बांधकाम विमा योजना | Builders Risk Insurance In Marathi
नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण बांधकाम विमा योजना म्हणजेच builders risk insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

स्वप्न घराचे: (Builders risk insurance)
◆ प्रत्येक माणसाला आपले एक घर असावे व ते आपण खूप सजवावे आणि सर्वांनी त्यामध्ये गुण्यागोविंदाने रहावे असे स्वप्न असते.
आणि त्या स्वप्नांच्या मागे माणसे कमवायला लागल्यापासूनच दिवस-रात्र एक करून मेहनत करत असतात.
काडी- काडी जमवून पैसा जमा करून घर विकत घेतात पण जे पैसे देऊन त्यांनी स्वप्नांचे इमले विकत घेतलेले असते,
ते भेसळ भ्रष्टाचार किंवा अन्य कारणाने कोसळले तर??
बांधकाम करणाऱ्यांचा हेतू:
बांधकाम करणारे म्हणजेच बिल्डर्स हे अशा स्वप्नांचे महाल बांधण्याचे काम करत असतात परंतु, कित्येक वेळा कमकुवत बांधकामामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे इमारत पत्त्याच्या खेळासारखी कोलमडते अशावेळी किती जणांच्या संसाराची जबाबदारी बिल्डरच्या खांद्यावर येते व अनेक आरोप-प्रत्यारोप ही होत असतात काही बिल्डर्स आपल्या स्वार्थासाठी कमी दर्जाचे साहित्य वापरतात किंवा कमिशन मिळवण्यासाठी कमी गुणवत्तेची टेंडर्सना मंजुरी देतात
विम्याचे संरक्षण ( builders risk insurance in marathi ) :
बांधकाम विमा योजना ही बांधकाम करणाऱ्या बिल्डर्सना सुरक्षित हात देताना दिसत असते.
एखादी इमारत बांधताना किंवा इमारत बांधल्यावर त्यांचे काही नुकसान झाल्यास किंवा ती कोसळल्यास बिल्डर्स वर अनेक खटले दाखल होऊ शकतात!
अशा वेळी त्या लोकांच्या खटल्या जिंकल्यास खूप नुकसान भरपाई द्यावी लागेल .
त्यावेळी विमा कंपनी त्यांना आर्थिक मदत करण्यास सज्ज असते.
मालमत्ता विमा व खास वैशिष्ट्ये:
◆ या विमा योजने मुळे जर एखाद्या विमाधारक बिल्डर्स एखादी इमारत किंवा घराचे बांधकाम करत असताना काही नुकसान झाले असेल आणि त्याची भरपाई ही करावयाची असेल तर विमा कंपनी की करते.
बिल्डरच्या आर्थिक संरक्षणाची जबाबदारी विमा कंपनीची घेते.
नवीन एखादी वास्तू बांधत असताना त्याच्या निर्माणाच्या वेळी अनेक अघटीत गोष्टी घडू शकतात!
इमारत ,किंवा घर कोसळणे ,आग लागणे किंवा अन्य कारणाने ती वास्तू चे नुकसान झाल्यास बांधकाम साहित्याचेही झाले तरीही विमा कंपनी त्याची जबाबदारी घेते
कोण कोणत्या गोष्टींसाठीही विमा योजना संरक्षण देत असते:
- बांधकाम करतेवेळेस बिल्डर्सना अनेक अडथळे पार करावे लागतात तर शॉर्टसर्किट झाल्यामुळे इमारतीला आग लागून नुकसान झाले तर त्याची भरपाई बिल्डर्सना भरावी लागते पण ते विमाधारक असतील तर विमा कंपनी ही जोखीम उचलू शकते
- इमारत बांधते वेळी अनेक साधने ,उपकरणे ही तेथे ठेवलेली असतात अशावेळी त्या साहित्याची चोरी झाली तर कितीतरी पटीने त्याचा आर्थिक फटका बिल्डरला बसू शकतो अशा वेळी विमा कंपनी त्याचे आर्थिक बाजू सांभाळण्याचे काम करते आर्थिक नुकसानीची जबाबदारी ही घेते
- अपघात :एखाद्या वास्तूला मोठ्या अवजड वाहनाने टक्कर दिली तरी त्याचे नुकसान होऊ शकते त्याची जबाबदारी विमा योजना घेते
- नैसर्गिक आपत्ती ने होणारे नुकसान जसे की वादळात एखादी अर्धवट बांधलेली वास्तू कोलमडू शकते किंवा वीज पडून ती कोसळू शकते अशा वेळी विमा कंपनी त्याला मदत करू शकते
- अशी अनेक कारण इमारतीचे नुकसान होण्यासाठी कारणीभूत असतात
- परंतु प्रत्येक विमा कंपनी तसेच प्रत्येक राज्याचे नियम हे वेगळे असू शकतात
- अशा वेळी विमाधारकाने कंपनी चे नियम अटी व मिळणारे संरक्षण याचा नीट अभ्यास करूनच ती योजना घेतलेली बरी!
विमाधारक बिल्डर्स ने घ्यावयाची काळजी:
- विमाधारक बिल्डर्सने प्रथम आपल्या व्यवसायातील धोके हे संरक्षित होतील ना? याची विमा कंपनीकडून माहिती घेतली पाहिजे
- विमाधारक बिल्डरला आपले बांधकाम करणारे मजूर तसेच साहायकाना ही संरक्षित करता आले पाहिजे
- कारण बांधकाम करतेवेळी जीवित हानी व अपघात होणे उंचावरून पडून जायबंदी होणे याचे प्रमाणही अधिक असते.
विमा योजनेत अंतर्भूत गोष्टी कोणत्या? | builders risk insurance in marathi
- बिल्डर्स ज्यावेळी विमा योजना काढायचे ठरवतात त्या वेळी त्यांनी च्या वास्तुसाठी ती विमा योजना घेतली असेल त्याची वर्तमान किंमत किती आहे?
- याचा अंदाज घेतला जातो
- तसेच जर बांधकाम चालू असेल किंवा नवीन काही बदल हे जुन्या वास्तू मध्ये करताना अनेक साधनसामुग्री आणलेली असते
- कामाला असणारे कामगार यांचाही विचार करून विम्याची असणारी रक्कम ठरवली जाते.
बिल्डर साठीच्या विमा योजनेचा खर्च:
वरील गोष्टीही विम्याचा खर्च ठरविताना विचारात घेतला जातो. तसेच बिल्डर्स जे बांधकाम करत आहेत ते कोणत्या प्रकारचे आहे?
ते किमतीमध्ये खर्चिक आहे का?
बजेट कमी आहे का ?
त्यासाठी लागणारी संसाधने व इतर खर्च अंतर्भूत करून विमा कंपनी त्या वास्तुसाठी विमा कंपनीने किती आर्थिक जबाबदारी उचलायची?
हेही सर्व विचार करून ठरविले जाते
या गोष्टीसाठी विमा योजनेचे संरक्षण मिळत नाही:
1)युद्धजन्य परिस्थिती मध्ये एखाद्या वास्तूची किंवा इमारतीचे नुकसान झाल्यास मात्र विमा कंपनी त्या नुकसानच बाध्य नसते
2) एखाद्या बिल्डर्स विमाधारकाच्या इमारतीच्या साधनांची चोरी झाल्यास विमा कंपनी जबाबदारी घेईल पण चोरी होताना होणाऱ्या अपघातामध्ये नुकसान झाल्यास त्या व्यक्तीच्या नुकसानीस तो पात्र राहत नाही
3)काही वेळा बिल्डर्सचे प्रोजेक्ट/ प्रकल्प खूप मोठे -मोठे व खर्चीक असतात.
अशावेळी ते खर्च कर्ज काढून किंवा अन्य मार्गाने निधी जमवून तो प्रकल्प पूर्ण करत असतात. परंतु जर ते कर्ज फेडू शकला नाही व जप्ती आली तर त्या भरपाईसाठी जर तो विमा कंपनी कडे मदतीच्या अपेक्षेने पहात असेल तर मात्र त्याची घोर निराशा होते!
बिल्डर्स रिस्क इन्शुरन्स घेण्याचा कोणी विचार करावा?
आपण बांधकाम करत असलेली कोणतीही गोष्ट व त्याबाबत अघटित घडले, म्हणजे त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी अनेक जण ही योजना घेण्यास उत्सुक असतात.
बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर
प्रोजेक्ट सांभाळणारे इंजिनियर
त्यांचे कन्स्ट्रक्शन चालू आहे तो व्यक्ती
ही पुढचा धोका ओळखून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो.
बिल्डर रिस्क विमा व पैसे गुंतवणूकदार ( builders risk insurance in marathi ) :
बांधकाम करतेवेळी त्याच्याशी निगडित असलेले व सर्वेसर्वा जबाबदारी घेतलेल्या सर्व व्यक्ती ही झालेल्या नुकसानास जबाबदार ठरतात
कॉन्ट्रॅक्ट,र जमिनीचे मालक, किंवा अशी लोक नुकसानीपासून स्वतःला वेगळे करू शकत नाहीत!
म्हणूनच अशा व्यक्तीने ही विमा योजना नक्की घ्यावी.
कारण ,नुकसान अधिक म्हणून विमा योजनेमुळे लाभही अधिक मिळतात .
संरक्षण मर्यादा:
बिल्डर रिस्क पॉलिसी ही जोपर्यंत बिल्डर्सचे वास्तु बांधण्याचे काम चालू असते तोपर्यंतच कार्यरत असू शकते.
एखादा प्रोजेक्ट संपला की विमा योजनेचे संरक्षण ही पूर्ण होते
या बांधकाम प्रोजेक्टमध्ये चे आर्थिक फायदा घेण्यास इच्छुक असतात
अशा व्यावसायिकांना या विम्याची गरज लागते
आता ते कोणते असू शकतात? ते आपण पाहू-
विमा योजना व जोखीम:
★”बांधकाम रिस्क विमा” योजना अनेक जबाबदाऱ्या उचलते
★ त्यात बांधकामाची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध असलेल्या सर्व गोष्टींची जोखीमही उचलत असते.
★त्यात प्रत्यक्ष खर्चात तर सरळ- सरळ झालेले नुकसान दिसून येते.
★ तसेच चोरी होणे, आग लागणे, वास्तू कोसळणे व यामुळे बांधकामाचे नुकसान होणे, उपकरणे साधने यांची चोरी होणे, साहित्य (वाळू ,लोखंडी सळ्या, सिमेंट ,वायरी, इलेक्ट्रिक उपकरणे, इतर कारणासाठी लागणारी लोखंडी साधने) यांच्या चोरीचा सामावेश होऊ शकतो
★अप्रत्यक्ष नुकसाना मध्ये बांधकामाच्या नुकसानीमुळे इमारत असेल तर ब्लॉक विक्रीस किंवा भाड्यास जाणारे असतील तर तो लाभ त्यांचा थांबतो
★ तसेच मिळणारे व्याज यामध्येही घट होते
विमा कंपनी अशा वेळी आर्थिक मदत करून बिल्डरची जोखीम उचलू पाहते.
नक्की वाचा : key man insurance in marathi
या गोष्टीना भरपाई नाही:
★ जसे की भूकंप किंवा वादळ सदृश परिस्थिती मुळे इमारत वास्तू कोलमडली तर अशा नैसर्गिक आपत्ती या विमा योजनेत थारा नाही
★ त्यामुळे आपल्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती तसेच नियमित येणाऱ्या आपत्तीचा आधी विचार करून विमा कंपनीची जोखीम धोरण दक्षतेने वाचून समजूनच ती योजना घ्यावी हेच बरे!
★ युद्धाची जबाबदारी तर कोणतीही विमा योजना उचलत नाही कारण की देशावर आलेले सामूहिक आपत्ती असते
★ तसेच बांधकाम करतेवेळी बहुतेक सामान हे लोखंडाचे असते ,जसे लोखंडाची कांब सळ्या वगैरे त्यांना जर दमट हवामानामुळे किंवा इतर कारणांमुळे गंज लागली तर त्यांचे आयुष्यही कमी होते अशा त्यांचे नुकसान खूप मोठे असू शकते
पण याची जबाबदारीही जोखिम विमा कंपनी उचलत नाही.
विमा योजना व कुशल एजंट:
हो ,जर तुम्ही कोणतीही विमा योजना घेत आहात, तर तुम्हाला एक चांगला एजंट आवश्यक असतो.
आणि बांधकाम संबंधित तुम्ही विमा योजना घेत असाल तरीही एक कुशल व हुशार असा तुम्हाला एजंट हा हवाच !
तो तुमच्या व्यवसायासंबंधी धोके, आपत्ती ओळखून कोणती विमा योजना घ्यायची हे ठरवू शकतो
कारण ,काही अशा गोष्टी असतात त्या विमा योजनेच्या जोखमींमध्ये नसतात व आपण वरवर पाहून ती घेत असतो
जसे की – नैसर्गिक आपत्ती संरक्षित होते म्हटले तरी भूकंप, पूर ,पाण्यामुळे होणारे किंवा बांधकाम व्यवसायात सर्रास होणाऱ्या जोखमी या अंतर्भूत असतीलच असे नाही!
मग अशा काही गोष्टी आपण त्यात जोडून घेऊ शकतो.
परंतु त्यासाठी एक विमा कंपनी व बिल्डर्स च्या मध्ये चांगला दुवा हा असावा लागतो आणि तो म्हणजे एजंटच असू शकतो..
प्रकल्प व बिल्डर्स:
बिल्डर किंवा मालक हा आपले बांधकाम करते वेळी एखाद्या ठराविक प्रकल्पासाठी संरक्षण घेऊ शकतो ते बांधकाम झाल्यास विमा योजना ही संपुष्टात येऊ शकते काही कॉन्ट्रॅक्टर किंवा बिल्डर्स हे सतत प्रोजेक्ट घेत असतात किंवा एका वेळी दोन दोन्ही प्रोजेक्ट त्यांचे चालू असतात त्यामुळे त्यांना सगळ्यांसाठी एकत्र पॉलिसी घ्यावी लागते व त्याचे संरक्षण ही त्यांना विमा कंपनीतर्फे मिळते अर्थात प्रत्येकाचा हप्ताही वेगवेगळा असतो व खर्चही!
★ अर्थात ज्यालाही विमा योजना घ्यावयाची असेल, त्याने प्रत्येक विमा कंपनी चे संरक्षण, त्याच्या अटी ,त्याचे नियम व आपल्या आवश्यक गरजा लक्षात ठेवून विमा योजना घेतली पाहिजे आणि नुकसाना पासून स्वतःला व स्वतःच्या व्यवसायाला वाचवले पाहिजे.
Reed Also : बिझनेस सुरु करताना काय काळजी घ्यावी 2022
अजच्या या आर्टिकल मध्ये आपण बांधकाम विमा योजना | Builders risk insurance बद्दल माहिती बघितली जर तुमाला या पोस्ट मध्ये काही शंका असेल आम्हाला कंमेंट मध्ये कळवा
Tags : बांधकाम विमा योजना | Builders risk insurance ,बांधकाम विमा योजना | Builders risk insurance in marathi 2022
1 thought on “बांधकाम विमा योजना | Builders risk insurance in marathi 2022”