचानक अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन तयार असतानाही ते दुसऱ्या पक्षाकडे पाठविता न येणे
5) वाहतूक कोंडी यामुळे तसेच
6) मानवनिर्मित काही आपत्ती ही असतातच जशा –
संप
आंदोलने
मोर्चा

  • अशा व्यवसायातील अनेक अडथळ्यांमुळे व्यावसायिक त्रस्त होऊन बसतो
  • कारण त्याला अनेक खर्च त्यातून भागवायचे असतात उदाहरणार्थ –
  • कच्चामाल
  • यंत्र दुरुस्ती
  • नवीन यंत्र खरेदी
  • कामगारांचा पगार
  • कर्ज घेतले असल्यास त्याचा हप्ता फेडावयाचा असतो
  • अशा वेळी जर अचानक असे नुकसान झाले तर तो कोणाकडे आधारासाठी बघू शकेल??

व्यवसाय व्यत्यय व परिणाम:

वरील सर्व व्यत्ययांचा परिणाम हा त्याच्या व्यवसायावर होऊ शकतो
1 व्यवसाय ठप्प पडू शकतो
2 वेतन वेळेवर न मिळाल्याने कामगार संप करू शकतात
3 कच्चामाल न मिळाल्याने नवीन उत्पन्नाची गती मंदाऊ शकते
4 कर्जदार कर्जासाठी तगादे लावू शकतात
* या सर्व कारणांमध्ये सर्व व्यावसायिकाना एक भक्कम आधार असतो तो म्हणजे ‘ ‘ ‘व्यवसायिक व्यत्यय विमा योजनेचा’

विमा व व्यवसायिक:

  • व्यावसायिक हे नोकरदार वर्गा सारखे सुरक्षित जीवन जगू शकत नाहीत
  • त्यांच्या डोक्यावर नेहमी एक टांगती तलवार असते
  • कधी खूप प्रगती होते , तर कधी व्यापार ठीक चालतो कधी कधी काही कारणाने तो ठप्प ही होऊ शकतो
  • यामुळे विमा योजना काढल्यामुळे व्यावसायिकाला आपल्या मंदीच्या काळात ही भक्कम आर्थिक आधार ही मिळू शकतो
  • व विमाधारक म्हणून त्याची विमा कंपनी त्याच्या आर्थिक नुकसानाची जोखीम उचलू शकते
  • त्यामुळे तो काहीसा निश्चिंत राहून आपला व्यवसाय योग्यरितीने पुन्हा करू शकतो

व्यवसाय व्यत्यय विमा ( what is business interruption insurance in marathi ) :

1 या चे दुसरे नाव व्यवसाय उत्पन्न असे ही आपण घेऊ शकतो
2 या व्यवसाय व्यत्यय विम्याची मदत व्यावसायिकाला आपल्या व्यवसायातील व्यत्यय किंवा अडचणींच्या काळात झालेल्या उत्पन्नाचे नुकसान भरून देण्यासाठी होते

व्यावसायिकांचा आधारस्तंभ:

★ व्यवसाय व्यत्यय विमा एखाद्या आपत्तीच्या काळात वाहतूक व्यवस्था ही काही काळासाठी बंद केलेली असते अशावेळी उत्पादन घेऊन निघालेल्या गाडीचे म्हणजेच व्यावसायिकाच्या उत्पादनाचे भारी नुकसान होऊ शकते पण आपली विमा कंपनी हे नुकसान भरून देते
★ काही कारणामुळे जर उत्पादन पूर्ण तयार असून बाजारपेठ सरकारद्वारा विक्रीस उपलब्ध नसेल किंवा वाहतूक यंत्रणा सक्रिय नसेल आणि अशा व्यत्ययामुळे व्यावसायिकांच्या सामानाची प्रचंड नुकसान होऊ शकते
★व आर्थिक नुकसानाचा परिणाम हा त्याच्या शरीर व मनावर बरोबरच व्यवसायावरही होतो
★ या व्यवसायामुळे फक्त उत्पन्नाच्या नुकसानीची भरपाई होत नाही तर इतर फायदेही मिळून त्याद्वारे मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे तो परत आपल्या व्यवसायाकडे आशेने पाहू शकतो

व्यत्यय व विम्याचे संरक्षण ( business interruption insurance in marathi ) :

◆ व्यावसायिकांचा व्यवसाय हा ग्राहकांना खास गोष्टीच प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे देणे असेल व त्या जागेचे आगीत किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्ती नुकसान झाले असेल तर त्या प्रात्यक्षिक शिकवण्याचा खर्च विमाधारकास विमा धरा मिळू शकतो
◆ वाहतूक यंत्रणा ठप्प पडल्याने किंवा लॉकडाउन तसेच अन्य कारणाने अपेक्षित व्यवसायात ला फायदा न मिळाल्यास आधी झालेल्या व्यवहारात द्वारा मिळालेल्या नफ्याची चाचपणी करून विमा कंपनी विमाधारकाला मिळू शकणारा जो नफा किंवा लाभ आहे तो

त्याला मिळवून देते
◆ व्यवसायिक नुकसान भरपाईत काही यंत्र दुरुस्ती करावी लागली तर त्यासाठीचा खर्च ही मोठाच असतो तो विमा कंपनी देऊ करते जसे- * * *वादळग्रस्त व्यावसायिकांना हा विमा काढला असेल आणि नैसर्गिक नुकसाना मुळे त्याच्या कारखान्यातील नुकसान झाले असेल तर सर्व दुरुस्ती खर्च विमाधारकास विमा कंपनी द्वारा मिळू शकते त्यामुळे त्याच्या डोक्यावरचा खूप मोठा भार हा हलका होतो
◆ सर्वात अतिशय महत्त्वाचा या विमा योजनेचा लाभ म्हणजे या आपत्ती काळात व्यावसायिकाला आवश्यक तेवढे आर्थिक संरक्षण ही योजना देते बाकी योजना या ठराविक कालमर्यादेत बांधील असतात पण ही योजना मात्र एका सच्चा मित्रासारखी संकट संपेपर्यंत हात सोडत नाही
◆ ही विमा योजना व्यवसायातल्या नुकसानाची भरपाई करून झाल्यावर पुन्हा व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायाच्या पूर्वपदावर आणून पोहोचविण्याचे काम करते

covid-19 व व्यवसाय नेते विमा:

  • covid-19 च्या काळात या विम्याचा फायदा व्यावसायिकांना म्हणावा तसा झाला नाही
  • covid-19 मुळे या विषाणूच्या संक्रमण आधी तेजीत चाललेला व्यवसाय जवळजवळ ठप्प झाला
  • कारण खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या काही आधार असणाऱ्या लोकांचा मृत्यू झाला
  • पैशांची आवक कमी झाल्यामुळे अत्यावश्यकच खर्च करण्याची सवय लोकांनी लावून घेतली
  • काही उद्योगधंदे चालणारे असले तरी covid-19 मुळे अत्यावश्यक सेवेमुळे ते वंचित टाकले गेले
  • जसा कपड्यांचा व्यवसाय, दागिने ,भांडी ,चप्पल ,हॉटेल सलून यांची दुकाने तुडुंब भरलेली दिसायची
  • ती या परिस्थितीत सरकारने पूर्णपणे बंद करवली
  • त्यामुळे त्यांना उपजीविकेसाठी * कारखान्याचे थकीत भाडे
  • इलेक्ट्रिसिटी बिल
  • मेंटेनन्स
  • कर्मचाऱ्यांचे वेतन
  • या सर्वांचा खर्च कसा करायचा?
  • या प्रश्नाला सामोरे जावे लागले

विम्याचा मदतीचा कालावधी:

  • ही योजना तशी 30 दिवसा पुरतीच मर्यादित असते
  • परंतु आपत्तीचे स्वरूप पाहिल्यानंतर ती आपत्ती सुरू झाल्यापासून आपत्ती संपेपर्यंत च्या काळापर्यंत ही 360 दिवसापर्यंत वाढवता येते
  • त्यामुळे व्यावसायिकाला कमालीचा आधार मिळतो
  • कमीत कमी 48 ते 72 तास अशा छोट्या वेळेसाठी ही त्याची मर्यादा आपण ठरवू शकतो
  • अर्थात आपत्तीचा कालावधी जेवढा लहान-मोठा तेव्हढा विमा योजनेचा संरक्षण करण्याचा कालावधी ठरवू शकतो

ही विमा योजना काही गोष्टींना संरक्षण देत नाही :

1) पूरग्रस्त भागात पाण्यामुळे अनेक व्यवसायिकांच्या व्यवसायाचे आर्थिक नुकसान होते परंतु ते या विमा योजनेत भरून काढता येत नाही
2) भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात छोटे-मोठे अनेक उद्योग धंदे लयास जातात त्यांची जोखीम देखील या विमा योजनेद्वारा उचलली जात नाही
3) तसेच आज उद्भवलेला covid-19 सारखा भयानक आर्थिक व जीवित अनेक गोष्टींचे नुकसान करणारा विषाणू यामुळेच व्यवसायाचे नुकसान झाले असेल तर तेही विमा कंपनी भरून देत नाही
4) व्यावसायिक व्यापार करताना प्रत्यक्षपणे नुकसान ग्रस्त असेल तर त्याच्या नुकसानाची जबाबदारी उचलली जाते

नक्की वाचा : Two Wheeler Insurance In Marathi

व्यवसाय व्यक्ती विमा एक दृष्टिक्षेप:

★ हा विमा व्यावसायिकांना जर काही महत्त्वाच्या कारणाने ठराविक काळापुरता व्यवसाय बंद करावा लागला असेल तर त्या काळापुरता त्या व्यावसायिकाला स्वतःच्या पायावर पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न या योजनेद्वारा होतो
★ या विमाद्वारे विमाधारक व्यावसायिकाचे बंद असलेल्या काळापुरते आर्थिक उत्पन्न तसेच त्याची भौतिक संपत्ती याची जोखीम उचलते
★ हा विमा लहान -लहान कारखान्यांसाठी उपयोगी पडतो शंभर किंवा त्याच्यापेक्षा कमी कामगार ज्या ठिकाणी कार्यरत असतील तेथे याची मदत होते
★ covid-19 मध्ये देशातील काय जगातील लहान-मोठ्या व्यवसायांवर गदा आलेली दिसून येते
★अशा वेळी या विमा योजनेत covid-19 चे आर्थिक संरक्षण मिळेल का? याचे स्पष्ट उत्तर मिळत नाही
★ पण न्यायालयाद्वारे आपण काही गोष्टी स्पष्ट करून घेऊन मदत घेऊ शकतो
★प्रत्येक विमा कंपनीची धोरणे नियम हे covid-19 साठी वेगवेगळे असू शकतात त्यामुळे मदत मिळेलच का? हा प्रश्नही दुरापास्त आहे

विमा दावा करण्यापूर्वी:

★ आकस्मिक परिस्थितीच्या प्रहाराने अगतिक होऊन विम्याचा आधार हा व्यवसायिकांना घ्यावा लागतो पण तरीसुद्धा विमाधारक व्यावसायिकांनी काही गोष्टींकडे लक्ष ठेवावे-
1) आपले नुकसान कोणत्या आपत्ती झाले आहे ? त्याचा आपल्या विमा योजनेत समावेश आहे का ? सर्व नियम अटी पुन्हा पुन्हा तपासून व पडताळून पाहाव्यात
2) आपत्तीनंतर लगेचच विमा दावा करावा कारण किमान मर्यादेनंतर विमा दावा केल्यावर तो अयशस्वी ठरतो
3) कंपनीला द्यावयाची
सर्व कागदपत्रे,
नुकसानचे फोटो,
किंवा इतर पुरावे,
विमा योजना क्रमांक व
इतर कागदपत्रे जोडावीत
4) नुकसान भरपाई जर covid-19 साठी हवी असेल ,तर मात्र सर्व विमा योजना पत्रक नीट वाचावे covid-19 यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे का? हे पहावे कारण covid-19 ला बहुतेक विमा योजने ने आश्रय दिलेला दिसून येत नाही.

Reed Also : Top 10 business ideas marathi|Best Top online business ideas marathi

व्यवसाय व्यत्यय विमा निवडताना ( business interruption insurance in marathi ) :

  1. काही विमा योजना आजच्या बेभरवशाच्या काळासाठी आवश्यक आहे
  2. आज पर्यंत च्या वर्तमान स्थितीत चांगला चालू असलेला व्यवसाय काळजी चे स्वरूप घेऊ लागलेला आहे
  3. अशावेळी जर विम्याची साथ असल्यास कोलमडलेल्या व्यवसायाला उभे करण्यास तो नक्कीच मदत करू शकतो
  4. आपली विमा योजना निवडताना त्यात-
  5. आपले उत्पादन व उत्पन्न किती आहे? याचा विचार करावा
  6. विमा योजनेच्या अटी किंवा नियम ज्या काही वेळा दुर्लक्षित रहाव्यात म्हणून बारीक अक्षरांच्या प्रिंट ने लपवू पहातात त्यामुळे आळस न करता सर्व तपशीलवार पत्रक तपासावे व वाचावे
  7. आजच्या या ‘नो प्रॉफिट नो लॉस ‘यासारख्या काळात भरावा लागणारा प्रीमियम कडे लक्ष ठेवावे
  8. त्याचबरोबर मिळणारे नुकसानीसाठी चे आर्थिक संरक्षण केवढे आहे ? तेही अवश्य पहावे
  9. covid-19 च्या संक्रमणाचा स्पष्ट उल्लेख आहे का ? याकडेही जरूर लक्ष द्या
  10. आपला व्यवसाय कोणत्या ठिकाणी ( स्थान )आहे?
  11. त्याची भौगोलिक व सामाजिक परिस्थिती पुढे आपल्या व्यवसायाला पूरक आहे का?
  12. जर आपत्तीजन्य परिस्थिती असेल तर ,त्यासाठी ही योजना योग्य संरक्षण देणारी आहे का? तेही पहा
  13. 9)तुमच्याकडे कामगारांची संख्या किती आहे ?
  14. त्यांच्या वेतनांची जोखीम प्रतिकूल परिस्थितीतही ही विमा योजना उचलेल का ?हेही प्रकर्षाने पहावे
  15. कारण कच्चामाल व कामगार हे आपल्या व्यवसायाचे मुख्य स्त्रोत असतात
  16. इतर विमा योजना कंपन्या चे नियम, अटी ,लाभ व तुमच्या आजूबाजूला असलेली अशा विमा कंपनीच्या योजनेची आपापसात तुलना करून मगच योग्य विमा योजना असणारी कंपनी निवडावी

★आजच्या काही व्यवसायाच्या दृष्टीने दोलायमान स्थितीत असलेले व्यावसायिकानी थोडीशी चाचपणी केली तर आपल्या ला जर व्यवसायात नुकसान होत असेल तर त्यापासून कसे भरपाई मिळवून ? परत आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर पाहिजे
★ हे फक्त या ‘व्यवसाय व्यत्यय विमा’ योजने द्वारा च होऊ शकते
★ वर्तमान व भविष्य काळात व्यावसायिकांनी अशा योजनांचा नक्की विचार करावा!

1 thought on “व्यवसाय व्यत्यय विमा | Business Interruption Insurance In Marathi 2022”

Leave a Comment