पाळीव प्राण्यांसाठी विमा | Animal Insurance In Marathi 2022

पाळीव प्राण्यांसाठी विमा | Animal Insurance In Marathi

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आज आपण पाळीव प्राण्यांसाठी विमा म्हणजेच animal insurance in marathi बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .

Animal Insurance In Marathi
Animal Insurance In Marathi
 • मानवतावाद
 • मनुष्य इतर माणसांकडे माणुसकीने पाहत असतोच ज्यावेळी त्यांना काही मदत हवी असेल किंवा काही अडचण आली असेल तर मनुष्याच्या मदतीला येत असतो
 • मग तो ओळखीचा असो वा ओळखीचा नसो, नात्यागोत्याचा संबंध ही येत नाही त्या परिस्थितीत  परिस्थितीत! आणि हाच खरा मानवतावाद आहे. माणसाने दुसऱ्या माणसाच्या दुःखाकडे पाहून दुःखी आणि सुखाकडे पाहून सुखी झाले पाहिजे. माणसातला असलेला देव त्याने ओळखायला हवा .
 • भूतदया आणि आपण:
 • जसे की मनुष्याने माणसाकडे संवेदनशीलतेने पाहायला हवे.

 तसेच इतर प्राणीही विश्वात जगत असतात त्यांनाही जगायची म्हणजे सुखाने जगायची संधी ही माणसाने दिली पाहिजे यालाच भूतदया असे म्हणतात हा प्राणी आपल्या भावना आपल्या गरजा या सांगू शकत नाही ते बोलू शकत नाही आणि दुसऱ्यावर ते अवलंबून असतात अशावेळी माणसाने त्याला होईतोवर प्राण्यांची काळजी घेतलीच पाहिजे त्यांना त्रास देऊन त्यांची मजा पाहण्याचे खूप जणांना आवडते पण हे चुकीचे नाही का?

 पाळीव प्राण्यांची मित्रता

 आपण खूपजण पाळीव प्राण्यांना पाळत असतो मग तो स्वामी भक्त कुत्रा असो किंवा गोष्टीतली मनीमाऊ असो वा शेतकऱ्यांचा सखा बैल आपले पालन पोषण च्या दुधावर होते ती काय असो किंवा अन्य प्राणी यांची माणसाशी मित्रता ही असते कारण हे आपल्यासाठी उपयुक्त तर आहेतच

प्राणी आपण का पाळतो?

 • आपण आपल्या मनोरंजन किंवा आनंदासाठी –
 • आवडणारा प्राणी असल्याने त्याला पाळले जाते –
 • उपयुक्त प्राणी ज्याच्यामुळे आपल्याला काही फायदे असतात –
 • जसे की गाय दुध देते ,बैल शेतकऱ्यांना शेतात मदत करतो
 • कुत्रा घराचे रक्षण करतो
 • आणि मांजर ,उंदीर यापासून घराच्या नुकसानीची काळजी घेते
 • असे अनेक प्राणी आहेत ज्यांना आपण पाळत असतो आणि निर्भेळ आनंद घेत असतो
 • तुमच्याही जीवनात असे प्राणी असतीलच ना, ज्या त्याच्या निरागस डोळ्यांना पाहून आपले मन क्षणभरासाठी स्वार्थी मना पासून मुक्त होत असेल?

पाळीव प्राणी आपलं व आपल्या घराचे रक्षण करतात पण त्यांचे रक्षण कोण करणार ?

 • याचं एक उत्तर विमा हेही होऊ शकतं
 • आजच्या काळात माणसे सख्ख्या नात्यातल्या  लोकांची काळजी घ्यायला कचरतात .
 • ती जर आजारी पडली तर त्याचा खर्च हा त्याच्यासमोर एक यक्षप्रश्न प्रश्न असतो.
 • मग पाळीव प्राण्यांना जर आजार झाला तर?
 • त्यांच्यावर होणारा खर्च कसा करणार ?
 • अशा वेळी त्यांचा जर प्राणी विमा काढला असेल तर त्याचाही फायदा विमाधारकाला मिळतो

पाळीव प्राणी विमाचे फायदे ( animal insurance in marathi ) ,काय काय मिळतात?

1 जर एखादा पाळीव प्राणी आजारी पडला किंवा जखमी झाला असेल तर पाळीव प्राण्यांच्या पशु वैद्यकीय उपचारासाठी काही प्रमाणात रक्कम ही विमा कंपनी द्वारा मिळते
2 आकस्मिक कारणाने पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला तर विमा कंपनी द्वारा नुकसानभरपाई दिली जाते
3 जर एखाद्या व्यक्तीचा पाळीव प्राणी हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर त्यावेळी सुद्धा विम्याच्या योजनेनुसार काही रक्कम विमाधारकाला मिळून जाते
4  आजचे वैद्यकीय क्षेत्र जसे  अद्ययावत झाले आहे तसे तंत्रज्ञानामुळे खर्चाचे प्रमाण ही अतिशय वाढलेले दिसते
5  पशुवैद्यकीय औषध ,वैद्यकीय तंत्रे वापरत असल्याने मालकांना खर्चाचा अधिक ताण येऊ शकतो
6 आर्थिक तणावातून थोड्या प्रमाणात मुक्ती मिळण्यासाठी आपण जर आपल्या पाळीव प्राण्यांचा विमा काढला असेल तर खूपच बरे होईल
7 काही पशू प्रेमी प्राण्यांची काळजी एखाद्या आपल्या घरातल्या व्यक्ती सारखी घेत असतात
8  त्यामुळे प्राण्यांची जीवनशैलीत ही माणसांप्रमाणेच सुधारणा झालेली आढळते
9  तो खर्च पेलवण्यासाठी बाजारात प्राण्यांच्या विमा कडे बघण्याचा दृष्टिकोण आता सकारात्मक झालेला दिसून येतो.

आपले लाडके पाळीव प्राणी कोणकोणते ?

★ ज्यांचा जास्त प्रमाणात विमा उतरवला जातो ती मांजर ही बहुतांशी मध्यमवर्गीय असो वा करोडपतीच्या घरात सर्वात लाड करून घेणारी म्हणून प्रसिद्ध प्राणी आहे
★ सर्वाधिक प्रिय म्हणजे आपण स्वामीनिष्ठ कुत्र्याचा उल्लेख केला तर अयोग्य ठरत नाही व त्याच्या मालकांच्या विश्वास व प्रेमाच्या गोष्टी लहानांपासून  मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऐकायला आवडतात त्यांच्यावर बनलेले बॉलीवूड हॉलीवुड मधले सिनेमे पाहिले की सर्वच वयोगटातील लोक तन्मय होऊन जातात
★ घोडा इतिहासिक काळातील गरज असणारा व राजे महाराजांची शान तसेच स्वामीनिष्ठ म्हणून   ओळखला जाणारा दुसरा प्राणी आहे .मग ते राणा प्रताप चा चेतक असो वा शिवाजीची घोडी कृष्णा असो त्यांनी तर  इतिहासातील
एक सुवर्णपानच रेखाटलेले आहे

भारतातील पशु विमा ( animal insurance in marathi )याबद्दल आपण माहिती घेऊ:

 • घरातील पाळीव प्राण्यांमुळे आपल्या घराला एक चैतन्य आलेले असते –
 • उदाहरणार्थ – समजा तुम्ही एखादा कुत्रा पाळला असेल तर तो तुमच्यावर कोणत्याही स्वार्था विना अमर्यादित प्रेम करीत असतो ज्या वेळी तुम्ही तुमच्या ऑफिसमधून घरी येतात त्यावेळी तो तुमच्या येण्याची वेळ एकच असेल तर त्या त्या वेळी बरोबर आवाज काढत दारावर बसून असतो जशी तुमची एन्ट्री होते तो तुमच्यावर उड्या मारून आपले प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पाहिल्यावर आपल्याला निरातिशय आनंदच होणार नाही ?
 • अशा सच्या दोस्तासाठी नवीन कोणत्या पशु विमा योजना भारतात आणली आहे?
 • ती  योजना नेमकी काय आहे?
 • या योजने दरम्यान प्राण्यांच्या वैद्यकीय खर्च विमाधारकाला दिला जातो
 • पाळीव प्राण्यांना काही दुखापत झाली असेल किंवा कोणत्या अपघातात जखमी झाला असेल तर त्याचा एक वैद्यकीय खर्च विमा कंपनी उचलते
 • प्राण्यांच्या मृत्यू किंवा हरवल्यावर देखील कंपनी खर्च करते
 • चांगल्या  वैद्यकीय सुविधा देण्यासाठी विमाधारकाला विमा कंपनीकडून काही रक्कम मिळत असते

पाळीव प्राण्यांसाठी विमा ( animal insurance in marathi ) योजनांची मदत :

★ सानुकूलित योजना :

या योजनेअंतर्गत कुत्री, मांजरं ,पक्षी इत्यादी पाळीव प्राण्यांसाठी सानुकूलित पाळीव प्राणी विमा योजना उपलब्ध आहे

★आय आर डी मंजूर विमायोजना:

 योजनेला आय आर डी ए ने मंजुरी दिली आहे(आय आर डी ए )म्हणजेच ( विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ) याद्वारे अनेक पाळीव प्राणी या योजनेत येतात
 उदाहरणार्थ  – मांजर विमा ,गुरेविमा ,कुत्रा विमा ,घोडा विमा इत्यादी

 • या प्राण्यांसाठी 1000 ते 30 हजार पर्यंत ची विमा राशीची रक्कम ठेवलेली असते

★ॲड-ऑन कव्हर :

 • काही विमा कंपनी योजनेसाठी ऍड आन कव्हर देतात
 • ज्यावेळी काही प्राणी  थोड्या वेळासाठी शोमध्ये काम करत असतात आणि अचानक काही आजारपणामुळे त्याला तो शो  करता आला नाही
 • तर त्यात भरलेली रक्कम कंपनीद्वारे त्याला नुकसान भरपाई म्हणून मिळू शकते

★तिसरी पार्टी देयता:

 • जर तुमच्या पाळीव प्राण्यांमूळे कोणाचे नुकसान झाले असेल तेर  उदाहरणार्थ –
 • जर तुमचा पाळीव कुत्रा तिसर्‍या व्यक्तीला चावला किंवा त्याच्यावर हल्ला केला तर त्या व्यक्तीला लागणार्‍या वैद्यकीय सुविधा किंवा नुकसान भरपाई विमा कंपनी द्वारा मिळू शकते आपण तणाव मुक्त होऊ शकतो

पशु विम्याचे चे तीन प्रकार आहेत ते खालील प्रमाणे:

1 आजीवन कव्हर विमा
2 वेळ मर्यादित कव्हर विमा
3 पैशाची मर्यादा कव्हर विमा

1 आजीवन कव्हर विमा :

 • या विम्यामध्ये जीवनभर तुम्हाला तुमच्या पाळीव प्राणी व त्यांच्या मालकांचा कोणताही आजार संरक्षित करता येतो. व याची काळजी विमा कंपनी घेते
 • उदाहरणार्थ – एक्झिमा ,आर्थरायटिस इत्यादी आजाराचा समावेश यामध्ये केला जातो

2 वेळ मर्यादित कव्हर विमा:

 • या विमामुळे दर वर्षी ठराविक रक्कम विमाधारकाला मिळते.
 • या विमा नुसार पाळीव प्राण्याला अपघात झाला किंवा एखादा आजार झाला असेल
 • तर त्यादरम्यान व त्यानंतर काही काळपर्यंत विम्याचा आर्थिक लाभ विमाधारकाला उठवता येतो

3 पैशांची मर्यादा कव्हर विमा :

 • या विमा नुसार विमाधारकांना त्याची विमा कंपनी त्याच्या पाळीव पशू वर होणारा वैद्यकीय खर्च करण्यास मदत करते

पशु विमा हा शेतकरी, छोटे व्यावसायिकांना महा वरदान:

 • हो खरं आहे हे की पशु विमा हा शेतकऱ्यांसाठी किंवा छोट्या व्यावसायिकांसाठी एक वरदानच ठरतो.
 • कारण शेतकरी अनेक प्राणी पाळत असतात
 • पशुपालन हा त्यांचा शेती व्यतिरिक्त एक जोड धंदा असतो
 • जसे- डुक्कर, बकरी ,मेंढी ,कोंबडी यांच्यापासून शेतकरी तसेच छोट्या व्यावसायिकांना पैसे कमवण्याचे एक माध्यम झालेले असते
 • परंतु अशा प्राणी किंवा पक्षी यांना जर कोणता आजार झाला किंवा रोगाची साथ आली तर एकाच फटक्यात शेकडो कोंबड्या किंवा प्राणी मरू लागतात
 • आणि शेतकरी यांचे अतोनात नुकसान होते
 • अशा शेतकऱ्यां चे आणखी पैसे कमविण्याचे साधन असते- ते म्हणजे गाय, म्हैस यांच्यापासून बऱ्याच गोष्टी मिळतात त्यांना पाळणे हे होय
 • पण त्यांनाही आजारापासून सुरक्षित ठेवावे लागते आणि ते आवश्यक असते
 • जर या गुरा -ढोरांचा विमा काढला असेल तर विमाधारक तणावमुक्त राहून त्यांचे पालन करू शकतो
 • आणि त्याद्वारे तो पैसेही कमावू शकतो

पशुधन विमा आणि केंद्रसरकार :

 • पशुधन विमा योजना एक केंद्र विमा योजना आहे
 • ही  योजना 2005 पर्यंत सुरू झाली आहे.

ही योजना सुरु होण्यामागची कारणे होती-

     1 शेतकरी किंवा पशुपालन करणाऱ्या लोकां च्या प्राण्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे जर आर्थिक नुकसान झाले तर अशा लोकांची मदत करणे व त्यांना केंद्र सरकारच्या येणाऱ्या विम्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे एक

      2 या योजनेअंतर्गत संकलित किंवा देशी दूध देणाऱ्या मशीन चा विमा काढून तो सध्याच्या त्यांच्या मूळ किमतीवरून काढावा व विम्याचे प्रीमियम पन्नास टक्के अनुदानित ठेवलेले असते व अनुदान पूर्णपणे केंद्र सरकारद्वारा भरले जाते

★ केंद्र सरकारने अशा पशु विमा योजना निर्माण केल्या असल्या तरी सुद्धा महाराष्ट्रात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचा सहयोग आढळतं नाही
 ★ आजही हवी तशी जागृती ही  या विमा संदर्भात झालेली दिसून येत नाही
★ आणि त्यामुळे खुपसे शेतकरीही असतील किंवा असेही व्यावसायिक असतील की त्यांचे नुकसान झाले तरी आर्थिक नुकसान त्यांना स्वतःलाच हे उचलावे लागते आणि त्यामुळे त्यांचे जीवन होरपळून जाते
★ केंद्र सरकार जसे शेतकरी किंवा सर्वसामान्य व्यक्तींसाठी काही सुविधा योजना बनवित असतात
★  तसेच  जनतेने सुद्धा आपल्या साठी कोणत्या योजना, कोणत्या सुविधा या योग्य आहेत?
★ व कोणकोण नवनवीन योजना आपल्यासाठी येत आहेत? याची सतत माहिती घेत राहिले पाहिजे
★ यात आपलाच फायदा नाही का??

पशु विमा ची मदत कशाप्रकारे होते?

1 जर नैसर्गिक कारणाने पशूंचा मृत्यू झाला तर विमाधारकाला विमा कंपनी ही मदत करते आणि त्याची नुकसान भरपाई ही देते

उदाहरणार्थ -जसे पूर येणे ,आग लागणे ,वादळ येणे ,इमारती कोसळणे यासारख्या कारणांनी जर पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला व त्यासाठी ठरलेली नुकसानभरपाई विमाधारकाला विमा कंपनी देते

काही वर्षांपूर्वी मुंबई त गोरेगावला आरे कॉलनी मध्ये पावसाचे भरपूर पाणी साचले होते अतोनात वर्षा झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते आणि याचा फटकातेथील प्रसिद्ध अशा म्हशींच्या गोट्यांना पडला पावसात च्या पाण्यात  अडकून त्यांचा मृत्यू झाला पण तेथील लोकांनी किंवा संस्था नी पशु विमा नक्कीच काढला असेल आणि जेणेकरून त्यांना त्याचा नुकसान भरपाई मिळाली असेलच

Hyipothrmeya कव्हरेज:

“प्राण्यांचा मृत्यू जर पाऊस पडलयामुळे, गारा पडल्यामुळे बर्फ पडल्यामुळे अशा कारणाने झाला असेल तर विमा कंपनी विमाधारक व्यक्तीला  नुकसान भरपाई देते याला हाइपर्थरमिया कवरेज असे म्हणतात”

प्राण्यांचे शव उचलण्यास मदत:

 • शेतकरी किंवा व्यवसायिक एक जोडधंदा म्हणून प्राण्यांना पाळत असतो
 • जर ते प्राणी खूप संख्येमध्ये असतील व काही कारणाने त्यांचा मृत्यू झाला
 • तर एकदम शंभर दोनशे शव उचलण्यास ही तसाच खर्च येतो
 • कारण आजार आणि रोगामुळे प्राण्यांचा मृत्यू होतो
 • अशावेळी त्याचे शव उचलण्यास मजूर तयार होत नसतात
 • त्यासाठी त्यांना जास्त पैसे देणे आवश्यक होते
 • व अशा प्रकारचा खर्च हा विमा कंपनी उचलून विमाधारकाला एक प्रकारे मदतच करते
 • आणि विमा धारकाचा थोडा तरी ताण कमी करण्यास हातभार लावते

विषारी पाणी किंवा भोजना मुळे झालेला मृत्यू :

 • खूप वेळा प्राण्यांसाठी सुविधा ही बेफिकीर पणाने केलेली असते
 • त्याच्या भोजन तथा पाणी सर्व बाबींकडे लक्ष देणे जमत नाही
 • अशा विषारी अन्न किंवा पाणी पिण्यामुळे प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो
 • बहुतेक वेळा काही प्राणी हे नदी किंवा ओढ्याचे पाणी पितात
 • आणि त्याच्या द्वारे काही विषारी द्रव्य त्यांच्या पोटात गेले आणि जर त्यांचा मृत्यू झाला
 • तर या कारणाने सुद्धा विमा कंपनी विमाधारकाला आर्थिक मदत करते आणि नुकसानाची भरपाई करते

मेंढी बकरी विमा:

 • मेंढ्या किंवा बकरी पालन हा एक स्वतंत्र व्यवसाय तर आहे
 • पण शेतकऱ्यांसाठी एक जोडधंदा बनवू शकतो
 • अशा वेळी विम्याचे काही नियम हे असतात
 • प्राण्याच्या मृत्यूची नुकसान भरपाई उचलण्याची जबाबदारी विमा कंपनी घेत असली
 • तरी नैसर्गिकरित्या होणाऱ्या मृत्यूचे जबाबदारी ती घेत नसते
 • नुकसानीची भरपाई देताना प्रत्येक प्राण्याच्या वर्तमान स्थिती मध्ये असलेल्या किमती प्रमाणे त्याचे मूल्य ठरवले जाते
 • विमा काढताना प्रत्येक प्राण्यांचे स्वतंत्र मूल्यमापन करावयाचे झाल्यास
 • किंवा समूहा नुसार मूल्य करावयाचे झाल्यास त्याचा पण विचारा हा प्रीमियम भरतेवेळी केला जातो.

कोंबडीपालनासाठी विम्याची सुरक्षितता:

 • कोंबडी पालन व्यवसायही चांगलेच मार्जिन देणारा व्यवसाय आहे
 • अंडी ,चिकन किंवा त्याची शीट त्याच्या पासून बनलेले खत याचीही मागणी मोठ्या प्रमाणात आढळते
 • कोंबडी पालन मध्ये खूप जोखीम असते
 • शेतकरी आपला एक जोडधंदा म्हणून किंवा काही  व्यावसायिक कोंबड्या पाळून व्यवसाय सुरू करतात
 • एकाच वेळी हजारोंच्या संख्येने कोंबड्या या एकत्र पिंजऱ्यात बंदिस्त केलेल्या असतात
 • परंतु एखादा जर आजार किंवा रोग आला
 • तर मात्र एकाच वेळी शेकडोच्या संख्येने असे पक्षी मरतात
 • व एका फटक्यात मालकाचे लाखोचे नुकसान होते
 • ते टाळण्यासाठी जर अशा शेतकऱ्यांनी किंवा व्यवसायिकांनी विमा सारख्या योजनेमध्ये भाग घेतला तर त्याच्या नुकसानाची भरपाई होऊ शकते

Reed Also : Best three business ideas in २०२२ in marathi

कोणत्या कारणासाठी विमा संरक्षण विमा कंपनी देते:

1 तांत्रिक काही गडबड झाल्याने जर कोंबड्यांचा मृत्यू झाला तर विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास बाध्य असते
2 काही कारणाने अंडी देणे कोंबड्यांचे थांबले तर हेही कारण पुरेसे असते कारण अंडी विकणे व त्यातून पैसे मिळवणे हा या व्यवसायाचा एक मोठा भाग आहे
3 नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणाने जर कोंबड्यांच्या संख्येत विलक्षण घट झाली असेल तरी नुकसानभरपाईचा विमा कंपनी विचार करते आणि विमाधारकाला आर्थिक मदत करते

★ वरील कारणांचा विचार करून विमा कंपनी विमाधारकाला नुकसान झाले असेल तर पैशाच्या रूपात मदत करून सहकार्य करते

● विमा दावा :

◆ विमा दावा करतेवेळी:

 • विमा दावा मंजूर करण्याची विमा कंपनीची ची कारणे आहेत त्यात तुमच्या नुकसानाचे नाव आहे ना ?याची खात्री करून घ्या
 • विमा दाव्या साठी लागणारी महत्त्वाची व योग्य कागदपत्रे द्यावी लागतात ती नेहमी व्यवस्थित करून ठेवा
 • नुकसान झाल्यावर पंधरा दिवसा च्या आत सर्व कागदपत्र व विमा दावा ,विमा कंपनी कडे सादर करावा लागतो
 • एजंट किंवा विमा अधिकार यांच्या नजरेस विमा दावा करत असल्याचे दाखवून द्यावे लागते

पशु विमा बद्दल काही विशेष माहिती:

★ गाई-म्हशींच्या वर्तमान स्थितीतल्या बाजारभाव पाहून त्या रकमेचा विमा हा विमा कंपनी द्वारा उतरवला जातो
★ विमा हप्ता साठी 50 टक्के अनुदान मिळते हे संपूर्ण अनुदान केंद्र  सरकारकडूनच मिळून जाते
★  विमाधारकाच्या जास्तीत जास्त दोन जनावरांना किमान तीन वर्षापर्यंत चा विमा मिळतो
★ केंद्र सरकारकडून अधिकाधिक माहिती सर्वांकडे पोहोचवण्यासाठी खर्चही सरकार द्वारा पुरविला जातो

महाराष्ट्रातील पशु विमा योजने बद्दल उदासीनता:

★केंद्र सरकारने देशभरातील सर्व शेतकरी व सगळे पशुपालन करता ना मदत व्हावी त्यांच्या नुकसानाची भरपाई व्हावी म्हणून हया पशु विमा योजनेस सुरुवात केली होती
★ परंतु जसे इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विमा योजना घेतली गेली
★ तसे महाराष्ट्र राज्यात मात्र उदासीनता दिसून येते
★ महाराष्ट्रात बहुतेक शेतकऱ्यांना पशुधन विमा बद्दल माहिती नसते आणि त्यामुळे त्याचा लाभ घेऊ शकत नाही
★  महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसार प्रचार व्हायला हवा तसा न झाल्याने खूप कमी विमाधारक पशु विमा घेताना दिसून येतात
★ पण केरळ, हरियाणा ,आंध्र प्रदेश येथे जवळ जवळ हजारो ते लाखोंच्या संख्येने या योजनेचा लाभ करून घेणारे पशुपालनकरते दिसून येतात
★ दुभती जनावरे व त्यांची सुरक्षा तसेच शेतीसाठी आवश्यक जनावरांना सरकारकडून संरक्षण मिळण्यासाठी ही योजना केली असली तरी खूप लोकांपर्यंत ही योजना अद्याप पोहोचलेली दिसत नाही

● महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे मोठा गदारोळ माजलेला दिसतो
★परंतु अवर्षण हे जरी एक कारण असले तरीही ज्यांच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती ची कमी नाही किंवा कमी अधिक कितीही गुरे-ढोरे किंवा अन्य पशुपक्षी यांचे पालन केले जाते
★ त्यांनी आपल्या या पशुधन संपत्तीचे जर विमा योजनेत रूपांतर केले
★तर नक्कीच त्यांना एक बलशाली हात मिळू शकतो
★ अर्थात असा सुजाण विचार फक्त शेतकरी किंवा व्यावसायिक करू शकतात हो ना??

पशुधन विमा योजना व त्याचे निकष:

 • पशुधन म्हणजेच पशुपालकांची एक संपत्तीचे असते व अशा वेळी जर त्या धनाचे काही कारणाने नुकसान झाले जीवित हानी झाली तर सरकारकडून किंवा विमा कंपनीकडून त्याचे आर्थिक भरपाई विमाधारकाला मिळू शकते
 • आपल्या भारतातील तीनशे जिल्हे या योजनेमध्ये समाविष्ट झालेले दिसून येतात

निकष:

कोण त्या पशूंचा विमा काढला जाऊ शकतो:
★ पाच लिटर दूध देणारे प्राणी किंवा पशु यांचा विमा काढला जाऊ शकतो तसेच
★ 50 छोटे पशु म्हणजेच प्राणी यांचा विमा काढला जाऊ शकतो

पशु विमा कोणत्या परिस्थितीत विमाधारकाला संरक्षित करू शकतो:

1 अपघात सदृश्य घटना:
जर विमाधारकाच्या ठिकाणी पूर ,वादळ किंवा दुष्काळ यासारख्या नैसर्गिक घटनेमुळे पशुंची जीवित हानी झाली तर विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई देते
2 पशु ला झालेला आजार किंवा पसरलेले रोग यामुळे सुद्धा त्यांचा मृत्यू झाला तर सुद्धा विमा कंपनी मदत करते
3 सर्जिकल ऑपरेशन झाले असेल त्यावेळी विमा कंपनीचा ही आधार असतो
4 जर पशु ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी दंगे झाले संप किंवा नागरिकांचे मोर्चे निघाले आणि काही अघटीत रूप घेऊन पशुधनास हानी पोहचवली गेली आणि त्यामुळे जर पशूंची जीवित हानी झाली किंवा त्यांचा मृत्यू झाला तर विमा दावा केल्यास विमाधारकास त्याची आर्थिक मदत केली जाऊ शकते
5 आतंकवाद – हा एक महत्त्वाचा मुद्दा आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी होऊ शकतो. कारण असे देशविघातक गट समाजातील पशुधनाला धार्मिक वादाचा रंग लावून हल्ले करू शकतात आणि याही परिस्थितीत विमा कंपनी द्वारा विमाधारकाला आर्थिक स्वरूपाची मदत होऊ शकते

या कारणांमुळे विमा नुकसान भरपाई विमा धारकास मिळत नाही:

1 जर मुद्दाम हून किंवा जाणून बुजून अशी बेफिकीरीने काम केल्यामुळे पशुंचा जर मृत्यू झाला असेल तर-

उदाहरणार्थ

एखाद्या प्राण्याला जर ओझे वाहण्यासाठी उपयोगात आणले जात असेल आणि त्याच्या प्रकृतीची काळजी न घेता भारंभार ओझे त्याच्यावर लादले गेले असेल आणि त्याचा त्यात मृत्यू झाला तर विमा कंपनी अशा विमाधारकास नुकसान भरपाई म्हणुन काही रक्कम देत नाही
2 आजारी पडलेल्या जनावरांना जर वैद्यकीय सल्ला न घेता उपचार केले गेले व त्यात त्यांचा मृत्यू झाल्यास ती नुकसान भरपाई विमा दावा केल्यावरही मिळत नाही
3 विमा योजना स्वीकारण्या आधीच जनावरांना काही आजाराची लागण झाली असेल तेव्हाही विमा कंपनी भरपाई देत नाही
4 काही प्राण्यांची म्हातारपणात किंवा नको असलेल्या प्राण्यांना मुद्दामून ही मारले जाते विमा कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी हे असे कृत्य केले जाते हे समजल्यास विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास नकार देते
5  वारा किंवा समुद्रामुळे नुकसान झाल्यास त्यात पशूंचे जीवितहानी झाल्यास विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास बाध्य नसते
6 पशुंची काही चोरट्या मार्गाने विक्री केली जाते किंवा विमा आधारित पशू गायब झाले असते तरी विमा कंपनीकडे विमा दावा केला जाऊ शकत नाही आणि केल्यास तो स्वीकारला जात नाही
7 काही दूध देणारे पशु शारीरिक दृष्ट्या दूध देण्यास अक्षम असतात त्यांच्या बाबतीत ही नुकसानभरपाई मिळू शकत नाही
8 युद्ध किंवा त्याचा सदृश्य हल्ले व त्यामुळे होणारे पशुधनाच्या जीविताचे नुकसान यामुळे सुद्धा भरपाई मिळत नाही
9 पशुधन योजना घेतल्या घेतल्या तर पंधरा दिवसाच्या आतच त्या पशूंचा मृत्यू झाला त्या कारणांमध्ये सुद्धा विमा कंपनी विमा नुकसानभरपाई देत नाही
10 काही प्राण्यांमध्ये थोडी किंवा मोठ्या प्रमाणात विकलांगता असू शकते ती पण नुकसान भरपाई देण्यासाठी ग्राह्य मानली जात नाही
11 पशु विमा योजना घेतल्यावर प्राण्यांची ओळख होण्यासाठी त्यांच्या शरीरावर एक तास लावला जातो जेणेकरून विमा कंपनीला त्या प्राण्याची ओळख पटायला मदत होऊ शकते परंतु जर एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला परंतु त्या प्राण्याच्या शरीरावरील त्याचे अस्तित्व नसेल तर मात्र विमा दावा  करूनही त्याची नुकसानभरपाई विमाधारकाला मिळत नाही.

पशु विमा ( animal insurance in marathi ) काढताना विमा कंपनी कोणते निकष लावते?

1 पशु विमा काढताना विमा कंपनी सशक्त प्राण्यांचा विमा काढण्याची परवानगी देत असते व त्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी येऊन पशुपालकांच्या पशूच्या आरोग्याची तपासणी करतात व ते सर्व चाचण्या करून मगच त्या प्राण्याच्या कानाला आपल्या विमा कंपनीचा टॅग लावतात
2 विमा काढल्या जाणाऱ्या प्राण्यांचे सर्व कागदपत्र पशु विमा कंपनी आपल्याजवळ ठेवून घेते
3 पशु विमा काढताना त्याचा एक वर्ष किंवा तीन वर्षाचा विमा काढला जातो ज्या कालावधीचा आपण विमा काढतो आहोत त्या कालावधीत जर त्या प्राण्याचा मृत्यू झाला तर विमा कंपनी त्याला नु uiकसान भरपाई म्हणून काही आर्थिक मदत करते पण जर त्या कालावधीमध्ये त्या प्राण्यांचा मृत्यू नाही झाला तर मात्र नुकसान भरपाई मिळत नाही
4 विमा कंपनीतील अधिकारी कागदपत्रा बरोबर विमाधारकाला त्याचा फोन नंबर हि देतात ज्यामुळे पशूंच्या मृत्यूनंतर लगेच विमा कंपनीला कळवावे लागते त्यानंतर विमा अधिकारी कमीत कमी 24तास विमाधारकाच्या घरी येऊन राहतात व त्याच्या मृत्यूच्या निष्कर्ष काढतात
5 विमा दावा करताना पशूच्या कानाला टॅग लावलेला असतो तो विमा कंपनीचा असतो तोच निघाला असेल तर कंपनीला लगेच कळवून तो लावून घेतला पाहिजे जर असा टॅग प्राण्याच्या मृत्यूनंतर अधिकाऱ्यांना दिसला नसेल तर त्याची विमा नुकसान भरपाई  त्याला मिळत नाही.

नक्की वाचा : What Is Insurance In Marathi

● हा पशुधन विमा हा प्रत्येक पशुपालकांनी काढणे अत्यावश्यक आहे
★पण खबरदारी व डोळसपणे योजना वाचून समजून पडताळून घ्यावी
★ ही योजना आपल्या साठी उपयोगी आहे का ?
★त्या नियमांमध्ये आपण बसू शकतो का?
★ त्याचे प्रीमियम आपण भरू शकतो का?
★ याचाही विचार व्हावा

 ज्याच्याकडे जास्तीत जास्त पशुधन आहे त्याने मात्र अशा योजनेमध्ये सक्रिय होणे अति आवश्यक ठरेल.

1 thought on “पाळीव प्राण्यांसाठी विमा | Animal Insurance In Marathi 2022”

Leave a Comment