शेती विमा | Agriculture Insurance In Marathi 2022

शेती विमा | Agriculture Insurance In Marathi

भारत हा शेतीप्रधान देश म्हणूनच ओळखला जात असे भारतात 90 टक्के लोक शेती करून आपलं पोट भरतात आणि एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे शेती व्यवसाय योग्य ही होता खूप मनुष्यबळ  श्रमप्रधान असा हा व्यवसाय असल्याने खूप जणां च्या  सहभागाची त्यात आवश्यकता असे

Agriculture Insurance In Marathi
Agriculture Insurance

निसर्गावर अवलंबून शेती:

 • शेती हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरच अवलंबित असतो
 • पाऊस पडल्यावर शेतकरी पेरणी करण्याचा निर्णय घेतात त्यामुळे_
 • शेतकरी  धोका पत्करूनच्  तणावाखाली शेती करताना दिसून येतो
 •  पिके आल्यावर  खूप गोष्टींचा शेतकऱ्याला विचार करावा लागतो
 • पिकांच्या सुरक्षितते कडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवावे लागते
 • नाहीतर त्यांनी केलेले सर्व कष्ट  पाण्यात जाण्यासाठी वेळ लागत नाही

विम्याची गरज प्रत्येकाला:

विमा हा आपल्या स्वतःच्या व कुटुंबीयांच्या जीवितास हानी पोहोचली तर आर्थिक मदत व्हावी म्हणून व्यक्ती काढत असतात काही जण स्वतःच्या बहुतेक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी विमा करतात जसे की आपले घर कार्यालय ,दुकान ,गाडी इत्यादी चा विमा काढण्यास व्यक्ती नेहमीच तयार असतात.

विमा व नुकसान भरपाई:

 • प्रत्येक जण जसे आपले दुकान ,घर ,गाडी यांना आपली मौल्यवान संपत्ती समजत असतात
 •   त्यांच्या सुरक्षिततेसाठी विम्यामध्ये गुंतवणूक करतात
 •   जेणेकरून त्यांच्या मालमत्तेचे चे काही नैसर्गिक कारणांमुळे किंवा मानवनिर्मित कारणांमुळे आकस्मिक रित्या नुकसान झाले असेल
 • तर त्याची बहुतेक नुकसान भरपाई ही विमा कंपनी विमाधारकाला देण्याचे काम करत असते
 •   विमा कंपनी मुळे एक प्रकारे व्यक्ती म्हणजेच विमाधारक निर्धास्त राहू शकतो

शेतकऱ्याची खरी संपत्ती विमा:

 • शेतकऱ्याची ही खरी मालमत्ता त्याची शेती व त्यातले पीक हे असतेच
 • पण त्यावरही अनेक संकटे येत असतात
 • त्यामुळे त्याचे अतोनात नुकसान होते
 •   वर्षातून एकदा केलेली शेती व त्यातून येणाऱ्या अन्नधान्य तून तो पूर्ण वर्षाची आपली सोय करत असतो
 • तेच धान्य विकून इतर सर्व खर्च तो भागवीत असतो
 • कुटुंबीयां चे पोट भरणे
 • आणि त्याच वेळी पूर्ण देशातील जनतेचे ही तो पोट भरत असतो
 • त्यामुळे त्याला विम्याची नितांत गरज असते
 • जेणेकरून त्या नुकसानभरपाई मुळे तो परत आपलं जीवन जगायला स्वाभीमानाने सुरुवात करू शकेल

शेतकऱ्याची हलाखीची परिस्थिती:

 • शेतकरी सुद्धा आपल्या मुलांनी शिकून-सवरून नोकरी करावी असे म्हणत असतो
 •   पण हे देशाच्या दृष्टीने किती हानिकारक आहे
 • जर शेतकरी शेती करणार नसेल तर-
 •   पीक कशी घेणार ? व अन्नधान्य नसेल तर आपण काय करणार ?
 • कितीही आपल्याजवळ पैसे असतील तरीही जगण्यासाठी अन्नच लागते नाही का ?
 • पण नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन जातो
 • आणि आत्महत्या करण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा पर्याय राहत नाही
 • पण जर -आपण म्हणजे शेतकऱ्याने आपल्या शेताचे किंवा विविध पिकाचे विमा योजनेमध्ये सहकार्य घेतले तर, विमा कंपनी द्वारा नक्कीच साथ मिळेल असे आशावादी चित्र उभ राहील हो नक्कीच!!

शेती विमा म्हणजे काय?? | what is agriculture insurance in marathi

 • शेतीही निसर्गावर अवलंबून असते
 • पाऊस पडला तरच, शेतकरी शेती व्यवसायाला सुरुवात करतात
 • नाहीतर फक्त पावसाची वाट पाहण्यात त्याचा वेळ जातो
 •   नैसर्गिक आपत्ती ,कीड व पिकांवर येणाऱ्या रोगांमुळे पिकांचे जे काही नुकसान होते ते नुकसान भरून काढण्यासाठी विमाधारकाला विमा कंपनी नुकसान भरपाई देते त्याला शेती विमा म्हणतात
 • तो एक शेतकरी व विमा कंपनी या मध्ये असलेला एक लिखित करार असतो
 • जो काही नियम व अटीन वर आधारित असतो
 • ही विमा कंपनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान  भरून देण्याची हमी उचलते
 • पण त्यासाठी शेतकऱ्याला विमा कंपनीचे नियमित प्रीमियम म्हणजेच हप्ते भरावे लागते

शेतकऱ्याने शेती विमा का काढावा??

1 शेतकऱ्याने नक्की शेती विमा काढावा कारण त्यामुळे त्याच्या पिकाचे झालेले नुकसान त्याची विमा कंपनी भरून देऊ शकते
2 शेतकरी स्वतःची जमीन कसत असला किंवा कुणासाठीही तो शेती करत असेल तरीही त्याला विमा कंपनीकडून विमा नुकसान भरपाई मिळू शकते
3 पीक पेरणी ते पीक काढणीच्या कालावधी मध्ये कीड रोग लागला किंवा नैसर्गिक आपत्ति झाल्यास विमा कंपनी शेतकऱ्याला त्यासंबंधी जोखीम उचलण्यास मदत करते.

शेती विमा चे काही फायदे | benefits of agriculture insurance in marathi

१ शेतकरी निर्धास्तपणे शेती करू शकतो
२ भविष्यात शेती व्यवसायाकडे एक आशावादाने लोक पाहू शकतील
३ नुकसान भरपाई मिळाल्याने नवीन जोमाने पुन्हा शेतकरी काम करण्यास उद्युक्त होईल
४ पूर येणे ,शेतात पाणी साठणे ,गारपीट पडणे ,अवेळी पाऊस येणे किंवा पीक वाहून जाणे या आपत्तीमध्ये विमा कंपनी विमा नुकसान भरपाई देऊ शकते
पीक कापणीच्या दिवसापर्यंत पीक वादळ ,अतिपावसामुळे, अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांनी दावा केल्यानंतर दावा रक्कम मिळू शकेल

या कारणामुळे शेती यामध्ये नुकसान भरपाई मिळू शकत नाही ती कोणती कारणे ते आपण पाहूया-

1 मानव निर्मित आपत्ती चा विमा नुकसान भरपाई मिळत नाही जर मुद्दामहून काही माणसांनी पिकांची नासधूस केली असेल आग लागली असेलविमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही
2 उदाहरणार्थ पिकाला आग लागणे  पिकांची चोरी होणे सारख्या गोष्टी मध्ये विमा कंपनी जोखीम उचलत नाही

शेती विमा त्रुटी – तसेच शेतकऱ्यांची नाराजी:

 1. शेतकऱ्यांनी विमा काढल्यावर हप्ते ही भरले पण नैसर्गिक आपत्ती आली तरी ही भरपाई मिळत नाही अशी बहुतेक शेतकऱ्यांची तक्रार आहे
 2. मुख्य कारण म्हणजे या विम्यामध्ये अनेक नियम व अटी आहेत त्यामुळे सरळ-सरळ ,सहजासहजी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे शेतकरीही थोडेसे नाराज आहेत.
 3. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते त्या वेळी विमा कंपनीकडून त्यांच्या शेताचे सर्वेक्षण केले जाते
 4. विमाधारकाच्या शेता बरोबरच इतर शेजारील शेती पाहूनच मग नुकसान भरपाई किती आणि द्यावी का नाही हे ठरविले जाते
 5. उदाहरणार्थ- जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर गारपीट पडले असेल पण बाजूच्या शेतावर गारपीट नाही पडली तर विमा कंपनीकडे नुकसानभरपाईचा दावा केला तरीसुद्धा विमा कंपनी सर्वेक्षण करून आजूबाजूचा अंदाज घेत विमाधारकाला नुकसान भरपाई द्यावी का नाही हे विचार करते त्यामुळे पुष्कळदा एकट्या शेतकऱ्याचे नुकसान असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळतच नाही त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज असतात
 6. काही शेती विमा योजना या सरकारी आहेत त्यांनी जिल्ह्यासाठी काही कंपन्यांची निवड केली होती की त्यांच्या कडून शेतकऱ्यांना शेती विमा निवडताना किंवा नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होईल परंतु त्या कंपनीच्या कार्यावर ही शेतकऱ्यांमुळे प्रश्नचिन्ह उभी राहिली  आहेत
 7. अशीच काही कारणे आणि घटनांमुळे शेतकऱ्यांपेक्षा कंपनीलाच फार मोठा लाभ झालेला दिसून येतो काही अहवालानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नुकसान झाले असले तरी न मिळता विमा कंपनीच्या या खात्यात कोट्या वधी रुपये आल्याचे समजते
 8. जशी घर विमा, वाहन विमा यामध्ये विमा धारकाचे वैयक्तिक नुकसान झाले असेल आणि त्याने विमा दावा केला, असेल तर त्याला त्याच्या नुकसान अनुसार भरपाई मिळून जाते .
 9. शेती विमा मध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक रूपातही नुकसान झाले असेल तर त्याला तसेच वैयक्तिक स्वरुपात भरपाई मिळावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे पण तसे मिळत नाही आणि त्याला काही कारणेही आहेत

शेती विमा अधिकाऱ्यांच्या सूचना:

1 अतिपाऊस, कीड ,रोगांच्या प्रादुर्भावामुळे चे शेताचे नुकसान होते ,ते शेती विमा मुळे भरून निघते शेतकरीही निश्चिंत झाले .म्हणून ,आपत्ती आली तरच नुकसान भरपाई मिळेल इतर विमा सारखी हे मनाशी पक्के करावे.
2 या योजनेअंतर्गत काही शेतकरी हप्ते भरताना त्यात सातत्य ठेवत नाही नाही तेही बरोबर नाही
3 ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी त्यांच्या बँकेचे हप्ते भरतात ,त्या बँकेत जाऊन 48 तासांच्या आत आपल्या विमा कंपनीकडे नुकसानभरपाईसाठी विमा दावा करावा .मगच ,त्याचा पंचनामा करून विमा कंपनी मदत करू शकते

सरकारची शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना :

१ या योजनेअंतर्गत स्वतःच्या मालकीची शेतजमीन कसणारा शेतकरी हा या योजनेचा फायदा घेऊ शकतो
२ कुणी शेतकरी दुसऱ्यांची जमीन कसत असेल त्यालाही त्याच्या नुकसानीची भरपाई मिळू शकेल
३ या योजनेच्या अंतर्गत खरीप हंगामात अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी विमा हा संरक्षित रकमेच्या दोन टक्के हप्ता असा मिळू शकेल
४  व रब्बी हंगामामध्ये 1.5% हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा असतो
६ नगदी पिकांसाठी खरीप हंगामाकरिता विमा कंपनी विमा साठी संरक्षित रकमेच्या पाच टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावयास सांगतात
७ उर्वरित हप्त्याची रक्कम मात्र केंद्र आणि राज्य सरकारकडून दिली जाते.

नुकसानभरपाई मिळण्यासाठी काय करावे:

1 फळपिकांसाठी च्या विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी विमा रकमेची माहिती करून घ्यावी
2  गारपिटीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीची प्रथम संपर्क साधावा व आपली तक्रार किंवा आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडावे
3 कृषी विभाग विमा कंपनीसोबत वैयक्तिक पातळीवर नुकसान प्रमाण निश्चित करावं
4 हवामान केंद्रातील जोडल्यास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होते
5 विभागानुसार कंपन्यांची निवड प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यांवर केलेली असते त्यांचे त्या-त्या जिल्ह्यावर नियंत्रण असते
6 पिकांचे नुकसान झाल्यास पीक काढणीनंतर 14 दिवसात कृषी विभागाकडून पंचनामे केले जातात
7 पंचनामा झाल्यावर विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या नुकसानाची खात्री वाटल्यास ते नुकसान भरपाई त्याच्या खात्यात जमा करतात
8 त्याच्यासाठी शेतकऱ्यांनीही आपले नुकसान झाल्यावर अठ्ठेचाळीस तासांच्या आत विमा कंपनीकडे विमा दाव्या साठी अर्ज केला पाहिजे.

नक्की वाचा : What Is Health Insurance In Marathi

अशाप्रकारे  शेतकऱ्यांसाठी सरकार व विमा कंपनी यांनी नुकसान भरपाई साठी मदतीचा हात शेती विमा काढून केला आहे पण काही गैरसमजामूळे किंवा परिस्थितीमुळे अज्ञानामुळे सुद्धा हा शेती विमा ( agriculture insurance in marathi ) घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत नाही यासाठी दोन्ही कडून म्हणजे विमा कंपनी सरकार आणि विमाधारक म्हणजे शेतकरी यांच्या समन्वयदाखवून मार्ग काढला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भारत शेतीप्रधान देश म्हणून परत आपले स्थान मिळू शकेल व आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना जगण्याचे बळ मिळू शकेल

Vist Also : maymarathi.com

1 thought on “शेती विमा | Agriculture Insurance In Marathi 2022”

Leave a Comment